Showing posts with label जगण्‍यातलं काही.... Show all posts
Showing posts with label जगण्‍यातलं काही.... Show all posts

Saturday, April 8, 2023

मन भरत जातं...

मनाचे काठ डोळ्यांच्या कडांपर्यंत पोचतात का?

मन अतिव समाधानाने, आठवणीने, प्रेमानं काठोकाठ भरुन ओसांडून वाहतं, तेव्हा डोळे झरु लागतात, ते त्यासाठी का?

तुझ्या सहवासात माझं मन भरतं, असं म्हणताना मला तृप्त झाल्याची भावना अनुभवाला येतंच नाही. कारण तू कितीही लाभलीस तरी कमीच पडतेस. तू सोबत असताना मला जे काही अनुभवाला येतं, जे जाणवत राहतं ते सारं मला नीट स्वीकारताही येत नसावं. एकाच वेळी ह्रदयात उष्ण आणि थंड अशी दुहेरी जाणिव होत राहते. कसा अर्थ लावायचा त्याचा? अर्थ सोड, ती अवस्था नीटशी अनुभवायची कशी, हेदेखील मला अजून कळलेलं नाही. मी निवांत असताना तुझ्या ओढीच्या तीव्रतेनं शरीर कंप पावण्याचा आणि अगदी अस्वस्थ असताना तुझ्या विचारानं मनाला शांतता लाभण्याचा अनुभव मला वारंवार येतो.

किती हा विरोधाभास?
विरोधाभास हा प्रेमभावनेतला कॉन्स्टन्ट असतो का गं?

म्हणूनच मनात जे काही उमलत राहतं त्याचे अर्थ लावण्याची, ते निव्वळ अनुभवण्याचीही माझ्या मनाची क्षमता मर्यादीतच वाटत राहते. त्या अनुभवाच्या आवेगाने मन प्रचंड थकून जातं. त्या वेळी मला कुठलीच नवी जाणिव-अनुभव नको असतो. मन क्षणभर कोरं करकरीत असावं असं वाटतं. तरीदेखील विहीरीच्या तळाला झरा फुटावा तसे तुझ्याबद्दलचे कितीतरी विचार उमळून वर येत राहतात; हे सतत घडत राहतं! ते सामावून घेता घेता माझा श्वासही थकून जातो. मनानं ती संपृक्तावस्था गाठली की शिणलेले गहिरे कढ दाटून येतात. मन जडावत जातं. आणि ते सारं मावेनासं झालं की डोळ्यांवाटे बाहेर पडतं. आणि त्याही क्षणी तू सोबत नसल्याची भावना आतल्या एका रिकाम्या जागेकडे बोट दाखबत राहते.

तृप्त होण्याची जागा तशीच रिकामी ठेवत मन असंच भरत जातं असतं का?

Sunday, March 5, 2023

भारलेला दिवस

माझी प्रत्येक सकाळ तुझ्या जिव्हाळ्याने भरलेल्या शब्दांनी सुरू होते. मनाला गारवा देणारा अनुभव असतो तो माझ्यासाठी. तुझा मंद-मुलायम आवाज ऐकू येतो तेव्हा तू जवळ भासतेस आणि दूरही. ते छानही वाटतं, किंचित बोचतंही. तू दिसत नाहीस, डोळ्यांपुढे नाहीस, मला तुला त्या पातळीव अनुभवता येत नाही यानं मन दुखावतं-खंतावतं. तू आणि मी कधी कामाचं बोलतो, इकड-तिकडच्या गप्पा करतो, ते अर्थ-बीनअर्थाचं सगळंच बोलणं मला फार हवंहवंसं वाटतं. न बोलता-लिहीता आपल्यामध्ये नांदणारी शांतताही तितकीच हवीहवीशी, आश्वस्त करणारी असते. आजकाल मी बसल्या बसल्या उगाचच माझा हात पुढे करतो. या वेड्या आशेसह की तू चटकन धरशील तो. तुझ्या स्पर्शाची कल्पना करुन मी उगाचच सुखावतो. बोटात बोटं गुंफली जातात, नजरेला नजर मिळते आणि माझा तुझ्याशी संवाद सुरू होतो. अथांग-अमर्याद असा. त्याला काळाचं, परिस्थितीचं, पात्रांचं असं कशाचंच भान नसतं, चौकट नसते. मला तसं तुझ्यासोबत राहायला आवडतं. तू इथे नाहीस, म्हणून मी माझ्या मनाची तशा संवादाच्या आधारे फसवणूक करतोय, असं नसतं ते! माझ्यासाठी तो खूप खराखुरा संवाद असतो. अस्सल असा!

माझा प्रत्येक दिवस तुझ्या शब्दांनी, संवादांनी, आठवणींनी भारलेला असतो...

बहाणे

माझं लिहिणं, सिनेमा पाहणं, मित्रांशी बोलणं, काम करणं, पेपर वाचणं, बाजारात जाणं, कपड्यांना इस्त्री करणं, टीव्ही पाहणं, क्लाएंटला भेटणं, चित्रं काढणं, गाडी चालवणं, काहीतरी खाणं, काहीतरी पिणं, डोळे उघडणं, ते मिटणं, श्वास घेणं...

हे सगळेच्या सगळे बहाणे आहेत...

तुझ्या आठवणीऐवजी इतरत्र गुंतण्याचे...

आणि तरीदेखील ते गुंतणं होतं नाही.

Sunday, February 19, 2023

अर्थ

तुम्हारा अस्तित्व
किसी और के लिए महत्त्वपूर्ण होना,
ज़ीवन मे इस से बड़ा अर्थ
कोई हो नहीं सकता

Thursday, February 16, 2023

दिल मे सुकून था!

लोकल ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसलो होतो. ती ट्रान्सजेंडर पैसे मागत आली. आताशा मी त्यांच्यामुळे पूर्वीसारखा अनईझी होत नाही. पण मी त्यांना कधीच पैसे देत नाही. ती समोर येऊन हात पसरुन उभी राहिली. चेहरा गोड, आकर्षक! मी कधी नव्हे ते तिच्याकडे जाणिवपूर्वक एकटक पाहत राहिलो. ती माझ्या नजरेला मनावर न घेता निघून गेली. पण मी तिला मनात घोळवत राहिलो.

कसं जमत असेल गर्दीतून निर्लेप फिरत राहणं? हे असं पैसे मागताना तिला कधी कुणी ती माणूस आहे असं फिलिंग देत असेल का?
का असे प्रश्न येतायत माझ्या मनात? कदाचित माझं मन सध्या भावविभोर झालंय, म्हणून की काय...
दोन दिवसांनी ती पुन्हा आठवली. तिच्याबद्दल काय-बाय वाटत मी काही ओळी लिहील्या. मी त्यात 'मला तुला घट़ट मिठी माण्याची इच्छा झालीय. यावेळी भेटशील तेव्हा हे करेन नक्की.' असं लिहून गेलो...
चार दिवस उलटले.
पुण्यावरुन मुंबईला आलो. दादरवरून बोरीवली लोकल पकडली. तो लोकलचा डबा पाहिला तसं मी लिहिलेल्या त्या ओळी आठवल्या. 'या क्षणी कुणी ट्रान्सजेंडर डब्यात आली तर तिला मिठी मारण्याची हिम्मत आहे का माझ्यात?' त्या विचारानं छातीवर दडपण आलं. मी तसं केलं नाही तर कुणाला कळणार होतं? पण मी ते लिहून आलो होतो!
जर जमणार नव्हतं तर का लिहावं माणसानं? माझी संवेदना लिखित शब्दांपुरतीच मर्यादीत आहे का? एक ना अनेक प्रश्न...
माझ्या त्या स्थितीची जणू परिक्षा पाहिल्यागत दोघी ट्रान्सजेंडर डब्यात शिरल्या. त्या माझ्याजवळ आल्या तेव्हा मी खिशातली एक नोट पुढे केली. तिनं ती घेतली आणि माझ्या डोक्यावर हात ठेऊन काहीतरी पुटपुटली. मला विचारायला धीर झालाच नाही. तिनं रांगेतल्या सगळ्यांकडे पैसे मागितले. ती जाऊ लागली तेव्हा छाती धडधडली. वेळ निघून चालल्यासारखं काहीतरी. जाता जाता तिनं माझ्या खांद्यावर हात ठेवला.
मी चटकन विचारलं, "तू गले गलेगी मेरे?"
ती खाली वाकली. डाव्या हाताचं बोट स्वतःच्या नाकावर मारत तिनं विचारलं,
"सेक्स चाहिए?"
मी म्हटलं "नहीं."
तसं तिनं दुसराही हात माझ्या खांद्यावर ठेवला.
"क्यों? प्यार नहीं मिला?" (काय काय पाहिलंय हिनं? मनात विचार येऊन गेला.)
"नहीं! बस ऐसे ही गले लग जा!"
तिनं दोन हात हळूच पुढे केले. मी उठून उभा राहिलो. तिला छान मिठी मारली. दूर होताना अगदी सेकंदभर तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ थांबला. तिचे डोळे जरा जवळून पाहता आले. ती निघून गेली. मी खाली बसलो.
डबा भरलेला होता. मी कुणाच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही. टाळलं नव्हतं, गरज वाटली नव्हती.
खाली बसलो तेव्हा मी नवं-वेगळं काही केल्याचं फिलिंग मनामध्ये नव्हतं. जे होतं ते साधेपणानं सहज घडून गेलं. शब्दाला जागण्यासाठी मी लिहिलेल्या शब्दांनी मलाच बळ द्यावंसं काहीतरी...
मै मेरे लफ़्ज़ो के साथ वफ़ादार रह सका,
दिल मे सुकून था!

झोप

रात्रीचे अडीच वाजलेले. कुणीतरी भराभरा हलवून उठवल्यागत माझे डोळे चटकन उघडले. जाग आल्याबरोबर मनात आलेला पहिला विचार, 'तिच्यासोबत बोलणं पूर्ण झालं होतं ना!?'
मोबाईल आठवला!
उजवा हात झोपताना स्वतःच्याच अंगाखाली सापडलेला. मुंग्या आलेल्या भयानक. हात हलवू वाटत नव्हता. पण त्याचं हाताने कसल्याशा घाईने मोबाईल उचलण्याचा प्रयत्न. तो उचलता येईचना, इतक्या मुंग्या! पण मन म्हणतंय, की या क्षणी मोबाईल घेतलाच पाहिजे. स्क्रीन उजळली. तुझ्या मेसेजचं नोटीफिकेशन येऊन पडलं होतं. असं झोपेतून उठून पाहावं आणि तुझा मेसेज आलेला असावा हे किती सुखय ना!
मेसेज येऊन फक्त पाच मिनिटं झाली होती. जणू तुझा मेसेज आलाय म्हणून मला जाग आलीय! वेडसर विचार.
वाचू लागलो. तू अशी मधूनच सुरु झालीस. मी वाचत गेलो आणि छाती धडधड करु लागली. आणखी... आणखी...
तू मला हे सगळं काय सांगत-म्हणत होतीस मला काहीच कळत नव्हतं. मी हे असं कधी केलं? मी कुठे असा विचार केला तुझ्याबद्दल? एका क्षणात छातीतले सगळे अवयव कुणीतरी काढून घ्यावेत आणि त्या पोकळीत वारं भिरभिरत राहावं, अशी अत्यंत विचित्र फिलिंग आली.
मी निद्रा आणि जागेपणीच्या सीमारेषेवर घुटमळत होतो. तुझा मेसेज वाचताच झटका बसावा तसा अंथरुणात उठून बसलो. काही वेळ काहीच कळलं नाही. अर्धमिटल्या डोळ्यांत नुसतीच भयस्वप्न फिरत राहिली. काहीच कळेना. संदर्भ लागेना. मी उठलो. डोळ्यांवर पाणी मारलं. झोप दूर सरकली. मेसेज पुन्हा वाचला. यावेळी अर्थ लागला. तू तुझ्या ब्लॉगसाठी लिहिलेला तो स्फूट होता. पण माझी धडधड काही कमी होईना. अजूनही होत नाहीए.
माझ्या काळजाचं पाणी पाणी झालंय हे वाचून. हे असं इतकं समोरच्याची धडकन थबकेल असं कसं लिहितेस? तुझी ही पात्रं मनावर कसला वार करतात माहितीए! आणि हे सगळं एकटेपण, नात्यांची रुढीबाज आवरणं दूर करत तू मांडत असलेलं भावनांचं शहाणपण, हे सारं कुठून येतं गं?
तुझा नवरा किती करंटा आहे गं! छ्या्! का नाहीए पाहात तो तुझ्याकडे? तू कॉलेजमध्ये जेव्हा लेक्चर घेतेस, टिचर्स रुममध्ये विविध मुद्द्यांवरुन हुज्जत घालतेस किंवा तुझ्या ब्लॉगवर लिहितेस, तेव्हा तुझी ती रुपं पाहून मी किती भारावलेलो असतो. मला फार फार शोधू-पाहू वाटते तुझ्या मनातली खळबळ. तुझ्या कवितांमधली सल मला अस्वस्थ करत जाते. तुझ्याशी कितीही बोललो, तुझं लिहिलेलं कितींदाही वाचलं, तुझ्या सोबत फिरलो तरीही मला तुझं सारं रुप पाहताच येत नाही. तू हे असे लिहिलेले तुकडे मला वेळी-अवेळी पाठवत राहतेस. मी तुझ्या या कृतीला जवळीक समजून त्यावर गुजराण केल्यासारखा राहतो. मी इथं तुला पूर्णार्थानं पाहण्यासाठी तळमळतोय आणि त्याला तुला साधं पाहावं-स्पर्शावंसंही वाटत नाही. नशीब इतकं विचित्र असावं?
मला या क्षणी येऊन तुला घट्ट मिठीत घ्यायचंय. कुठंचं जाऊ द्यायचं नाहीए. तुझ्याबद्दल आकर्षण वाटतंच, पण आताचं हे वाटणं सेक्शुअल नाहीए. मला फक्त आणि फक्त तुला धरून ठेवावंसं वाटतंय. तू हरवण्याचं भय का दाटून आलंय मनात? तुला असं मनविभोर करुन टाकणाऱ्या गोष्टी लिहिताना पाहिलं-वाचलं की माझा ऊर प्रचंड भरून येतो! हा चालू क्षण खूप विचित्र भासतोय. या क्षणात जर माझा जीव तुझ्या हातात ठेऊन तुला वाढवता-फुलवता आलं असतं ना, तर मी आनंदानं केलं असतं. ही काय फिलिंग आहे माहित नाही.
माझी धडधड कमी होत नाहीए... छातीत भिरभिरणारी वावटळ थांबण्याचं नाव घेत नाहीए...
आठवलं! तू मघाशी स्वप्नांत होतीस कुठेतरी... काहीच आठवत नाही पण होतीस.
झोपण्याचा प्रयत्न करतो. गुड नाईट!

Friday, February 10, 2023

इज़हार-ए-महोब्बत

मला जे सांगावसं वाटतं ते या जगात फक्त तुला ऐकू जातं असं वाटतं मला. मला आजपर्यंत कुणाबद्दलच असं - एवढं - इतकं छान वाटलेलं नाही. ही फिलिंग अशी माझ्या आत छान पसरत जाते. रोपट्याला जमिनीतून पाणी मिळावं अशी काहीतरी. तुला भेटावसं वाटतं मला! म्हणजे तू शेजारी बसलेली असशील तरीही. आणि तुला भेटण्यासाठी तू शेजारी असणं गरजेचंही नसतं. तुझ्याकडे खूप काही मागावंसं वाटतं आणि नकोही असतं. हा संभ्रम किंवा गोंधळ नाहीए. तर अशी खूप खूप प्रोफाउण्ड फिलींग आहे जिचा चटकन अर्थ लागत नाही. त्यामुळे याला जर इज़हार-ए-महोब्बत म्हणायची असेल तर म्हणूयात.


 

Tuesday, February 7, 2023

ये तेरी मेरी कहानी

तेरा मेसेज मिला. अरसो बाद!

इस रात के सन्नाटे मे तेरी आवाज कितनी अलग लगती है! कानो के इतने नज़दिक... मुझे गुदगुदी सी होती है. तू यहाँ थी, तब भी मेरे कानो मे यूही बोला करती थी. और ये तेरी आवाज के पीछे टिक टिक करनेवाली (शायद दिवार की) घड़ी! हाथों से छुटते पलो की तरफ़ सुई से इशारा करती हुई...

जब तुने वो नज़्म मोबाईल पर रिकॉर्ड कर के मुझे भेजी, तब मै चौक गया था. मै मेरी कहानीयाँ तुझे अक्सर भेज़ा करता था. उन के बारे मे तो तुने कभी कुछ बोला नहीं! फिर आज़ ही चुप्पी क्यों तोड दी?

पर तेरी नज़्म बड़ी पसंद आयी मुझे. कितना कुछ कह दिया उस ने! मानो किसी ने मेरे अंदर की बेबसी को लफ़्जो से खिंच कर बाहर निकाला हो.

तेरी नज़्म जो बयान करती है वो सच तो है. ये कहानीयाँ सच मे तकलीफ़ पहुँचाती है. तू भी तो ज़ानती है!

मुझे कभी कभी मेरे तख़य्युल से बड़ा ड़र लगता है. ना ज़ाने कब कैसी कहानी और कैसे किरदार पेश कर दे! फिर उन कहानियों को ले कर ज़ीना पड़ता है. मरना भी पड़ता है. किरदारो का बोझ उठाते उठाते कुली बन जाता हूँ. वो जहाँ ले जाते है वहाँ चला जाता हूँ. वो जहाँ मुडे वहीं मूड भी जाता हूँ.

क्यों करता हुँ ये? शायद अच्छा लगता है मुझे ये, या शायद ज़रुरत है मेरी. इस जिंदगी के ऐसे कितने पल है जो मै जी न सका, शायद इस के आगे भी कभी ज़ी ना पाऊं. वो, ज़ो मै कभी हो न सका, उस मै की तलाश मे इन किरदारो के साथ ख़ानाबदोश की तरह फ़िरता रहता हूँ. उस पल की तलाश मे, जो मुझे पुरा कर दे. क्या ऐसा कोई पल दुनिया मे है?

फ़िर ये किरदार सहारा बन जाते है मेरा. इन के साथ छुटे पल ज़ीने की नाकाम कोशिश करता हूँ.  कोई ख़ुशी या सुकून ढुंढ भी लू तो वो मिलता भी कितना है? बस पलभर का... उस एक पल से दिल का गुज़ारा नहीं होता. ना दिल भरता है - ना संभलता है. बस चकनाचूर हो कर उन सारे जिये पलो मे तिनके तिनके मे बटता रहता है...

क्या उस इक पल की ज़िंंदगी के लिए इतनी ज़द्दोज़हद ठिक है?

क्या कोई सिर्फ एक कहानी तेरी-मेरी मर्जी की नहीं हो सकती?

इन्ही कहानियों से पैदा हुए ये भगवान, ज़िज़स या ख़ुदा... इन मे से किसी के पास भी दिल नहीं?

सच कहा है तुने! कहानिया तकलिफ़ जरूर देती है. पर फ़िर भी इन्हें लिख़ता रहता हूँ. अब यही वज़ह बन चुकी है मेरे ज़ीने की. तकलिफ़ दे या सुकून, ज़हन मे पैदा होनेवाली अगली कहानी का, अगले किरदार का इंतज़ा तो होता ही है मुझे! एक इंतज़ार ये भी है के कोई कहानी लिख़ते लिख़ते मै भी पुरा हो जाऊ...

तू सात समंदर पार दुनिया के किसी कोने मे बैठ कर मेरी कहानीयों का यू नज़्मो मे ज़वाब दे रही है, मानो मैने कोई चिठ्ठी लिख़ी हो तुझे!

अब तुने चुप्पी तोड़ ही दी है तो फ़िर बता! कहा ले जाए ये तेरी-मेरी कहानी? बनेगी मेरी कहानी का किरदार? या ये कहानी लिख़ कर करेगी मुझे पुरा?

---

ये अगर खत होता तो कह देती किसी रोज मैने कहा ही था,

तुम कहानी लिखो तो मुझे ज़रूर लिख़ना. मेरे होने के कई रंग तुम से बेहतर कहाँ किस ने ज़ाना है और कहाँ किसी ने तुमसे बेहतर मुझे पढा है। तुम्हारी कहानी में मैं बिलकुल मैं रहूँगी, पानी की तरह, न मेरा कोई एक आकार न रूप न रंग न मुझे बहने से रोका ज़ा सकता है न मुझे हवा बनने से न फिर बारीश की तरह बरसने से। मेरे किरदार की रोचकता तुम्हारे नोन जजमेंटल अप्रोच में है।  बिना किसी प्रिज्युडाईसेस से सिर्फ तुम समझ सकते हो, तो तुम मुझे जरूर लिखना।  मेरे कही-अनकही से, मेरी सोच और धारणाओं से तुम जैसे मिल पाए उतनी तो कोशीश किसीने मुझ से भी मिलने की नहीं की। ☺️

काळाघोडा फेस्टीव्हल - सुख

'काळाघोडा फेस्टीव्हल'मध्ये इन्स्टॉलेशन लावलेल्या परिसरात शिरलं की समोरचं एक मोठ्ठी पॅरागॉनची चप्पल ठेवलेली दिसते. तिचे निळे बेल्ट स्लाईडमध्ये कन्व्हर्ट केलेत. लहानांसोबत मोठी माणसंसुद्धा लहान होऊन त्यावर घसरगुंडी खेळत होते, फोटो काढत होते. पनवेलच्या 'भारत स्कूल अॉफ आर्ट'च्या अर्यांश सिप्पीला नेमकं हेच हवं होतं. त्याच्या कल्पनेतून साकार झालेल्या, त्याने आणि सिद्धेश्वर चौधरी यांनी मिळून तयार केलेल्या या आकर्षक-मजेदार इन्स्टॉलेशनं नाव आहे 'सुख'!

मी तिथं पोचलो तेव्हा एक मुलगी गळ्यात हात अडकवून तिथं उभी होती. मी विचारलं, हे तयार करण्यामागचा विचार काय? तर तिनं 'हे सगळं याच्या डोक्यातून आलंय' असं म्हणत अर्यांशची ओळख करुन दिली. तो म्हणतो, की आपल्या आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी-वस्तू आपल्याला सोबत करतात. पण त्यांकडे आपलं कधी लक्षच जात नाही. अर्यांशला 'चप्पल' ही तशी, आपल्याला सोबत करणारी गोष्ट वाटते. त्यानं विचारलं, की तुला चप्पल म्हटलं की काय आठवतं?

मी म्हटलं, गीत चतुर्वेदीची ओळ - तुम्हारे बिना उतना ही अकेला हूं, जितना एक पैर की चप्पल! (तशीही त्यानं तिथं एकाच पायातली चप्पल ठेवली होती!)

तो दिलखुलास हसला. म्हणाला, प्रत्येकाचा कनेक्ट असाच वेगवेगळा. मला बालपण आठवतं. या पॅरागॉनच्या स्लिपर घालून मी जोरजोरात धावायचो, पडायचो, पुन्हा उठून धावायचो. आजच्या आयुष्यात खाली पडणं-अयशस्वी होणं हे नैराश्याकडे घेऊन जातं. मला या इन्स्टॉलेशनमधून आपल्या सर्वांच्या आयुष्यातला हा खाली-वर जाण्याचा प्रवास मजेदार असू शकतो हे सुचवायचं आहे. म्हणून आम्ही 'भारत स्कूल अॉफ आर्ट'च्या अप्लाईड आर्टसच्या विद्यार्थ्यांनी चपलेची स्लाईड साकारली.

कल्पना छान, साधीसोपी होती. सादरीकरण आकर्षक होतं. पण अर्यांशची ते सारं सांगण्याची, डोक्यातलं प्रत्यक्षात उतरवण्याची एनर्जी जास्त आवडली. त्याच्यासोबत फोटो काढून घेतला.

Tuesday, January 31, 2023

EMAIL

 

च्यायला नसती कटकट! साधे चोवीस तास धड जात नाहीत!
काल तुझा फोन आला तेव्हा खरंतर छान वाटलं. कित्ती महिन्यांनंतर आपण बोललो असू असे. एकदम निवांत! आताशा मुंबईतल्या मुंबईत राहूनही आपल्या भेटी होत नाहीत. तू कंपनी सोडल्यापासून तर अगदी नसल्यातच जमा. पण काल जणू मधे काही घडलंच नाही असं बोललो आपण! मागचा सगळा आठवडा डोकं पिंजून काढणाऱ्या अस्वस्थतेत घालवला होता. पण ती सगळी जळमटं दिवाळीचा झाडू फिरवल्यागत नाहीशी झाली. तू गेल्यामुळे मी अस्वस्थ होतो असं नाही, पण तरीही तुझं जाणं हा माझ्या अस्वस्थतेचा भाग होताच. म्हणजे आहेच! पण कालपासून सगळं कसं छान वाटत होतं! पण किती वेळ टिकलं ते? छ्या!
मी झोपलोय पहाटे साडेचारला आणि नऊला उठूनही बसलो. डोळे तारवटलेत थोडे, पण तरीही किती फ्रेश वाटत होतं! धुंदकीतच होतो कसल्याशा. आज दिवसभरात क्लाएंटच्या दोन मिटींग आणि एक फिल्ड व्हिजिट उरकून, मी 'क्युबाफेअर'चा आख्खा प्रपोजल ड्राफ्ट संपवत आणला. सोलंकीसुद्धा बोलला, "आज भलतीच एनर्जी संचारलीय तुझ्यात!'' मलाही तसंच वाटत होतं. कदाचित तू घरी पार्टीला बोलावलंस त्याचा आनंद असेल. पण नुसतं बोलावलं नाहीस. पूर्वीसारखं अगदी हक्काने 'ये नाहीतर...'च्या रुबाबात बोललीस. आवडलं आपल्याला! तुला पुन्हा एकदा भेटायला मिळेल याचा आनंद झाला. पण तुझ्या त्या फोनमुळे, किंबहुना तू ज्या सहजपणे माझ्याशी बोलत होतीस ना, त्यामुळे आपण यापुढे पूर्वीसारखं भेटायलाही लागू याची आशा होती. तू माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ शकणार नाहीस, हे माहितीए. पण पुन्हा भेटीगाठी सुरु होण्याची ही पुसटशी शक्यताही खूप होती माझ्यासाठी.
आता इतपत सगळं ठिक होतं. पर दिल चुत्यागिरी करेबगैर मानता नहीं. मला खरंच गरज नव्हती तुझा इमेल उघडायची. झक मारली मी!
आताचा नाही. तू ते पूर्वी पाठवायचीस ना, स्फूट की लघुकथा की असलंच कायबाय म्हणायचीस तू त्याला, ते वाले इमेल! मी वेगळं फोल्डर केलंय त्यांचं. अधूनमधून वाचतो मी. कधीकधी तू फारच पर्सनल असं लिहायचीस. आपण लोणावळ्यात राहिलो होतो. त्या रात्री तू बेडवर माझ्या शेजारी पडल्या पडल्या मला मेल पाठवलेलास. मी विचारलंही, "हे काय? माझा परफॉर्मन्स रिपोर्ट का?" तर 'वाच' म्हणालीस. उफ्फ! तो मेल वाचताना मी सेक्सपेक्षा जास्त एक्ससाईट झालो होतो. आधी मला ती सेक्सस्टोरीच वाटली होती. मी तुला तसं थट्टेनं म्हणालोसुद्धा. तर काय सॉल्लिड जळजळत्या नजरेनं पाहिलंस तू! मला वाटलं आता गिळणार तू मला. पण तू मला झापलंस. खरंच, नव्हतं कळलं मला तेव्हा. मी नाही ना तुमच्यासारख्या वाचणाऱ्यांच्या जातीचा. पण तो इमेल मी आयुष्यात वाचलेल्या उत्तम लेखनांमधलं असं काहीसं होतं. उत्तम नाही... काय शब्द तो... ते असतं ना असं खूप छानसं असं. कसं सांगू? म्हणजे शेकोटी कशी... जवळ गेलं की ऊब देते. तसं काहीसं. आतून ऊब देणारं असं. काय झकास लिहिलं होतंस तू! आजही तो मेल वाचताना मला लोणावळ्यातली ती रात्र आठवते. मी ठेवलाय तो मेल जपून.
Is it weird to keep it? Should I delete it?
मी केला अनेकदा डिलिट करण्याचा विचार. पण धीर नाही झाला माझा! माझ्या तुझ्या नात्याचा तेवढाच काय तो प्रत्यक्ष अंश उरला आहे. एक आठवणी सोडल्या तर तुझ्या-माझ्यातलं एवढं इन्टीमेट असं माझ्याकडे काय उरलंय आता?
तुझे ते इमेल माझ्या आयुष्यातला सगळ्यात हळवा संवाद आहेत. तू लिहावं आणि मी वाचावं. तू वाचलेल्या कुठल्याशा कादंबरीतल्या कथेसारखंच होतं हे. मला तुझ्या जगाचा या तऱ्हेनं भाग होण्याचं खूप समाधान होतं. मला कायच्या काय आवडायचं ते वाचायला! खूपदा काहीच नाही कळायचं. तरीही आवडायचं वाचायला. आणि वरुन तू ते केवळ मलाच पाठवतेस या विचारानं तर कसला ऊर भरुन यायचा नुसता. स्पेशल असण्याचा भारी फिल एकदम! मला तुझ्या मेलमध्ये स्वतःला वाचायला-शोधायला आवडायचं. मला न कळणारं असं तू काहीतरी भारी लिहितेस याचं अप्रूपही होतं. त्या भरात कदाचित मी तुझे ते इमेल नीट वाचलेच नाहीत कधी. आज उत्साहाच्या भरात तुझा एक जुना मेल उघडला आणि मला तुझ्या मेलमध्ये मॅडी सापडला!
मॅडी म्हणजे तुझ्या त्या कहाण्यांमधलं कॅरेक्टर. कुठं कुठं तो निव्वळ माझी कॉपी तर कुठं तू तुझ्या कल्पनेनं अगदीच त्याला कुठच्या कुठं नेऊन ठेवलेला. मला तो तुझा वरच्या लेव्हलवरचा मॅडी फार आवडायचा. वाटायचं, याच्यासारखं व्हावं. मी तुला कितीदा विचारलं की, ही गोष्ट आपल्यातल्या कुठल्या घटनेवरुन लिहीली आहेस? तर तू 'तुला काही कळतंच नाही' अशा अर्थाचं गूढ हसायचीस.
पण आज तुझा मेल वाचताना काहीतरी चटकन स्ट्राईक झालं. मला प्रथमच मॅडी वेगळा दिसत होता. मी तो नव्हतो!
पण मॅडी कोण? मॅडी डिसुझा तर नाही? तुझा लिव्ह-इन?
मला क्षणभर नाहीच कळलं काही! अंगातून वारं निघून गेलं होतं. किती वेळ क्युबिकलमध्ये तसाच बसून राहिलो.
आता तू माझ्याशी प्रतारणा केलीस वगैरे असल्या झोनमध्ये मला जायचं नाही. कदाचित नसू आपण दोघे एक्स्क्लुझिव्ह! माझ्यासाठी तू होतीसच, पण तुला नसेल तसं वाटत माझ्याबद्दल तसं, तरी ठिकंय की! आपण एकत्र असतानाच तुझं माझ्यावरुन मन उडालेलं असू शकतं आणि त्याला कारणीभूतही मीच असू शकेन. घडतं की असंही कधीकधी!
म्हणजे मला या सगळ्या गोष्टी स्वीकारता येतात. पण तुझ्या गोष्टींमधला 'तो मी नव्हेच' हे आज कळलं आणि आतमध्ये काहीतरी ओरबाडत गेल्यागत झालं. मला तुझ्या आयुष्यात नसण्यापेक्षा तुझ्या गोष्टींमध्ये मी नाही याचं एवढं का वाईट वाटावं? एवढं रडू का यावं? त्या शब्दांमध्ये बेमालूम मिसळून राहण्यात कसलं समाधान होतं मला? त्यातूनही चटका हा की माझ्या जागी कुणी औरच आहे.
तुला केलंय का कधी कुणी रिप्लेस? हे असं? या तऱ्हेने?
तुझ्यापासून वेगळं होताना माझा तुझ्यासोबतचा अंश कुठेतरी मागे उरलाय या विचारानं हलकं दुखरंसं बरं वाटायचं मला. आता? हे घर हरवल्यासारखं फिलिंग खूप विचित्रंय.
तुझा पुन्हा मेसेज आलाय. 'उद्या पार्टीला नक्की ये' म्हणून. काय करु? मला नाही कळतंय काही.

Tuesday, September 27, 2022

चालेल?

ए चल ना, एकत्र चालूया. 

सहजंच गं.

असं एकमेकांत डोकावत थोडं पुढपर्यंत जाऊया.

चालता चालता माझ्यातलं काय बरंय ते आवडून घे, काय खरंय ते समजून घे. मीही तसंच करेन!

हो गं! माहितीय. मीठ थोडं कमीयं ते. मग टाक ना तू चिमूटभर. कधी मी मीठाची चिमूट पुढे केली तर घेशील नक्की!

नो! ते जमणार नाही हा. तुझ्यासाठी बदलणं-बिदलणं झेपणार नाही आपल्याला. तसलं काही प्रॉमिस करणार नाहीए मी. तूही करु नकोस. हो हो! उद्या कधी लग्न झालं तर त्यानंतरही नको बदलूस.

तू चाल की तुझ्या पद्धतीनं! पण ते उगीच पावलाला पाऊल वगैरे लावून नको हा! फक्त सोबत चालूयात. तुला अगदीच वाटलंच तर माझ्या पावलांची लय धर, मला वाटलं तर मी धरेन. त्यापेक्षा असं करु. खांद्यावर हात टाकून चालूयात का? लय जुळेल आपोआप.

हाऽ हाऽ हाऽऽऽ ते दो दिल एक जान वगैरे सगळं झूठयं. तुझी-माझी आवड-निवड वेगळीच असू दे. तुझं वेगळं असणं आवडतं मला. माझंही आवडून घेशील ना?

विश्वास असलाच पाहिजे, पण आंधळा नको. सहज विश्वास ठेव. मीही ठेवेन. एखाद्या बाबतीत नसेल ठेवता येत तर तेही मोकळेपणाने सांग. विश्वास नसेल सुरुवातीला, पण डेव्हलप करुयात की.

केवळ शब्दांनी नको, स्पर्शानंही बोल. तुझ्या सगळ्या मागण्या सांग. (अगदी तुझ्या फँटसीज सुद्धा!)

माझ्यावर हक्क गाजव. आवडेल मला. मालकीचा विचार आपण वेशीपलिकडेच ठेवूया.

हो, हे मात्र खरंय तुझं! बंधन नको असं म्हणतोय खरं, पण तरीदेखील 'आपली' म्हणून काही बंधनं वगैरे तयार होतीलच. पण ती आपणहून तयार झालेली असतील ना? त्यात पूर्वग्रह, जग-रीत अशी भेसळ तरी नसेल. ते घेऊ ना आपण समजून-उमजून. नाही पटलं तर देऊ सोडून. त्यात काय एवढं!

प्रेम?

...

खरंच सांगतो, अर्थ नाही कळत याचा. शब्दातही सांगता येत नाही. म्हणजे झालीयत काही प्रेमप्रकरणं. नाही असं नाही. पण तरीही पुरतं कळलंय असं नाही. हे तुला जे काही सांगतोय हे त्यातूनच आलेलं शहाणपण असल्यासारखं आहे. आधी एकमेकांना माणूस म्हणून तरी नीट पाहूयात ना! तुला-मला पुरेशी स्पेस देता येतेय का? भांडणं झालं तर पुढाकारानं मिटवता येतंय का? स्वतःला न पटणारं समोरच्याने मांडलं तर काय रिअॅक्शन येतेय हे सगळं पाहूयात तरी... आपण हे आपलं बेटा वर्जन तयार करतोय असं समज.

काय म्हणतेस? फेल गेलं तर? तर मग दुसरं अपग्रेडेड वर्जन तयार करु. वाटलंच तर करुयात लग्न. नाही केलं तरी चालेल मला. तुझं काय ते सांग. ठेवशील मला तुझ्यासोबत? बिनलग्नाचा?

फार गंभीर वगैरे झालं का? म्हणून तर म्हणतोय, हे प्रेम वगैरे पाहू की नंतर. आधी थोडंसं चालूयात ना सोबत.

फार नाही... तेऽऽऽ तिथपर्यंत. तिथून पुढचं पुढं पाहू...

ठिकय?

Tuesday, May 19, 2020

रत्नाकर मतकरी


दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये नाटक पाहायला गेलो होतो. एकटाच!
शिवाजी मंदिरला गेलो की 'मॅजेस्टीक'च्या बुक गॅलरीत चक्कर टाकायचा शिरस्ता आहे. तेव्हा खिशात शिलकीचे पैसे राहू लागले होते. पुस्तकं विकत घेऊ लागलो होतो. तिथे पुस्तकांच्या रांगांतून फिरता फिरता 'ऐक! टोले पडताहेत! - रत्नाकर मतकरी यांच्या ३० गूढकथा' हे पुस्तकं दिसलं. घेतलं.
थेटरात सीटवर येऊन बसलो. नाटक सुरू व्हायला वेळ होता, पण बॅगमधलं पुस्तक चैन पडू देत नव्हतं. पुस्तक काढलं. वाचायला सुरूवात केली. आजुबाजूची सगळी लोकं येऊन बसली. अनाऊन्समेंट झाली. नाटक सुरू होण्यापूर्वी माझी शिर्षक कथा वाचून झाली होती. पुढची 'तारकर' ही कथा वाचायला सुरू करणार इतक्यात दिवे मंद झाले. नाटकाचे तिसरे टोले पडले. थोडा हिरमुसलो. वाटलं, शिवाजी मंदिरऐवजी शिवाजी पार्कात जाऊन बसलो असतो तर बरं झालं असतं. प्रयोग सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकाचा रसभंग करणारं ते बहुधा पहिलं नाटक.
रत्नाकर मतकरींच्या लेखनाशी मी नेमका कधी जोडलो गेलो ते आठवत नाही. मात्र फार मागे जाणारी आठवण तिच! त्या पुस्तकानंतर मतकरींची एकामागोमाग एक सर्व पुस्तकं कपाटात जमा झाली. ते नाटककार होते. त्यांनी वैचारिक लेखन केलं, लहान मुलांसाठी कथा-नाटकं लिहिली. पण मी त्यांच्या गूढ जगताने जास्त भारावलो. त्यांच्या कथा धुंद करणाऱ्या होत्या. निजधाम, निर्मनुष्य, पावसातला पाहुणा, फिरून त्याच जागी अशा कित्येक कथांची निवेदनशैली-कथेची रचना अफलातून होती. त्यांची 'कोळसा' ही कथा डेल टोरोच्या 'डेव्हील्स बॅकबोन' या सिनेमाच्या प्रकृतीशी जुळणारी वाटली होती.
'बुकशेल्फ' सुरू केल्यानंतरही भरतच्या फ्लॅटवर आमचा बहुभाषी बुक क्लब सुरूच होता. मी त्यात मतकरींच्या 'पावसातला पाहुणा' आणि 'कोळसा' या कथा हिंदीत भाषांतरीत करून वाचल्याचं आठवतं. हिमाचलचा भरत आजही 'कोळसा' या कथेची आठवण काढतो.
मतकरींच्या अनेक कथा वाचताना स्क्रीनप्ले वाचल्यासारखा फिल यायचा. हे स्पष्ट जाणवलं ते त्यांच्या 'कबंध' या कथेमधून. त्यांनी उत्तम लघुकथा लिहिल्या, त्यामागे त्यांना नाटक आणि सिनेमा या माध्यमांची असलेली जाण नक्कीच कारणीभूत होती. त्यांच्या लेखनात नेमकेपणातून परिणाम घडवण्याची ताकद होती.
आम्ही 'थिंक महाराष्ट्र' आणि 'ग्रंथाली'च्या माध्यमातून रामदास भटकळ यांची जाहीर मुलाखत घेतली होती. त्यावेळी रत्नाकर मतकरी मुलाखतकाराच्या भूमिकेत होते. मुलाखतीच्या तयारीच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काही भेटीगाठी झाल्या.मतकरींनी माणसातलं, त्याच्या कृतीविचारांतलं गूढ मांडलं. मानवी मनाइतकं गूढ काहीच नाही हे त्यांच्या लेखनातून पानोपानी प्रत्ययाला येतं. माझ्यावर झालेल्या वाचनाच्या संस्कारात रत्नाकर मतकरींच्या साहित्याचा महत्त्वाचा वाटा आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!





Monday, May 11, 2020

उगम - शोध मातृत्वाचा

लहानपणी आई चिडली की तळणाच्या झारीनं किंवा उलतण्यानं फटका मारायची! घरातल्या त्या झारी-उलतण्याचा खूप राग यायचा, पण आईबद्दल तसं कधी वाटलं नाही. 'ती फटका घालणार' हे मनोमन मान्य केलेलं होतं. उलट, तिनं मारल्यानंतर पुन्हा तिनंच जवळ घेण्यात, त्यावेळी थोडं रडण्यात आणि तिच्या ''पुन्हा तसं करणार नाही ना?'' या प्रश्नाला होकारार्थी मान डोलावण्यात कसलासा आनंद असायचा.
...
पुढे कोचिंग क्लासला जाऊ लागलो. रखरखलेल्या, वाऱ्यानं फुफाटा उडणाऱ्या मैदानाच्या कोपऱ्यावर क्लास होता. ते चित्र बदलायचं ठरवलं. आम्ही मुलांनी बाग फुलवायला घेतली. रोज माती उपसायची, दगड वेचायचे, ते दूरवर नेऊन टाकायचे, पाणी मारायचं, ठिकठिकाणंाहून फुलझाडं किंवा बिया मिळवायच्या... अनेक महिन्यांनी फुलांनी डवरलेली हिरवीगार बाग उभी राहिली तिथे! शेजारी गणपतीचं मंदिर होतं. आमचं पाहून त्यांनीही बागेची लागवड केली. यावेळी आमच्याकडून बिया आणि झाडं घेऊन गेले. समाधान वाटलं.
...
काही वर्षांनी क्लासमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचनालय सुरू केलं. वीसेक रुपयांचं भांडवल मिळालं होतं. जुनी-पुराणी पुस्तकं जमवून, रद्दीच्या दुकानाच्या फेऱ्या मारुन थोडी पुस्तकं जमवली. पंचवीस पैशाला एक पुस्तक अशा दरानं आम्ही पुस्तकं वाचायला देऊ लागलो. मिळकत काहीच नव्हती. येणाऱ्या पैशांमधून नवी (म्हणजे जुनीच!) पुस्तक विकत घेत होतो. शेकड्यानं पुस्तकं जमली. सात-आठ वर्षांनंतर घरात पुस्तकं येऊ लागली. प्रत्येक पुस्तकाला कव्हर घालू लागलो. कुणी मागितलं तर शंभरदा दटावून त्याला वीट येईल इतपत पुस्तक सांभाळण्याच्या सूचना देऊ लागलो...
...
असं बरंच काही...

सृजन-पालन-ममत्व-जबाबदारी... 'आई' असण्याची भूमिका अशी कणाकणाने कळत-जाणवत गेली. म्हणजे ते त्या-त्या वेळी समजत नव्हतं, पण आता त्या अनुभवांचा अर्थ लावता येतो. वसुंधराचा बाप होईपर्यंत 'आई'च्या भूमिकेची किंचित जाणिव झाली असावी. म्हणूनच तिच्यासोबत असताना भूत-भविष्यावर नजर ठेऊन तिच्या वर्तमानाला आकार देऊ पाहतो. 'आई' या भावनेनं बाप होण्याला हातभार लावला.
तर अशा अनेक आयांना, आई समजलेल्या बापांना, आई न कळताही आतल्या आत त्या छटा अनुभवणाऱ्या प्रत्येकाला...
Happy Mother's Day!
या निमित्ताने आईच्या भूमिकेकडे डोळसपणे पाहणाऱ्या 'उगम' या कादंबरीचा 'बुकशेल्फ'ने सादर केलेला हा परिचय...

Thursday, April 30, 2020

अरे भय्याऽऽऽ

१९९४.
तेव्हा चौथीत होतो. दूरदर्शनवर 'चंद्रकांता' मालिका सुरु झाली होती. इरफान खानला पहिल्यांदा त्या छोट्या पडद्यावर पाहिलं. त्याने बद्रीनाथ-सोमनाथ असा एक डबल रोल केला होता. त्या पात्राच्या अंगावर छोटे चमकदार गोळे लटकवलेले असायचे. तो त्यातला एकेक तोडून फेकायचा आणि ते बॉम्बसारखे फुटायचे. अंगावर लटकलेले बॉम्ब! मला भारी फॅसिनेशन झालं होतं त्याचं.
तो इरफान डोक्यात कुठेतरी नोंदला गेला!
आठ वर्षांनंतर माटुंग्याच्या स्टारसिटी थेटरमध्ये 'कसूर' बघत होतो. तेव्हा इरफान कोर्ट सीनमध्ये समोर आला. पब्लिक प्रॉसिक्यूटर. करारी नजर आणि कॉन्फीडन्ट! हा चंद्रकांतामधला गोळेवाला. मी अोळखलं...
त्यानंतर तो दिसला 'आन - मेन अॅट वर्क' या चित्रपटात! त्यानं तारवटलेल्या-मोठ्या डोळ्यांचा, थंड डोक्याचा, खूनशी खलनायक ताकदीनं उभा केला होता. इरफान खऱ्या अर्थाने भेटला तो इथे! खऱ्या अर्थाने यासाठी की त्यानंतर तो कधीच विस्मृतीत गेला नाही.
इरफानचे डोळे कायच्या काय जखडून ठेवायचे! त्याला शब्दबंबाळ संवादांची गरज कधीच नव्हती. क्रौर्य, विषाद, आनंद, लोभ, मनातला गुंता असं कितीसं सारं त्यानं त्याच्या एकटक पाहण्यातून व्यक्त केलं. त्यानं जेवढा टोकाचा विखार व्यक्त केला असेल तेवढीच सालस आणि इनोसन्ट व्यक्तीरेखाही रंगवली.
इरफानचा अभिनय त्याच्यापासून वेगळं काढता येणं शक्य व्हायचं नाही. तो अमूक अमूक पद्धतीचं पात्रं रंगवतोय हे ठासून सांगण्याची गरज नसायची. तो सहज पडद्यावर यायचा आणि केवळ त्या पात्रासारखा 'असायचा'! त्याचं तसं असणंच पुरेसं व्हायचं. म्हणूनच त्याला कधी 'पिक्चरमधली एन्ट्री' किंवा त्यासाठी बडवलेलं स्पेशल संगीत वगैरे असं लागलं नाही.
कुठल्याशा कार्यक्रमात शाहरुख म्हणाला होता. आम्ही अॅक्टींग करायची म्हणून ही एवढी मेहनत करत, गळे ताणत संवाद म्हणतो आणि हा इरफान येतो. काही वेगळं न करता नुसते संवाद म्हणतो आणि लोक याची तारीफ करतात. खरंय! तो सहज होता! त्याला हवं तेव्हा गूढ असणं, लोभस हसणं, नितळ वागणं सारं सहज साध्य होतं.
आज तो गेला! लोकं म्हणतात विश्वास बसत नाही अजून. लोकांना नसते ना सवय एवढ्या खरेपणाची! मुलामा दिलेलं, वर्खाखाली झाकलेलं, उसनं अवसानं घेतलेलं काहीतरी पाहण्यात जन्म निघून चाललेला असतो. मग 'अरे भय्याऽऽऽ!' असा पडद्यावरुन आवाज येतो. आणि हळुहळू त्याच्या शेजारी उभी राहणारी मोठी नावं सपक वाटू लागतात.
मान वर करुन पाहावीत अशी माणसं आधीच कमी असतात. म्हणूनच तो गेल्यानंतर रितं रितं वाटतंय. कुठंतरी जोडलेला धागा तुटून आत काहीतरी अधांतरी लोंबकळत राहावं असं...
वय वर्ष त्रेपन्न! आताशी तर बैठक बसत होती. अर्ध्यात मोडली!
थोड्या वेळापूर्वी बातमी वाचली. इरफान खान यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. जे काही अस्तित्व उरलं होतं, तेही लोप पावलं.
आता उरलाय तो 'लाईफ इन मेट्रो'मधला बडबड्या मॉन्टी,
'पिकू'तला स्टेरिंगमागे बसलेला राणा
'कारवाँ'मधला साधासुधा शौकत
'करीब करीब...' मधला 'घनघोर इश्क' म्हणणारा योगी
'नेमसेक'मधला अशोक
'लाईफ अॉफ पाय'मधला पाय पटेल
साजन फर्नांडीस,
पान सिंग तोमर,
अश्वीन कुमार,
चंपक बन्सल...
आणि इरफानचा तो आवाज
'अरे भय्याऽऽऽ'!


Sunday, April 12, 2020

क्वेश्चनमार्कवाला परेश रावल!

रात्रीचे साडेबारा वाजलेले.

मी :- ... आणि अशा तऱ्हेने टोपीवाल्याने सगळ्या टोप्या उचलल्या. त्या पेटीत भरल्या. आणि पेटी डोक्यावर ठेऊन तो चालत चालत जंगलातून दूर निघून गेलाऽऽऽ... संपली गोष्ट! चला झोपायला.
वसू :- कुठे गेला तो?
मी :- पुढच्या गावाला गेला. (मी पांघरुण घेत म्हटलं)
वसू :- नाव काय त्या गावाचं?
मी :- अंऽऽ रामपूर.
वसू :- कोण राहत होतं तिते!
मी :- लोक राहत होते.
वसू :- किती लोक?
मी :- खूप!
वसू :- खूप म्हणजे किती?
मी :- तीन हजार!
वसू :- तीन हजार म्हणजे किती?
मी :- भरऽऽपूर असतात ते. तुला नाही कळणार. झोप आता.
वसू :- वन, टू, थ्री... यामध्ये किती ते सांग.
मी :- अगं वन, टू, थ्री असं करत खूप पुढे गेलं की तीन हजार येतात.
वसू :- पुढे म्हणजे कुठे जायचं!
मी :- वसू, तुला गोष्ट सांगितली ना मी. आता झोप. साडेबारा वाजलेत.
वसू :- बाबा, साडेबारा म्हणजे किती? वन, टू, थ्री मध्ये किती ते सांग.
😖😍


Friday, March 22, 2019

रंग

तू इवल्या हातांनी उधळलेले रंग
आयुष्याच्या सांदीकोपऱ्यात जाऊन स्थिरावतायत
दररोज...
त्या रंगांना मोहक स्पर्श आहे
तुझ्या शब्दमोहाचा मधुर नाद आहे
लडिवाळपणाची गोडी आहे
आणि तुला नव्याने उमगू लागलेल्या रुसव्याची किनारदेखील!
ते रंग रुजत चाललेत आत खोलवर
आणि त्यातून मीच उगवतोय, रोज मोठा होतोय
बाप म्हणून...
इवल्या हातांनी, टपोऱ्या डोळ्यांनी आणि नाजूक ओठांतून बाहेर पडणाऱ्या "बाबा" या शब्दांनी केलेली ही रंगांची उधळण रोज अनुभवतोय, हे किती मोठं देणं आहे!
अशा वेळी ज्यावर विश्वास नाही, त्या देवाचेसुध्दा आभार मानावेसे वाटतात!

Friday, July 13, 2018

भिजलेला गुलमोहर

''बाबाऽऽऽ.... ए बाबाऽऽऽ... उठ...''
सकाळी साडेसात वाजता वसू मला उठवायला अाली होती.
''बाबा उठ... पाऊस पडतो... माझा गुलमोहर भिजत्तो...''
शब्दांनिशी डोळे उघडले तर बाहर पाऊस धो धो कोसळत होता. अामच्या खिडकीतून दूरवर गुलमोहराचं झाडं उभं असलेलं दिसतं. वसू रोज खिडकी बसून अोव्याच्या झाडाची पानं खाते. तेव्हा त्या गुलमोहराकडे हात दाखवून म्हणत असते, ''माझं झाड हाय!''
अात्ता पावसात गुलमोहर भिजू लागला म्हणून तिने मला उठवलं. मी अाळसावलेल्या डोळ्यांनी तिच्या चेहऱ्यावरची इटुकली चिंता पाहत होतो. मी तिला विचारलं,
''अगं गुलमोहर भिजतो तर अापण काय करणार?''
तर दोन्ही हातांच्या मूठी जागच्या जागी गोल फिरवत म्हणाली,
''पिळून टाकू.''
अाता बोला!

Saturday, July 7, 2018

बातें - ६

अाप कहों ना कहो
हम तो लिखेंगे
कुछ वादे सामनेवाले से नही
अपने अाप से भी होते है

---

अक्सर वादे अपने आप से ही होते है
हम तो बहाने बनाते हैं
किसी और के नाम के
उसे पुरा करने के वास्ते

बातें - ५

पर बडे छुपे रुस्तम हो तुम
भेजते नहीं अपनी कहाँनिया
अपने आफसाने
मांगना पडता है...
या फिर अब भी ऐतबार नहीं के समझ पायेंगे हम उन्हे

---

शक तेरी समझदारी पे नही
मेरे तखय्युल पे है
अक्सर लगता है
जहाँ मै थम जाता हूँ, वहाँ तू शुरू होती है