आत पेटलेल्या वणव्याच्या ठिणग्या
पडू नयेत कधी कुणाच्या घरावर
त्याने भडकलेल्या आगीत
पुन्हा मलाच होरपळायचं असतं
कितीही सावरलं तरी काही चुकार ठिणग्या
निसटतातच नजरकैदेतून
आणि समोर उभा राहतो
अनर्थाचा अग्नीडोंब
मी फक्त पहात रहायचं असतं
उंब-यावरच... सचिंत मनानं...
मग आतल्या आगीतूनच एक प्रार्थना जन्म घेते
समोरची आग विझण्यासाठी...
प्रार्थनेत अश्रू मिसळत जातात
रक्ताचा एक पाट वाहत येऊन मिसळतो
मनातली अस्वस्थता आत कोंडून टाकून
मी धावा करत असतो... आग विझवण्याचा...
त्या आगीत स्वतःची समिधा टाकावी का?
मग विझेल का ती भूकेली आग?
तिचा स्रोत माझ्या अंतरात तर दडलेला नाही ना?
... आता विचारांचाही जाळ भडकू लागतो
भूतापासून भविष्यापर्यंत सगळंच बदलावंसं वाटतं
माझ्याच पाऊणखुणा पुसाव्याशा वाटतात
स्वतःलाच भूल द्यावीशी वाटते
मी वाढवलेलं रोपटं उपटून फेकावंसं वाटतं
आगीचे लोळ विचारांचं कवच जाळू लागतात
माझं हिरवगार रान होरपळत जातं
मी माझीच होळी पाहत असतो
माझ्या कानावर माझीच बोंब ऐकू येत असते
पडू नयेत कधी कुणाच्या घरावर
त्याने भडकलेल्या आगीत
पुन्हा मलाच होरपळायचं असतं
कितीही सावरलं तरी काही चुकार ठिणग्या
निसटतातच नजरकैदेतून
आणि समोर उभा राहतो
अनर्थाचा अग्नीडोंब
मी फक्त पहात रहायचं असतं
उंब-यावरच... सचिंत मनानं...
मग आतल्या आगीतूनच एक प्रार्थना जन्म घेते
समोरची आग विझण्यासाठी...
प्रार्थनेत अश्रू मिसळत जातात
रक्ताचा एक पाट वाहत येऊन मिसळतो
मनातली अस्वस्थता आत कोंडून टाकून
मी धावा करत असतो... आग विझवण्याचा...
त्या आगीत स्वतःची समिधा टाकावी का?
मग विझेल का ती भूकेली आग?
तिचा स्रोत माझ्या अंतरात तर दडलेला नाही ना?
... आता विचारांचाही जाळ भडकू लागतो
भूतापासून भविष्यापर्यंत सगळंच बदलावंसं वाटतं
माझ्याच पाऊणखुणा पुसाव्याशा वाटतात
स्वतःलाच भूल द्यावीशी वाटते
मी वाढवलेलं रोपटं उपटून फेकावंसं वाटतं
आगीचे लोळ विचारांचं कवच जाळू लागतात
माझं हिरवगार रान होरपळत जातं
मी माझीच होळी पाहत असतो
माझ्या कानावर माझीच बोंब ऐकू येत असते
No comments:
Post a Comment