अब सहा नहीं जाता
Wednesday, March 29, 2023
बोझ
अब सहा नहीं जाता
Monday, March 27, 2023
मी प्रेम करतो तुझ्यावर!
मी प्रेम करतो तुझ्यावर!
तुझ्या-माझ्यातल्या दुराव्याची सगळी अंतर मापत...
तुझा आवाज ऐकताना उरात उमळलेली धडधड सावरत...
अंगभर उगवणारी थरथर पुन्हा त्याच मातीत रिचवत...
दिव्यावर झेपावणाऱ्या पाखराच्या आवेगाची तीव्रता पचवत...
तुजवीण संथावत चाललेल्या श्वासाला उसनं बळ देत...
जडशीळ छातीत सयगंधाला भरुन घेत...
या चेहऱ्यावर फुलणारं तुझं हसू डोळा भरुन घेत...
वर्तमानाच्या खडकाळ भुईत भविष्यातल्या समाधानाची बीजं पेरत...
तुझ्यासाठी उभ्या जगाला फाट्यावर मारण्याची जिगर जागवत...
तुझा हात धरण्याची अन् ती पकड निभावून नेण्याची धमक
स्वतःचीच स्वतःला अधोरेखित करत...
तुझ्यासाठी माझ्यातल्या स्त्री-पुरुषाची गुंतवण अधिक घट्ट करत...
अहिल्येची प्रतिक्षा अन् मीरेची ओढ यांतला तोल साधत...
मी प्रेम करतो तुझ्यावर...
Sunday, March 26, 2023
पिव्हेट पॉईंट
सांगावं की नाही
व्यक्त व्हावं की नाही
जे कळतंय-जाणवतंय ते पोचवावं की नाही
हा प्रश्नय मोठा...
आपलेच अक्राळविक्राळ डोह
आ वासून आपल्यालाच गिळंकृत करण्यासाठी पुढं सरसावत असताना
इतरांना त्यात डोकवायला आमंत्रित करणं कितीसं योग्यय?
तू आणि मी सुद्धा
जेव्हा मला असं एकटं सोडून देता
तेव्हा किती झर्रकन दूरवर निघून जात राहतो मी...
भयानं, काळजीनं, चिंतेनं, अंधारानं चिंब भिजून गेलेला
खूप काही सांगण्याची आस असलेला आणि नसलेलाही
दोलायमान अवस्था बरी अशा स्थितीत अधांतरी झुलत असलेला
स्वतःचं स्वतःच्या वेडसर विचार-कल्पनांशी लढत राहतो एकटा
हे सगळं कुठून निर्माण होतं? कुठून येतं? का उगवतं?
तू सोबत नसण्याचे एवढे गहिरे ओरखडे का?
की तुला ते सांगता येत नसल्याच्या जखमा आहेत या?
सांगणं सोपं आहे देखील आणि नाही देखील
आपली ओझी दुसऱ्याच्या पदरात नेऊन टाकण्यात हशील ते काय?
आणि ओझी काही कमी नाहीत
शब्द न गवसण्याचे भार आहेतच
जोडीला शब्दांचे येणारे नजराणे खुंटलेत
आवाजाच्या तारा तुटल्यायत
सकाळपासून एक फोन करायला जमू नये? तुलाही? मलाही?
मग आठवणींमध्ये बेमालूम मिसळत जाणाऱ्या कल्पनांनी
स्वतःची नखं बाहेर न काढली तरच नवल!
बोचणं, टोचणं, भंजाळून जाणं हे क्लिशे वाटावं
अशा यातनांचा वर्षाव होत जातो
माझा मीच करत राहतो
यथेच्छ...
स्वतःच स्वतःचा समाचार घेत
चाबूक, पैरण, वीजा, तलवारी
अगदीच काही नाही सापडलं तर अणकूचीदार दाभण हात घेऊन
सोलवटून काढत राहतो स्वतःला
उसवल्या-उचकटल्या त्वचेखालचं जळजळीत आम्लं
पुन्हा मलाच जाळायला येतं तोंड वर करुन
कॉन्ट्राडिक्शनची किती शिखरं गाठावीत माणसानं?
सगळी उत्तरं आपल्यापाशीच असल्यागत
पण एकालाही हात लावता येऊ नये जणू
भव्यदिव्य खोल गर्तेच्या निच्चतम बिंदूकडे चाललेला हा प्रवास थांबेच ना...
हा दिवसच वाईटंय
की माझा विचार?
मग तुझे कुठले कुठले शब्द शोधून
तापल्या मनावर पाणी ओतत राहणं येतं
ह्रदय जाळणारे चरचरीत आवाज उमटत जातात
खरंच वेडाय का मी? खरंच लहान मूल झालोय का?
तू कंटाळणार नाही ना मला?
प्रश्नांची सरबत्ती थांबावी कशीतरी ही एकदाची
तोफ धडाडली की आत कोंडलेली दारु
निदान बाहेर तरी पडते
इथे सगळंच लूपमध्ये चाललंय
धडाडणं, पुन्हा कोंदटणं, गहिरवणं, सर्दावणं, खंतावण, मधेच भिजत पडणं, शांतावणं, पुन्हा भरणं...
यातनाचक्र
मीच माझ्यासाठी तयार केलेलं
डान्टेनं लिहिलेला इन्फर्नो असाच आहे म्हणतात!
प्रितीचा, तिच्या आवेगाचा, आठवणींचा, त्या मागे सोडणाऱ्या ओघळांचा
भार जमतो का वहायला मनाला?
न पुसता कोण देऊन जातं ही देवाची देणी?
आणि माझ्या समस्त सृष्टीत अशी उलथापालथ होत असताना
माझं तुझ्यावर प्रेम आहे हा एवढाच भाग कॉन्स्टन्ट असतो...
सबंध ब्रम्हांडाच्या पिव्हेट पॉईंटसारखा...
Saturday, March 25, 2023
Friday, March 24, 2023
साँस
तुम ज़ब भी
मुझ से बात नहीं करती
मेरा दिल सहम जाता है
फ़िर तुम दो लफ़्जो के बीच
साँस लेने के लिए क्यों ना रुकी हो...
Wednesday, March 15, 2023
कुछ दर्द
वक़्त हर मर्ज का इलाज होता है.
फिर भी कुछ दर्द
वक्त़ के मुकाबले
बड़े लंबे चलते है...
Monday, March 13, 2023
गली
Sunday, March 12, 2023
स्तन
ये शायद ज़ानता नहीं,
पर...
किसी नवज़ात बच्चे को ख़ोने के बाद
स्त्री के स्तन से जैसे दूध बहता रहता है ना,
मै हर वक्त़ वैसा महसूस करता हूँ
Friday, March 10, 2023
कैसा लगता है तुम्हें?
तुम्हारी आँख़ ख़ुलती है
तुम अपने घर मे नहीं
मेरे सपने मे होती हो
तब सच सच बताना
कैसा लगता है तुम्हें?
उस अंधेरे मे जलते हुएदीपक देख़ती हो
जो तुम्हारी ही यादों सेजलते रहते है
उस रोशनी मे तुम्हे
मेरे दिल तक ज़ानेवाला रास्तादिख़ाई देता है
सच सच बताना,
कैसा लगता है तुम्हे?
तुम मेरे दिल तक आ करदस्तक देती हो
और ज़ाग ज़ाता हूँ मै
अपने बिस्तर पर
कुछ लिख़ कर भेज़ दिया करता हूँ तुम्हे
तुम वो वहाँ पढ लेती हो
यूँ एक ही वक्त़ मे दो ज़गह मौज़ूद होना
मेरे जि़स्मो-ज़हन पर छा ज़ाना
बताओ तो जरा,
कैसा लगता है तुम्हे?
Tuesday, March 7, 2023
तौहीन
Monday, March 6, 2023
चली आना
तुम अगर कभी
ख़फ़ा हो भी गए मुझ से
तो रुठ कर
मेरे ही पास चले आना...
Sunday, March 5, 2023
विद्ध!
तुझं असणं जेवढं आश्वस्त करतं मला
तेवढंच तुझं नसणं विद्ध!
भारलेला दिवस
माझी प्रत्येक सकाळ तुझ्या जिव्हाळ्याने भरलेल्या शब्दांनी सुरू होते. मनाला गारवा देणारा अनुभव असतो तो माझ्यासाठी. तुझा मंद-मुलायम आवाज ऐकू येतो तेव्हा तू जवळ भासतेस आणि दूरही. ते छानही वाटतं, किंचित बोचतंही. तू दिसत नाहीस, डोळ्यांपुढे नाहीस, मला तुला त्या पातळीव अनुभवता येत नाही यानं मन दुखावतं-खंतावतं. तू आणि मी कधी कामाचं बोलतो, इकड-तिकडच्या गप्पा करतो, ते अर्थ-बीनअर्थाचं सगळंच बोलणं मला फार हवंहवंसं वाटतं. न बोलता-लिहीता आपल्यामध्ये नांदणारी शांतताही तितकीच हवीहवीशी, आश्वस्त करणारी असते. आजकाल मी बसल्या बसल्या उगाचच माझा हात पुढे करतो. या वेड्या आशेसह की तू चटकन धरशील तो. तुझ्या स्पर्शाची कल्पना करुन मी उगाचच सुखावतो. बोटात बोटं गुंफली जातात, नजरेला नजर मिळते आणि माझा तुझ्याशी संवाद सुरू होतो. अथांग-अमर्याद असा. त्याला काळाचं, परिस्थितीचं, पात्रांचं असं कशाचंच भान नसतं, चौकट नसते. मला तसं तुझ्यासोबत राहायला आवडतं. तू इथे नाहीस, म्हणून मी माझ्या मनाची तशा संवादाच्या आधारे फसवणूक करतोय, असं नसतं ते! माझ्यासाठी तो खूप खराखुरा संवाद असतो. अस्सल असा!
माझा प्रत्येक दिवस तुझ्या शब्दांनी, संवादांनी, आठवणींनी भारलेला असतो...
बहाणे
माझं लिहिणं, सिनेमा पाहणं, मित्रांशी बोलणं, काम करणं, पेपर वाचणं, बाजारात जाणं, कपड्यांना इस्त्री करणं, टीव्ही पाहणं, क्लाएंटला भेटणं, चित्रं काढणं, गाडी चालवणं, काहीतरी खाणं, काहीतरी पिणं, डोळे उघडणं, ते मिटणं, श्वास घेणं...
हे सगळेच्या सगळे बहाणे आहेत...
तुझ्या आठवणीऐवजी इतरत्र गुंतण्याचे...
आणि तरीदेखील ते गुंतणं होतं नाही.
Saturday, March 4, 2023
बड़ी बात
Friday, March 3, 2023
छेड़ख़ानी
इक निकली तो सारी निकल आई
Thursday, March 2, 2023
तेरा खयाल
उस आखरी वक़्त मे
ज़िस्म से ज़ान निकल गई
पर ज़हन से लिपटा तेरा ख़याल है
के मानता ही नहीं
Wednesday, March 1, 2023
सौग़ात
तुम्हारी याँद साँस की तरह है
ये कहाँ था कभी उस ने...
... अरसे बीत चुके है
हिचकीयों की सौग़ात नहीं आई