Showing posts with label काव्‍यसंग्रह. Show all posts
Showing posts with label काव्‍यसंग्रह. Show all posts

Friday, November 8, 2024

तुझेच मी गीत गात आहे (शिर्षकगीत)

नसे एकटी मी, जरी दूर तू
तुझी ओढ अजून काळजात आहे
मनाच्या रानात दरवळणारा
तुझ्या आठवांचा पारिजात आहे

येशील परतून आस ही वेडी
तुझे नाव दाही दिशांत आहे
ज्यात गेलो होतो वाहून दोघे
ओंजळीत अजून ती लाट आहे

दिल्या घेतल्या, वचनांची त्या
श्वासांत हळवी चांदरात आहे
तुझ्या सूरांची शपथ घेऊनी
तुझेच मी गीत गात आहे...

 


 

Tuesday, January 10, 2017

सातवा

चमच्यांच्या स्टँडवर
सात चमचे होते एक चमचा एक दिवशी
गहाळ झाला
उरलेल्या सहांच्या गळ्यातून
प्रथमच
अनावर हुंदका फुटला
‘ती असती तर’ – ते उद्गारले,
तो हरवला नसता
मीही अनावरपणे
सातवा चमचा झालो
आणि त्याची रिकामी जागा घेउन
सहांच्या हुंदक्यात
सामील झालो – आणि
पुटपुटलो;
खरं आहे, मित्रांनो
ती असती तर
मी हरवलो नसतो.

- कुसुमाग्रज

Saturday, May 3, 2014

उदास ढग

युगायुगांचा उदास ढग मी
अजून फिरतो तुझ्यात बघ मी
तुझे न येणे जणू असे कि ...
शरीर आहे तरी विलग मी
दिवा विझावा कसा तनाचा
अजून माझी मलाच धग मी
हसावयाला नसेल कारण
उगाच घेतो रडून मग मी
तुझ्यात माझी असो आठवण
तुझेच देतो तुलाच जग मी
किती कथांच्या कितीक कविता
मलाच वाचू कसा सलग मी


- सौमित्र

Saturday, March 15, 2014

खूप माणूस होऊन

आतून सारखा झिनझिनाट,
खूप माणूस होऊन जगावं 
खूप माणूस होऊन जगावं 

कुणी पडताना दिसताच 
धावून सावरावं 
झडताना दिसताच 
पाणी होऊन मुळापर्यंत पोहचाव 

लिन चेहऱ्याच्या गर्दीन 
ओळखीचं हसावं 
अनोळखी माणसातही 
पाहताक्षणी घुसावं 

शब्द इतके सरळ यावे 
समोरच्याच्या हृदयात शिरवे 

चोराला मिठी मारताच 
अपराधबोध जन्मावा 
पिसाटाच्या डोळ्यात पाहताच 
रक्ताच्या उसळ्या थांबाव्या 

बाईला बाईपण मुलाला मूलपण 
माणसाला माणूसपण देता यावं 

ठेवता यावा हिजाड्याच्याही खांद्यावर हात 
मंदावालेल्यांची वात उजळता यावी 

ऐकू यावा छोट्यातला छोटा आवाज 
करता यांव त्याला कवितेत मोठा 
सोसता यावे सगळे आघात 
देता यावं प्रत्येक प्रतिकाराला बळ 

थांबावं आपल्या उंचीचं सतत घटत जाण 
संपाव नेहमीचं सतावण 

फेर धरून नाचणारी 
सत्व गमावल्याची जाणीव 
नाहिशी व्हावी कायमची 

डोळ्यांदेखत सुटून चाललेली भाषा 
यावी परत हातात 

माणूसपण सांडाव डोळ्यांतून 
बोलण्या चालण्यातून करण्याधरण्यातून 
देण्याघेण्यातून 

सुटावा घमघमाट माणूसपणाचा 
अन वेढून टाकाव त्यानं 
सगळ्या बकालपणाला 
कवटाळून टाकावं कोरडेपणाला 

माणूसपणाचे दाटून यावे काळेभोर ढग 
सांधावं तडकलेल्या मातीला 

खूप माणूस होऊन जगायचंय 
खूप माणूस होऊन जगायचंय 
पुटपुटत खिसे चाचपडताना 
गवसावा हरवलेला बंदा रुपया …

- प्रफुल्‍ल शिलेदार

Monday, August 12, 2013

रचना

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले;

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!

- विंदा करंदीकर

Friday, August 9, 2013

ही माझी प्रीत निराळी

ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु: खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि: संग

शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग

सवयीचा परिसर इवला
घे कुशीत शिंदळवारा
देहाची वितळण सारी
सोन्याहून लख्ख शहारा

तू खिन्न कशाने होशी
या अपूर्व संध्याकाळी
स्तनभाराने हृदयाला कधी
दुखविल का वनमाळी

- ग्रेस

Tuesday, August 6, 2013

मर्म

ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!

…असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये

- ग्रेस
(चंद्रमाधवीचे प्रदेश)

Saturday, August 3, 2013

पाऊस आला

उत्‍तररात्रीचा पाऊस आला
सुगंध मातीचा कोमल आला

फांद्यांनी मिटले हिरवे डोळे
जांभळा डोंगर झोपेत न्‍हाला

झेलून सरींची ओलेती मिठी
वा-याच्‍या मनाचा झोपोळा झाला

कौलारांवरती अदृश्‍य परी
थेंबांच्‍या फुलांचा घेऊन झेला

मेघांची पालखी आभाळी झुले
पाऊसराजाचा सन्‍मान झाला

सरींनी घातली स्‍वप्‍नांना मिठी
पाऊस आला रे, पाऊस आला

- मंगेश पाडगावकर

Friday, August 2, 2013

अजून काही

तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही

जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा
खुली व्यथांची सताड दारे अजून काही

तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही

गडे मला सांग माझीतुझी वदंता
विचारते गाव हे बिचारे अजून काही

तुम्ही कुठे आमच्या दिशा बंदिवान केल्या ?
सणाणती बंडखोर वारे अजून काही

थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हेका–
‘अजून गा रे.. ‘अजून गा रे .. अजून काही..’

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही!

विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही

- सुरेश भट

Wednesday, July 31, 2013

मृत्यू

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानीला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली।

- भाऊसाहेब पाटणकर

Monday, July 29, 2013

आसवांचा येतो वास

कसे कसे हसायाचे
हसायाचे आहे मला

हासतच वेड्या जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे आणि कुणापास?
इथे भोळ्या कळ्यांनाही
आसवांचा येतो वास

- आरती प्रभू

Saturday, July 27, 2013

एवढे दे पांडुरंगा

माझिया गीतात वेडे
दु:ख संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमॄताचे फूल यावे!

आशयांच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा!

स्पंदने ज्ञानेश्वराची
माझिया वक्षांत व्हावी;
इंद्रियांवाचून मीही
इंद्रिये भोगून घ्यावी!

एकनाथाने मलाही
बैसवावे पंगतीला;
नामया हाती बनावे
हे जिणे गोपाळकाला!

माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे;
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे!

मी तुक्याच्या लोचनांनी
गांजल्यासाठी रडावे;
चोख वेव्हारात माझ्या
मी मला वाटून द्यावे!

ह्याविना काही नको रे
एवढे दे पांडुरंगा!
ह्याचसाठी मांडीला हा
मी तुझ्या दारात दंगा!

- सुरेश भट
(रंग माझा वेगळा)

Sunday, July 21, 2013

काहूर

घन झाकळती नभ
घंटा निनादते दूर
मला कळेना कशाचे
मनी दाटते काहूर...

अशा काहूरास नाही
रूपरेषा नावगाव
हिमकालातील धुके
नसे आशय ना भाव...

तरी करपते त्‍याने
माझ्या चेतनेचे पाख
नसे निवारा ना जाळ
तरी साचे मनी राख...

- कुसुमाग्रज

Thursday, July 18, 2013

साफसाफ

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही

हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही

जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही

मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही

थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्‍या कसलीच खंत नाही

मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही

दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)

मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!

– सुरेश भट (एल्गार)

Sunday, July 14, 2013

वणवण

रुणझुणत राहिलो किणकिणत राहिलो
जन्‍मभर मी तुला 'ये' म्‍हणत राहिलो

सात्‍वनांना तरी ह्रदय होते कुठे?
रोज माझेच मी मन विणत राहिलो

ऐकणारे तिथे दगड होते जरी
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो

शेवटी घर राहिले सुनेच्‍या सुने
उंब-यावरच मी तणतणत राहिलो

विझत होते जरी दीप भवतालचे
आतल्‍या आत मी मिणमिणत राहिलो

दूर गेल्‍या पुन्‍हा जवळच्‍या सावल्‍या
मी जसाच्‍या तसा रणरणत राहिलो

मज न ताराच तो गवसला नेमका
अंबरापार मी वणवणत राहिलो

- सुरेश भट

Friday, July 12, 2013

समजावुनी व्यथेला समजावता न आले!

समजावुनी व्यथेला समजावता न आले!
मज दोन आसवांना हुलकावता न आले!

सर एक श्रावणाची आली … निघुन गेली…
माझ्या मुक्या ञुषेला पण बोलता न आले?

सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले!

चुकवुनही कसा हा चुकला न शब्द माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले!

लपवीत गीत माझे पळ काढला तरीही
ह्रदयांतल्या विजांना झिडकारता न आले!

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखरे माझे मज टाळता न आले!

- सुरेश भट

Thursday, July 11, 2013

आसवांचे जरी हसे झाले!

आसवांचे जरी हसे झाले!
हे तुला पाहिजे तसे झाले!!

चंद्र आला निघुनही गेला!
ऐनवेळी असे कसे झाले?

शोधुनी मी तुला कुठे शोधु?
चेह-याचेच आरसे झाले!!

पाहिले दुःख मी तुझे जेव्‍हा!
दुःख माझे लहानसे झाले!!

आग ओकून मी किती ओकू?
शब्‍द सारेच कोळसे झाले!!

संपले हाय बोलणे माझे!
जे तुझ्याशी कसेबसे झाले!!

- सुरेश भट


Thursday, July 4, 2013

... Until We Meet Again

Those special memories of you
will always bring a smile
if only I could have you back
for just a little while

Then we could sit & talk again
just like we used to do
you always meant so very much
and always will do too

The fact that you are no longer here
will always cause me pain
but you are forever in my heart
until we meet again.

Wednesday, June 26, 2013

भल्या पहाटे निघून आले!

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !

तुझ्याच स्वप्नात रात गेली…तुझ्याच स्वप्नात जाग आली…
तुझ्याच स्वप्नात जागणा-या जगातुनी मी उठून आले !

विचारले मी न अंबराला.. विचारले मी न वारियाला …
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले !

अताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेही नाही…
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले !

- सुरेश भट

झंझावात…

जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी
आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी

झाले कशाचे बोलणे? केले जरा मन मोकळे!
माहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा


बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
कुठल्याच दारी मी कधी केली न कागाळी तुझी


मजला असे पाहू नका …. रस्त्यावरी थांबू नका 
माझ्या भविष्याची मला नाही जराही काळजी


जे राहिले सांगायचे ते टाळले अजिबात मी
मीही अताशा ऐकतो ….. दिसलो म्हणे इतक्यात मी

कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी
नाराज आयुष्या तुझी घालू कशी रुजुवात मी?


तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा? बदनाम झंझावात मी!

- धुंडाळतो आहे इथे माझा रिकामा हात मी!
उमटेल मी धरतीवरीचमकेन त्या गगनात मी!

- ''एल्गार'', सुरेश भ