सकाळी डोळे किलकिले करण्याच्या आधी
तुझी मिठी माझ्याभोवती पडलेली असते
तुझे ओठ माझ्या गालावर विसावत असतात
मी झोपेतून जागा होऊन
एका मऊसूद स्वप्नाच्या काठावर उभा राहतो
थोडा जागा... थोडा निजलेला...
अजूनही स्वप्नात असल्यासारखा
तुझ्या सोबतीचं मंद समाधान पांघरुन
मी विसावत जातो तुझ्या बाहुपाशांत
तुझं अल्ल्डपण, तुझा निरागसपणा,
तुझी माया, तुझा जिव्हाळा...
सारं काही दिवसाच्या पहिल्या क्षणातच दाटून येतं
सूर्योदयापूर्वी आकाशात पसरणारे रंगच जणू
तुझ्या सहवासानं, त्या स्पर्शानं
माझी प्रत्येक सकाळ नव्याने जन्म घेत जाते
तुझं सतत माझ्याभोवती बागडणं
भिरभिरणा-या फुलपाखरासारखं असतं
अन् तुझ्यामुळे मी मलादेखील भासू लागतो
एखाद्या फुलासारखा...
मी अनुभवलीय तुझी अस्वस्थता
मी दूर असतानाची...
मी अनुभवलीय तुझी काळजी
मला होणा-या छोट्या-मोठ्या त्रासातली
तुझा तो ओलावा, माझ्या कणाकणातून पाझरत जातो
त्या आल्हादक अनुभवात चिंब भिजत राहतो मी
तुझ्या माझ्यासोबत असण्यानं मी जपला गेलोय...
तुझी मिठी माझ्याभोवती पडलेली असते
तुझे ओठ माझ्या गालावर विसावत असतात
मी झोपेतून जागा होऊन
एका मऊसूद स्वप्नाच्या काठावर उभा राहतो
थोडा जागा... थोडा निजलेला...
अजूनही स्वप्नात असल्यासारखा
तुझ्या सोबतीचं मंद समाधान पांघरुन
मी विसावत जातो तुझ्या बाहुपाशांत
तुझं अल्ल्डपण, तुझा निरागसपणा,
तुझी माया, तुझा जिव्हाळा...
सारं काही दिवसाच्या पहिल्या क्षणातच दाटून येतं
सूर्योदयापूर्वी आकाशात पसरणारे रंगच जणू
तुझ्या सहवासानं, त्या स्पर्शानं
माझी प्रत्येक सकाळ नव्याने जन्म घेत जाते
तुझं सतत माझ्याभोवती बागडणं
भिरभिरणा-या फुलपाखरासारखं असतं
अन् तुझ्यामुळे मी मलादेखील भासू लागतो
एखाद्या फुलासारखा...
मी अनुभवलीय तुझी अस्वस्थता
मी दूर असतानाची...
मी अनुभवलीय तुझी काळजी
मला होणा-या छोट्या-मोठ्या त्रासातली
तुझा तो ओलावा, माझ्या कणाकणातून पाझरत जातो
त्या आल्हादक अनुभवात चिंब भिजत राहतो मी
तुझ्या माझ्यासोबत असण्यानं मी जपला गेलोय...