बांधल्या ओठांचा दोष नाही
थांबल्या शब्दांवर रोष नाही
ज्या वादळाशी झगडलो आकांताने
त्या ठिकाणी माझा अवशेष नाही
शब्दांचा थांग लागत नाही
या गझलेस अंत लाभत नाही
बरसणारा पाऊस ओतावा कुठे?
दुवा साधणारा पूल गवसत नाही
ओले काठ सोडवत नाही
भिजण्याचा मोह आवरत नाही
परतीची पावलं जड आहेत खरी
पण कृतघ्नतेचा आळ सोसवत नाही
थांबल्या शब्दांवर रोष नाही
ज्या वादळाशी झगडलो आकांताने
त्या ठिकाणी माझा अवशेष नाही
शब्दांचा थांग लागत नाही
या गझलेस अंत लाभत नाही
बरसणारा पाऊस ओतावा कुठे?
दुवा साधणारा पूल गवसत नाही
ओले काठ सोडवत नाही
भिजण्याचा मोह आवरत नाही
परतीची पावलं जड आहेत खरी
पण कृतघ्नतेचा आळ सोसवत नाही
No comments:
Post a Comment