Tuesday, February 28, 2023

बंदगी

तेरी याद आते ही
जो कशिश जागती है दिल में
ख़ुदा की बंदगी
इस से अलग न होगी

Monday, February 27, 2023

डर

ड़र
अकेलेपन से ज़्यादा
अधुरा होने का होता है

Thursday, February 23, 2023

ये कैसी कश्मकश

ये कैसी कश्मकश है
के कहना भी तुम्ही से है
और छुपाना भी...

Wednesday, February 22, 2023

ए चाँद

ए चाँद ना बहा अश्क तू ज़मीं से बिछड़ के 
ऐसा तो नहीं उसे प्यार नहीं तुझ से
ज़मीं अपने दायरे मे इश्क तो किया करती है
वरना क्यों घूम ज़ाती होगी ये दुनिया हर रोज़
बस तुझे इक नज़र फ़िर देख़ने के लिए...

ज़ानता ही नहीं

मुझे कभी कभी तू
समझ़ मे नहीं आती
और कभी कभी लगता है
तुझे मुझ़सा कोई ज़ानता ही नहीं

Tuesday, February 21, 2023

घर

शाम होते ही
मेरी हर याद, मेरा हर ख़याल
तुम्हारे पास लौट आता है
और ज़ाऊँगा भी कहाँ?
तुम घर ज़ो हो मेरा!

Sunday, February 19, 2023

अर्थ

तुम्हारा अस्तित्व
किसी और के लिए महत्त्वपूर्ण होना,
ज़ीवन मे इस से बड़ा अर्थ
कोई हो नहीं सकता

Friday, February 17, 2023

खुशबू

तुम जब भी मुझसे मिल कर जाते हो  अपनी सारी खुशबू मेरे बदन पर छोड कर जाते हो अब मैं न्हा भी लु तो मैं जानती हूं  कै रोज तक ये खुशबू कही नहीं जाने वाली...

- शायरा

Thursday, February 16, 2023

दिल मे सुकून था!

लोकल ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसलो होतो. ती ट्रान्सजेंडर पैसे मागत आली. आताशा मी त्यांच्यामुळे पूर्वीसारखा अनईझी होत नाही. पण मी त्यांना कधीच पैसे देत नाही. ती समोर येऊन हात पसरुन उभी राहिली. चेहरा गोड, आकर्षक! मी कधी नव्हे ते तिच्याकडे जाणिवपूर्वक एकटक पाहत राहिलो. ती माझ्या नजरेला मनावर न घेता निघून गेली. पण मी तिला मनात घोळवत राहिलो.

कसं जमत असेल गर्दीतून निर्लेप फिरत राहणं? हे असं पैसे मागताना तिला कधी कुणी ती माणूस आहे असं फिलिंग देत असेल का?
का असे प्रश्न येतायत माझ्या मनात? कदाचित माझं मन सध्या भावविभोर झालंय, म्हणून की काय...
दोन दिवसांनी ती पुन्हा आठवली. तिच्याबद्दल काय-बाय वाटत मी काही ओळी लिहील्या. मी त्यात 'मला तुला घट़ट मिठी माण्याची इच्छा झालीय. यावेळी भेटशील तेव्हा हे करेन नक्की.' असं लिहून गेलो...
चार दिवस उलटले.
पुण्यावरुन मुंबईला आलो. दादरवरून बोरीवली लोकल पकडली. तो लोकलचा डबा पाहिला तसं मी लिहिलेल्या त्या ओळी आठवल्या. 'या क्षणी कुणी ट्रान्सजेंडर डब्यात आली तर तिला मिठी मारण्याची हिम्मत आहे का माझ्यात?' त्या विचारानं छातीवर दडपण आलं. मी तसं केलं नाही तर कुणाला कळणार होतं? पण मी ते लिहून आलो होतो!
जर जमणार नव्हतं तर का लिहावं माणसानं? माझी संवेदना लिखित शब्दांपुरतीच मर्यादीत आहे का? एक ना अनेक प्रश्न...
माझ्या त्या स्थितीची जणू परिक्षा पाहिल्यागत दोघी ट्रान्सजेंडर डब्यात शिरल्या. त्या माझ्याजवळ आल्या तेव्हा मी खिशातली एक नोट पुढे केली. तिनं ती घेतली आणि माझ्या डोक्यावर हात ठेऊन काहीतरी पुटपुटली. मला विचारायला धीर झालाच नाही. तिनं रांगेतल्या सगळ्यांकडे पैसे मागितले. ती जाऊ लागली तेव्हा छाती धडधडली. वेळ निघून चालल्यासारखं काहीतरी. जाता जाता तिनं माझ्या खांद्यावर हात ठेवला.
मी चटकन विचारलं, "तू गले गलेगी मेरे?"
ती खाली वाकली. डाव्या हाताचं बोट स्वतःच्या नाकावर मारत तिनं विचारलं,
"सेक्स चाहिए?"
मी म्हटलं "नहीं."
तसं तिनं दुसराही हात माझ्या खांद्यावर ठेवला.
"क्यों? प्यार नहीं मिला?" (काय काय पाहिलंय हिनं? मनात विचार येऊन गेला.)
"नहीं! बस ऐसे ही गले लग जा!"
तिनं दोन हात हळूच पुढे केले. मी उठून उभा राहिलो. तिला छान मिठी मारली. दूर होताना अगदी सेकंदभर तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ थांबला. तिचे डोळे जरा जवळून पाहता आले. ती निघून गेली. मी खाली बसलो.
डबा भरलेला होता. मी कुणाच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही. टाळलं नव्हतं, गरज वाटली नव्हती.
खाली बसलो तेव्हा मी नवं-वेगळं काही केल्याचं फिलिंग मनामध्ये नव्हतं. जे होतं ते साधेपणानं सहज घडून गेलं. शब्दाला जागण्यासाठी मी लिहिलेल्या शब्दांनी मलाच बळ द्यावंसं काहीतरी...
मै मेरे लफ़्ज़ो के साथ वफ़ादार रह सका,
दिल मे सुकून था!

बहुत सारी तुम!

मेरी कविता में
कुछ कवी है
कुछ उनकी रचनाएँ है
थोड़ा ज़ीवन है
थोड़े शब्द है
और बहोत सारी तुम!

झोप

रात्रीचे अडीच वाजलेले. कुणीतरी भराभरा हलवून उठवल्यागत माझे डोळे चटकन उघडले. जाग आल्याबरोबर मनात आलेला पहिला विचार, 'तिच्यासोबत बोलणं पूर्ण झालं होतं ना!?'
मोबाईल आठवला!
उजवा हात झोपताना स्वतःच्याच अंगाखाली सापडलेला. मुंग्या आलेल्या भयानक. हात हलवू वाटत नव्हता. पण त्याचं हाताने कसल्याशा घाईने मोबाईल उचलण्याचा प्रयत्न. तो उचलता येईचना, इतक्या मुंग्या! पण मन म्हणतंय, की या क्षणी मोबाईल घेतलाच पाहिजे. स्क्रीन उजळली. तुझ्या मेसेजचं नोटीफिकेशन येऊन पडलं होतं. असं झोपेतून उठून पाहावं आणि तुझा मेसेज आलेला असावा हे किती सुखय ना!
मेसेज येऊन फक्त पाच मिनिटं झाली होती. जणू तुझा मेसेज आलाय म्हणून मला जाग आलीय! वेडसर विचार.
वाचू लागलो. तू अशी मधूनच सुरु झालीस. मी वाचत गेलो आणि छाती धडधड करु लागली. आणखी... आणखी...
तू मला हे सगळं काय सांगत-म्हणत होतीस मला काहीच कळत नव्हतं. मी हे असं कधी केलं? मी कुठे असा विचार केला तुझ्याबद्दल? एका क्षणात छातीतले सगळे अवयव कुणीतरी काढून घ्यावेत आणि त्या पोकळीत वारं भिरभिरत राहावं, अशी अत्यंत विचित्र फिलिंग आली.
मी निद्रा आणि जागेपणीच्या सीमारेषेवर घुटमळत होतो. तुझा मेसेज वाचताच झटका बसावा तसा अंथरुणात उठून बसलो. काही वेळ काहीच कळलं नाही. अर्धमिटल्या डोळ्यांत नुसतीच भयस्वप्न फिरत राहिली. काहीच कळेना. संदर्भ लागेना. मी उठलो. डोळ्यांवर पाणी मारलं. झोप दूर सरकली. मेसेज पुन्हा वाचला. यावेळी अर्थ लागला. तू तुझ्या ब्लॉगसाठी लिहिलेला तो स्फूट होता. पण माझी धडधड काही कमी होईना. अजूनही होत नाहीए.
माझ्या काळजाचं पाणी पाणी झालंय हे वाचून. हे असं इतकं समोरच्याची धडकन थबकेल असं कसं लिहितेस? तुझी ही पात्रं मनावर कसला वार करतात माहितीए! आणि हे सगळं एकटेपण, नात्यांची रुढीबाज आवरणं दूर करत तू मांडत असलेलं भावनांचं शहाणपण, हे सारं कुठून येतं गं?
तुझा नवरा किती करंटा आहे गं! छ्या्! का नाहीए पाहात तो तुझ्याकडे? तू कॉलेजमध्ये जेव्हा लेक्चर घेतेस, टिचर्स रुममध्ये विविध मुद्द्यांवरुन हुज्जत घालतेस किंवा तुझ्या ब्लॉगवर लिहितेस, तेव्हा तुझी ती रुपं पाहून मी किती भारावलेलो असतो. मला फार फार शोधू-पाहू वाटते तुझ्या मनातली खळबळ. तुझ्या कवितांमधली सल मला अस्वस्थ करत जाते. तुझ्याशी कितीही बोललो, तुझं लिहिलेलं कितींदाही वाचलं, तुझ्या सोबत फिरलो तरीही मला तुझं सारं रुप पाहताच येत नाही. तू हे असे लिहिलेले तुकडे मला वेळी-अवेळी पाठवत राहतेस. मी तुझ्या या कृतीला जवळीक समजून त्यावर गुजराण केल्यासारखा राहतो. मी इथं तुला पूर्णार्थानं पाहण्यासाठी तळमळतोय आणि त्याला तुला साधं पाहावं-स्पर्शावंसंही वाटत नाही. नशीब इतकं विचित्र असावं?
मला या क्षणी येऊन तुला घट्ट मिठीत घ्यायचंय. कुठंचं जाऊ द्यायचं नाहीए. तुझ्याबद्दल आकर्षण वाटतंच, पण आताचं हे वाटणं सेक्शुअल नाहीए. मला फक्त आणि फक्त तुला धरून ठेवावंसं वाटतंय. तू हरवण्याचं भय का दाटून आलंय मनात? तुला असं मनविभोर करुन टाकणाऱ्या गोष्टी लिहिताना पाहिलं-वाचलं की माझा ऊर प्रचंड भरून येतो! हा चालू क्षण खूप विचित्र भासतोय. या क्षणात जर माझा जीव तुझ्या हातात ठेऊन तुला वाढवता-फुलवता आलं असतं ना, तर मी आनंदानं केलं असतं. ही काय फिलिंग आहे माहित नाही.
माझी धडधड कमी होत नाहीए... छातीत भिरभिरणारी वावटळ थांबण्याचं नाव घेत नाहीए...
आठवलं! तू मघाशी स्वप्नांत होतीस कुठेतरी... काहीच आठवत नाही पण होतीस.
झोपण्याचा प्रयत्न करतो. गुड नाईट!

Wednesday, February 15, 2023

ओ वाचक! तुमचं प्रेमपत्र आलंय!

'धर्मरेषा ओलांडताना' हे हिनाचं पुस्तक पुण्यातील 'साधना' प्रकाशनच्या कार्यालयात व्हॅलेन्टाईन्स डे च्या गोड मुहूर्तावर प्रकाशित झालं. विषय, विचार, लेखन अशा सगळ्याच तऱ्हेने हिनाचं-साधनाचं हे पुस्तक महत्त्वाचं आहे. तिने लिहिलेलं पुस्तकातील मनोगत मला खूप विशेष वाटलं. कन्टेन्टच्या पलीकडे जात लेखनाचा ओघ, मांडणी, संयतता, लिखाणातील तोल आणि फर्मनेस अशा बऱ्याच पातळ्यांवर ते प्रभावी आहे. ते वाचत असताना आपली ही हुशार मैत्रिण इतकं भारी लिहू लागली असल्याचं नव्याने जाणवलं आणि खूप ऊबदार फिलिंग येतं गेलं. ते मनोगत वाचकांशी बोलतं! एखाद्या प्रेमपत्रासारखं! पुस्तक ज्या विचारसरणीतून-धडपडीतून घडलं तो विचार विशेष आहेच, पण त्या सोबत हे पुस्तक जो परिणाम करू पाहतंय तो देखील तितकाच महत्वाचा आहे. प्रेमाबद्दलचा विचार आणि विश्वास डेव्हलप करणारं हे पुस्तक तुम्ही जरुर विकत घ्या. पुस्तक अमेझॉन किंडलवर ईबुक स्वरूपात उपलब्ध आहे.
मी आजवर पाहिलेला हा पहिलाच अस्सल अनौपचारिक कार्यक्रम. कार्यक्रम रंगतदार झाला तो साधनाचे संपादक विनोदी शिरसाठ यांच्या सहजसोप्या संवादाने. पुस्तक प्रकाशन कोणाच्या हस्ते करायचे आहे हे कार्यक्रम सुरू झाला तरी ठरलं नव्हतं. पुस्तकात जिच्यावर लेख आहे ती प्रज्ञा केळकर सिंग तिथे उपस्थित असलेली दिसली आणि तिच्याच हस्ते प्रकाशन करायचं ठरवलं. केलं देखील! उपस्थित असलेली यच्चयावत मंडळी स्वतःच्या ओळखीसह हे पुस्तक, हिना आणि तिचं लेखन याबद्दल मनमोकळेपणानं बोलले. साधनाच्या सुहास पाटील याने साने गुरुजींची प्रार्थना सुरेल गायली. त्यानंतर आम्ही छान छान फोटो काढले. कालचा कार्यक्रम नितळ आनंद देणारा होता.

धर्मरेषा ओलांडताना
आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलाखती
संवादक - हिनाकौसर खान
साधना प्रकाशन
पृष्ठसंख्या - 222
मूल्य - 300 रुपये
संपर्क - 020 24459635 / 70582 86753

Tuesday, February 14, 2023

खिडकी

गम के अंधेरे मे डूबी
इस दुनियाँ मे
तुम्हारी हसी
किसी खिडकी की तरह खुलती है!

जश्ऩ

हमे प्यार है तुम से
ये हम ने किसी से कहाँ तो न था
फिर क्यों ये दुनिया आज़ जश्ऩ मना रहीं है
तेरे मेरे प्यार का?

प्रेम

मेरी आत्मा को गले लगानेवाले वो सारे शब्द
जिस किसी ने लिखे थे
जो लिख रहे है
और जो लिखेंगे
मै तुम सब से प्रेम करता हूँ!

Sunday, February 12, 2023

रुठेंगे

आज रुठेंगे तुमसे
देख़ते है मनाते कैसे हो!

ये करुंगा जरुर

तुम यूँ साड़ी पहनकर हात फैलाए
झूठी-सच्ची हँसी लेकर गुज़र ज़ाती हो भीड़ से
कमलपत्ते पर पानी की बूँद चलती हो ज़ैसे
तू ये कैसे करती है बता?
तू कितनी सूख़ ज़ाती होगी रे अंदर से?
मै तुझे बाहों मे भरना चाहता हूँ इक बार, बड़े प्यार से...
और चुराना चाहता हूँ तेरी थोड़ी हँसी
जो कर्ण की कवचकुंडल की तरह अभेद्य लगती है मुझे
अब की बार तुझे मिलूँगा, तो ये करुंगा जरुर...

ठंड़ बहोत है...

तुम अगर आज़, यहाँ, इस वक्त़ मौजूद होते
तो झट से गले लगा लेता तुम्हें
तुम्हारे दिल की गर्मी से
थोड़ा सेंक लेता मै खुद़ को
आज़कल एहसासों की दुनियाँ में
ठंड़ बहोत है...

Friday, February 10, 2023

बिछड़ना

सुझी हुई कविता का 
कागज़ तक आते आते बिछड़ ज़ाना
प्रेमी के बिछड़ ज़ाने के बराबर होता है

इज़हार-ए-महोब्बत

मला जे सांगावसं वाटतं ते या जगात फक्त तुला ऐकू जातं असं वाटतं मला. मला आजपर्यंत कुणाबद्दलच असं - एवढं - इतकं छान वाटलेलं नाही. ही फिलिंग अशी माझ्या आत छान पसरत जाते. रोपट्याला जमिनीतून पाणी मिळावं अशी काहीतरी. तुला भेटावसं वाटतं मला! म्हणजे तू शेजारी बसलेली असशील तरीही. आणि तुला भेटण्यासाठी तू शेजारी असणं गरजेचंही नसतं. तुझ्याकडे खूप काही मागावंसं वाटतं आणि नकोही असतं. हा संभ्रम किंवा गोंधळ नाहीए. तर अशी खूप खूप प्रोफाउण्ड फिलींग आहे जिचा चटकन अर्थ लागत नाही. त्यामुळे याला जर इज़हार-ए-महोब्बत म्हणायची असेल तर म्हणूयात.


 

Wednesday, February 8, 2023

बाहों मे

तेरी बाहों मे खुद़ से रुबरु होंगे
ये सोचा न था
दिल-ए-चैन इतना है के दुआ करते है
ये दुआ आखरी हो!

Tuesday, February 7, 2023

ये तेरी मेरी कहानी

तेरा मेसेज मिला. अरसो बाद!

इस रात के सन्नाटे मे तेरी आवाज कितनी अलग लगती है! कानो के इतने नज़दिक... मुझे गुदगुदी सी होती है. तू यहाँ थी, तब भी मेरे कानो मे यूही बोला करती थी. और ये तेरी आवाज के पीछे टिक टिक करनेवाली (शायद दिवार की) घड़ी! हाथों से छुटते पलो की तरफ़ सुई से इशारा करती हुई...

जब तुने वो नज़्म मोबाईल पर रिकॉर्ड कर के मुझे भेजी, तब मै चौक गया था. मै मेरी कहानीयाँ तुझे अक्सर भेज़ा करता था. उन के बारे मे तो तुने कभी कुछ बोला नहीं! फिर आज़ ही चुप्पी क्यों तोड दी?

पर तेरी नज़्म बड़ी पसंद आयी मुझे. कितना कुछ कह दिया उस ने! मानो किसी ने मेरे अंदर की बेबसी को लफ़्जो से खिंच कर बाहर निकाला हो.

तेरी नज़्म जो बयान करती है वो सच तो है. ये कहानीयाँ सच मे तकलीफ़ पहुँचाती है. तू भी तो ज़ानती है!

मुझे कभी कभी मेरे तख़य्युल से बड़ा ड़र लगता है. ना ज़ाने कब कैसी कहानी और कैसे किरदार पेश कर दे! फिर उन कहानियों को ले कर ज़ीना पड़ता है. मरना भी पड़ता है. किरदारो का बोझ उठाते उठाते कुली बन जाता हूँ. वो जहाँ ले जाते है वहाँ चला जाता हूँ. वो जहाँ मुडे वहीं मूड भी जाता हूँ.

क्यों करता हुँ ये? शायद अच्छा लगता है मुझे ये, या शायद ज़रुरत है मेरी. इस जिंदगी के ऐसे कितने पल है जो मै जी न सका, शायद इस के आगे भी कभी ज़ी ना पाऊं. वो, ज़ो मै कभी हो न सका, उस मै की तलाश मे इन किरदारो के साथ ख़ानाबदोश की तरह फ़िरता रहता हूँ. उस पल की तलाश मे, जो मुझे पुरा कर दे. क्या ऐसा कोई पल दुनिया मे है?

फ़िर ये किरदार सहारा बन जाते है मेरा. इन के साथ छुटे पल ज़ीने की नाकाम कोशिश करता हूँ.  कोई ख़ुशी या सुकून ढुंढ भी लू तो वो मिलता भी कितना है? बस पलभर का... उस एक पल से दिल का गुज़ारा नहीं होता. ना दिल भरता है - ना संभलता है. बस चकनाचूर हो कर उन सारे जिये पलो मे तिनके तिनके मे बटता रहता है...

क्या उस इक पल की ज़िंंदगी के लिए इतनी ज़द्दोज़हद ठिक है?

क्या कोई सिर्फ एक कहानी तेरी-मेरी मर्जी की नहीं हो सकती?

इन्ही कहानियों से पैदा हुए ये भगवान, ज़िज़स या ख़ुदा... इन मे से किसी के पास भी दिल नहीं?

सच कहा है तुने! कहानिया तकलिफ़ जरूर देती है. पर फ़िर भी इन्हें लिख़ता रहता हूँ. अब यही वज़ह बन चुकी है मेरे ज़ीने की. तकलिफ़ दे या सुकून, ज़हन मे पैदा होनेवाली अगली कहानी का, अगले किरदार का इंतज़ा तो होता ही है मुझे! एक इंतज़ार ये भी है के कोई कहानी लिख़ते लिख़ते मै भी पुरा हो जाऊ...

तू सात समंदर पार दुनिया के किसी कोने मे बैठ कर मेरी कहानीयों का यू नज़्मो मे ज़वाब दे रही है, मानो मैने कोई चिठ्ठी लिख़ी हो तुझे!

अब तुने चुप्पी तोड़ ही दी है तो फ़िर बता! कहा ले जाए ये तेरी-मेरी कहानी? बनेगी मेरी कहानी का किरदार? या ये कहानी लिख़ कर करेगी मुझे पुरा?

---

ये अगर खत होता तो कह देती किसी रोज मैने कहा ही था,

तुम कहानी लिखो तो मुझे ज़रूर लिख़ना. मेरे होने के कई रंग तुम से बेहतर कहाँ किस ने ज़ाना है और कहाँ किसी ने तुमसे बेहतर मुझे पढा है। तुम्हारी कहानी में मैं बिलकुल मैं रहूँगी, पानी की तरह, न मेरा कोई एक आकार न रूप न रंग न मुझे बहने से रोका ज़ा सकता है न मुझे हवा बनने से न फिर बारीश की तरह बरसने से। मेरे किरदार की रोचकता तुम्हारे नोन जजमेंटल अप्रोच में है।  बिना किसी प्रिज्युडाईसेस से सिर्फ तुम समझ सकते हो, तो तुम मुझे जरूर लिखना।  मेरे कही-अनकही से, मेरी सोच और धारणाओं से तुम जैसे मिल पाए उतनी तो कोशीश किसीने मुझ से भी मिलने की नहीं की। ☺️

काळाघोडा फेस्टीव्हल - सुख

'काळाघोडा फेस्टीव्हल'मध्ये इन्स्टॉलेशन लावलेल्या परिसरात शिरलं की समोरचं एक मोठ्ठी पॅरागॉनची चप्पल ठेवलेली दिसते. तिचे निळे बेल्ट स्लाईडमध्ये कन्व्हर्ट केलेत. लहानांसोबत मोठी माणसंसुद्धा लहान होऊन त्यावर घसरगुंडी खेळत होते, फोटो काढत होते. पनवेलच्या 'भारत स्कूल अॉफ आर्ट'च्या अर्यांश सिप्पीला नेमकं हेच हवं होतं. त्याच्या कल्पनेतून साकार झालेल्या, त्याने आणि सिद्धेश्वर चौधरी यांनी मिळून तयार केलेल्या या आकर्षक-मजेदार इन्स्टॉलेशनं नाव आहे 'सुख'!

मी तिथं पोचलो तेव्हा एक मुलगी गळ्यात हात अडकवून तिथं उभी होती. मी विचारलं, हे तयार करण्यामागचा विचार काय? तर तिनं 'हे सगळं याच्या डोक्यातून आलंय' असं म्हणत अर्यांशची ओळख करुन दिली. तो म्हणतो, की आपल्या आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी-वस्तू आपल्याला सोबत करतात. पण त्यांकडे आपलं कधी लक्षच जात नाही. अर्यांशला 'चप्पल' ही तशी, आपल्याला सोबत करणारी गोष्ट वाटते. त्यानं विचारलं, की तुला चप्पल म्हटलं की काय आठवतं?

मी म्हटलं, गीत चतुर्वेदीची ओळ - तुम्हारे बिना उतना ही अकेला हूं, जितना एक पैर की चप्पल! (तशीही त्यानं तिथं एकाच पायातली चप्पल ठेवली होती!)

तो दिलखुलास हसला. म्हणाला, प्रत्येकाचा कनेक्ट असाच वेगवेगळा. मला बालपण आठवतं. या पॅरागॉनच्या स्लिपर घालून मी जोरजोरात धावायचो, पडायचो, पुन्हा उठून धावायचो. आजच्या आयुष्यात खाली पडणं-अयशस्वी होणं हे नैराश्याकडे घेऊन जातं. मला या इन्स्टॉलेशनमधून आपल्या सर्वांच्या आयुष्यातला हा खाली-वर जाण्याचा प्रवास मजेदार असू शकतो हे सुचवायचं आहे. म्हणून आम्ही 'भारत स्कूल अॉफ आर्ट'च्या अप्लाईड आर्टसच्या विद्यार्थ्यांनी चपलेची स्लाईड साकारली.

कल्पना छान, साधीसोपी होती. सादरीकरण आकर्षक होतं. पण अर्यांशची ते सारं सांगण्याची, डोक्यातलं प्रत्यक्षात उतरवण्याची एनर्जी जास्त आवडली. त्याच्यासोबत फोटो काढून घेतला.

Monday, February 6, 2023

क्यों?

तुम ज़ब भी मुझे बाहों मे समेट लेते हो
ये वक़्त रुक सा क्यों जाता है?

Saturday, February 4, 2023

चल दिए हो

चल दिये हो हमारे शहर से बिना बताए
कभी तुम्हारे ख़्वाबो से गुज़र जायेंगे
और तुम्हे ख़बर तक ना होगी! 

---

इतल्ला न करने की बेशक खता हुई
मगर बस शहर से गये है
दिल से नहीं।
- शायरा

Thursday, February 2, 2023

इत्मीनान से

नज़रअंदाज़ कर के हमे
इत्मीनान से बैठो हो तुम
तुम्हारी पलके उठने के इंतज़ार मे
हमारा दम निकलेगा उसका क्या?