प्रश्नांचं निवडुंग उगवावं ते किती?
काट्यांची अधीरता रुतावी ती किती?
किती वेळा छाटावं त्या मुजोर रोपांना?
पुन्हा फुटणारे कोंब उपटावेत तरी किती?
निसटून गेलेल्या क्षणांमागे धावावं तरी किती?
त्या क्षणांचे स्वतःला दोष द्यावेत तरी किती?
पाडव्यात तरी किती भेगा त्या जीवाला?
त्या भेगांचे भोग आता भोगावेत तरी किती?
आपुलीच दैना आपण पाहावी तरी किती?
उसने हसू मागून आणावे तरी किती?
आपल्याच पाठीवर किती फेरावा हात तो?
त्या गदगदल्या हातापासून डोळे लपवावेत तरी किती?
जन्मोजन्मीचे हे दुरावे साहावेत तरी किती?
निष्पर्ण कोरड्या सरी झेलाव्यात त्या किती?
या अनवाणी पावलांनी हुंदके का दाबले?
दबल्या हुंदक्यांचे काटे आता बोचावेत तरी किती?

No comments:
Post a Comment