मंद चांदण्यात उभा
नभ मोकळे समोर
लाटा पुसती हळूच
उरी कोणता दगड?
धुंद वारा तो बोचतो
रात्र येते अंगावर
डोळा घन हा दाटला
दाटूनी आली सर
सरसर आल्या सरी
त्यांना सावरू मी कसा?
उंब-यावरी दाटे मेघ
त्याला आवरु मी कसा?
डोळा उघडता रोज
तुला पहावंस वाटे
मन गुंतवू गं कुठे
क्षणाक्षणा सय दाटे
कसं जाऊ वाटे तुला?
मज एकला सोडून
काही क्षणांचा तो डाव
रोज जाशी तू मोडून
माझ्या समींदराच्या काठी
वारा घुमतो तो कानी
येणाजाण्या-यास सांगे
मोडल्या डावाची ती कहाणी
कहाणी ती नाही साधी
त्यास फुटला अंकुर
तुझ्या आनंदाचं फुलं
उगवेल त्याच्यावर
फुलं तारकांची अशी
माळ तुझ्या तू केसात
हळूच पाहिन दूरून
दोन पावलांची साथ
छान रंगू दे तो विडा
सजू दे ते रान सारं
दवबिंदूलाही येवो
समाधानाचा बहर
नभ मोकळे समोर
लाटा पुसती हळूच
उरी कोणता दगड?
धुंद वारा तो बोचतो
रात्र येते अंगावर
डोळा घन हा दाटला
दाटूनी आली सर
सरसर आल्या सरी
त्यांना सावरू मी कसा?
उंब-यावरी दाटे मेघ
त्याला आवरु मी कसा?
डोळा उघडता रोज
तुला पहावंस वाटे
मन गुंतवू गं कुठे
क्षणाक्षणा सय दाटे
कसं जाऊ वाटे तुला?
मज एकला सोडून
काही क्षणांचा तो डाव
रोज जाशी तू मोडून
माझ्या समींदराच्या काठी
वारा घुमतो तो कानी
येणाजाण्या-यास सांगे
मोडल्या डावाची ती कहाणी
कहाणी ती नाही साधी
त्यास फुटला अंकुर
तुझ्या आनंदाचं फुलं
उगवेल त्याच्यावर
फुलं तारकांची अशी
माळ तुझ्या तू केसात
हळूच पाहिन दूरून
दोन पावलांची साथ
छान रंगू दे तो विडा
सजू दे ते रान सारं
दवबिंदूलाही येवो
समाधानाचा बहर
No comments:
Post a Comment