सर्वांनी म्हटलं 'पाणी वाचवा'
तरी आम्ही होळी खेळलो!
दुष्काळाची चित्रं डोळ्यांसमोरून दूर सारत
आम्ही रंगात न्हालो.
दूर तिकडे आयपीएलविरुद्ध ओरडा सुरू झालाय.
पण आम्हाला तिकडे लक्ष देण्याचं कारण नाही,
कारण...
आमची होळी साजरी झाली...
तसाच आयपीएलही साजरा होईल.
तुफानी जाहिरात, सामन्याचा थरार
आणि विजयाचा जल्लोष होईल.
पाण्याचे टॅंकर भरभरून
खेळपट्टयांवर रिते होतील.
कोट्यावधी रुपयांची नवी
होळी साजरी होईल.
सुकं जाळण्याची प्रथा मोडेल.
यंदा पहिल्यांदाच ओली होळी जळेल.
अन् त्यात जळेल आमच्याही आतलं काहीतरी...
पण कुणाला पर्वा आहे त्याची?
दोन्ही हात तोंडावर आपटत
आम्ही बोंब ठोकू.
त्या गोंधळात सुक्याचा
आक्रोश दडपून टाकू.
आम्ही डोळ्यांवर बांधलीत
उत्सवाची चमचमती झापडं
बोच-या जाणिवांना वाकुल्या दाखवतात
मनाची बंद कवाडं
भेगाळलेल्या जमिनीवर आता
झगमगतील दिवे
वीज-पाण्याच्या दुष्काळात जमतील
उत्सवक-यांचे थवे
थव्यांतून येतोय आवाज
'आम्ही मैदान गाजवू'
आमचं रोम जळत असताना
आम्ही आनंदाने फिडेल वाजवू!
तरी आम्ही होळी खेळलो!
दुष्काळाची चित्रं डोळ्यांसमोरून दूर सारत
आम्ही रंगात न्हालो.
दूर तिकडे आयपीएलविरुद्ध ओरडा सुरू झालाय.
पण आम्हाला तिकडे लक्ष देण्याचं कारण नाही,
कारण...
आमची होळी साजरी झाली...
तसाच आयपीएलही साजरा होईल.
तुफानी जाहिरात, सामन्याचा थरार
आणि विजयाचा जल्लोष होईल.
पाण्याचे टॅंकर भरभरून
खेळपट्टयांवर रिते होतील.
कोट्यावधी रुपयांची नवी
होळी साजरी होईल.
सुकं जाळण्याची प्रथा मोडेल.
यंदा पहिल्यांदाच ओली होळी जळेल.
अन् त्यात जळेल आमच्याही आतलं काहीतरी...
पण कुणाला पर्वा आहे त्याची?
दोन्ही हात तोंडावर आपटत
आम्ही बोंब ठोकू.
त्या गोंधळात सुक्याचा
आक्रोश दडपून टाकू.
आम्ही डोळ्यांवर बांधलीत
उत्सवाची चमचमती झापडं
बोच-या जाणिवांना वाकुल्या दाखवतात
मनाची बंद कवाडं
भेगाळलेल्या जमिनीवर आता
झगमगतील दिवे
वीज-पाण्याच्या दुष्काळात जमतील
उत्सवक-यांचे थवे
थव्यांतून येतोय आवाज
'आम्ही मैदान गाजवू'
आमचं रोम जळत असताना
आम्ही आनंदाने फिडेल वाजवू!
