Thursday, December 1, 2011
Thursday, November 24, 2011
नातं
शिवाजीपार्कच्या कट्ट्यावर तो एकटाच बसला होता. छान संध्याकाळ रंगून आली होती. त्याला आवडणारा पिवळसर प्रकाश पसरला होता. कितीतरी जोडपी, मित्रमैत्रीणींचे घोळके त्याच्या आजूबाजूला होते. मस्त गलका होता आजूबाजूला. आणि तो गप्प.
जवळपास अर्धा तास झाला असेल. तो तिथेच बसून होता. विचार करत. मध्येच स्वतःशी बडबडायचा. मग त्याला सभोवतालचं भान यायचं आणि मग पुन्हा गप्प बसायचा. स्वतःशी बोलताना तो नुसता बडबडायचा असं नाही. तो हातवारे करायचा, त्याच्या चेह-यावर संभाषणातले भाव यायचे. जणू काही समोर बसलेल्या ख-याखु-या व्यक्तीशीच बोलतोय जणू. दुस-या कुणी पाहिलं तर मानसिक रोगीच वाटला असता तो. पण तो तसा नव्हता. चारचौघांसारखाच तो सामान्य मुलगा होता.
ब-याचदा तो कुणा मुलीसोबत दिसायचा तिथे. त्यांचं छान संभाषण चालायचं. तिच्या सहवासात तो फुलून यायचा, त्याच्या सहवासात ती रंगलेली असायची. त्यांना कधी हातात हात घातलेलं किंवा खांद्यावर हात टाकून चाललेलं कुणी पाहिलं नाही. पण ते एकत्र असायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यात परस्परांबद्दल खूप आपुलकी, प्रेम असायचं. कधी पार्कात, कधी शिवाजीमंदीरच्या फुटपाथवर, कधी कुठे चहाच्या टपरीवर, एखाद्या हॉटेलात, नाही तर दादर स्टेशनच्या फलाटावर उभं राहून ते कितीतरी वेळ गप्पा छाटायचे.
गप्पांना कोणताही विषय पुरायचा त्यांना. साहित्य, चित्रपट, सामाजिक घडामोडी, घरगुती गोष्टी, नातेसंबंधांवर चर्चा, असं बरंच काहीसं असायचं त्यांच्या बोलण्यात. आणि या सगळ्यात त्यांच्या मनातल्या चोरकप्प्यात बंद असलेलं आपसुक वर यायचं. मग ते शेअर व्हायचं. समजून घेतलं जायचं. चर्चीलं जायचं. कधी भांडणंही व्हायची. पण भांडणाचा स्वर कानापर्यंत पोचून मागे फिरायचा. त्याने कधी मनात उतरण्याचा प्रयत्नही केला नाही.
कधी ती डिस्टर्ब असायची. मग तो तिला बोलावून घ्यायचा. कधी त्याला कसनुसं वाटत असायचं. मग ती त्याला भेटायला बोलवायची. दोघेही यायचे. त्यांच्या मनात परस्परांबद्दल जेवढी माया होती तेवढाच आदरही होता. शिवाजीमंदिर आणि पार्काच्या सान्नीध्यात कितीतरी सांजरंग पाहिले होते त्यांनी. तिथंच त्यांचं नातं बहरलं. घट्ट झालं. माणसं देवळात जायची आणि तो तिला भेटायचा. ती माणसांपासून चार हात लांब रहायची आणि त्याची वाट पहात तिथं उभी रहायची. दोघांनाही परस्परांचे विचार ठाउक होते. कल्पना ठाउक होत्या. मर्यादांसोबत विस्तार ठाउक होते. एवढं, की दोघांना परस्परांच्या मनातलं न सांगता कळायचं. अतिशयोक्ती नाही, खरंच कळायचं. आपल्याला जाणणारं याजगात नक्की कोण आहे हे दोघांनाही माहित होतं. तोच त्यांचा आनंद होता...
... पण आज त्याच्या चेह-यावर तो आनंद दिसत नव्हता. तो तिची वाटही पहात नव्हता. कट्ट्यावरून उठून तो चौपाटीकडे चालू लागला. त्याची नजर उगाच कुठेतरी गुंतलेली होती. रस्ता ओलांडून तो किना-यावरच्या बागेत आला. तिथल्या भिंतीजवळ जाउन तो उभा राहिला.
मंद वारा सुटला होता. समोर पहुडलेला समुद्र खूप शांत वाटत होता. किती खोल होता तो कुणास ठाउक. किती घडामोडी घडत असतील ना त्याच्या अंतरंगात? पण तरीही वरून अगदी गंभीर वाटत होता. पलिकडे असलेली सूर्यही तसाच सकाळी किती प्रखर होता. आता डोळे भरून पाहता येतंय त्याच्याकडे. पण आता तो वेगानं अस्ताला चालला होता. तो सूर्याकडे बघत राहिला नुसता. त्याला अशावेळी आकाशातले रंग खूप आवडायचे. कदाचित कधीतरी न बोलता जवळ बसून त्यांनीही सूर्यास्त पाहिला असावा. कुणास ठाउक पण, आज त्याला सूर्य खूप जवळचा वाटला. अगदी त्याच्यासारखा. थोडा निस्तेज. अंधाराच्या कुशीत गडप होण्यास उत्सुक असा.
काही वेळातच अंधार पडला. त्याची पावलं माघारी फिरली. शांतपणे. खरंच शांत होता. त्याच्या मनात रोष नव्हता, असुया नव्हती, तिच्या आयुष्यात दुसरं कुणी आल्याची सलंही नव्हती. त्यांचं नातं खरंच तेवढं प्रगल्भ होतं. पण तरीही त्याचं मनं घडल्या घटनांचं कारण शोधत होतं. तिचं जाणं सहज नव्हतं. त्यात खूप अवघडलेपण होतं. समोरासमोर आल्यानंतर जे ओठ तासनतास बोलत रहायचे ते आता शब्दांना थोपवू पहात होते. ज्या डोळ्यांनी परस्परांचा आनंद पाहिला ते आता प्रयत्नपूर्वक दुसरीकडे गुंतू पहात होते आणि हे सगळं त्याला सहन होतं नव्हतं. नातं तुटलं नव्हतं, पण त्याचा प्रवाह आटला होता. पाणी वाहून गेलं होतं, पण तिथे न दिसणारे ओघळ त्याच्या नजरेत खुपत होते. म्हणून त्याला उत्तर हवं होतं.
अचानक वाट्याला आलेली ही शांतता त्याच्या अंगावर येत होती.
ती त्याला कंटाळली होती का? तर नाही.
तिला तो आवडत नव्हता का? असंही नाही.
तिच्या एकाएकी जाण्याचं त्याला आता एकचं उत्तर समोर दिसत होतं.
त्याच्या जीवनातली तिची भूमिका संपली होती. ती त्याच्या आयुष्यातून कदाचित दूर जाणार नाही, पण आधी होती तशीही राहणार नाही. ती असेल, पण थोड्या बदललेल्या रूपात. कुठल्यातरी वेगळ्या जागी. कारण आधीची जागा त्या आधीच्या 'तिने' व्यापलेली होती. आणि राहील. नाती संपत नाहीत, तुटत नाहीत, ती बदलतात. त्याच्या मनाच्या जवळ असलेलं हे नातं बदललं. याची सवय होईपर्यंत, मनानं ते नीट मान्य करेपर्यंत त्याचा थोडा त्रास होईल त्याला. जुन्या चित्रांमधले रंग आठवतीलही. पण नंतर घेईल जुळवून तो. घ्यावंच लागेल त्याला.
तो आत्ममग्नतेने चालला होता. समुद्र अजूनही शांत होता. पार्कातला गजबजाट कमी होउ लागला होता. अंधार पसरत होता. मावळलेला सूर्य उद्याच्या सूर्योदयाच्या तयारीला लागला असेल, बस... ही रात्र तेवढी सरावी...
जवळपास अर्धा तास झाला असेल. तो तिथेच बसून होता. विचार करत. मध्येच स्वतःशी बडबडायचा. मग त्याला सभोवतालचं भान यायचं आणि मग पुन्हा गप्प बसायचा. स्वतःशी बोलताना तो नुसता बडबडायचा असं नाही. तो हातवारे करायचा, त्याच्या चेह-यावर संभाषणातले भाव यायचे. जणू काही समोर बसलेल्या ख-याखु-या व्यक्तीशीच बोलतोय जणू. दुस-या कुणी पाहिलं तर मानसिक रोगीच वाटला असता तो. पण तो तसा नव्हता. चारचौघांसारखाच तो सामान्य मुलगा होता.
ब-याचदा तो कुणा मुलीसोबत दिसायचा तिथे. त्यांचं छान संभाषण चालायचं. तिच्या सहवासात तो फुलून यायचा, त्याच्या सहवासात ती रंगलेली असायची. त्यांना कधी हातात हात घातलेलं किंवा खांद्यावर हात टाकून चाललेलं कुणी पाहिलं नाही. पण ते एकत्र असायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यात परस्परांबद्दल खूप आपुलकी, प्रेम असायचं. कधी पार्कात, कधी शिवाजीमंदीरच्या फुटपाथवर, कधी कुठे चहाच्या टपरीवर, एखाद्या हॉटेलात, नाही तर दादर स्टेशनच्या फलाटावर उभं राहून ते कितीतरी वेळ गप्पा छाटायचे.गप्पांना कोणताही विषय पुरायचा त्यांना. साहित्य, चित्रपट, सामाजिक घडामोडी, घरगुती गोष्टी, नातेसंबंधांवर चर्चा, असं बरंच काहीसं असायचं त्यांच्या बोलण्यात. आणि या सगळ्यात त्यांच्या मनातल्या चोरकप्प्यात बंद असलेलं आपसुक वर यायचं. मग ते शेअर व्हायचं. समजून घेतलं जायचं. चर्चीलं जायचं. कधी भांडणंही व्हायची. पण भांडणाचा स्वर कानापर्यंत पोचून मागे फिरायचा. त्याने कधी मनात उतरण्याचा प्रयत्नही केला नाही.
कधी ती डिस्टर्ब असायची. मग तो तिला बोलावून घ्यायचा. कधी त्याला कसनुसं वाटत असायचं. मग ती त्याला भेटायला बोलवायची. दोघेही यायचे. त्यांच्या मनात परस्परांबद्दल जेवढी माया होती तेवढाच आदरही होता. शिवाजीमंदिर आणि पार्काच्या सान्नीध्यात कितीतरी सांजरंग पाहिले होते त्यांनी. तिथंच त्यांचं नातं बहरलं. घट्ट झालं. माणसं देवळात जायची आणि तो तिला भेटायचा. ती माणसांपासून चार हात लांब रहायची आणि त्याची वाट पहात तिथं उभी रहायची. दोघांनाही परस्परांचे विचार ठाउक होते. कल्पना ठाउक होत्या. मर्यादांसोबत विस्तार ठाउक होते. एवढं, की दोघांना परस्परांच्या मनातलं न सांगता कळायचं. अतिशयोक्ती नाही, खरंच कळायचं. आपल्याला जाणणारं याजगात नक्की कोण आहे हे दोघांनाही माहित होतं. तोच त्यांचा आनंद होता...
... पण आज त्याच्या चेह-यावर तो आनंद दिसत नव्हता. तो तिची वाटही पहात नव्हता. कट्ट्यावरून उठून तो चौपाटीकडे चालू लागला. त्याची नजर उगाच कुठेतरी गुंतलेली होती. रस्ता ओलांडून तो किना-यावरच्या बागेत आला. तिथल्या भिंतीजवळ जाउन तो उभा राहिला.
मंद वारा सुटला होता. समोर पहुडलेला समुद्र खूप शांत वाटत होता. किती खोल होता तो कुणास ठाउक. किती घडामोडी घडत असतील ना त्याच्या अंतरंगात? पण तरीही वरून अगदी गंभीर वाटत होता. पलिकडे असलेली सूर्यही तसाच सकाळी किती प्रखर होता. आता डोळे भरून पाहता येतंय त्याच्याकडे. पण आता तो वेगानं अस्ताला चालला होता. तो सूर्याकडे बघत राहिला नुसता. त्याला अशावेळी आकाशातले रंग खूप आवडायचे. कदाचित कधीतरी न बोलता जवळ बसून त्यांनीही सूर्यास्त पाहिला असावा. कुणास ठाउक पण, आज त्याला सूर्य खूप जवळचा वाटला. अगदी त्याच्यासारखा. थोडा निस्तेज. अंधाराच्या कुशीत गडप होण्यास उत्सुक असा.
काही वेळातच अंधार पडला. त्याची पावलं माघारी फिरली. शांतपणे. खरंच शांत होता. त्याच्या मनात रोष नव्हता, असुया नव्हती, तिच्या आयुष्यात दुसरं कुणी आल्याची सलंही नव्हती. त्यांचं नातं खरंच तेवढं प्रगल्भ होतं. पण तरीही त्याचं मनं घडल्या घटनांचं कारण शोधत होतं. तिचं जाणं सहज नव्हतं. त्यात खूप अवघडलेपण होतं. समोरासमोर आल्यानंतर जे ओठ तासनतास बोलत रहायचे ते आता शब्दांना थोपवू पहात होते. ज्या डोळ्यांनी परस्परांचा आनंद पाहिला ते आता प्रयत्नपूर्वक दुसरीकडे गुंतू पहात होते आणि हे सगळं त्याला सहन होतं नव्हतं. नातं तुटलं नव्हतं, पण त्याचा प्रवाह आटला होता. पाणी वाहून गेलं होतं, पण तिथे न दिसणारे ओघळ त्याच्या नजरेत खुपत होते. म्हणून त्याला उत्तर हवं होतं.अचानक वाट्याला आलेली ही शांतता त्याच्या अंगावर येत होती.
ती त्याला कंटाळली होती का? तर नाही.
तिला तो आवडत नव्हता का? असंही नाही.
तिच्या एकाएकी जाण्याचं त्याला आता एकचं उत्तर समोर दिसत होतं.
त्याच्या जीवनातली तिची भूमिका संपली होती. ती त्याच्या आयुष्यातून कदाचित दूर जाणार नाही, पण आधी होती तशीही राहणार नाही. ती असेल, पण थोड्या बदललेल्या रूपात. कुठल्यातरी वेगळ्या जागी. कारण आधीची जागा त्या आधीच्या 'तिने' व्यापलेली होती. आणि राहील. नाती संपत नाहीत, तुटत नाहीत, ती बदलतात. त्याच्या मनाच्या जवळ असलेलं हे नातं बदललं. याची सवय होईपर्यंत, मनानं ते नीट मान्य करेपर्यंत त्याचा थोडा त्रास होईल त्याला. जुन्या चित्रांमधले रंग आठवतीलही. पण नंतर घेईल जुळवून तो. घ्यावंच लागेल त्याला.
तो आत्ममग्नतेने चालला होता. समुद्र अजूनही शांत होता. पार्कातला गजबजाट कमी होउ लागला होता. अंधार पसरत होता. मावळलेला सूर्य उद्याच्या सूर्योदयाच्या तयारीला लागला असेल, बस... ही रात्र तेवढी सरावी...
Sunday, September 25, 2011
कधी कधी...
बगळ्यांची जोडी नजरेसमोरून जाताना
डोळ्यातलं पाणी हळूच थरारलं होतं
त्यात पडलेलं त्यांचं प्रतिबिंब
गालावरून ओघळतं कधी कधी
वा-याच्या बदललेल्या दिशा
आता सवयीच्या झाल्यात मला
त्याचं मला अनुकूल होणंच
अस्वस्थ करतं कधी कधी
कानांवर आदळणारी आतली शांतता
कान दडपून टाकते माझे
मग बाहेरचा हा कोलाहलही
स्पंदनांची धगही आता
मंदावल्यासारखी भासते
ही चेतनाही शरिराबाहेर
डोकावून पाहते कधी कधी
कड्यावरून पहावा
तो सूर्य मावळताना
त्या रंगात विरघळण्यासाठी
तोल हा जावा कधी कधी
पैलतीरीच्या प्रदेशात तरी
नको पाऊलखुणा त्या एकट्या
त्यांनाही सोबत व्हावी
कुणा पावलांची कधी कधी...
Friday, June 17, 2011
मी वाट पाहतोय...
शांत... सुंदर चांदणं पडलंय
समुद्रावर गार वारा सुटलाय
लाटांची गाज कानावर येतेय
आणि मी वाट पाहतोय...
सगळं काही उंब-याजवळ काढून ठेवून
अनवाणी पायांनी वाळूतून चाललोय
माझ्याच पावलांची मागे पडलेली रांग दूरपर्यंत गेलेली दिसतेय
तिथून इथपर्यंत कसा काय एकटा आलो कुणास ठाउक?
पण इथून पुढे एकट्यानं नाही चालवंत आता
मान वळवून समोर पाहतो तर अथांग पहुडलेला समुद्र दिसतोय
मला जायचंय त्याच्याकडे... पण असं एकट्यानं नव्हे!
त्या पाउलखुणांवरून कुणीतरी येईल, अशी आस आहे मनात
म्हणून वाट पाहतोय...
ती वाट अशीच कोरी राहिली
तर इथेच अडकून पडायची भीती वाटतेय
मला तर त्या समुद्राला कवटाळायचंय
चिंब भिजून मग आकंठ बुडून जायचंय
पण असं एकट्यानं नव्हे!
म्हणून वाट पाहतोय...
अद्याप त्या पाउलखुणा एकट्याच दिसतायत
कुणी येईल की नाही अशी शंकाही येतेय मनात
त्यांचं रिकामंपणं समजू शकतो मी
पण त्यांना खोटा दिलासा नाही देता येत मला
त्यांना सोबत म्हणून त्यांच्या शेजारी बसलोय
आणि मीही वाट पाहतोय...
रात्रीच्या वेळी या विस्तीर्ण समुद्रकिना-यावर उभं असताना
खूप एकटं वाटतंय
या जगात माझ्याशिवाय कुणीच नसल्यासारखं
इथं माझ्या अस्तित्वाची जाणिवच संपत चालल्यासारखी
'मी अजून आहे' हे सांगणारं कुणीतरी हवंय!
म्हणून वाट पाहतोय...
रात्र गडद होत चाललीय आणि सोबत माझं रिकामंपणही
या अंधाराची आता भीती वाटू लागलीय
हात चाचपडतायत आधारासाठी
स्वतःमध्ये हरवून गेलो तर पुन्हा जड जाईल शोधणं
पण मला हरवायचं नाहीए
मला पहायचाय सूर्योदय उद्याचा
पण तो पाहण्यासाठी दोन डोळे हवेत कुणाचेतरी
म्हणून वाट पाहतोय...
Wednesday, June 15, 2011
वेड्या आठवणी
धरणीची तगमग आणि मेघांची चाहूल
तहानलेल्या मातीला बरसणा-या थेंबांची भूल
सृष्टीमिलनाच्या सोहळ्याला आतुरलेला आसमंत
थेंबाच्या स्पर्शागणिक येतो मातीचा गंध
त्या गंधांशी जोडलेल्या कित्येक आठवणी
हळूवार फुललेल्या दिवसांची सुरेल गाणी
दूरवरून येणा-या त्या गाण्यांचे सूर आजही कानात गुंजतात
ह्रदयाची तार छेडत ते कोवळे दिवस जागवतात
...तिच्या ओझरत्या स्पर्शानं तेव्हा रोमरोम बहरायचा
एका नजरभेटीसाठी जीव खालीवर व्हायचा
त्या अजाण भावनांचं मनावर उगाच दडपण यायचं
पोटातलं ओठावर आलं तरी पुढं नाही सरकायचं
त्यानंतर असायची...
तिची चाहूल लागल्यावर स्तब्ध झालेला काळ
डोळ्यांची केलेली पारायणं आणि तिष्ठत राहिलेले शब्द
हातात गुंफलेल्या हातांनी उसळलेलं रक्त
... मग न चुकलेली एक संध्याकाळ यायची
समुद्राच्या काठावर दाटून आलेली कातरवेळ
ओलावलेल्या कडांनी पाहिलेला नियतीचा तो खेळ
कोवळी पायवाट सरते आणि हमरस्त्यावर येतात पावलं
सोबतीला आठवणींचं दान जे भावगर्भात मावलं
आज अवचित सय येते दाटून
आणि पापण्यांची दारं भिजून चिंब होतात
आजही पावसात येणा-या त्या गंधाला
या वेड्या आठवणी अशाच सोबत करतात
Tuesday, June 14, 2011
Monday, June 13, 2011
Sunday, June 12, 2011
Friday, June 10, 2011
भरलेलं आभाळ
आभाळ भरून आलंय
पण सालं बरसतच नाही
कुठल्यातरी पर्वताच्या आडोशाला मोकळं व्हायचंय त्याला
पण सालं जमतंच नाही...
भरलेलं आभाळ कधीपासून प्रवास करतंय
त्याला दिसतंय ते केवळ विस्तीर्ण माळरान
अंगाची काहिली करणारा सूर्य आणि पडलेला वारा
त्याच्या मनात वादळानं थैमान घातलेलं असताना
बाहेरची ही शांतता त्याला सहन होत नाही
त्या वादळात त्याला स्वतःलाच उडवून लावायचंय
पण सालं जमतंच नाही...
आभाळानं खाली डोकावून पाहिलं
त्याच्या भरलेपणाची कुणालाच जाणिव नाही
खरंच हवंय का कुणाला त्याचं बरसणं?
नसावं बहुतेक
निदान त्यानं स्वतःसाठी तरी बरसावं
पण सालं तेही जमत नाही...
वा-याच्या दिशेसोबत वाहत चाललंय आभाळ
ना स्वतःची मती ना स्वतःची गती
कुठं जाउन थडंकावं तेही त्याला माहित नाही
कुणाच्या तरी कुशीत शिरायचंय त्याला
पण ती हक्काची जागा सापडतंच नाही
डोक्यावरचा भार उतरवून नव्यानं उभं रहायचंय त्याला
पण सालं जमतंच नाही...
त्याच्या आतलं वादळं आणि बाहेर झेपावतंय
ते बाहेर येईलच याची आभाळाला भीती वाटतेय
तसं झालं तर बरंच काही होईल बेचिराख
अस्तावस्त नगरी आणि कित्येक भावनांची राख
बाहेर येवू पाहणारं वादळं आतंच शमवायचंय त्याला
पण उडालेली धूळ खाली बसतंच नाही
नितळ, स्वच्छ डोळ्यांनी त्याला पुन्हा जगाकडे पहायचंय
पण आतल्या गदारोळात हे सालं जमतंच नाही
आभाळाची भरती आता काठावर आलीय
मोकळं नाही झालं तर फुटेल ते आता
आतल्या ओझ्याने ते गदगदून आलंय
कुठल्यातरी कोनाड्यातून पाझरू लागलंय
त्याचं पाझरणं कुणालाच दिसत नाही
या कोंदटलेल्या जगात त्याचा जीवच रमत नाही
मनानं कितीही घेतलं तरी आयुष्याची वाट बदलू शकत नाही
थकलेल्या आभाळाला मरणाला कवटाळणंही जमत नाही
..............................................................
साधं........
एवढंसं सुद्धा जमत नाही...

Sunday, June 5, 2011
पाऊस....!

आज पुन्हा बरसला तो
बेधुंद... मुक्त...
मी खिडकीतून त्याला न्याहाळत होतो
त्याचा आवेग स्तब्ध करणारा होता
त्याला तेवढ्याच आवेगानं मिठीत घ्यावंसं वाटतं होतं
एका बाजूला जगजीतचे आर्त स्वर कानावर पडत होते
दुसरीकडे कसलीतरी अजाण वेदना मनात रेंगाळत होती
पापण्यांच्या ओलसर कडा मी प्रकर्षानं सावरल्या होत्या
पण बाहेर कोसळणारा तो वेडा पाऊस मला म्हणत होता,
वाहून जाऊ दे.....
मग घराबाहेर पडलो
त्या धारा अंगावर झेलत चालू लागलो
बरसणारं पाणी रोमारोमातून आत झिरपू लागलेलं
आतून बाहेरून ओलाचिंब झालो
सगळा आसमंतच धो धो बरसत असल्यासारखा
त्यात तो आल्हाददायक गारवा...
मघाची मनाची काहिली कुठल्याकुठं पळाली
आतापर्यंत वाटणारं एकटेपण दूर झालं
तो माझ्यासाठी धावून आला होता
तो मला समजावत राहिला
होतं असं कधी कधीत्यात काय एवढं?
माणसानं कधी साचून राहू नये
जे असेल ते वाहू द्यावं!
कोसळणा-या पाण्याचा आवाज सभोवताली दाटून राहिला होता
डोक्यावर पडणारं पाणी गालावरून ओघळत होतं
त्या आडोशाच्या आड मीही वाहू लागलो
खरंच... तो माझ्यासाठी धावून आला होता...!
Sunday, May 29, 2011
दंड
नाही पडले ते शब्द कानी
जरी होता त्यांचा अधिकार तो
ना उमगले तिला, ना उमगले मला
अंतरीच्या इच्छेचा उद्गार तो
आपल्याच गतीनं ती येत असता
मी निघूनी गेलो वा-यापरी
तो वेग जाहला शत्रु माझा
अजाण वेदना ही दाटे उरी
समुद्रकिनारी उभे वाळूचे किल्ले
आत्ममग्नतेत का तोडीले मी?
उरलेला वाळूचा ढीग असे,
का माझी स्वतःची राख ती
न जाणे बरसली असतील किती
हतबल अश्रूंची टिपे ओंजळीत त्या...
मी शांत पहुडलो पुनव चांदण्यात
तिथे जागल्या काळोख्या रात्री तिच्या
काय हरपले काय निसटले
उगाच मला ती जाण आली
अज्ञात अंधारातच सुखी होतो
या जाणिवांनी वेदना बहाल केली
का उठावी त्या उरीची
वेदना माझ्या इथे
हा दंड असे माझ्या चुकांचा
जो श्वासान्तापरी ना फिटे...!
जरी होता त्यांचा अधिकार तो
ना उमगले तिला, ना उमगले मला
अंतरीच्या इच्छेचा उद्गार तो
आपल्याच गतीनं ती येत असता
मी निघूनी गेलो वा-यापरी
तो वेग जाहला शत्रु माझा
अजाण वेदना ही दाटे उरी
समुद्रकिनारी उभे वाळूचे किल्लेआत्ममग्नतेत का तोडीले मी?
उरलेला वाळूचा ढीग असे,
का माझी स्वतःची राख ती
न जाणे बरसली असतील किती
हतबल अश्रूंची टिपे ओंजळीत त्या...
मी शांत पहुडलो पुनव चांदण्यात
तिथे जागल्या काळोख्या रात्री तिच्या
काय हरपले काय निसटले
उगाच मला ती जाण आली
अज्ञात अंधारातच सुखी होतो
या जाणिवांनी वेदना बहाल केली
का उठावी त्या उरीची
वेदना माझ्या इथे
हा दंड असे माझ्या चुकांचा
जो श्वासान्तापरी ना फिटे...!
Saturday, May 28, 2011
कोई फरीयाद...
कोई फरीयाद तेरे दिल मे दबी हो जैसे
कोई फरीयाद तेरे दिल मे दबी हो जैसे
तुने ऑंखो से कोई बात कही हो जैसे
जागते जागते इक उम्र कटी हो जैसे
जागते जागते इक उम्र कटी हो जैसे
जान बाकी है मगर सॉंस रूकी हो जैसे
हर मुलाकात पे महसूस यही होता है
हर मुलाकात पे मेहसूस यही होता है
मुझसे कुछ तेरी नजर पुँछ रही हो जैसे
राह चलते हुवे अक्सर ये गुमान होता है
राह चलते हुवे अक्सर ये गुमान होता है
वो नजर चुपके मुझे देख रही हो जैसे
वा नजर चुपके मुझे देख रही हो जैसे
एक लम्हें मे सिमट आया सदीयों का सफर
एक लम्हें मे सिमट आया सदीयों का सफर
जिंदगी तेज बहोत तेज चली हो जैसे
जिंदगी तेज बहोत तेज चली हो जैसे
इस तरहा पेहरो तुझे सोचता रेहता हुँ मै
इस तरहा पेहरो तुझे सोचता रेहता हूँ मै
मेरी हर सॉंस तेरे नाम लिखी हो जैसे
मेरी हर सॉंस तेरे नाम लिखी हो जैसे
कोई फरीयाद तेरे दिल मे दबी हो जैसे
तुने ऑंखो से कोई बात कही हो जैसे
जागते जागते इक उम्र कटी हो जैसे
Monday, May 23, 2011
एक अधुरी पायवाट...
आयुष्यभर जपून ठेवावी
अशी एक सल आहे मनात
या सुखानं चालणा-या आयुष्याला
एखादी तीट लावावी तशी
...ती कोवळी पायवाट कित्येकदा पायाखालून गेली
पण तिथं तिष्ठत असलेल्या पाकळ्यांची आर्तता माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही
माझ्याच ओंजळीत असलेल्या त्या पाकळ्या
माझ्यासाठी अस्पर्शीत राहिल्या... अखेरपर्यंत
मग वा-याच्या एका झुळूकेनं वाहून आणला
त्या पाकळ्यांचा गंध माझ्यापर्यंत
आणि त्या गंधासोबत जाणवली
त्यांच्या उरातली ती धगही
आजही तेवढ्याच निरागसतेनं, शांतपणे तो गंध माझ्यापर्यंत येतो
पण त्यापलिकडूनही जाणवतं त्यामागचं मुकेपण
हे सगळं बोचतं मला आतून, फार अस्वस्थ करत जातं...
त्या मुकेपणाच्या सावलीत माझंच मन आता गहिरं होत चाललंय
त्यांच्या नकळत मी स्पर्श केला त्यांना
अगदी अलगद...बेमालूमपणे
आणि माझ्या बोटांवर उठला त्या पाकळ्यांचा पुसटसा रंग
हलका... कदाचित कधीच न जाणारा...
त्या पाकळ्यांवर उमटले असतील आजवर कित्येक भाव... माझ्या नकळतच
अन् पहाटेचं दवबिंदू विरून जावं तसे विरूनही गेले असतील
त्यांचं पोकळीतलं ते जगणं-मरणं मी आज क्षणाक्षणाला अनुभवतोय
तेवढ्याच तिव्रपणे, जेवढं कधी त्यांनी असेल अनुभवलेलं
त्या पाकळ्यांच्या स्पर्शासाठी आज आसूसलोय मी
पण तो स्पर्श एकार्थाने केव्हाच दूरावलाय माझ्यासाठी
त्यांनी आजवर ओथंबून भरलेली माझी ओंजळ
अवचितपणे रिकामी झालेली दिसतेय मला
मला नाही देता आला त्यांचा अधिकार
याला कारणीभूत माझी आत्ममग्नता की त्यांची निःशब्दता?
उरली ती, भावनांच्या फसव्या क्षीतीजरेखेवर घुटमळणारी पावलं
अन् स्वतःच्याच डोळ्यांसमोर होणारा स्वतःचा सूर्यास्त
जगण्यातल्या भेगा भरणं या जन्मी शक्य नाही
फक्त त्यांची खरवड इतरांना जाणवू नये म्हणजे झालं...
मनाच्या तारा झंकारून उठल्यात
फक्त त्यांचा नाद आतून बाहेर जाऊ नये म्हणजे झालं...
त्या अव्यक्ताची वेदना माझ्या उरी उमटावी
त्याच्या नकळतच त्याच्या वेदनेला मीही साथ द्यावी
आयुष्याचा किती मोहक खेळ हा...
वेदनांचा थोडा भार त्यानं उचलावा... थोडा माझ्या वाट्याला यावा
''आता यालाच खरी साथ म्हणून का?''
सागराला भेटत असताना
वाटेतल्या ओढ्यांची ओल असावी तिच्या किना-यावर
कारण तिकडे ओढ्यांनीही जपून ठेवलेत
आपले ओलसर किनारे!
या जंगलातल्या सगळ्याच पायवाटा
बाहेर पोहोचतात असं नाही...
कधी कधी काही पायवाटा अर्ध्यातच विरून जातात
त्या अफाट जंगलाच्या ह्रदयगर्भात मनोमन मिसळून जाव्या तशा...
... ही अधुरी पायवाटही तशीच विरून गेली...

कारण तिकडे ओढ्यांनीही जपून ठेवलेतआपले ओलसर किनारे!
या जंगलातल्या सगळ्याच पायवाटा
बाहेर पोहोचतात असं नाही...
कधी कधी काही पायवाटा अर्ध्यातच विरून जातात
त्या अफाट जंगलाच्या ह्रदयगर्भात मनोमन मिसळून जाव्या तशा...
... ही अधुरी पायवाटही तशीच विरून गेली...
Saturday, May 21, 2011
रोहिणीसाठी...
तुझा हळूवार स्पर्श असला
की न लगे त्या शब्दांची साथ मला
हात तुझा हाती असो
आकाशी साथीला चंद्रकला
...तुझ्या ओठी हास्य फुलता
का चंद्र तो निस्तेज होई
सागर अवचित का उधाणला
हा वारा का हे गीत गाई
कधी अल्लड नदीचा खळखळाट तू
कधी अथांग सागरासम शांत तू
कधी कोसळणारा रूद्र जलप्रपात
कधी सुरधारिणी अलगुज तू
आनंद होवून आलीस जीवनात माझ्या
अंतःकरणापासून तुज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
स्वप्नं
स्वप्नं खरंच किती छान असतात हे आज कळलं
आयुष्यात पूर्ण न होणा-या इच्छा स्वप्नात पूर्ण करण्याची संधी असते
आज अशीच एक इच्छा पूर्ण झाली स्वप्नात...
मनाच्या तळघरातून एक पिसं हळूवार उडत आलं तळहातावर
त्याला स्पर्श करताना किती संवेदना जाणवत होत्या हाताला
हे खरं नाही, हे जाणवत असूनही तो क्षण खरा मानला मनानं
क्षणभरात खूप काही जगल्यासारखं वाटलं...
मग त्या पिसाशी बोललो मी
हळुवारपणे.....
शब्द ध्यानात नाहीत माझ्या
केवळ त्यांचे नाद गुंजतायत कानात
आयुष्यात पूर्ण न होणा-या इच्छा स्वप्नात पूर्ण करण्याची संधी असते
आज अशीच एक इच्छा पूर्ण झाली स्वप्नात...
मनाच्या तळघरातून एक पिसं हळूवार उडत आलं तळहातावर त्याला स्पर्श करताना किती संवेदना जाणवत होत्या हाताला
हे खरं नाही, हे जाणवत असूनही तो क्षण खरा मानला मनानं
क्षणभरात खूप काही जगल्यासारखं वाटलं...
हे सगळंच आयुष्य एक स्वप्नं असतं तर?
मग त्या पिसाशी बोललो मी
हळुवारपणे.....
शब्द ध्यानात नाहीत माझ्या
केवळ त्यांचे नाद गुंजतायत कानात
मग दाटून आली सर्वांगात एक विलक्षण अनुभूती
उठल्यावर शरिरभर मंद समाधानाचा एक सुंदर तरंग पसरलेला होता
किती सुंदर सकाळ आहे आजची....!
उठल्यावर शरिरभर मंद समाधानाचा एक सुंदर तरंग पसरलेला होता
किती सुंदर सकाळ आहे आजची....!
मी अश्वत्थामा...!
स्वतःच्या इच्छेने जगूनही हे मन कधी कधी अतृप्त का बरं रहातं?
म्हणूनच हे मन मला एक अगम्य कोडं भासतं!
नजर भविष्यापलिकडे पहात असताना याचे पाश असतात भूतकाळात गुंतलेले
अन् नशिबी येते वर्तमानातली कुतरओढ
पुसल्या गेलेल्या त्या सांजरंगांवरून नजर हटत नसते
त्या अखेरच्या लाटा, ते पक्ष्यांचे परतीचे थवे अजूनही मनात रेंगाळत असतात
फक्त ते चित्र जुनं झालेलं असतं
त्या चित्रात पुन्हा एकदा परतावं असं खूप वाटतं
चुकलेले कुंचल्याचे फटकारे पुन्हा नव्याने रेखाटावेत असं प्रकर्षानं वाटतं
पण आता ते शक्य नसतं
वेळ हातची निघून गेलेली असते
मग भरून रहाते मनाच्या सांदीकोप-यात एक विचित्र अस्वस्थता....
साकळलेल्या अंधाराच्या आडोशाला लपून रहाते
कसली तरी अव्यक्त भावना
त्या अंधारातच उठत रहातात
कोणत्या तरी अगम्य वेदनेचे कल्लोळ
मग भांबावलेलं मन सैरभैर धावतं
उगाच कोप-यात दडून बसतं
कधी मूक आक्रोश करतं
तर कधी स्वतःवरच राग काढतं
पण ती असते केवळ एका पोकळीतली धडपड
निष्फळ... व्यर्थ....
अखेरीस ह्रदयावर उरते एक जिर्ण झालेली जखम
अश्वत्थाम्याच्या कपाळावर असते तशी
कधीही न भरणारी.....
म्हणूनच हे मन मला एक अगम्य कोडं भासतं!
नजर भविष्यापलिकडे पहात असताना याचे पाश असतात भूतकाळात गुंतलेले
अन् नशिबी येते वर्तमानातली कुतरओढ
पुसल्या गेलेल्या त्या सांजरंगांवरून नजर हटत नसते
त्या अखेरच्या लाटा, ते पक्ष्यांचे परतीचे थवे अजूनही मनात रेंगाळत असतात
फक्त ते चित्र जुनं झालेलं असतं
त्या चित्रात पुन्हा एकदा परतावं असं खूप वाटतं
चुकलेले कुंचल्याचे फटकारे पुन्हा नव्याने रेखाटावेत असं प्रकर्षानं वाटतं
पण आता ते शक्य नसतं
वेळ हातची निघून गेलेली असते
मग भरून रहाते मनाच्या सांदीकोप-यात एक विचित्र अस्वस्थता....साकळलेल्या अंधाराच्या आडोशाला लपून रहाते
कसली तरी अव्यक्त भावना
त्या अंधारातच उठत रहातात
कोणत्या तरी अगम्य वेदनेचे कल्लोळ
मग भांबावलेलं मन सैरभैर धावतं
उगाच कोप-यात दडून बसतं
कधी मूक आक्रोश करतं
तर कधी स्वतःवरच राग काढतं
पण ती असते केवळ एका पोकळीतली धडपड
निष्फळ... व्यर्थ....
अखेरीस ह्रदयावर उरते एक जिर्ण झालेली जखम
अश्वत्थाम्याच्या कपाळावर असते तशी
कधीही न भरणारी.....
Tuesday, May 3, 2011
अव्यक्त .......
दोघे रेस्टॉरंटच्या एक कोप-यात बसले होते. फारशी वर्दळ नव्हती. ती पुढ्यातल्या कॉफीच्या कपमध्ये नजर गुंतवून बसलेली. तो तिच्याकडे एकटक बघत होता. मग तो हलकेच खाकरला. आवाजानं ती भानावर आली.
‘‘काय झालंय ग तुला? स्पष्ट सांग पाहू.’’
‘‘काही नाही.’’ ती जड आवाजात म्हणाली.
‘‘हे बघ वैशू. कालपासून तुला ऑब्जर्व्ह करतोय. कुठलीतरी गोष्ट तुझ्या मनात सलतेय. काल कॉलेजची गेट टूगेदर पार्टी झाली. एवढ्या वर्षांनंतर सगळे भेटले, पण तू कुणाशीच धड बोलली नाहीस. काय झालंय काय तुला?’’
‘‘असं काही नाही रे!’’ ती दाटलेल्या आवाजात म्हणाली, पण तिचा तो नकार दुबळा होता. त्यानं ते चटकन ओळखलं.
‘‘हे बघं, त्या थापा तुझ्या नव-याला मार. मला नको. तुला कॉलेजपासून ओळखतोय मी. अगं, इतरांना नाही, निदान मलातरी सांग..... बोल, मन हलकं होईल तुझं.’’
तिनं रूमालानं डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि शांत आवाजात म्हणाली, ‘‘सम्या...... राजेशला माझ्याशी लग्न करायचं होतं.’’
‘‘कोण? आपला राजेश? राजेश इनामदार? काय म्हणतेस काय?’’ तो ऐकून उडालाच.....
....... ते कॉलेजमध्ये असताना त्यांच्या कोरग्रुपमधला राजेश इनामदार. थोडा हळवा, थोडा विचारी पण अबोल. कविता लिहायचा. स्वतःचं चाली लावायचा. खूप आर्तता असायची त्याच्या शब्दांमध्ये. निवांत जागी गप्पांचा फड जमला, की याच्या हळूवार कविता सगळ्यांचंच भान हरपायच्या. कॉलेजमध्ये अनेक मुलींना आवडायचा तो. पण त्यानं कुणालाच दाद दिली नव्हती. अशी कुजबुज होती, कि त्याला कोणीतरी आवडायचं, पण ती कोण होती हे अखेरपर्यंत कुणालाच नाही समजलं. आता एवढ्या वर्षांनंतर ती मुलगी वैशाली होती हे ऐकून समीरही आश्चर्यचकित झाला.
‘‘काल गेट टूगेदरमध्ये स्वाती भेटली होती.’’ वैशाली सांगत होती. ‘‘ती त्याची घनिष्ठ मैत्रीण. राजेश अजून लग्नाचं मनावर घेत नाही म्हणून सहज तिला विचारलं, तर कसल्याशा टेन्शमध्ये वाटली. खोदून विचारलं तेव्हा तिनं हे सांगितलं मला.’’
‘‘सम्या, तेव्हा आपण सगळे एकत्रच होतो.... पण तो अखेरपर्यंत अबोलच राहिला. किती घुसमट झाली असेल त्याची? जास्त वाईट याचं वाटतंय, की माझं लग्न झालं तरीही तो माझ्यातच गुंतलाय. त्याला वाटतंय, की अशा मन:स्थितीत त्यानं कुणाशी लग्न केलं तर त्या मुलीवर तो अन्याय असेल, म्हणून तो लग्नाचा विचारही मनात आणत नाहीए.’’
‘‘कमाल आहे त्याची. मलाही कधी बोलला नाही तो......... पण वैशू, तू का एवढी अस्वस्थ होतेस? त्यानं त्याच्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवल्या नाहीत यात तुझा दोष आहे का?’’
‘‘वाईट यासाठी वाटतंय, की असं कुणामध्येतरी अडकणं काय असतं हे मी समजू शकते. त्या अडकलेल्या जीवाच्या यातना कळतायत रे मला! त्यानं मला ते का सांगितलं नसेल तेही समजतंय. रोज समोरासमोर भेटावं, पण मैत्री आणि प्रेम यांच्या कचाट्यात अडकून तोंडातून शब्द फुटू नयेत, हे अगतिकपण किती जीवघेणं असतं याची कल्पना नाही तुला. त्याच्या भावना आणि दुःख मला तिव्रतेनं जाणवतंय. मी समोर असतानाही त्याला त्याच्या भावना उघड करायला जमल्या नाहीत. ते कोंदटलेपण काय असतं, ते या क्षणीही अनुभवू शकते मी आणि त्याचाच त्रास होताय मला.’’
‘‘तुला तो आवडायचा का तेव्हा?’’
‘‘तो नाही, पण दुसरं कुणीतरी आवडायचं मला.’’ ती म्हणाली.
काही क्षण त्याला तिचे शब्द कळलेच नाहीत. ‘‘म्हणजे? कॉलेजमध्ये असताना तुझं कुणावरतरी प्रेम होतं?’’ त्यानं अविश्वासानं विचारलं. त्याच्या आवाजात अविश्वास तर होताच, पण सोबत थोडं दुखावलेपणंही होतं. तिनं आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवावं आणि तेदेखील इतकी वर्ष हे त्याला बोचलं असावं.
‘‘तू माझ्यापासून एवढी वर्ष हे लपवून ठेवलंस वैशू? मला आश्चर्य वाटतंय. मला वाटायचं की, आयुष्यातली कुठलीही बाब शेअर करावी इतकी आपली मैत्री गहिरी आहे. पण आज जाणवलं, तसं काहीच नाहीए. एवढी वर्ष मी तुला एवढा परकाच राहिलो ना?’’ त्याला लागलेला चटका त्याच्या आवाजातून साफ जाणवत होता.
‘‘असं नको रे बोलूस.’’ ती काकुळतीला येऊन म्हणाली. ‘‘तुला सांगावसं अनेकदा वाटलं, पण खूप प्रयत्नांनी स्वतःला रोखलं मी. तुला सांगणं मला जमलंच नाही.’’
‘‘अगं पण का?’’
‘‘...................’’
‘‘आता बोल ना!’’
‘‘कारण तो तूच होतास सम्या.’’ तिनं गदगदलेल्या आवाजात म्हटलं.
तो जागेवरच गोठून गेला. तिच्या त्या शब्दांबरोबर ह्रदयापासून निघालेली एक शीतलहर त्याचं सर्वांग बधिर करत गेली. सारं जग त्याच्या भोवती क्षणार्धात गर्रकन फिरलं. आत्ता जे शब्द ऐकू आले त्याचा अर्थ लावायला त्याला बराच वेळ लागला. त्याच चित्त ठिकाणावर आलं तेव्हा ती समोर मान खाली घालून बसली होती.
दोघं अबोल होते. पण आत कसलीशी वादळं थैमान घालत होती. ती शांतता त्याच्या अंगावर येऊ लागली.
‘‘मला माहित नव्हतं की तू..... पण कधीपासून?.... मला सांगितलं का नाहीस?’’ तो शब्दागणिक अस्वस्थ होत गेला.
‘‘कसं सांगणार होते रे मी?’’ ती कातर आवाजात बोलू लागली. ‘‘कॉलेजपासूनचा तू माझा सगळ्यात जवळचा मित्र. किती गोष्टी आपण एकत्र शेअर केल्या! आधी केवळ मित्र असलेला तू नंतर माझ्यासाठी आकर्षण होत गेलास. तुझा सहवास, तुझं वागणं, तुझी समजून घेण्याची वृत्ती, थोडासा चंचलपणा सगळंच भावत गेलं. तारूण्यसुलभ गोष्ट म्हणून मी मनाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं मला ते!’’
‘‘मी तुझा अनेकवेळा अंदाज घेतला. पण लग्नाविषयीचे तुझे विचार घरच्यांच्या मतांवर अवलंबून होते. त्यात तू एकदा म्हटलंस, की तू प्रेमविवाह करणार नाहीस आणि मी वेडी.... तुझा तो अखेरचा निर्णय आहे, असं समजून गप्प बसले. तुला कॉलेजमध्ये आवडणारी ती मुलगी आणि तिच्याजवळ जाण्याचे ते तुझे प्रयत्न, यांना मी नेहमी साथ देत गेले. पण मनात काहीवेळा एक स्वार्थी विचारही यायचा. असं वाटायचं, की ती तुला कधीच मिळू नये आणि मी तुला अशीच आयुष्यभर साथ करत जावी.’’
‘‘तुझ्या डोळ्यांत मी स्वतःला शोधत राहिले, पण त्यात एका मैत्रिणीशिवाय मला कधीच काही दिसलं नाही. त्यावेळी तुझा ओझरता स्पर्श मला हवाहवासा वाटायचा, पण तरीही मी स्वतःला तुझ्यापासून प्रकर्षानं लांब ठेवत गेले. त्या काळात तुझी आणि माझी खूप भांडणं झालेली होती..... आठवतात?....... मीच मुद्दाम उकरून काढलेली. रोज तुझ्याशी बोलायला मला विषय हवा असणं आणि तुझ्यापासून दूर रहायचा एक वेडा प्रयत्न, अशी ती माझी दुहेरी धडपड असायची. मनात भावनांचा कल्लोळ उडालेला असताना तू माझा हात हातात धरून तुझ्या त्या मैत्रिणीबद्दल बोलत बसायचास. कसं सांगू तुला शब्दामध्ये, की एकाचवेळी तुझ्यात गुरफटणं आणि तुझ्यापासून तिळ तिळ तुटणं हा काय अनुभव असतो ते.’’
‘‘त्यानंतरही अनेकदा वाटलं, की तुला एकदा सगळं सारं काही स्पष्ट सांगावं, पण नाही रे धीर झाला मला. तू नाही म्हणालास तर? माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलास तर? रागावून मैत्री तोडून गेलास तर? अशी प्रश्नांची माळच उभी रहायची मनामध्ये. तुला मनातलं सांगितल्यानंतर होणा-या परिणामांची अनिश्चितता मला पेलवत नव्हती आणि काही झालं तरी मला ही मैत्री अजिबात तोडायची नव्हती. स्वतःच्याच मनानं तयार केलेल्या दुहेरी पेचात अडकत गेले आणि आजही तशीच अडकून आहे.’’
त्याचा जागेवरच दगड होवून गेलेला. एवढी वर्ष कोंडून ठेवलेली भावना, तीही आपल्याबद्दलची आणि आपल्यामुळेच कोंडून राहिलेली. तिचं स्वागत करावं, नकार द्यावा, की तिचं दुखावलेलं मन सांभाळावं. त्याला काहीच समजत नव्हतं.
ती बोलतच होती. ‘‘खूप अस्वस्थ होते रे मी इतकी वर्ष. कुणालातरी सांगावं म्हटलं तरी जमत नव्हतं. एवढी मनाच्या जवळची गोष्ट समजून घेईल असं दुसरं जीवाभावाचं कुणी नव्हतंच. तुझ्या वाट्याचं असूनही तुला सांगू शकत नव्हते. माझं लग्न झालंय हे माहितीय मला. पण मी त्याच्याशी प्रतारणा करत नाहीए. त्यानं मला खूप प्रेम दिलंय आणि मीदेखील त्याबद्दल त्याची कृतज्ञ आहे. मी फक्त माझ्या मनाची ही भेग त्याच्यापासून दडवून ठेवलीय. जशी तुझ्यापासून लपवून ठेवली होती तशी.’’
मग बराच काळ घड्याळाचे काटे आपल्या गतीने धावत राहिले. आकाशात सांजरंग दाटून आला.
‘‘पण वैशू, आता यातून साध्य काय?’’ इतका वेळ गप्प असलेला तो आताशानं बोलला.
‘‘साध्य?’’ ती उद्वीग्नपणे हसली. ‘‘काहीच नाही. ज्या क्षणी ते घडू इच्छीत होतं तेव्हा ते मी घडू दिलं नाही. खूप प्रांजळ भावना होती माझी! मला फक्त हे आयुष़्य तुझ्यासोबत जगायचं होतं. माझा प्रत्येक क्षण तुझ्याजोडीनं साजरा करायचा होता. खूप सुरेख कल्पना केल्या होत्या मनाशी. त्या प्रत्यक्षात आणायच्या होत्या. पण इच्छीलेलं सगळं घडत नसतं.’’
पुन्हा शांतता.
‘‘सम्या, हे ऐकल्यावर तू मला सोडून जाणार नाहीस ना?’’
त्या प्रश्नासरशी त्यानं तिच्याकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात दाटलेले असंख्य प्रश्न त्याला दिसले. जोडीला साकळलेली दुराव्याची भीती.
‘‘तू माझ्या जवळ येऊ शकला नाहीस, निदान याहून दूर तरी जाऊ नकोस.’’
तिच्या आवाजातली अगतिकता आता लपत नव्हती. त्यालाही ती जाणवली.
‘‘तू मला एकेकाळी आवडत होतास, म्हणून मी आज हे सगळं सांगितलं, असं नकोस समजू. माझ्या सगळ्यात जवळच्या मित्रापासून मी एक गोष्ट लपवून ठेवली होती. ती त्याचीच होती. ते समजणं त्याचा हक्क होता, म्हणून बोलले. प्लिज......... तू..........’’
त्यानं हलकेच तिच्या हातांवर हात ठेवला.
कदाचित आता शब्दांचं काम संपलं होतं.
किती आश्वासक स्पर्श होता त्याचा! कदाचित या एकाच क्षणासाठी ती थांबलेली असावी. तिला पुन्हा भरून आलं. तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. अनेक वर्षांची आपली अतृप्त इच्छा पूर्ण करून घेतल्याप्रमाणं.
बराच काळ तिच्या गालांवरून आसवं ओघळत राहिली. त्यानंही तो हात तसाच राहू दिला. ते दोघे परस्परांच्या खूप जवळ बसले होते, पण त्यांच्यातलं कित्येक मैलांचं अंतर त्या दोघांनाही जाणवत होत. कधीच न तोडलं जाणारं अंतर. आपण आयुष्यात परस्परांच्या जवळ येऊ शकलो नाही, पण निदान दूरवरून एकमेकांना पाहू तरी शकतो.
रेस्टॉरंटच्या काचेतून समोरचा समुद्र आणि त्या पलिकडचं क्षीतीज नजरेस पडत होतं. सूर्य कलू लागलेला. ती क्षणभर त्या दृश्याकडे पहात राहिली. समोर दिसणारी जमिन आणि क्षीतीज, दोहोंवर तिला निराशा दाटलेली दिसली. एक फसवी भेट... उगाच तिच्या मनात आलं.
तिनं पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तिला बरंच काही बोलायचं होतं. सांगायचं होतं. पण गळा दाटून आला होता. ती कशीबशी एवढंच बोलू शकली.
‘‘थँक्स सम्या!’’
तिनं पर्स उचलली.
‘‘कुठे निघालीस?’’
‘‘आज एवढ्या वर्षांनंतर माझा हक्क मला मिळाला. तुला एकवार हे सांगण्याचा, की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आणखी कुणीतरी अडकलंय या चक्रात. त्या अस्वस्थ मनाला नि:श्वास लाभायला हवा.’’
तिने डोळे पुसले आणि ती निघून गेली. काहीशी मोकळी, निश्चिंत दिसली ती जाताना. तो तसाच बसून होता. बराच वेळ. कुठतरी एकटक पहात. काहीतरी पुन्हा हरवल्यासारखा.
प्रकाश अंधुक होऊ लागलेला. संकोचलेल्या, व्याकूळलेल्या जिवांना अंधारानं आपल्या पदराखाली घेतलं. त्या अंधाराच्या आड त्याच्या गालावरून पाण्याचे ओघळ वहात होते. नेहमीसारखेच. सर्वांच्या अपरोक्ष. मात्र आज त्या अश्रूंची व्यथा काहीशी वेगळी होती....
आपण शोधात असलेल्या फुलपाखराच्या पायांचे ठसे ब-याच दिवसांनतर आपल्याच खांद्यावर दिसावेत तशी...
‘‘काय झालंय ग तुला? स्पष्ट सांग पाहू.’’
‘‘काही नाही.’’ ती जड आवाजात म्हणाली.
‘‘हे बघ वैशू. कालपासून तुला ऑब्जर्व्ह करतोय. कुठलीतरी गोष्ट तुझ्या मनात सलतेय. काल कॉलेजची गेट टूगेदर पार्टी झाली. एवढ्या वर्षांनंतर सगळे भेटले, पण तू कुणाशीच धड बोलली नाहीस. काय झालंय काय तुला?’’
‘‘असं काही नाही रे!’’ ती दाटलेल्या आवाजात म्हणाली, पण तिचा तो नकार दुबळा होता. त्यानं ते चटकन ओळखलं.
‘‘हे बघं, त्या थापा तुझ्या नव-याला मार. मला नको. तुला कॉलेजपासून ओळखतोय मी. अगं, इतरांना नाही, निदान मलातरी सांग..... बोल, मन हलकं होईल तुझं.’’
तिनं रूमालानं डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि शांत आवाजात म्हणाली, ‘‘सम्या...... राजेशला माझ्याशी लग्न करायचं होतं.’’
‘‘कोण? आपला राजेश? राजेश इनामदार? काय म्हणतेस काय?’’ तो ऐकून उडालाच.....
....... ते कॉलेजमध्ये असताना त्यांच्या कोरग्रुपमधला राजेश इनामदार. थोडा हळवा, थोडा विचारी पण अबोल. कविता लिहायचा. स्वतःचं चाली लावायचा. खूप आर्तता असायची त्याच्या शब्दांमध्ये. निवांत जागी गप्पांचा फड जमला, की याच्या हळूवार कविता सगळ्यांचंच भान हरपायच्या. कॉलेजमध्ये अनेक मुलींना आवडायचा तो. पण त्यानं कुणालाच दाद दिली नव्हती. अशी कुजबुज होती, कि त्याला कोणीतरी आवडायचं, पण ती कोण होती हे अखेरपर्यंत कुणालाच नाही समजलं. आता एवढ्या वर्षांनंतर ती मुलगी वैशाली होती हे ऐकून समीरही आश्चर्यचकित झाला.
‘‘काल गेट टूगेदरमध्ये स्वाती भेटली होती.’’ वैशाली सांगत होती. ‘‘ती त्याची घनिष्ठ मैत्रीण. राजेश अजून लग्नाचं मनावर घेत नाही म्हणून सहज तिला विचारलं, तर कसल्याशा टेन्शमध्ये वाटली. खोदून विचारलं तेव्हा तिनं हे सांगितलं मला.’’
‘‘सम्या, तेव्हा आपण सगळे एकत्रच होतो.... पण तो अखेरपर्यंत अबोलच राहिला. किती घुसमट झाली असेल त्याची? जास्त वाईट याचं वाटतंय, की माझं लग्न झालं तरीही तो माझ्यातच गुंतलाय. त्याला वाटतंय, की अशा मन:स्थितीत त्यानं कुणाशी लग्न केलं तर त्या मुलीवर तो अन्याय असेल, म्हणून तो लग्नाचा विचारही मनात आणत नाहीए.’’
‘‘कमाल आहे त्याची. मलाही कधी बोलला नाही तो......... पण वैशू, तू का एवढी अस्वस्थ होतेस? त्यानं त्याच्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवल्या नाहीत यात तुझा दोष आहे का?’’
‘‘वाईट यासाठी वाटतंय, की असं कुणामध्येतरी अडकणं काय असतं हे मी समजू शकते. त्या अडकलेल्या जीवाच्या यातना कळतायत रे मला! त्यानं मला ते का सांगितलं नसेल तेही समजतंय. रोज समोरासमोर भेटावं, पण मैत्री आणि प्रेम यांच्या कचाट्यात अडकून तोंडातून शब्द फुटू नयेत, हे अगतिकपण किती जीवघेणं असतं याची कल्पना नाही तुला. त्याच्या भावना आणि दुःख मला तिव्रतेनं जाणवतंय. मी समोर असतानाही त्याला त्याच्या भावना उघड करायला जमल्या नाहीत. ते कोंदटलेपण काय असतं, ते या क्षणीही अनुभवू शकते मी आणि त्याचाच त्रास होताय मला.’’
‘‘तुला तो आवडायचा का तेव्हा?’’
‘‘तो नाही, पण दुसरं कुणीतरी आवडायचं मला.’’ ती म्हणाली.
काही क्षण त्याला तिचे शब्द कळलेच नाहीत. ‘‘म्हणजे? कॉलेजमध्ये असताना तुझं कुणावरतरी प्रेम होतं?’’ त्यानं अविश्वासानं विचारलं. त्याच्या आवाजात अविश्वास तर होताच, पण सोबत थोडं दुखावलेपणंही होतं. तिनं आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवावं आणि तेदेखील इतकी वर्ष हे त्याला बोचलं असावं.
‘‘तू माझ्यापासून एवढी वर्ष हे लपवून ठेवलंस वैशू? मला आश्चर्य वाटतंय. मला वाटायचं की, आयुष्यातली कुठलीही बाब शेअर करावी इतकी आपली मैत्री गहिरी आहे. पण आज जाणवलं, तसं काहीच नाहीए. एवढी वर्ष मी तुला एवढा परकाच राहिलो ना?’’ त्याला लागलेला चटका त्याच्या आवाजातून साफ जाणवत होता.
‘‘असं नको रे बोलूस.’’ ती काकुळतीला येऊन म्हणाली. ‘‘तुला सांगावसं अनेकदा वाटलं, पण खूप प्रयत्नांनी स्वतःला रोखलं मी. तुला सांगणं मला जमलंच नाही.’’
‘‘अगं पण का?’’
‘‘...................’’
‘‘आता बोल ना!’’
‘‘कारण तो तूच होतास सम्या.’’ तिनं गदगदलेल्या आवाजात म्हटलं.
तो जागेवरच गोठून गेला. तिच्या त्या शब्दांबरोबर ह्रदयापासून निघालेली एक शीतलहर त्याचं सर्वांग बधिर करत गेली. सारं जग त्याच्या भोवती क्षणार्धात गर्रकन फिरलं. आत्ता जे शब्द ऐकू आले त्याचा अर्थ लावायला त्याला बराच वेळ लागला. त्याच चित्त ठिकाणावर आलं तेव्हा ती समोर मान खाली घालून बसली होती.
दोघं अबोल होते. पण आत कसलीशी वादळं थैमान घालत होती. ती शांतता त्याच्या अंगावर येऊ लागली.
‘‘मला माहित नव्हतं की तू..... पण कधीपासून?.... मला सांगितलं का नाहीस?’’ तो शब्दागणिक अस्वस्थ होत गेला.
‘‘कसं सांगणार होते रे मी?’’ ती कातर आवाजात बोलू लागली. ‘‘कॉलेजपासूनचा तू माझा सगळ्यात जवळचा मित्र. किती गोष्टी आपण एकत्र शेअर केल्या! आधी केवळ मित्र असलेला तू नंतर माझ्यासाठी आकर्षण होत गेलास. तुझा सहवास, तुझं वागणं, तुझी समजून घेण्याची वृत्ती, थोडासा चंचलपणा सगळंच भावत गेलं. तारूण्यसुलभ गोष्ट म्हणून मी मनाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं मला ते!’’‘‘मी तुझा अनेकवेळा अंदाज घेतला. पण लग्नाविषयीचे तुझे विचार घरच्यांच्या मतांवर अवलंबून होते. त्यात तू एकदा म्हटलंस, की तू प्रेमविवाह करणार नाहीस आणि मी वेडी.... तुझा तो अखेरचा निर्णय आहे, असं समजून गप्प बसले. तुला कॉलेजमध्ये आवडणारी ती मुलगी आणि तिच्याजवळ जाण्याचे ते तुझे प्रयत्न, यांना मी नेहमी साथ देत गेले. पण मनात काहीवेळा एक स्वार्थी विचारही यायचा. असं वाटायचं, की ती तुला कधीच मिळू नये आणि मी तुला अशीच आयुष्यभर साथ करत जावी.’’
‘‘तुझ्या डोळ्यांत मी स्वतःला शोधत राहिले, पण त्यात एका मैत्रिणीशिवाय मला कधीच काही दिसलं नाही. त्यावेळी तुझा ओझरता स्पर्श मला हवाहवासा वाटायचा, पण तरीही मी स्वतःला तुझ्यापासून प्रकर्षानं लांब ठेवत गेले. त्या काळात तुझी आणि माझी खूप भांडणं झालेली होती..... आठवतात?....... मीच मुद्दाम उकरून काढलेली. रोज तुझ्याशी बोलायला मला विषय हवा असणं आणि तुझ्यापासून दूर रहायचा एक वेडा प्रयत्न, अशी ती माझी दुहेरी धडपड असायची. मनात भावनांचा कल्लोळ उडालेला असताना तू माझा हात हातात धरून तुझ्या त्या मैत्रिणीबद्दल बोलत बसायचास. कसं सांगू तुला शब्दामध्ये, की एकाचवेळी तुझ्यात गुरफटणं आणि तुझ्यापासून तिळ तिळ तुटणं हा काय अनुभव असतो ते.’’
‘‘त्यानंतरही अनेकदा वाटलं, की तुला एकदा सगळं सारं काही स्पष्ट सांगावं, पण नाही रे धीर झाला मला. तू नाही म्हणालास तर? माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलास तर? रागावून मैत्री तोडून गेलास तर? अशी प्रश्नांची माळच उभी रहायची मनामध्ये. तुला मनातलं सांगितल्यानंतर होणा-या परिणामांची अनिश्चितता मला पेलवत नव्हती आणि काही झालं तरी मला ही मैत्री अजिबात तोडायची नव्हती. स्वतःच्याच मनानं तयार केलेल्या दुहेरी पेचात अडकत गेले आणि आजही तशीच अडकून आहे.’’
त्याचा जागेवरच दगड होवून गेलेला. एवढी वर्ष कोंडून ठेवलेली भावना, तीही आपल्याबद्दलची आणि आपल्यामुळेच कोंडून राहिलेली. तिचं स्वागत करावं, नकार द्यावा, की तिचं दुखावलेलं मन सांभाळावं. त्याला काहीच समजत नव्हतं.
ती बोलतच होती. ‘‘खूप अस्वस्थ होते रे मी इतकी वर्ष. कुणालातरी सांगावं म्हटलं तरी जमत नव्हतं. एवढी मनाच्या जवळची गोष्ट समजून घेईल असं दुसरं जीवाभावाचं कुणी नव्हतंच. तुझ्या वाट्याचं असूनही तुला सांगू शकत नव्हते. माझं लग्न झालंय हे माहितीय मला. पण मी त्याच्याशी प्रतारणा करत नाहीए. त्यानं मला खूप प्रेम दिलंय आणि मीदेखील त्याबद्दल त्याची कृतज्ञ आहे. मी फक्त माझ्या मनाची ही भेग त्याच्यापासून दडवून ठेवलीय. जशी तुझ्यापासून लपवून ठेवली होती तशी.’’
मग बराच काळ घड्याळाचे काटे आपल्या गतीने धावत राहिले. आकाशात सांजरंग दाटून आला. ‘‘पण वैशू, आता यातून साध्य काय?’’ इतका वेळ गप्प असलेला तो आताशानं बोलला.
‘‘साध्य?’’ ती उद्वीग्नपणे हसली. ‘‘काहीच नाही. ज्या क्षणी ते घडू इच्छीत होतं तेव्हा ते मी घडू दिलं नाही. खूप प्रांजळ भावना होती माझी! मला फक्त हे आयुष़्य तुझ्यासोबत जगायचं होतं. माझा प्रत्येक क्षण तुझ्याजोडीनं साजरा करायचा होता. खूप सुरेख कल्पना केल्या होत्या मनाशी. त्या प्रत्यक्षात आणायच्या होत्या. पण इच्छीलेलं सगळं घडत नसतं.’’
पुन्हा शांतता.
‘‘सम्या, हे ऐकल्यावर तू मला सोडून जाणार नाहीस ना?’’
त्या प्रश्नासरशी त्यानं तिच्याकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात दाटलेले असंख्य प्रश्न त्याला दिसले. जोडीला साकळलेली दुराव्याची भीती.
‘‘तू माझ्या जवळ येऊ शकला नाहीस, निदान याहून दूर तरी जाऊ नकोस.’’
तिच्या आवाजातली अगतिकता आता लपत नव्हती. त्यालाही ती जाणवली.
‘‘तू मला एकेकाळी आवडत होतास, म्हणून मी आज हे सगळं सांगितलं, असं नकोस समजू. माझ्या सगळ्यात जवळच्या मित्रापासून मी एक गोष्ट लपवून ठेवली होती. ती त्याचीच होती. ते समजणं त्याचा हक्क होता, म्हणून बोलले. प्लिज......... तू..........’’
त्यानं हलकेच तिच्या हातांवर हात ठेवला.
कदाचित आता शब्दांचं काम संपलं होतं.
किती आश्वासक स्पर्श होता त्याचा! कदाचित या एकाच क्षणासाठी ती थांबलेली असावी. तिला पुन्हा भरून आलं. तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. अनेक वर्षांची आपली अतृप्त इच्छा पूर्ण करून घेतल्याप्रमाणं.
बराच काळ तिच्या गालांवरून आसवं ओघळत राहिली. त्यानंही तो हात तसाच राहू दिला. ते दोघे परस्परांच्या खूप जवळ बसले होते, पण त्यांच्यातलं कित्येक मैलांचं अंतर त्या दोघांनाही जाणवत होत. कधीच न तोडलं जाणारं अंतर. आपण आयुष्यात परस्परांच्या जवळ येऊ शकलो नाही, पण निदान दूरवरून एकमेकांना पाहू तरी शकतो.
रेस्टॉरंटच्या काचेतून समोरचा समुद्र आणि त्या पलिकडचं क्षीतीज नजरेस पडत होतं. सूर्य कलू लागलेला. ती क्षणभर त्या दृश्याकडे पहात राहिली. समोर दिसणारी जमिन आणि क्षीतीज, दोहोंवर तिला निराशा दाटलेली दिसली. एक फसवी भेट... उगाच तिच्या मनात आलं.
तिनं पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तिला बरंच काही बोलायचं होतं. सांगायचं होतं. पण गळा दाटून आला होता. ती कशीबशी एवढंच बोलू शकली.
‘‘थँक्स सम्या!’’
तिनं पर्स उचलली.
‘‘कुठे निघालीस?’’
‘‘आज एवढ्या वर्षांनंतर माझा हक्क मला मिळाला. तुला एकवार हे सांगण्याचा, की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आणखी कुणीतरी अडकलंय या चक्रात. त्या अस्वस्थ मनाला नि:श्वास लाभायला हवा.’’
तिने डोळे पुसले आणि ती निघून गेली. काहीशी मोकळी, निश्चिंत दिसली ती जाताना. तो तसाच बसून होता. बराच वेळ. कुठतरी एकटक पहात. काहीतरी पुन्हा हरवल्यासारखा.
प्रकाश अंधुक होऊ लागलेला. संकोचलेल्या, व्याकूळलेल्या जिवांना अंधारानं आपल्या पदराखाली घेतलं. त्या अंधाराच्या आड त्याच्या गालावरून पाण्याचे ओघळ वहात होते. नेहमीसारखेच. सर्वांच्या अपरोक्ष. मात्र आज त्या अश्रूंची व्यथा काहीशी वेगळी होती....
आपण शोधात असलेल्या फुलपाखराच्या पायांचे ठसे ब-याच दिवसांनतर आपल्याच खांद्यावर दिसावेत तशी...
Thursday, February 17, 2011
नि:शब्द
हातातल्या घड्याळाशी खेळत ती गेल्या अर्ध्या तासापासून वाळूत बसली होती. दर पाच मिनीटांनी तीची नजर आत येणाºया रस्त्याकडे जात होती. तो अजून आला नव्हता. काल रात्रीचं त्यानं फोन करून तिला ‘उद्या भेटूया’ म्हणून सांगितलं होतं. उद्या म्हणजे १४ फेब्रुवारीला. जुहू बिचवर. संध्याकाळी 5 वाजता. तशी ती आली. वेळेच्या आधीच. पण नेहमीसारखी साध्या कपड्यात नाही. त्याच्या नजरेस भरावी अशी तयार होऊन.
त्या दोघांची ओळख गेल्या वर्षभराची. कॉलेजमधले मित्र ते. एकाच वर्गात शिकणारे. तिच्या मित्रांच्या कंपूत तोही होता. थोडासा शांत. थोडासा विचारी. थोडासा भावूक. एक मित्र म्हणून आवडला तिला. कॅन्टीन, झाडाचा पार, ऑफ पिरीयड, सगळीकडे त्यांची धमाल चालली असयची. पण मग पावसाळ्यात गेलेली पिकनिक, दिवाळीत हाती घेतलेला प्रोजेक्ट, डिसेंबरमधल्या कॉलेजच्या स्पर्धा, त्यानंतर आलेलं गॅदरिंग, या सगळ्या दिवसांत तो तिला नव्यानं कळत गेला. ती दोघं खूप जवळ आली. परस्परांबद्दल आकर्षण वाटणं सहाजिकच होतं, पण आपली मैत्री तुटू नये म्हणून एकमेकांना काही कळू न देण्याचीही त्यांची धडपड सुरू होती. याबद्दल कुणीच कुणाशी काही बोललं नाही. मग तिनं त्याला सांगायचा निर्णय घेतला. उद्या सकाळी त्याला सांगायचं असं ठरवते तोच त्याचा फोन आला.
फोन ठेवला तेव्हा तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. का बोलावलं असेल त्यानं? त्याचा आवाज थरथरत होता का? का मला आपलं उगीच वाटलं तसं? एकामागोमाग एक अशी प्रश्नांची माळच उभी होती. तिनं समोर पाहिलं. क्षीतीजाच्या रेघेवरून पक्ष्यांचा थवा उडत चालला होता.
आदल्या रात्री फोन केल्यापासून त्याला झोप म्हणून काही आली नाही. खरं तर मनातून तो चांगलाच घाबरला होता. असं त्यानं कधी कुठल्या मुलीला भेटायला बोलावलं नव्हतं. पण ती कातर स्वरात हो म्हणाली आणि त्याच्या मनानं उंच उडी मारली. कधी एकदा उद्याची संध्याकाळ होते आणि़... आणि काय? तिथं गेल्यानंतर काय करायचं? काय बोलायचं? त्यानं काहीच ठरवलं नव्हतं. नव्हे, ते त्याच्या लक्षातच येत नव्हतं. उद्या सकाळी ठरवू, असं म्हणून तो झोपी गेला खरा, पण प्रत्यक्ष भेटीची वेळ होत आली तरी त्याच्या मनात गोंधळच होता. असं गोंधळलेल्या अवस्थेत आपण तिच्यासमोर काही वेड्यासारखं बोललो म्हणजे? आणि ती आपल्याला हसली म्हणजे? त्याला काहीच कळत नव्हतं. पण तरीही तिला भेटण्याचं प्रचंड औत्सुक्य होतं.
संध्याकाळी पाचच्या सुमारास तो समुद्राकडे जाणाऱ्या वाटेनं चालला होता. पावलागणिक बाजूच्या इमारतींची रांग मागे हटत होती आणि समुद्राचा विस्तार त्याच्या नजरेत भरत होता. किती सुंदर होता तो! अगदी तिच्यासारखा! त्याच्या ह्रदयातली धडधड वाढत होती. तळहातांना घाम सुटला होता. छातीतल्या धडधडीमुळे त्याला आत्ताच दूरवरून धावून आल्यासारखं वाटू लागलं. ती आली असेल का? की मीच लवकर आलोय? त्यानं आसपास वळून पाहिलं. आज समुद्रावर बरीच गर्दी होती. या गर्दीत ती सापडेल? अचानक त्याच्या नजरेला काहीतरी ओळखीचं दिसलं. कदाचित ओढणी. तो त्या दिशेनं निघाला आणि अचानक थांबला.
ती पाठमोरी बसली होती.
घड्याळ्याच्या काट्यानं ‘पाच’चा टप्पा ओलांडला आणि तीची अस्वस्थता वाढली. मागे वळून तिनं किती वेळा पाहिलं असेल तिचं तिलाच ठाऊक! ही ओढ कशाला गं? अजून तर कशातच काही नाही. तिच्या मनानंच तिला म्हटलं आणि तिच्या ओठांवर हळूवार हसू उमटलं. अजून कसा आला नाही तो? असा विचार करत तिनं मान वळवली तर तो समोरच उभा. तिनं झटकन समोर पाहिलं. कसली तरी चोरी पकडली गेल्यासारखं वाटलं तिला. तो हळूच येऊन वाळूत तिच्याशेजारी बसला. थोडं अंतर ठेऊन.
आता काय बोलायचं? दोघांच्या मनात एकच प्रश्न. सुरूवात करायला कुणीच धजत नव्हतं.
दोघंही गप्प. अवघडून गेल्यासारखे. काय बोलावं ते सुचत नव्हतं. एकमेकांकडे पहायची पण चोरी.
वेळ अशीच चालली होती.
समोर पहुडलेल्या समुद्रात नवीन लाटा तयार होत होत्या. एक लाट तयार झाली किनाºयाकडे धाव घेत होती. ती काठावर पोहोचण्याआधीच तिच्यामागे आणखी एक नवी लाट तयार झालेली असायची. दोघंही समुद्राकडे टक लावून त्या लाटा पहात बसले होते. जणू त्यांच्या मनाचं प्रतिबिंबच समोर पडलं असावं. क्षीतीजावर पसरलेल्या आभाळाच्या पडद्यावर सांजरंग हळूवारपणे उतरू लागले होते. मधूनच एखादी पक्ष्यांची ओळ उडत जायची.
‘‘किनाऱ्यावर दिसणारा फेसाळता समुद्र क्षीतीजाजवळ किती शांत दिसतो ना?’’ तो समुद्राकडे पहातच म्हणाला.
तिनं चटकन त्याच्याकडे बघीतलं. तो असं काही म्हणेल याची तिला अपेक्षा नव्हती. पण तरीही तो जे म्हणाला ते तिला आवडलं होतं. समोर टक लावून पहाणारा त्याचा चेहरा तिनं क्षणभर न्याहाळला आणि ती पुन्हा समोर बघू लागली.
‘‘जेवढं आत जावं तेवढा तो प्रगल्भ होत गेलेला भासतो मला.’’ तो बोलत होता. ती ऐकत होती. मग बराच वेळ तो बोलत राहिला. समुद्राबद्दल, क्षीतीजाबद्दल, मावळतीच्या रंगांबद्दल. तिला खूप छान वाटत होतं ते ऐकायला. ती त्याच्या शब्दांना डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करत होती. समोर सूर्य क्षीताजाला स्पर्श करत होता. रंग अधिकच गडद होत चालले. लाटांचा शुभ्र रंग फिकट होऊ लागला. मोजक्या ठिकाणी चांदण्या नजरेस पडत होत्या.
‘‘निघू या?’’ त्यानं विचारलं. तिनं मान डोलावली. वाळूवर तळहात ठेऊन उठताना त्याचा तिच्या हातावर पडला. तिनं तो तसाच राहू दिला. केवळ मान वळवून त्याच्याकडे पाहिलं.
फक्त काही क्षण गेले असतील. पण दोघांनाही खूप मोठा प्रवास करून परस्परांच्या जवळ आल्यासारखं वाटलं.
दोघं किनाऱ्यावर उभं राहून पलिकडे बघत होते. सूर्य काही वेळातच पाण्याआड गेला असता. एक विरत चाललेली लाट त्यांच्या पायांवरून गेली. त्यानं डाव्या हातात एक गुलाब तिच्यासमोर धरला. लालबुंद पाकळ्यांचा टपोरा गुलाब. तिनं तेवढ्याच शांतपणे तो स्वीकारला. शरिरावरून वाºयाची एक गार झुळूक वहात गेली. तिनं हळूच त्याचा हात हातात घेतला. बोटात बोटं गुंफली. पाय नकळतपणे पुढं निघाले. आता आजूबाजूला वर्दळ नव्हती. कानांवर पडणारे आवाज नव्हते. सांज नव्हती की रात्र नव्हती. होत्या त्या केवळ नि:शब्द पाऊलखुणा!
Wednesday, February 9, 2011
अनोळखी पावलांची रांग
रेश्माला बघायला पाहुणे येणार होते.
तिला काहीतरी लिहून पाठवायचं होतं. पण काही सुचलं नाही.
रात्री हिनाच्या ब्लॉगवर गेलो. हिनाने पोस्ट केलेली एक गझल वाचली.
काहीतरी सुचलं आणि तिला लिहिलं.
तसं पाहिलं तर दोघींसाठी
नाहीतर केवळ माझ्यासाठी.
पण एकाच दिवशी दोघींबद्दल एकच भावना दाटून येणं म्हणजे गम्मतच की!
.....................................
.....................................
.....................................
प्रत्येकाच्या आयुष्याला जोडीदार लागतो.
का? माहित नाही.
तसे आपण एकटे कधीच नसतो. नातेवाईकांचा गोतावळा, मित्रांचा कंपू आपली सोबत करतच असतो. तरीही त्या अनामिकाची आस लागते.
का? माहित नाही.
आपलं मन जिवलग मित्रांकडेही मोकळं करतंच असतो की आपण! तरीही त्याला मनातलं काहीतरी वेगळं सांगावसं वाटत.
का? माहित नाही.
कोसळणारा पाऊस, एकच छत्री, मावळतीचे रंग, हे सगळंच निशब्द करायला पुरेसं. त्या क्षणी एकमेकांशी काहीही बोलण्याची इच्छा नसावी आणि तरीही तो जवळ असावसं वाटावं.
का? माहित नाही.
भन्नाट वाऱ्यात उधाणलेल्या समुद्राच्या काठावरून चालताना दूर क्षीतीजावर सूर्य जेव्हा अस्ताला जात असतो, तेव्हा ते सगळं किती सुंदर आहे हे कुणालातरी जवळ ओढून सांगावस वाटत. त्यानंही ते तितक्याच निरागसपणे अनुभवावं अशी इच्छा असते.
का? माहित नाही.
...
...
...
देवास ठाऊक जोडीदार का लागतात?
पण शेवटी वाळूत उमटलेली अनोळखी पावलांची रांग दूरवर जावून एकात एक मिसळून गेलेली दिसली की पुरे!
हो ना!

Monday, February 7, 2011
‘अवतार’ - उद्याच्या तंत्रबंबाळ चित्रपटसृष्टीची नांदी!
| अवतार चित्रपटातील नावी जमात |
| 2009 मधे डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला टीव्हीवर ‘अवतार’चे प्रोमोज येऊ लागले होते. ती विचित्र माणसं, त्यातले वेगळे प्राणी हे सगळं पाहून हा फार जुन्या कालखंडात घडणारा चित्रपट असावा असा समज झाला. चित्रपट पहाण्याची आवड आणि कॅमरूनचं नाव यामुळे इतरांप्रमाणे मीदेखील चित्रपट पहायला गेलो. प्रत्यक्षात ती निघाली सायन्स फिक्शन फिल्म. पाहताक्षणी मला चित्रपट खूप आवडला. पृथ्वीवर खनिजांच्या जाणवत असलेल्या कमतरतेमुळे माणसं पँडोरा नावाच्या एका ग्रहावर खनिजांच्या शोधार्थ जातातं. तिथं नावी नावाची मानवसदृष्य जमात वास्तव्यास असते. ही खनिजं प्राप्त करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून नावींशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी त्यांच्यापैकी एकास नावींकडे पाठवण्यात येते. त्यानं मैत्री करून आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अपेक्षीत असतं. पण घडतं उलट. नावींचं आयुष्य जाणून घेताना तो माणूस त्यांच्याशी एकरूप होत जातो. अखेरीस झालेल्या नावी विरूद्ध मानव अशा युद्धात नावींच्या बाजूनं उभा ठाकतो. निसर्गापासून दिवसेंदिवस दूर जात असलेला माणसाचा पुन्हा निसर्गाकडे होणारा प्रवास इथं दिसतो. असो; चित्रपटाचं परिक्षण लिहीण्याचा इथं उद्देश नाही. निसर्ग आणि मानवावर आधारलेली चित्रपटाची ही संकल्पना आवडण्यासारखी होतीच, पण त्याचबरोबर चित्रपटातले ग्राफिक्सही तितकेच प्रभावी होते. नावी जमातीचं शरिर हे जवळपास आठ ते दहा फूट उंच होतं. त्वचेचा निळा रंग, लांब कान, शेपटी, मोठाले डोळे, रूंद नाक, मांजरासारखी बुबुळं अशी त्या शरिराची इतर वैशिष्ट्यं होती. हे झालं केवळ त्यांच्या शरिराचं वर्णन. पँडोरा ग्रहावरचा निसर्ग, आश्चर्यकारक आकाराची झाडं, ड्रॅगनसारखे प्राणी, नावींच्या राहण्याचं ठिकाण असं सगळंच विशेष तांत्रिक मेहनतीनं तयार केलं होतं. तो निसर्ग वेगळा आहे हे दाखवणं क्रमप्राप्त होतं, त्यामुळे ही सगळी वैशिष्ट्यं बऱ्याच प्रमाणात मनाला पटतात. चित्रपट पाहिल्यानंतर हा निसर्ग, कसा तयार करण्यात आला असेल? याचं चित्रीकरण पृथ्वीवरच्या कोणत्या भागात करण्यात आलंय? त्या नावी जमातीचा मेकअप नक्की कसा केलाय? हे काही केल्या मला कळेना. अखेर हे सगळं फार चांगल्या पद्धतीनं तयार केलंय, असं ढोबळ विधान मनात ठेऊन मी गप्प बसलो. माझा लहान भाऊ सूरज अॅनिमेशन आणि स्पेशल इफेक्टचा कोर्स करतोय. त्यानं हा चित्रपट पाहिला. त्याच्या शिक्षणाच्या जवळची गोष्ट म्हणून तो त्यातल्या खाचाखोचा शोधू लागला. एक दिवस आम्ही बोलत असताना अवतारचा विषय निघाला. तेव्हा मी पँडोराचा निसर्ग दाखवण्यासाठी कॅमरूनने ज्या जागांची निवड केली त्या छान आणि वेगळ्या होत्या असं म्हटलं. त्यावर सूरज म्हणाला, ‘‘दादा, तो सगळा चित्रपट स्टुडीओच्या आत शूट झालाय.’’ आता हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता. माझा विश्वास बसत नाही म्हणून सूरजने मला अवतारची मेकींग ऑफ दाखवली. मी पाहिलेले (नावी जमातीच्या रूपातील) कलाकार प्रत्यक्षात चेहºयाने वेगळेच होते. त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रूग्णालयात शरिराला लावतात तशा लहान लहान वायर जोडल्या होत्या. ‘‘यांच्या माध्यमातून त्या कलाकराच्या केवळ हालचाली रेकॉर्ड केल्या जातात. याला मोशन कॅप्चरींग म्हणतात.’’ सूरज माहिती पुरवत होता. ‘‘यामध्ये अॅनिमेशनचाही भाग असतो. या मोशन्स त्या कलाकारासाठी तयार करण्यात आलेल्या एका ग्राफिकल मॉडेलमध्ये टाकल्या जातात. मग ते मॉडेल थेट त्या कलाकाराप्रमाणे हालचाली करू लागतं. त्या मॉडेलवर इतर संस्कार करून त्याला एक चेहरा दिला जातो. अवतारमधली सगळी नावी जमात अशीच तयार झालीय.’’ मोशन कॅप्चरींग, कम्पोझीटींग, मॅच मूव्हींग, रोटोस्कोपी, लायटींग, मॉडेलिंग. अशा अनेक पद्धतींबद्दल तो बरंच काही सांगत राहिला. मी पहात होतो. चित्रपटातल्या एक दृष्यात ते दोघे उंच झाडाच्या जाडजूड फांद्यांवरून उड्या मारत चाललेले असतात. पण प्रत्यक्षात ते एका स्टुडीओमध्ये तयार केलेल्या लाकडी रस्त्यांवरून उड्या मारत होते. ‘‘हे शूट झाल्यानंतर त्याच्या मागे ती झाडं वगैरे तयार करण्यात आली. त्यातला एवढासाही भाग खरा नाही. सगळं काही बनवण्यात आलंय.’’ हे सगळं निदान माझ्यासाठी तरी अकल्पित होतं. स्पेशल इफेक्ट काय असतात, हे समजण्यापुरतं जुजबी ज्ञान मला होतं. पण हे काहीतरी अचाटच वाटलं. चित्रपट क्षेत्रात शिरकावं करणारा हा एका नवाच घटक होता. नसलेल्या गोष्टी खऱ्याखुऱ्या आहेत असा विश्वास बसावा इतकं ते सगळं बेमालुम होतं. तसं पहायला गेलं तर स्पेशल इफेक्टस्मध्येही हेच असतं की. मोठमोठे बॉम्बस्फोट, पृथ्वीवर पडणाऱ्या उल्का, एलियन्स अटॅक किंवा सुपरहिरोंचे चित्रपट. या सगळ्यांमध्ये भरगच्च स्पेशल इफेक्टस् असतात. पण ते पहाताना ‘हे स्पेशल इफेक्ट आहेत’ हे माहित असतं. तसं इथं घडलं नाही. पडद्यावर दिसणारं सगळं खरं आहे असं मनानं चटकन मान्य केलं होतं. हे थोडं गंभीर वाटलं. मी पाहिलेल्या काही सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये भविष्यातील जगात येऊ शकणाऱ्या कृत्रिमतेचे चित्रण पहिले आहे. अवतारनं निर्माण केलेल्या त्या जगातून मला ही कृत्रिमता चित्रपट क्षेत्रापुरती का होईना, पण येऊ घातल्याचा भास झाला. एकेकाळी चित्रपट केवळ स्टुडिओमध्ये चित्रीत केला जात असे. बाजार, बगिचे, रस्ते वगैरेंचे सेट उभारून चित्रीकरण पार पडत असे. त्यानंतर चित्रपट स्टुडिओबाहेर बाहेर आला. चित्रपटाला वास्तवाचा जास्तीत जास्त स्पर्श व्हावा या हेतूनं (मग ते केवळ चित्रीकरणाच्या पातळीवर का असेना) चित्रपटकर्त्यांकडून प्रयत्न होऊ लागला. मात्र गेल्या दशकभराच्या काळामध्ये चित्रपट अधिकाधिक वास्तव (केवळ प्रसंगांच्या बाबतीत हा!) करण्याच्या नादात कृत्रिमतेचा आधार घेण्याकडे कल वाढू लागला आहे. याचा परिणाम म्हणजे आता तयार केले जाणारे चित्रपट हे तंत्रबंबाळ होऊ लागले आहेत. चित्रपटाची कथा आणि पर्यायाने तिचा परिणामही तंत्राच्या भडीमारात गुदमरू लागलाय. सूरज नेहमीच माझ्याशी इफेक्ट, ते तयार करण्याची पद्धत, अमुक एका चित्रपटात केलेलं मॉडेलिंग, नवीन आलेले थ्री-डी चित्रपट वगैरेंवर गप्पा मारत रहातो. त्याच्या सहवासाने मलाही त्यातल्या बाबींची माहिती होऊ लागली आहे. त्याच्या क्लासमधली मुलं घरी येत असतात. त्यांच्या गप्पा कानावर पडतात. ही सगळी मुलं त्या तंत्रानं भारून गेल्यासारखी वाटतात. आता तो त्यांच्या शिकण्याचा भाग आहे म्हणून त्याच्याशी जवळीक साधणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. पण त्यांच्या बोलण्यामध्ये तंत्रानंतर कोणतेच विषय नसतात. ही झाली त्या क्षेत्राशी संबंधीत असलेली माणसं. इतरांचं त्याहून वेगळं नाही. हे तंत्र आता सगळ्यांनाच आवडू लागलंय. थ्रीडी किंवा इतर स्पेशल इफेक्टस् हे आजच्या प्रेक्षकाला आकर्षित करण्याचं काम करतायत. या नवनव्या तंत्रासाठी चित्रपट पाहिले जातायत. पण चित्रपटांसाठी ही चिंतेची बाब आहे. चित्रपट माध्यम हे स्वत:च एक तंत्र असल्यामुळे त्यात तांत्रिक अंगानं बदल होणारच. पण यानंतरही तो चित्रपट आहे याचा विसर पडू न देणं महत्त्वाचं ठरतं. त्यातल्या चित्रांमधून मांडली जाणारी कथा, तिचा आशय, दिग्दर्शक-लेखक आणि तंत्रंज्ञांचादेखील दृष्टीकोन, त्यातून चर्चील्या जाणाऱ्या गोष्टी हे सगळंच चित्रपटाला परिपूर्ण करत जातं. त्यातली दृष्यभाषा तर फार महत्त्वाची. ही भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी, एखादा आवश्यक परिणाम साधण्यासाठी तंत्राचा वापर नक्की करण्यात यावा. पण घडतंय उलटं. आज चित्रपट अर्थपूर्ण नव्हे तर देखणे, थरारक, रोमांचक अन् लोकप्रिय करण्यासाठी या तंत्रांचा वापर केला जात आहे. वापर नव्हे भडिमार केला जातोय. त्यामुळे तंत्रज्ञान हे काहीतरी घडवण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट न रहाता चित्रपटाची कथा, आशय, इत्यादींच्या रांगेत जाऊन बसलंय. प्रेक्षकांचाही तोच समज झालाय. आज अवतारचे इफेक्टस्, टॉय स्टोरी-आईस एजमधील थ्रीडी टेक्नॉलॉजी, या अॅनिमेशनपटांतील मॉडेल यांची चर्चा होते. अर्थात ती व्हावी. त्या गैर काहीच नाही. पण त्याबरोबरीने आशय आणि अर्थपातळीवर मूल्यात्मकता या संबंधानेही चित्रपटाचा विचार होणे आवश्यक ठरते. ती घडताना कुठेच दिसत नाही. म्हणजे अवतारच्या इफेक्टबद्दल बोलणारी अनेक माणसं मी प्रत्यक्षात आणि माध्यमांमध्येही पाहिली. मात्र कोणत्याही ठिकाणी त्या चित्रपटाची मूळ संकल्पना चर्चीली गेलेली मला आढळली नाही. चित्रपट आणि पर्यायानं प्रेक्षकांवर होणाऱ्या तंत्राच्या भडीमारात चित्रपटातले कलागुण, त्यातून मांडला जाणारा आशय या महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टी दुय्यम स्थानावर ढकलल्या जात आहेत. बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड, कोणत्याही प्रदेशातील चित्रपट पहा. हे सगळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाटतात. हॉलिवूडमध्ये केला जाणारा तंत्राचा वापर तर विस्मयचकित करणारा आहे. त्या तुलनेत भारतीय चित्रपटांमध्ये तंत्राचा त्या सफाईने वापर केला जात नसला तरीही हे सगळे चित्रपट अत्यंत चकचकीत असतात. रजनिकांतचा रोबोट, लव्ह स्टोरी 2050, क्रिश, यांसारख्या कित्येक चित्रपटांसाठी परदेशातून तंत्रज्ञ मागवण्यात आलेले आपण पाहिले. या गोष्टींची बेसुमार चर्चा वर्तमानपत्रं, वाहिन्या, मुख्यत्वेकरून चित्रपटांशी संबंधीत वाहिन्यांवर केली जाते. चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या तंत्रांचा गवगवा होतो, मात्र चित्रपटांमधून काय दिलं जातंय हे दुर्लक्षीतच रहातंय. अर्थात ही काही आज घडणारी गोष्ट नाही. अमिताभच्या तारूण्यात त्याने केलेले चित्रपटही असेच होते. त्यांचा भर मनोरंजनावर होता. या चित्रपटांतून त्याची इमेज लार्जर दॅन लाईफ झाली आणि कथावस्तू दुय्यम होत गेली. प्रेक्षक त्याला पहायला चित्रपटगृहात यायचे. आज अमिताभची जागा तंत्राने घेतली एवढंच. रोबोट या चित्रपटात मांडण्यात आलेली संकल्पना म्हणजे ‘यंत्रमानवाला भावना बहाल केल्या आणि तो तुमच्यावर प्रेम करू लागला तर मग काय?’ या संकल्पनेवर 2001 साली स्टीव्हन स्पीलबर्गने ‘आर्टीफिशल इंटेलिजन्स’ हा चित्रपट तयार केला होता. या संकल्पनेवर चर्चा करण्यास तो बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. हे ‘रोबोट’ संदर्भात घडलं नाही. कारण तो पूर्णपणे मनोरंजनमूल्यांवर आधारित होता. हीच बाब लव्ह स्टोरी 2050 ची. वर्तमानकाळात आपलं प्रेम हरवलेली एक व्यक्ती त्या प्रेमाच्या शोधार्थ भविष्यकाळात जाऊन पोहोचते हा चित्रपटाचा विषय. भविष्यामध्ये जेव्हा तंत्रज्ञानानं प्रचंड प्रगती केलेली असेल, त्याचा मानवावर, त्याच्या जाणिवा आणि भावनांवर तेवढाच मोठा परिणाम होत असेल, अशा काळात त्याच्या प्रेमाच्या व्याख्या कशा असतील? त्याच्या भावना बदललेल्या असतीरल का? तो प्रेमाला कोणत्या पद्धतीनं प्रत्युत्तर देईल? अशा अनेक गोष्टी या चित्रपटात पडताळून पाहता आल्या असत्या. प्रत्यक्षात झालं नेहमीसारखंच. हा चित्रपटही भविष्यातलं भौतिक जग दाखवण्यापुरताच मर्यादीत राहिला. विज्ञानकथेच्या अंगानं जाणारे हे चित्रपट एक फॅन्टसी स्टोरी बनून राहिले. त्यांच्यावर अखेरपर्यंत दिसून आला तो केवळ तंत्राचा प्रभाव. इथं पुढारलेलं तंत्र आणि मागासलेले विचार असं व्यस्त प्रमाण दिसतं. तंत्र वापरलं जाऊ नये असं म्हणणं नाही. उलट तंत्राचा वापर करून तयार करण्यात आलेले काही चांगले चित्रपटही उदाहरणादाखल सांगता येतील. 1997 साली आलेला ‘कॉन्टॅक्ट’ हा एलियन्स संपर्कावर आधारित चित्रपट अत्यंत माफक इफेक्टचा वापर करून देव, माणूस अन् श्रद्धा यांवर भाष्य करतो. त्याउलट 2000 साली आलेल्या वाचोस्की बंधूंच्या ‘मेट्रीक्स’ या चित्रपटात अनेक स्पेशल इफेक्टचा भरणा होता. मात्र तो कुठेच चित्रपटावर कुरघोडी करत नव्हता. अवतारमध्येही बऱ्याच प्रमाणात तंत्रामधून आवश्यक परिणाम साधण्यात आला आहे. (पण अवतारची ही तंत्रं एवढी लोभस आणि आकर्षक आहेत की प्रेक्षक चित्रपटाचा अर्थ लावण्यापेक्षा त्यांच्या देखणेपणातच गुंतून पडतो) बदलत्या काळानुसार तंत्र पुढे येणारंच. पण ते चित्रपटाच्या पुढं न जाता त्याच्या बरोबरीनं वापरलं जाणं गरजेचं आहे. अन्यथा सध्या ज्या प्रमाणे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारे थ्रीडीपट केवळ ‘थ्रीडी इफेक्टस्’साठी पाहिले जातात, तसे उद्या बहुतांश चित्रपट हे केवळ त्यांच्यात वापरण्यात आलेल्या मनमोहक तंत्रासाठी पाहिले जातील. |
Friday, February 4, 2011
ती गेली तेव्हा...
२ फेब्रुवारी २०१०
काकू (माझी आजी) आजारी होती म्हणून सकाळीच मम्मी गावी गेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास ऑफिसमध्ये काम करत होतो आणि मावशीचा फोन आला. काकू गेली. क्षणभर काहीच कळेना. असं होणार हे माहित असूनही मन मानायला तयार होत नव्हतं. सूरजला फोन करून बॅग घेऊन दादरला यायला सांगितलं. विशाल शिकायला पुण्याला होता. तो रस्त्यात भेटणार होता. पहाटेच्या सुमारास पुण्याला पोहोचलो. विशालला घेऊन अकलूज गाठलं. वाटेत मामाचे सारखे फोन येत होते. कुठपर्यंत आलात? दोन -तीन गाड्या बदलत आम्ही प्रवास केला. घर जसजसं जवळ येत चाललं तसतसं मनं अधिकाधिक अस्थिर होत चाललं.
माझ्या लहानपणाच्या आठवणी जिथून सुरू होतात तिथं काकू उभी असलेली दिसते. माझं सुटीत आजोळी जाणं, तिथली दंगामस्ती, माझे खेळ, माझे हट्ट, माझं फिरणं, रडणं या सगळ्या घटनांच्या ज्या चौकटी मनात उभ्या रहातात, त्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात ती उभी असलेली आढळते. मला फिरायला घेऊन जाणं, वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालणं, माझ्यासोबत पत्ते खेळणं, रात्री चूलीवर शिजवलेलं जेवण भरवताना छान छान गोष्टी सांगणं असं खूप काही करायची ती. आमचा वाडा (अर्थात अंगण) बरंच मोठं होतं. त्यात नळ होता. त्यावेळी सहसा कुणाच्या घरी नळ नसल्याने शेजारच्या बायका आमच्याकडे सकाळी पाणी भरायला यायच्या. मला ते आवडायचं नाही. रात्री झोपताना समोरचा गण्या आणि त्याचे वडील आमच्या अंगणात अंथरूण टाकायचे. मला तेही आवडायचं नाही. शहरातून मालकी हक्कांचे संस्कार घेऊन आलेल्या मला ते सगळं रूचायचं नाही. काकूनं मला त्यांच्यासोबत कसं रहावं, आपलं आणि त्यांचा हा फरक विसरावा हे शिकवलं. तिची माझ्यावर खूप माया होती. बºयाचदा ती बोटं मोडून माझ्यावर तिची किती माया आहे हे सांगायची. मी गावी चाललो की माझ्या वडीलांना मी सुटीचे दिवस फुकट घालवू नयेत, त्यात अभ्यासही करावा असं वाटायचं. एकदा त्यांनी माझ्यासमवेत एक वही दिली आणि त्यात दररोज 3 इंग्रजी शब्द लिहीण्यास सांगितलं. मुंबईला परतल्यानंतर ते वही तपासणार होते. अर्थात मी सुटीत तसं काहीच केलं नाही. आता घरी जाऊन फटकेच खावे लागतील या भीतीने मुंबईला परत जाताना मी धास्तावलो होतो. तेव्हा काकूने माझ्याकडून ती वही काढून घेतली आणि म्हटलं, ‘‘वही गावी विसरलास म्हणून सांग.’’
मावशी कायमची गावी रहायला आल्यानंतर विशाल आणि विकास, माझे मावस भाऊ तिथं राहू लागले. लहानपणापासून वडीलांनी लाडावून ठेवल्यामुळे पहिल्या काही वर्षात त्यांचा काकूला तसा बराच त्रास झाला. विकास लहान होता आणि विशाल हट्टी. त्याची आणि माझी सतत भांडणं व्हायची. ती सोडवणं हा काकूच्या डोक्याला झालेला तापच होता. काकूनं कुणाही एकाला झुकतं माप देऊ नये, आम्हा सर्वांवर समान प्रेम करावं असं आम्हाला वाटायचं. जर तिनं एखादी गोष्ट कुणाला दिली की लगेच दुसरा विचारायचा, ‘‘त्याला का म्हणून?’’ मग ती म्हणायची, ‘‘कारण तो माझ्या गारीत (चितेत) उडी टाकायचाय.’’ एकदा तिच्या या उत्तरावर विशालनं भाबडेपणानं विचारलं, ‘‘तो गारीत उडी टाकणार आणि मी?’’ काकू म्हणाली, ‘‘आणि तू वरून बोंबलायचाय’’.
गावाला दिड-दोन महिने राहून माझी मुंबईला परतण्याची वेळ झाली की माझ्या आणि तिच्या एकत्रित रडण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. मी मुंबईला परत आलो की कित्येक रात्री माझी उशी तिच्या आठवणीनं भीजत असे. मी सर्वात जास्त पत्रं तिलाच लिहिली होती. लहानपणी खेळलेले सगळे खेळ, तिथं भेटलेली माणस, रंगलेले पत्त्यांचे डाव, किल्ल्यातली भटकंती, गारेगारवाल्याकडून घेतलेला बर्फाचा गोळा अशा माझ्या खूप काही आठवणी तिच्याशी निगडीत आहेत. माझं सगळं बालपण तिनं व्यापल्यासारखं वाटतं.
गाडीत मला असं बरंच काही आठवत होतं. आम्ही अकलूजच्या जवळ आलेलो समजल्यावर घरी जमलेल्यांनी पुढची तयारी करायला घेतली. आम्ही तिघं घराजवळ आलो. मी घरी येताना नेहमी याच वाटेन यायचो. ती कट्ट्यावर बसलेली, पाणी भरत असलेली नाहीतर मामाच्या मुलांबरोबर खेळत असलेली नेहमी दिसायची. तिला छानपैकी मिठी मारून मगच घरात जायचो. ती नेहमी जिथं दिसायची आज त्याच जागी तिचं निर्जीव कलेवर ठेवलेलं होतं. माझी काकू हीच होती का? हा प्रश्न पडावा, इतका तिचा चेहरा बदललेला होता.
माझी काकू कायमची गेली होती.
तिला सगळ्यांनी उचललं. त्यांच्यासोबत मी स्मशानाची वाट चालू लागलो. मी तिला खांदा दिला आणि इतकावेळ डोळ्यात आवरून धरलेलं पाणी धडपडून बाहेर पडलं. स्मशानापर्यंत मी हुंदके देत रडत होतो.
स्मशानात तिची चिता धडधडून पेट घेत होती.
''तो माझ्या गारीत उडी टाकायचाय''
तिचे ते शब्द आठवले आणि पुन्हा एकदा आसवं गळू लागली.
डोळे पुसत तिला नमस्कार केला.
अखेरचा.
***************
आज तिला जाऊन एक वर्ष झालं. तिच्या आठवणी मनात नक्की आहेत. पण ती आमच्यातून निघून गेल्याचं जेवढं दुखः सगळ्यांना आहे तेवढं मला नाही. कारण काकूने माझ्या डोळ्यादेखत प्राण सोडला नाही. मला गावच्या घरात तिची कमतरता भासते पण ती मरण पावली आहे असं वाटतच नाही.
असं का?
ते मला नीट सांगता यायचं नाही. मी तिचा अखेरचा क्षण पहिला नाही म्हणून? की मला तिच्याशी जोडणाऱ्या आठवणीच सुरेख आहेत म्हणून? खरंच सांगता यायचं नाही. फक्त आयुष्यातली एक खूप मोठी आणि मनाला तेवढीच जवळ असलेली जागा आता रिकामी झालीय.
तिथं आता केवळ शांतता आहे.
ती गेली तेव्हा स्मशानात होती तशी.

Wednesday, January 19, 2011
Thanks सपना....
सपना तू दिलेल्या प्रतिक्रियेत सकारात्मक विचार मांडला आहेस. आणि ते बरोबरच आहे. मी जे लिहीलं होतं ते काहीसं नकारात्मक भासत होतं. आता मला काही नकारात्मकता मांडायची नव्हती़ पण मनातली अस्वस्थता ही एका विशिष्ट स्वरूपातली सभोवतालची परिस्थिती पाहिल्यामुळे (जी खरोखर नकारात्मकतेच्या जवळ जाणारी आहे) निर्माण झालेली असल्यामुळे त्यात त्या नकारात्मकतेचा अंश असणारच होता़ असो; त्या दिवशी लिहील्यानंतर मनात कुठेतरी वाटतच होतं की आपलं काहीतरी लिहायचं राहून गेलंय म्हणून. जेव्हा ते सगळं लिहीत होतो, तेव्हाही ही सकारात्मकता मनात डोकावत होती. हे सगळं लिहावंसं वाटत होतं. पण नंतर लिहीण्याच्या ओघात ते बाजूला सारलं गेलं. तरीही मला या गोष्टीची आठवण करून दिल्याबद्दल तिचे धन्यवाद.
त्या प्रवासात ही सकारात्मकता दिसतेच. निश्चित दिसते. मदत करण्यासाठी लोकं पुढे येत असतात़ कुणी काही विचारलं, मदत मागितली, कुणी कुठे अडलं तर मदत करायला माणसं आनंदानं पुढं सरसावतात़ आता कालचीच गोष्ट घ्या! रात्री मी दादरहून बोरिवली स्लो पकडली़ बरीच गर्दी होती़ मला कशीबशी जागा मिळाली़ आत एक जोडपं बसलं होतं. त्यांच्याकडे मोठ्या बॅग होत्या़ कदाचित मुंबईत नवीन असावेत, कारण उतरायचं होतं अंधेरीला आणि माटुंगा जाताच उठून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले़ त्यांची घाई पाहून काहींनी त्यांना ‘कुठे उतरायचं’ असं विचारलं. तर ते म्हणाले, ‘अंधेरीला’. हे ऐकून माझ्या शेजारचा ‘भय्या’ म्हणाला,‘‘ अरे भाई, अभी तो बहुत टाईम है’. आप खाली फोकटमे आगे आ गए़ अभी तो बहुत स्टेशन जाना बाकी है’’. मग तो त्यांना कुठं उभं रहा म्हणजे धक्के लागणार नाही, बॅग इथं ठेवा, भाभीजी तुम्ही माझ्या जागेवर बसा असं बरंच काहीबाही सांगत राहिला. गम्मत म्हणजे त्या बाईनं उतरताना माझ्या शेजारच्या माणसाला ‘चलो भय्या, चलते है’ असं म्हटलं. हा चांगुलपणा प्रवासात दिसतोच. तो नजरेआड करणं शक्य नाही.
सगळीच माणसं ही मनातून चांगलीच असतात, असा माझा विश्वास आहे़ कुणा नवख्या व्यक्तीला माहिती हवी असेल, कुणी वाट चुकला असेल तर मदत ताबडतोब मिळते असा माझा अनुभव आहे़ ही मदत त्यांच्या आवाक्यातली असते आणि आवाक्यातल्या गोष्टींसाठी मदत करायला माणूस तयार असतो. म्हणूनच फिरताना मला कधीच अडचण आली नाही. परिचयाच्या परिसरापेक्षा अपरिचित परिसरात जाताना मी फार उत्सुक असतो. मी बिनधास्तपणे लोकांना एवढीएवढीशी गोष्ट विचारत जातो. दुकानदारांपासून पोलिसांपर्यंत. सगळ्यांनाच! मला हव्या त्या जागा पटकन सापडतात. ही माणसं जेव्हा मदत करतात तेव्हा फार बरं वाटायचं. काही माणसं तर पत्ता दाखवायलाही यायची़ मग त्यांना त्रास दिल्याबद्दल अवघडल्यासारखं वाटायचं. मदत मिळाल्यावर चांगलं वाटण्याची ही कोणती भावना आहे? प्रथम कळायचंच नाही.
हाच तो चांगुलपणा.
माणसात असलेला हा चांगुलपणा दिसला की फार बरं वाटतं. पूर्वी रात्रीच्या वेळी आलेल्या वाटसरूची राहण्याची, जेवणाची सोय व्हायची, असं चित्रपट, कथा, कहाण्यांमधून पाहिलंलं-ऐकलेलं आहे़ हा चांगुलपणाच होता की! तो जरी आपल्या संस्कृतीचा भाग असला तरी त्याचा पाया या चांगुलपणावरच आधारलेला होता असा माझा समज आहे. आज तो चांगुलपणा पूर्वीइतक्या सहजपणे दिसत नाही. म्हणूनच तो पाहण्याची मनात अस्पष्ट इच्छा असावी आणि ती पूर्ण झाल्यावर मनाला बरं वाटत असावं.
आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मनावर परिणाम नक्कीच होतो. पूर्वी अशा घटना किंवा त्यांना कारणीभूत असणाऱ्या गोष्टी संख्येने कमी होत्या. आज त्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मग ते यांत्रिकीकरण असेल किंवा तंत्रज्ञान आणि त्यायोगे जीवनाचा वाढत असलेला वेग असेल. अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्याचीच मनावर पुटं चढतायत. हा निर्माण होणारा थर या चांगुलपणाला झाकत चाललाय. तो नष्ट होत नाही पण पूर्वीइतक्या प्रांजळपणे वरही येत नाही.
आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा बऱ्याचदा मनावर परिणाम होत नाही. त्याचं कारण माणसं कोडगी झाली आहेत असा नाही. पण त्यांच्या मनापर्यंत त्या संवेदना पोहोचतच नाहीत. घोटाळे घडतात पण त्यांचं आता काहीच वाटत नाही. का? तर आम्ही भरपूर घोटाळे पाहिलेत हो! आता घोटाळे होणं, जनतेच्या पैशांचा अपव्यय होणं हे गंभीर नाही का? पण हा आधीच्या अनुभवांचा मनावर झालेला परिणाम. आता आम्हाला त्यांचं काहीच वाटत नाही. हा झाला एक भाग, पण आयुष्याला आलेला सध्याचा वेगही डोळ्याआड करून चालणार नाही. इथं ‘सेंट्रीफ्यूगल फोर्स’चं उदाहरणं योग्य वाटतं. एखाद्या भांड्यात पाणी ठेवलं आणि ते भांडं जोरात गरागरा फिरवलं तर काय होतं? त्यातलं पाणी त्या वेगासोबत भांड्याच्या कडेला जमा होतं आणि मघाशी पाण्याखाली बुडालेला मधला भाग कोरडा होतो. ही सध्याच्या वेगचक्रात अडकलेल्या मनांची अवस्था आहे. एक तर ती कोरडी आहेत किंवा होत चाललीयत.
हे सगळं लिहीत असताना मनं स्वत:लाच प्रश्न करतं की हे सगळ्यांसोबतच घडतं का? याचं उत्तर अर्थात नाही असं येईल. हे सगळं कदाचित पन्नास टक्के लोकांसंबंधीही घडत नसेल. आपण संख्या त्याहूनही कमी घेऊ. पण हे ‘घडतंय’ हे वाईटच की! मग ते कुणा एकासोबत का घडेना. आणि जरी आज ते काही ठराविक समूहापर्यंत मर्यादीत आहे तरी उद्या त्याचं प्रमाण वाढेल याची भीती आहेच.
त्या गर्दीतून प्रवास करणं आज अगदी जिकिरीचं झालंय. मनं-शरिरं त्रास भोगत आहेत. पण तरीही माणसं परस्परांशी चांगली वागतात. तो चांगुलपणा आजही त्यांच्या ठायी आहे म्हणूनच. हा चांगुलपणाच माणसाला आपल्या माणूसपणाची आठवण करून देत रहातो. पण कधीपर्यंत? त्याचीही काहीतरी मर्यादा असेलच की! ही सारी परिस्थिती या चांगुलपणावर मात करून पुढं निघून जाईल की काय? हीच भीती त्या दिवशी लिहीताना कुठंतरी मनात होती.
दिनकर गांगल यांनी जेव्हा थिंक महाराष्ट्रची संकल्पना समजावून सांगितली तेव्हा मला त्यातला ‘चांगुलपणासाठीचं व्यासपिठ’ हा घटक आकर्षित करून गेला. त्याची खरोखर गरज आहे असं मला वाटतं. तरीही हे सगळं लिहायला सपना तुझी प्रतिक्रिया कारणीभूत ठरली. त्यामुळे तुला thanks.

Subscribe to:
Posts (Atom)