रुणझुणत राहिलो किणकिणत राहिलो
जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो
सात्वनांना तरी ह्रदय होते कुठे?
रोज माझेच मी मन विणत राहिलो
ऐकणारे तिथे दगड होते जरी
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो
शेवटी घर राहिले सुनेच्या सुने
उंब-यावरच मी तणतणत राहिलो
विझत होते जरी दीप भवतालचे
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो
दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो
मज न ताराच तो गवसला नेमका
अंबरापार मी वणवणत राहिलो
- सुरेश भट
जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो
सात्वनांना तरी ह्रदय होते कुठे?
रोज माझेच मी मन विणत राहिलो
ऐकणारे तिथे दगड होते जरी
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो
शेवटी घर राहिले सुनेच्या सुने
उंब-यावरच मी तणतणत राहिलो
विझत होते जरी दीप भवतालचे
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो
दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो
मज न ताराच तो गवसला नेमका
अंबरापार मी वणवणत राहिलो
- सुरेश भट
No comments:
Post a Comment