जखम ठसठसत असते
रक्त वाहत असतं
मी गात असतो
सारं काही आलबेल असतं
चिरे ढासळत जातात
धूळ उडत असते
माझ्या शब्दांची धार
आता मलाच चिरत असते
माझ्या अस्वस्थ होण्यानं
मी पुन्हा अस्वस्थ होत जातो
माझ्या हातातला भाला
रक्तानं माखत जातो
मला पाऊलखुणांचा पाठलाग
आता सोसवत नसतो
धावून जमिन संपलेली असते
मी आता कड्यावर उभा असतो
स्वप्नं अस्पष्ट होत जातात
सूर्य मावळत जातो
खाली कोसळत्या दरीत
पावलांचा तोल जातो
कोसळता कोसळता
मन बधीर होऊन जातं
भावनांचा ससेमिरा
क्षणभरासाठी रोखला जातो
पण मनातली सुटकेची आशा
क्षणभंगुरच ठरते...
अस्वस्थ लाटा उसळू लागतात
रिकामे वारे घुमू लागतात
पुन्हा रक्त वाहू लागतं
पुन्हा चिरे ढासळू लागतात...
रक्त वाहत असतं
मी गात असतो
सारं काही आलबेल असतं
चिरे ढासळत जातात
धूळ उडत असते
माझ्या शब्दांची धार
आता मलाच चिरत असते
माझ्या अस्वस्थ होण्यानं
मी पुन्हा अस्वस्थ होत जातो
माझ्या हातातला भाला
रक्तानं माखत जातो
मला पाऊलखुणांचा पाठलाग
आता सोसवत नसतो
धावून जमिन संपलेली असते
मी आता कड्यावर उभा असतो
स्वप्नं अस्पष्ट होत जातात
सूर्य मावळत जातो
खाली कोसळत्या दरीत
पावलांचा तोल जातो
कोसळता कोसळता
मन बधीर होऊन जातं
भावनांचा ससेमिरा
क्षणभरासाठी रोखला जातो
पण मनातली सुटकेची आशा
क्षणभंगुरच ठरते...
अस्वस्थ लाटा उसळू लागतात
रिकामे वारे घुमू लागतात
पुन्हा रक्त वाहू लागतं
पुन्हा चिरे ढासळू लागतात...
No comments:
Post a Comment