Friday, November 8, 2024

तुझेच मी गीत गात आहे (शिर्षकगीत)

नसे एकटी मी, जरी दूर तू
तुझी ओढ अजून काळजात आहे
मनाच्या रानात दरवळणारा
तुझ्या आठवांचा पारिजात आहे

येशील परतून आस ही वेडी
तुझे नाव दाही दिशांत आहे
ज्यात गेलो होतो वाहून दोघे
ओंजळीत अजून ती लाट आहे

दिल्या घेतल्या, वचनांची त्या
श्वासांत हळवी चांदरात आहे
तुझ्या सूरांची शपथ घेऊनी
तुझेच मी गीत गात आहे...