ये
या जीवानं अंतर साहण्याची मर्यादा ओलांडावी
त्याआधी
तू ये
ये त्या रात्रीसारखी
जवळ बस
ठेव छातीवर हात
डोळ्यात डोळे गुंतव
हाताच्या स्पर्शातून, गहिऱ्या नजरेतून
तू उतर माझ्या आत, खोल
मी कणाकणाने साकारलेल्या जगात
जिथे आहेत तुझ्या आठवणींचे दिवे
तुझ्यासोबतच्या क्षणांचे इमले
मी चितारलेली तुझी असंख्य चित्रं
आणि वाळूत उमटलेली तुझी-माझी पावलं
तिथला सूर्योदयही तुझा
रात्रही तुझीच
चंद्र, सूर्य,
असले-नसलेले तारेही तुझे
आणि हे लहानसं जग उरात सांभाळत
तुझी वाट पाहणारा हा जीवही तुझाच आहे सखे
ये,
वाट पाहतोय
Sunday, April 12, 2026
ये
Wednesday, March 25, 2026
सूर
छातीत वणवा धुमसतो
आणि शरीर
पोटात गरगरणाऱ्या भोवऱ्याच्या आवेगात
भेलकंडत राहतं दिवसभर
आपणंच सांडलेल्या बियांच्या पारंब्या
वळवळत येऊन डसत राहतात
अब्जावधी दंशांनी
आणि तेव्हा
तूच रुजवलेलं इवलसं रोपटं
त्या भयाण कल्लोळात
मला आधार देऊ पाहतं
जीवनरस वाहून चाललेला असताना
डोळ्यात पैलतीरीचं चांदणं चमकत राहतं
खोल गाडलेल्या घागरीत गवसलेलं बळ
नव्या कातेसारखं अंगावर चढवून
मी चालत जातो तिथवर
रोपट्याला छातीशी धरून
सोबतीला असते तुझी सावली
पण वाळूत पावलं उमटत नाहीत तुझी
भगवंता,
सढळ हातांनी दान द्यायला
का रे नाही शिकवलंस या आयुष्याला?
पण घेणारंय मी सगळं
या आयुष्याकडून... अगदी भरभरुन!
आणि ते मिळणार नसेल
तर ढुंकूनही बघायचं नाहीए मला असल्या आयुष्याकडे
हो,
मला हवीयस तू
बेहद्द, बेहिसाब, बेखौफ
या जगरहाटीच्या, चौकटींच्या,
नियतीच्या नाकावर टिच्चून हवीयस
आणि मलाही उधळून द्यायचंय स्वतःला तुझ्यावर
बेपर्वा होऊन
पण तुला माझ्या सूरात सूर मिसळता येईल?
Thursday, March 12, 2026
मागू दे
रात्रीच्या या प्रहरात
भवतालच्या अंध:कारात
तुला जवळ घेऊ दे
तुझा हात धरू दे
थोडा प्रकाश पसरू दे
सूर्योदयाआधी...
शब्द साखरझोपेत असताना
स्वप्नांच्या काठी विहरताना
मला सांगू दे एकदा
मनीचे गूज तुला
पाखरं किलबिलण्याआधी
दुनियेला जागं येण्याआधी
जगरहाटी सुरु होण्याआधी
कोण्या एका शब्दानेही
ही शांतता नष्ट होण्याआधी
सांगू दे तुला
मागू दे तुला
तुझ्याचकडे
तुझ्याचसाठी
Tuesday, March 10, 2026
ये जे पल अभी
ये जे पल अभी गुजरा है
वो सुना था, बेजान और लवारीस भी
क्योंकी ना थे उस पल मे
हम इक दुजे के पास
तो चल, उन गुजरते हुए पलो के लिए ही सही
उन्हे तनहा छोडने का
जुल्म नही करते
आ मिल जाते है हम दोनो
कम से कम वक्त का वक्त तो
खुशी से कटे
Wednesday, March 4, 2026
आजा
क्या कुछ होता नही?
क्या अपनी कोई पुरानी बात,
कोई पुरानी याद
आँख नम नही करती?
ये मै जो कहता हू, करता हू, लिखता हू,
क्या इन मे से कोई बात
दिल को छुती नही?
शायद ये सवाल करना गलत है
शायद मै वो अधिकार नही रखता
पर तुमसे ना पूछू तो किससे पुछू?
तुम्हारे सिवा है कौन मेरा?
मै तेरी एक करवट, एक मुस्कुराहट का कब से इंतजार कर रहा हू...
मुझे तेरा इंतजार है
मुझे तेरा बेसबरी से इंतजार है
ये दुनिया खत्म होने से पहले आजा
यकिन
तेरे खयाल के साथ सोना
तेरे खयाल के साथ जगना
ये नई बात तो नही
पर फिर भी, कुछ नया तो है...
मै इंतजार मे हूँ
तुम्हारे मिलने के,
तुम्हारे मुझे तक पहुचने के,
तुम्हारे कुछ कदम चलने के,
उन कदमों के बाद और भी
अनगिनत इंतजार है मुझे...
वक्त के फैले मैदान पर
जिंदगी का सारा वक्त लिए
मै तुम्हारे लिए खडा हूँ
मै रुका हूँ
मुझे यकिन है
तुम आओगी