Sunday, May 21, 2017

तू आणि मी

सकाळी डोळे किलकिले करण्‍याच्‍या आधी
तुझी मिठी माझ्याभोवती पडलेली असते
तुझे ओठ माझ्या गालावर विसावत असतात
मी झोपेतून जागा होऊन
एका मऊसूद स्‍वप्‍नाच्‍या काठावर उभा राहतो
थोडा जागा... थोडा निजलेला...
अजूनही स्‍वप्‍नात असल्‍यासारखा

तुझ्या सोबतीचं मंद समाधान पांघरुन
मी विसावत जातो तुझ्या बाहुपाशांत
तुझं अल्‍ल्‍डपण, तुझा निरागसपणा,
तुझी माया, तुझा जिव्‍हाळा...
सारं काही दिवसाच्‍या पहिल्‍या क्षणातच दाटून येतं
सूर्योदयापूर्वी आकाशात पसरणारे रंगच जणू

तुझ्या सहवासानं, त्‍या स्‍पर्शानं
माझी प्रत्‍येक सकाळ नव्‍याने जन्‍म घेत जाते
तुझं सतत माझ्याभोवती बागडणं
भिरभिरणा-या फुलपाखरासारखं असतं
अन् तुझ्यामुळे मी मलादेखील भासू लागतो
एखाद्या फुलासारखा...

मी अनुभवलीय तुझी अस्‍वस्‍थता
मी दूर असतानाची...
मी अनुभवलीय तुझी काळजी
मला होणा-या छोट्या-मोठ्या त्रासातली
तुझा तो ओलावा, माझ्या कणाकणातून पाझरत जातो
त्‍या आल्‍हादक अनुभवात चिंब भिजत राहतो मी

तुझ्या माझ्यासोबत असण्‍यानं मी जपला गेलोय...

Wednesday, April 26, 2017

संजयकाका

मी लहान होतो तेव्‍हा पुस्‍तकांची प्रथम ओळख झाली ती संजयकाकांच्‍या वर्तमानपत्राच्‍या दुकानात! चांदोबा, चंपक, ठकठक आणि दोन-दोन रुपयांची छोटी छोटी पुस्‍तकं. माझी आई मला माझ्या प्रत्‍येक परिक्षेच्‍या शेवटच्‍या पेपरला एक पुस्‍तक घेऊन देई. पण ते घरी आणल्‍याबरोबर अर्ध्‍या तासात वाचून पूर्ण होई आणि पुढच्‍या पुस्‍तकासाठी चार महिने वाट पाहावी लागे.

संजयकाकांना वाचनाचा छंद. ते पेपरच्‍या दुकानात पाठीमागेच छोटीशी लायब्ररी चालवत. स्‍वतः वाचत आणि इतरांनाही वाचायला देत. पण त्‍यांना जास्‍त वाचक कधीच लाभले नाहीत. त्‍या छोट्याशा लायब्ररीतून त्‍यांना काय उत्‍पन्‍न मिळत असे कोण जाणे? पुढं कळलं, तो उद्योग पैसे मिळवण्‍यासाठी नव्‍हता. आजही नाही.

वाचनाची आवड वाढत गेली तसा मी चंपक-ठकठक वरून इतर पुस्‍तकांकडे वळलो. काकांच्‍या लायब्ररीतली पुस्‍तकं चाळत राहिलो. त्‍यांच्‍या दुकानावरचा पेपर तर रोजच घरी यायचा. पण काकांनी कधी पेपरचं बिल किंवा लायब्ररीची फी म्‍हणून विचारली नाही. कधीतरी मलाच आठवण यायची. ''अरे! पेपरचं बिल फारच तुंबलंय.'' मग मी थोडेसे पैसे काकांना देऊन येई. तेही शांतपणे वही काढून त्‍यात हिशोब मांडत. पण त्‍यांनी उरलेल्‍या पैशांचा तगादा सोडा, साधी विचारपूसही कधी केली नाही. त्‍या सा-या आठवणी बावीस-तेवीस वर्षांपूर्वीच्‍या! आता घरात स्‍वतःची छोटी लायब्ररी आहे. त्‍यातली पुस्‍तकं आता मोठ्या दुकानांमधून येतात. म्‍हणून काकांच्‍या दुकानात पुस्‍तकांसाठी जात नाही. काही वर्तमानपत्रांकडून सवलतीत पेपरदेखील घरी येतो. पण मी काकांच्‍या दुकानावरचा पेपर सुरूच ठेवला आहे. जाणिवपूर्वक! ते नातं तोडावं असं वाटलं नाही!

मी आणि माझ्या मित्रांनी मिळून या वर्षीच्‍या 'जागतिक पुस्‍तक दिना'ला 'बुकशेल्फ' नावाचं युट्यूबचं चॅनेल सुरू केलं. वाचक-प्रेक्षकांचा छान प्रतिसाद मिळाला. काही वर्तमानपत्रांनी 'बुकशेल्फ'ची बातमी छापली आणि परवा आई म्‍हणाली, _''अरे संजयकाका म्‍हणत होते तुला भेटायचंय म्‍हणून.''

ऑफिसमधून परतताना काकांच्‍या दुकानावर गेलो. काका एकटेच बसले होते. दाढीची खुटं पांढरी झालेली जाणवली. पुढे स्‍टॉलवर वर्तमानपत्रं आणि पाठीमागे काचेच्‍या कपाटात वाट पाहणारी पुस्‍तकं. मी हलकंसं हसून काकांसमोर बसलो. ते सांगू लागले.

''मी त्‍या दिवशी पहाटे दुकानावर आलो. 'सामना' उघडला आणि दुस-याच पानावर तुझा फोटो. सोबत 'बुकशेल्फ'बद्दल माहिती होती. खूप खूप छान वाटलं वाचून! मग विचार आला. आपण आपल्‍या या लायब्ररीकडे हवं तसं लक्ष दिलं नाही. चालतेय म्‍हणून चालू ठेवली. पण तुझा तो प्रयत्‍न वाचला आणि म्‍हटलं लायब्ररीसंदर्भात काहीतरी नवं करता येईल. तू जरा सांग ना कसं करू ते?''

मी लहानपणी ज्‍या लायब्ररीतली पुस्‍तकं हरखून पाहिली-वाचली, आज तिच लायब्ररी कोणत्‍या नव्‍या कल्‍पनेनं चालवूया असं काका विचारत होते. कपाटांत एकट्या बसूून राहिलेल्‍या पुस्‍तकांची खंत त्‍यांच्‍या चेह-यावर जाणवत होती. माझ्या आत कुठंतरी हलका गहिवर दाटला होता. मी काही कल्‍पना सुचवल्‍या. पण काकांच्‍या डोक्‍यात ते आधीच कुठंतरी असावं. कारण ते स्‍वतःच वेबसाइट, ॲप वगैरे भाषा बोलू लागले. त्‍यांच्‍या डोळ्यात छान उत्‍साह झळकत होता. मी निघताना छान हसत म्‍हणाले, ''मला असा कुणीतरी पुश द्यावा लागतो. आता करूया!''

किती छान वाटलं मला!

आमचं 'बुकशेल्फ' हा तसा छोटासाचं प्रयत्‍न! पण संजयकाकांमुळे त्‍यातली एक शक्‍यता जाणवून गेली. असं हे आणखी घडावं असं वाटतंय.

माझ्या या अनुभवासह 'बुकशेल्फ'चा 'रुपवेध' पुस्‍तकाचा व्हिडीओ तुमच्‍यासमोर पुन्‍हा ठेवतोय. तुम्‍ही पाहिला नसेल तर नक्‍की पाहा. आणि जर पाहिला असेल तर न विसरता पुढे पाठवा. कदाचित आणखी एखादे संजयकाका असेच वाट पाहात असतील.

छोट्याशा पुशची!

Friday, April 21, 2017

बीजांकूर

स्‍वस्‍थता लोपली
अज्ञाताच्‍या डोही
तिच्‍या उरी बीजांकूर
प्रभातीच्‍या निर्मितीचा

Friday, March 10, 2017

औलाद

सपने टुटे
चिखे चिल्‍लाए
दुनिया की खामोशी मे
किसी ने ना सुने

जख्‍म तडपे
दिनदहाडे
सारी खुली ऑंखो से
ओझल रहे

झुलसती रही
हर सोच मेरी
मंजिले चढती रही
बेफिक्रीयोंकी

और कोशिशो की
आहटे
रोंदी गई
कुचली गई...

दुनियोवालो
ना दीया करो
मेरी हैवानीयत को
खुदा का वास्‍ता

यू डराना
खुद की औलाद को
ये अच्‍छी बात
नही होती!

Tuesday, March 7, 2017

क्षणानंद

क्षण आला
मज लाभला
मनी स्पर्शला
बिलगून बसला

दिन गेले
राती सरल्या
मन अंगणात
क्षण रूजला

कैक आले
कैक गेले
मन अंतरी
क्षण जपला

पाने पिकली
नाती सुकली
गात्रे थकली
क्षण उरला

नाद गुंजला
मनी पसरला
क्षणानंद हा
कालातीत!

Tuesday, January 10, 2017

सातवा

चमच्यांच्या स्टँडवर
सात चमचे होते एक चमचा एक दिवशी
गहाळ झाला
उरलेल्या सहांच्या गळ्यातून
प्रथमच
अनावर हुंदका फुटला
‘ती असती तर’ – ते उद्गारले,
तो हरवला नसता
मीही अनावरपणे
सातवा चमचा झालो
आणि त्याची रिकामी जागा घेउन
सहांच्या हुंदक्यात
सामील झालो – आणि
पुटपुटलो;
खरं आहे, मित्रांनो
ती असती तर
मी हरवलो नसतो.

- कुसुमाग्रज

Monday, January 9, 2017

दास्‍तान


कामयाबी से हसीन
राह हर कोशिश की है
उन राहो के नक्क्षेकदम
है हर सफर की दास्‍तान

Saturday, January 7, 2017

यल्‍गार!

ए मुसाफिर चलता जा
बेखौफ तू तेरी राह पर
जुस्‍तजू का लुत्फ उठा
फासलो का ना तू खयाल कर

जो मुश्‍कील नही वो राह नही
फिर जिंदगी से तकरार क्‍यू?
आरजू जन्‍नत की है
तो दर्द से इन्कार क्यू?

तेरा अक्‍स भी मुझ्तार है
खुद से तेरा यल्‍गार है
मुकालिब हो तू डर से तेरे
खुद ही का हो तू राहबर

तू सफर से इखलास रख
जिंदा तू तेरी प्‍यास रख
उस मोड पे है सेहर तेरी
तू सब्र रख... उम्‍मीद रख

सर उठा तू सॉंस ले
ना रोक तू तेरे कदम
हर लम्‍हा तू जी ले जरा
आगाज कर... यल्‍गार कर