निशेच्या गाभा-यात चंद्र मंदपणे तेवतोय
त्यातून पाझरणा-या चांदण्यानं
अंतरंग उजळून निघतंय...
रात्रीचं आणि माझं...
धुक्याच्या शालीसारखा चंद्रप्रकाश
आसमंतावर येऊन विसावलाय
चंद्राचं पाणी दिल्यासारखा
कणन् कण उजळलाय...
त्या भारलेल्या कणांतून प्रकट होते तुझी सावली
माझ्या पावलांना सोबत करत चालत येते ती पुढे
एकामागोमाग एक अशा सावल्यांची रांग लागते
मी उगाच तिष्ठत राहतो त्या रांगेत...
प्रत्येक सावलीचं मला येऊन बिलगणं होतं
आमचं हसणं होतं, रडणं होतं
समुद्रावर बसून बदलल्या वा-याचा आवाज ऐकत
एकमेकांत उतरणं होतं...
जुन्या सुकल्या तळांना खरवडत राहतो मी
पाण्याचा टिपूसही लागत नाही हाताला
जाणवत राहते डोहातली कोंदट हवा
माझ्यातच साचून राहिलेली...
ह्रदयाच्या देठापासून निघालेला कोंब
जमिनीत गाडून आता मुक्त होतोय
माझे बंध आता मलाच ठाऊक
आता स्वतःच्याच जाचातून मोकळा होतोय
तुझ्या सावलीच्या पदरात दान देऊन
मी पहाटेच्या उंब-यावर येऊन उभा आहे
ठरवलेली पहाट... ठरवलेली जागा...
ठरवलेला आनंद... ठरवलेला प्रवास...
त्यातून पाझरणा-या चांदण्यानं
अंतरंग उजळून निघतंय...
रात्रीचं आणि माझं...
धुक्याच्या शालीसारखा चंद्रप्रकाश
आसमंतावर येऊन विसावलाय
चंद्राचं पाणी दिल्यासारखा
कणन् कण उजळलाय...
त्या भारलेल्या कणांतून प्रकट होते तुझी सावली
माझ्या पावलांना सोबत करत चालत येते ती पुढे
एकामागोमाग एक अशा सावल्यांची रांग लागते
मी उगाच तिष्ठत राहतो त्या रांगेत...
प्रत्येक सावलीचं मला येऊन बिलगणं होतं
आमचं हसणं होतं, रडणं होतं
समुद्रावर बसून बदलल्या वा-याचा आवाज ऐकत
एकमेकांत उतरणं होतं...
जुन्या सुकल्या तळांना खरवडत राहतो मी
पाण्याचा टिपूसही लागत नाही हाताला
जाणवत राहते डोहातली कोंदट हवा
माझ्यातच साचून राहिलेली...
ह्रदयाच्या देठापासून निघालेला कोंब
जमिनीत गाडून आता मुक्त होतोय
माझे बंध आता मलाच ठाऊक
आता स्वतःच्याच जाचातून मोकळा होतोय
तुझ्या सावलीच्या पदरात दान देऊन
मी पहाटेच्या उंब-यावर येऊन उभा आहे
ठरवलेली पहाट... ठरवलेली जागा...
ठरवलेला आनंद... ठरवलेला प्रवास...
No comments:
Post a Comment