छातीत वणवा धुमसतो
आणि शरीर
पोटात गरगरणाऱ्या भोवऱ्याच्या आवेगात
भेलकंडत राहतं दिवसभर
आपणंच सांडलेल्या बियांच्या पारंब्या
वळवळत येऊन डसत राहतात
अब्जावधी दंशांनी
आणि तेव्हा
तूच रुजवलेलं इवलसं रोपटं
त्या भयाण कल्लोळात
मला आधार देऊ पाहतं
जीवनरस वाहून चाललेला असताना
डोळ्यात पैलतीरीचं चांदणं चमकत राहतं
खोल गाडलेल्या घागरीत गवसलेलं बळ
नव्या कातेसारखं अंगावर चढवून
मी चालत जातो तिथवर
रोपट्याला छातीशी धरून
सोबतीला असते तुझी सावली
पण वाळूत पावलं उमटत नाहीत तुझी
भगवंता,
सढळ हातांनी दान द्यायला
का रे नाही शिकवलंस या आयुष्याला?
पण घेणारंय मी सगळं
या आयुष्याकडून... अगदी भरभरुन!
आणि ते मिळणार नसेल
तर ढुंकूनही बघायचं नाहीए मला असल्या आयुष्याकडे
हो,
मला हवीयस तू
बेहद्द, बेहिसाब, बेखौफ
या जगरहाटीच्या, चौकटींच्या,
नियतीच्या नाकावर टिच्चून हवीयस
आणि मलाही उधळून द्यायचंय स्वतःला तुझ्यावर
बेपर्वा होऊन
पण तुला माझ्या सूरात सूर मिसळता येईल?
Wednesday, March 25, 2026
सूर
Wednesday, February 18, 2026
तेवढं पुरेय
तू फोनवर किती छान बोललीस माझ्याशी... आणि मी मोजकं बोलून थांबलो. कित्ता मुश्कील है ये... पताय? म्हणजे माझ्या आत काहीतरी बदललंय हे कळतंय मला, आणि ते तुझ्याचबद्दल आहे हेसुद्धा. आधी नव्हतं ना होत असं. पहले सब कुछ कितना आसान था. मिलना, घूमना, बात करना. अब सब मिठा मिठा सा मुश्कील हो गया है. असं वाटतं, की तुझ्याशी बोलताना मनातलं काहीतरी कधीही बाहेर येईल. आता मनात कायय हे माझं मलाच नीट कळत नाहीए. बाहेर काय येणारंय खुदा नोज! पण ही फेब्रुवारीची हवा अगदी न्यारी होऊन गेलीय.
सक्काळ सक्काळ तुझा फोन आल्यावर इतकं हरखायला काय झालंय मला? पहिल्यांदा फोन करतेयस का? घरी येऊन हक्काने आईच्या हातचा दालचा खाऊन जातेस. आणि आता अशी तू नव्याने भेटल्यासारखं काय करु लागलोय मी?
परवा आपला ग्रूप लेक्चरनंतर 'क्लासिक'मध्ये गेला. आपण कॉलेजबाहेर कितींदा दोघंच भटक भटक भटकलोय. अमर ज्यूस सेंटर, बडेमियाँ, शिवाजी मंदीर, झुडीयो... दोन साईडची रिटर्न तिकीटं काढून ट्रेनचा दिवसभर प्रवासही केलाय. पण तेव्हा नव्हतं काही वाटत. आता तुला गर्दीत भेटतानाही छातीत धडधड करत राहतं. हद है यार...
मी काउंटरला चहाची ऑर्डर देऊन येईपर्यंत सम्याच्या शेजारी बसलीस तू. माझ्या अगदी समोरच बसली होतीस. फक्त तीन फूट अंतरावर! आणि तरीही काळीज वरखाली होत राहिलं नुसतं. वाटलं, उठावं आणि तडक निघून जावं. नको चहा, नको हा ग्रूप! आणि तरीही नाहीच उठलो. उठता नाही आलं. तुझ्याशी झालेली एक पुसटशी नजरानजर सोडली तर मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलो. माझा चेहरा उतरलेला का? की डोळ्यात काही दिसलं? मग सम्याला उठवून मला शेजारी बसायला का लावलंस? जो भी हो! खुशीयों की फुलझडी उडाली नुस्ती! तीही दिसली वाटलं माझ्या थोबाडावर. समोर बसलेली कवू भुवया वर करुन करुन मला मुक्यानंच विचारतंय होती, की व्हॉट हॅपन्ड डूड?
इथं स्वतःलाच काही सांगता येईना, तर इतर कुणाला काय सांगावं? तुला तरी सांगावं का, की आतला माहोल बदललाय म्हणून? तू 'का?' विचारलंस तर काय उत्तर देऊ?रागावलीस तर काय करु? मैत्री तोडलीस तर? बोलायचं बंद केलं तर? शीट् यार! हे कित्ती 'तर, तर' आहेत! हे असं, 'ये हुआ तो क्या,' 'वो हुआ तो क्या' म्हणत आतलं मारुन मुटकून टाकायचं का? लोकं असंच करतात का? कदाचित... आणि मग आयुष्याच्या संध्याकाळी 'शायद मैने कहाँ होता' म्हणत मस्त हुळहुळती शायरी ऐकत बसतात. किंवा बसत असतील. आय डोन्ट नो व्हॉट दी ओल्ड गाईज डू? बट आय डोन्ट वॉना बी लाईक दॅट. म्हणून मी डॅडला सांगून टाकलं. म्हटलं, तुम्ही तुमच्या आणि ममाच्या कॉलेज डेजबद्दल सांगताना म्हणतात ना, शी वॉज माय टूडे अँड टुमॉरो, तसं काहीतरी वाटतंय. तर कित्ती जोराने हसले माहितीये! म्हणाले, चॅम्प! डोन्ट रश. नेटवरचे लव्ह कोटस् आणि वन लायनर्स डोक्यात ठेवून त्याला प्रेम समजू नकोस. लव्ह इज नॉट व्हॉट दे से, लव्ह इज व्हॉट यू डू. खरंतर मला नाय कळलं, ते काय म्हणाले ते. पण पुढचं कळलं. डॅड म्हणाले, मनाला जे वाटतंय ते ऐकणं खूप कठीण असतं. इटस् टफ टू फॉलो यूअर हार्ट. कारण ते नेहमीच दुनियेच्या अगेन्स्ट काहीतरी मागतं. पार अनकम्फर्टेबल करतं. पण तेच गट फिलिंग असतं आपलं. सो लिसन टू यूअर गटस्, लिसन टू यूअर हार्ट.
मी तेच करणारंय. हे जे अस्वस्थ वाटतं ना, ते प्रेमबीम आहे, असं मला नाय वाटत. पण जे आहे ते माझंय. आणि मला ते सांगायचंय तुला. तुला कळलं तर ठिक आणि नाही कळलं तरी ठिक. पर मै आगे जाके 'शायद' नही कहूँगा. मै को तेरे साथ रैने मे सुकून मिलता, एवढं कळतंय ना मला, आणि तेवढं पुरेय.
Thursday, February 12, 2026
पॅकिंग
पॅकिंग बाकी होगी!
आज ऑफिस से घर जाते जाते, डोलो-सॅरीडॉन की गोलींया ले लेना.
याद से! ये हमेशा टाल देती हो.
तुम्हारी इअररिंग ले लेना. उस दिन नोजरिंग ढिली हो गई थी. वो मत ले जाना.
शांत मन.
और हो सके तो मेरी कोई याद.
Wednesday, February 11, 2026
पैलतीर
पोटा-छातीपासूनची ओढाताण,
आणि
चांगल्या-वाईटाच्या टोकांमध्ये
हेलकावे खाणारं भयकंपीत मन
या सगळ्यातून पुढे आल्यानंतर ए रुमी,
मला कळतंय रे
त्या पाखराचं झंकारलेलं मन
दिव्यात सामावण्यासाठीची ती अतोनात धडपड
रोमारोमात भिनलेली अनिवार ओढ हा वेडेपणा नाहीए
जीवानं जीवासाठी दिलेली हाक आहे ती
मिलनाची, मुक्ततेची...
प्रयत्न, परिणाम, जीवन, मृत्यू,
भय अन् शंका
या साऱ्याच्याच पार घेऊन जाणारी
ती हाक ऐकू येतेय मला
आणि दिसतोय,
तुझ्या प्रेमसागराचा पैलतीर
Tuesday, February 10, 2026
गणित
"अगं ए... इतकं काय झालं चिडायला?"
"साला हरामखोर..." ती डोळे मोठ्ठे करत म्हणाली. "मला म्हणतो, असले कपलवाले चाळे पब्लिकमध्ये करायचे नायत."
"मग?"
"अरे मग काय?" तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"अरे आपल्याला तो कपल म्हणाला?" तिच्या आवाजात ढिगभर आश्चर्य आणि जरा रागही होता.
"अच्छाऽ... त्यावरून ऑफेन्ड झालीयस होय. मला वाटलं, तुझे चाळे पकडले म्हणून चिडलीयस?" त्याला माहित होतं, या वाक्यावर तिचं सटकणार. तसंच झालं.
"मी काय चाळे केले रे?" तिनं एक हात कमरेवर ठेवून, नेहमीसारखा एक डोळा बारीक करत विचारलं. त्यालाही नेहमीसारखीच गम्मत वाटली.
"२३ वर्षांची घोडी झालीयस आणि पाठकुळीवर बसतेयस माझ्या? ते पण गार्डनमध्ये? तो वॉचमेन ओरडेल नाही तर काय?"
"ह्या! ओरडू दे त्या डुकराला! आपलं बेटमध्ये काय ठरलेलं, हरलास तर मला पाठीवर घेऊन गार्डनच्या तीन फेऱ्या मारायच्या. मार आता!"
"असल्या चुत्याटीक बेटस् तुला का म्हणून सुचत राहतात?"
"लँग्वेज मिस्टर!"
"अच्छा? त्याला हरामखोर आणि डुक्कर म्हणताना कुठे गेलेली तुझी ही 'लँग्वेज'?"
"तुला का रे एवढा पुळका आलाय त्याचा? तो आपल्याला चारचौघात कपल म्हणाला, तुला नाय खटकलं?"
"मला का म्हणून खटकेल? आयला, बॉयफ्रेंड म्हणून मी बेस्ट फाईन्ड आहे. यू शुड बी थँकफुल." तो मजेत कॉलर ताठ करत म्हणाला.
"घंट्याचा बेस्ट फाईन्ड! बॉयफ्रेंड म्हणून किती दिवे लावलेस ते पाहिलं आम्ही! इतकी प्लॅनिंग करून शिवानीसोबत डेट फिक्स करून दिली तुझी. दुसऱ्या डेटला पोरगी पळाली तुझ्या हातनं."
तो जरा चरफडत म्हणाला, "एकतर मला तुझ्या प्लॅनिंग आणि सेटिंगची अजिबात गरज नव्हती, कळ्ळलं ना! आणि पळाली वगैरे काही नाही... आमची वाईब मॅच नाय झाली. म्हणून आम्ही थांबण्याचा म्युच्यूअल डिसिजन घेतला."
"ओ हो? म्युच्यूअल डिसिजन म्हणे?" ती ओठांचा चंबू करून चिडवत म्हणाली. "थापा मारायला मीच भेटते काय रे तुला? तुमच्या डिनरडेटचा स्टार्टर संपेपर्यंत पोरीने बाहेर येऊन तिच्या एक्सला फोन लावलेला."
त्याचा चेहरा उतरला, आणि तिचा खुलला.
"हाऽऽऽ मला कसं माहित हेच ना?" ती हातवारे करून चिडवून दाखवत म्हणाली. तो तिच्या हावभावाकडे शांतपणे पाहत उभा राहिला आणि म्हणाला,
"डिट्टो सर्कशीतला जोकर दिसतोय."
तशी ती झटकन सरळ उभी राहिली. त्याच्याकडे रोखून पाहत डोळ्यांनी आग ओकू लागली.
त्याला हसू आवरलं नाही. "माहितीय मला शहाणे, त्या चायनाटाऊनचा मॅनेजर ओळखीचाय तुझ्या. त्यानंच दिली तुला शिवानीची टिप."
ती निवळली.
"ए, शिवानीला तू असं काय बोललास रे, की ती डेटवरून पळून गेली?"
"सारखं पळून गेली, पळून गेली म्हणू नकोस हा!"
"म्हणणार! साल्या काहीतरी प्रचंड बोअरिंग टॉपिक काढला असणार तू. बोअर होऊन पळून गेली बिचारी."
"ज्याला व्हायचं बोअर त्याला होऊ दे. तू नाही होत ना? इतकं पुरेय."
"मी?" ती नाटकीपणे आवाज वाढवत म्हणाली. "अरे झेलते मी तुला, झेलते...!" ती छातीवर हात आपटत म्हणाली.
"तरीही माझ्याच पाठकुळीवर ये बसायला."
ती तोंडावर हात ठेवून खळखळून हसली. त्यानंही छान वाटून स्माईल केलं.
"अच्छी दिखती तू स्माईल करते हुए."
"ओहो! कॉम्प्लिमेंट? थँक्यू... पण तू कसंही हसलास ना, तरी तू माकडचं दिसतोस." ती आपल्याच विनोदावर जोरजोराने हसू लागली.
"असा एखाद्या मोमेंटचा असा पचका का करायचा असतो तुला?"
"ओ हॅल्लो!" तिने त्याच्यासमोर हात नाचवत म्हटलं.
"तेरे साथवाला मोमेन्ट लेकर मै क्या करू? उस वॉचमेन की बात को तू सिरिअसली मत ले आ... तू और मै सचमुच के कपल नैये."
"ओ हॅलो!" तो तिच्या हात नाचवण्याची ॲक्टिंग करत तो म्हणाला.
"तेरा मेरे सिवा किसी और के साथ मोमेन्ट नही बननेवाला."
"व्हॉट?" तिचे डोळे खऱ्या आश्चर्याने विस्फारले.
"व्हॉट काय व्हॉट?" तो कूलच होता.
"हे असलं ध्यान माझ्याशिवाय कोण झेलणारय? आणि माझ्यासारख्या मुलासोबत, तुझ्याशिवाय आणखी कुठल्या मुलीला इतका वेळ बडबड करायला जमलीय?"
ती गोंधळलेली.
"एक नंबरची चुत्याहेस. तुला अजूनही नाही कळतंय? अगं, गेली चार वर्ष, ना माझी गर्लफ्रेंड टिकलीय, ना तुझा बॉयफ्रेंड. पण आपण दोघे टिकलोय."
तिचे गोंधळलेल्या डोळ्यातलं गणित हळूहळू सुटायला लागलं.
"म्हणजे...?" तिनं अविश्वासाने विचारलं.
"म्हणजे, तो वॉचमेन मघाशी खरं बोलून गेला येडे..."
तो हसत म्हणाला आणि तिचा नेहमीच टिपेला पोचणारा आवाज घशातच अडकून राहिला.
Thursday, January 22, 2026
आवाज
Tuesday, December 26, 2023
चप्पल
हर रोज सुबह उठने के बाद
मै चप्पल पहन लेता हूँ
फिर भी,
दिनभर काम करते करते
पाँव मे बार बार कुछ चुभता रहता है
ऑफिस की सिढीयाँ कई बार चढ-उतरता हूँ
तब तकलिफ नहीं होती
पण शांती से बैठते ही
फिर कुछ चुभने लगता है
तब तुम्हारी याद आती है
गहरी...
कभी लिखता हूँ,
कभी किसी को पढ के सुनाता हूँ
चुभन वैसे के वैसी रहती है
शाम होती है
घर लौट आता हूँ
जुते उतार कर कोने मे रखता हूँ
रात होते होते तुम्हारी याद गाढी होती जाती है
अब चुभन दिल तक सुनाई देती है
रात को सो जाता हूँ
निंद मे भी चप्पल पैरो से नही निकलती...
मुझे पता है मै दूर हूँ तुम से
पर मै महसूस करता हूँ
तुम्हे, तुम्हारी पिडा को, इस अंतर को भी
किसी बोझ के तले दबे हुए सपने आते है
आँख खुलते ही तुम याद आते हो
मै उठता हूँ
हर रोज की तरह मै
फिर तुम्हारी चप्पल पहन लेता हूँ...
Monday, December 25, 2023
तेरी रोशनी
मुझे पसंद है इसलिए
शाम के वक्त
तुम दिया जलाया करती हो
वो रोशनी दिखाती है मुझे
तुम तक पहुँचने का रास्ता
प्रिये, ये रोशनी रहने देना
मुझे तुम तक आना है
Tuesday, December 19, 2023
सराब
सीने मे धुँआ सा उठता रहता है
कई बातों की अनकहीं मे दम घुटता सा रहता है
तेरे चेहरे पर खुशी देखे अरसा बित गया
आईने मे हसता हुआ चेहरा अब सराब सा लगता है
Saturday, April 8, 2023
मन भरत जातं...
मनाचे काठ डोळ्यांच्या कडांपर्यंत पोचतात का?
मन अतिव समाधानाने, आठवणीने, प्रेमानं काठोकाठ भरुन ओसांडून वाहतं, तेव्हा डोळे झरु लागतात, ते त्यासाठी का?
तुझ्या सहवासात माझं मन भरतं, असं म्हणताना मला तृप्त झाल्याची भावना अनुभवाला येतंच नाही. कारण तू कितीही लाभलीस तरी कमीच पडतेस. तू सोबत असताना मला जे काही अनुभवाला येतं, जे जाणवत राहतं ते सारं मला नीट स्वीकारताही येत नसावं. एकाच वेळी ह्रदयात उष्ण आणि थंड अशी दुहेरी जाणिव होत राहते. कसा अर्थ लावायचा त्याचा? अर्थ सोड, ती अवस्था नीटशी अनुभवायची कशी, हेदेखील मला अजून कळलेलं नाही. मी निवांत असताना तुझ्या ओढीच्या तीव्रतेनं शरीर कंप पावण्याचा आणि अगदी अस्वस्थ असताना तुझ्या विचारानं मनाला शांतता लाभण्याचा अनुभव मला वारंवार येतो.
किती हा विरोधाभास?
विरोधाभास हा प्रेमभावनेतला कॉन्स्टन्ट असतो का गं?
म्हणूनच मनात जे काही उमलत राहतं त्याचे अर्थ लावण्याची, ते निव्वळ अनुभवण्याचीही माझ्या मनाची क्षमता मर्यादीतच वाटत राहते. त्या अनुभवाच्या आवेगाने मन प्रचंड थकून जातं. त्या वेळी मला कुठलीच नवी जाणिव-अनुभव नको असतो. मन क्षणभर कोरं करकरीत असावं असं वाटतं. तरीदेखील विहीरीच्या तळाला झरा फुटावा तसे तुझ्याबद्दलचे कितीतरी विचार उमळून वर येत राहतात; हे सतत घडत राहतं! ते सामावून घेता घेता माझा श्वासही थकून जातो. मनानं ती संपृक्तावस्था गाठली की शिणलेले गहिरे कढ दाटून येतात. मन जडावत जातं. आणि ते सारं मावेनासं झालं की डोळ्यांवाटे बाहेर पडतं. आणि त्याही क्षणी तू सोबत नसल्याची भावना आतल्या एका रिकाम्या जागेकडे बोट दाखबत राहते.
तृप्त होण्याची जागा तशीच रिकामी ठेवत मन असंच भरत जातं असतं का?
Thursday, February 16, 2023
दिल मे सुकून था!
लोकल ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसलो होतो. ती ट्रान्सजेंडर पैसे मागत आली. आताशा मी त्यांच्यामुळे पूर्वीसारखा अनईझी होत नाही. पण मी त्यांना कधीच पैसे देत नाही. ती समोर येऊन हात पसरुन उभी राहिली. चेहरा गोड, आकर्षक! मी कधी नव्हे ते तिच्याकडे जाणिवपूर्वक एकटक पाहत राहिलो. ती माझ्या नजरेला मनावर न घेता निघून गेली. पण मी तिला मनात घोळवत राहिलो.
Friday, February 10, 2023
इज़हार-ए-महोब्बत
मला जे सांगावसं वाटतं ते या जगात फक्त तुला ऐकू जातं असं वाटतं मला. मला आजपर्यंत कुणाबद्दलच असं - एवढं - इतकं छान वाटलेलं नाही. ही फिलिंग अशी माझ्या आत छान पसरत जाते. रोपट्याला जमिनीतून पाणी मिळावं अशी काहीतरी. तुला भेटावसं वाटतं मला! म्हणजे तू शेजारी बसलेली असशील तरीही. आणि तुला भेटण्यासाठी तू शेजारी असणं गरजेचंही नसतं. तुझ्याकडे खूप काही मागावंसं वाटतं आणि नकोही असतं. हा संभ्रम किंवा गोंधळ नाहीए. तर अशी खूप खूप प्रोफाउण्ड फिलींग आहे जिचा चटकन अर्थ लागत नाही. त्यामुळे याला जर इज़हार-ए-महोब्बत म्हणायची असेल तर म्हणूयात.


