Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Tuesday, February 7, 2023

ये तेरी मेरी कहानी

तेरा मेसेज मिला. अरसो बाद!

इस रात के सन्नाटे मे तेरी आवाज कितनी अलग लगती है! कानो के इतने नज़दिक... मुझे गुदगुदी सी होती है. तू यहाँ थी, तब भी मेरे कानो मे यूही बोला करती थी. और ये तेरी आवाज के पीछे टिक टिक करनेवाली (शायद दिवार की) घड़ी! हाथों से छुटते पलो की तरफ़ सुई से इशारा करती हुई...

जब तुने वो नज़्म मोबाईल पर रिकॉर्ड कर के मुझे भेजी, तब मै चौक गया था. मै मेरी कहानीयाँ तुझे अक्सर भेज़ा करता था. उन के बारे मे तो तुने कभी कुछ बोला नहीं! फिर आज़ ही चुप्पी क्यों तोड दी?

पर तेरी नज़्म बड़ी पसंद आयी मुझे. कितना कुछ कह दिया उस ने! मानो किसी ने मेरे अंदर की बेबसी को लफ़्जो से खिंच कर बाहर निकाला हो.

तेरी नज़्म जो बयान करती है वो सच तो है. ये कहानीयाँ सच मे तकलीफ़ पहुँचाती है. तू भी तो ज़ानती है!

मुझे कभी कभी मेरे तख़य्युल से बड़ा ड़र लगता है. ना ज़ाने कब कैसी कहानी और कैसे किरदार पेश कर दे! फिर उन कहानियों को ले कर ज़ीना पड़ता है. मरना भी पड़ता है. किरदारो का बोझ उठाते उठाते कुली बन जाता हूँ. वो जहाँ ले जाते है वहाँ चला जाता हूँ. वो जहाँ मुडे वहीं मूड भी जाता हूँ.

क्यों करता हुँ ये? शायद अच्छा लगता है मुझे ये, या शायद ज़रुरत है मेरी. इस जिंदगी के ऐसे कितने पल है जो मै जी न सका, शायद इस के आगे भी कभी ज़ी ना पाऊं. वो, ज़ो मै कभी हो न सका, उस मै की तलाश मे इन किरदारो के साथ ख़ानाबदोश की तरह फ़िरता रहता हूँ. उस पल की तलाश मे, जो मुझे पुरा कर दे. क्या ऐसा कोई पल दुनिया मे है?

फ़िर ये किरदार सहारा बन जाते है मेरा. इन के साथ छुटे पल ज़ीने की नाकाम कोशिश करता हूँ.  कोई ख़ुशी या सुकून ढुंढ भी लू तो वो मिलता भी कितना है? बस पलभर का... उस एक पल से दिल का गुज़ारा नहीं होता. ना दिल भरता है - ना संभलता है. बस चकनाचूर हो कर उन सारे जिये पलो मे तिनके तिनके मे बटता रहता है...

क्या उस इक पल की ज़िंंदगी के लिए इतनी ज़द्दोज़हद ठिक है?

क्या कोई सिर्फ एक कहानी तेरी-मेरी मर्जी की नहीं हो सकती?

इन्ही कहानियों से पैदा हुए ये भगवान, ज़िज़स या ख़ुदा... इन मे से किसी के पास भी दिल नहीं?

सच कहा है तुने! कहानिया तकलिफ़ जरूर देती है. पर फ़िर भी इन्हें लिख़ता रहता हूँ. अब यही वज़ह बन चुकी है मेरे ज़ीने की. तकलिफ़ दे या सुकून, ज़हन मे पैदा होनेवाली अगली कहानी का, अगले किरदार का इंतज़ा तो होता ही है मुझे! एक इंतज़ार ये भी है के कोई कहानी लिख़ते लिख़ते मै भी पुरा हो जाऊ...

तू सात समंदर पार दुनिया के किसी कोने मे बैठ कर मेरी कहानीयों का यू नज़्मो मे ज़वाब दे रही है, मानो मैने कोई चिठ्ठी लिख़ी हो तुझे!

अब तुने चुप्पी तोड़ ही दी है तो फ़िर बता! कहा ले जाए ये तेरी-मेरी कहानी? बनेगी मेरी कहानी का किरदार? या ये कहानी लिख़ कर करेगी मुझे पुरा?

---

ये अगर खत होता तो कह देती किसी रोज मैने कहा ही था,

तुम कहानी लिखो तो मुझे ज़रूर लिख़ना. मेरे होने के कई रंग तुम से बेहतर कहाँ किस ने ज़ाना है और कहाँ किसी ने तुमसे बेहतर मुझे पढा है। तुम्हारी कहानी में मैं बिलकुल मैं रहूँगी, पानी की तरह, न मेरा कोई एक आकार न रूप न रंग न मुझे बहने से रोका ज़ा सकता है न मुझे हवा बनने से न फिर बारीश की तरह बरसने से। मेरे किरदार की रोचकता तुम्हारे नोन जजमेंटल अप्रोच में है।  बिना किसी प्रिज्युडाईसेस से सिर्फ तुम समझ सकते हो, तो तुम मुझे जरूर लिखना।  मेरे कही-अनकही से, मेरी सोच और धारणाओं से तुम जैसे मिल पाए उतनी तो कोशीश किसीने मुझ से भी मिलने की नहीं की। ☺️

Tuesday, January 31, 2023

EMAIL

 

च्यायला नसती कटकट! साधे चोवीस तास धड जात नाहीत!
काल तुझा फोन आला तेव्हा खरंतर छान वाटलं. कित्ती महिन्यांनंतर आपण बोललो असू असे. एकदम निवांत! आताशा मुंबईतल्या मुंबईत राहूनही आपल्या भेटी होत नाहीत. तू कंपनी सोडल्यापासून तर अगदी नसल्यातच जमा. पण काल जणू मधे काही घडलंच नाही असं बोललो आपण! मागचा सगळा आठवडा डोकं पिंजून काढणाऱ्या अस्वस्थतेत घालवला होता. पण ती सगळी जळमटं दिवाळीचा झाडू फिरवल्यागत नाहीशी झाली. तू गेल्यामुळे मी अस्वस्थ होतो असं नाही, पण तरीही तुझं जाणं हा माझ्या अस्वस्थतेचा भाग होताच. म्हणजे आहेच! पण कालपासून सगळं कसं छान वाटत होतं! पण किती वेळ टिकलं ते? छ्या!
मी झोपलोय पहाटे साडेचारला आणि नऊला उठूनही बसलो. डोळे तारवटलेत थोडे, पण तरीही किती फ्रेश वाटत होतं! धुंदकीतच होतो कसल्याशा. आज दिवसभरात क्लाएंटच्या दोन मिटींग आणि एक फिल्ड व्हिजिट उरकून, मी 'क्युबाफेअर'चा आख्खा प्रपोजल ड्राफ्ट संपवत आणला. सोलंकीसुद्धा बोलला, "आज भलतीच एनर्जी संचारलीय तुझ्यात!'' मलाही तसंच वाटत होतं. कदाचित तू घरी पार्टीला बोलावलंस त्याचा आनंद असेल. पण नुसतं बोलावलं नाहीस. पूर्वीसारखं अगदी हक्काने 'ये नाहीतर...'च्या रुबाबात बोललीस. आवडलं आपल्याला! तुला पुन्हा एकदा भेटायला मिळेल याचा आनंद झाला. पण तुझ्या त्या फोनमुळे, किंबहुना तू ज्या सहजपणे माझ्याशी बोलत होतीस ना, त्यामुळे आपण यापुढे पूर्वीसारखं भेटायलाही लागू याची आशा होती. तू माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ शकणार नाहीस, हे माहितीए. पण पुन्हा भेटीगाठी सुरु होण्याची ही पुसटशी शक्यताही खूप होती माझ्यासाठी.
आता इतपत सगळं ठिक होतं. पर दिल चुत्यागिरी करेबगैर मानता नहीं. मला खरंच गरज नव्हती तुझा इमेल उघडायची. झक मारली मी!
आताचा नाही. तू ते पूर्वी पाठवायचीस ना, स्फूट की लघुकथा की असलंच कायबाय म्हणायचीस तू त्याला, ते वाले इमेल! मी वेगळं फोल्डर केलंय त्यांचं. अधूनमधून वाचतो मी. कधीकधी तू फारच पर्सनल असं लिहायचीस. आपण लोणावळ्यात राहिलो होतो. त्या रात्री तू बेडवर माझ्या शेजारी पडल्या पडल्या मला मेल पाठवलेलास. मी विचारलंही, "हे काय? माझा परफॉर्मन्स रिपोर्ट का?" तर 'वाच' म्हणालीस. उफ्फ! तो मेल वाचताना मी सेक्सपेक्षा जास्त एक्ससाईट झालो होतो. आधी मला ती सेक्सस्टोरीच वाटली होती. मी तुला तसं थट्टेनं म्हणालोसुद्धा. तर काय सॉल्लिड जळजळत्या नजरेनं पाहिलंस तू! मला वाटलं आता गिळणार तू मला. पण तू मला झापलंस. खरंच, नव्हतं कळलं मला तेव्हा. मी नाही ना तुमच्यासारख्या वाचणाऱ्यांच्या जातीचा. पण तो इमेल मी आयुष्यात वाचलेल्या उत्तम लेखनांमधलं असं काहीसं होतं. उत्तम नाही... काय शब्द तो... ते असतं ना असं खूप छानसं असं. कसं सांगू? म्हणजे शेकोटी कशी... जवळ गेलं की ऊब देते. तसं काहीसं. आतून ऊब देणारं असं. काय झकास लिहिलं होतंस तू! आजही तो मेल वाचताना मला लोणावळ्यातली ती रात्र आठवते. मी ठेवलाय तो मेल जपून.
Is it weird to keep it? Should I delete it?
मी केला अनेकदा डिलिट करण्याचा विचार. पण धीर नाही झाला माझा! माझ्या तुझ्या नात्याचा तेवढाच काय तो प्रत्यक्ष अंश उरला आहे. एक आठवणी सोडल्या तर तुझ्या-माझ्यातलं एवढं इन्टीमेट असं माझ्याकडे काय उरलंय आता?
तुझे ते इमेल माझ्या आयुष्यातला सगळ्यात हळवा संवाद आहेत. तू लिहावं आणि मी वाचावं. तू वाचलेल्या कुठल्याशा कादंबरीतल्या कथेसारखंच होतं हे. मला तुझ्या जगाचा या तऱ्हेनं भाग होण्याचं खूप समाधान होतं. मला कायच्या काय आवडायचं ते वाचायला! खूपदा काहीच नाही कळायचं. तरीही आवडायचं वाचायला. आणि वरुन तू ते केवळ मलाच पाठवतेस या विचारानं तर कसला ऊर भरुन यायचा नुसता. स्पेशल असण्याचा भारी फिल एकदम! मला तुझ्या मेलमध्ये स्वतःला वाचायला-शोधायला आवडायचं. मला न कळणारं असं तू काहीतरी भारी लिहितेस याचं अप्रूपही होतं. त्या भरात कदाचित मी तुझे ते इमेल नीट वाचलेच नाहीत कधी. आज उत्साहाच्या भरात तुझा एक जुना मेल उघडला आणि मला तुझ्या मेलमध्ये मॅडी सापडला!
मॅडी म्हणजे तुझ्या त्या कहाण्यांमधलं कॅरेक्टर. कुठं कुठं तो निव्वळ माझी कॉपी तर कुठं तू तुझ्या कल्पनेनं अगदीच त्याला कुठच्या कुठं नेऊन ठेवलेला. मला तो तुझा वरच्या लेव्हलवरचा मॅडी फार आवडायचा. वाटायचं, याच्यासारखं व्हावं. मी तुला कितीदा विचारलं की, ही गोष्ट आपल्यातल्या कुठल्या घटनेवरुन लिहीली आहेस? तर तू 'तुला काही कळतंच नाही' अशा अर्थाचं गूढ हसायचीस.
पण आज तुझा मेल वाचताना काहीतरी चटकन स्ट्राईक झालं. मला प्रथमच मॅडी वेगळा दिसत होता. मी तो नव्हतो!
पण मॅडी कोण? मॅडी डिसुझा तर नाही? तुझा लिव्ह-इन?
मला क्षणभर नाहीच कळलं काही! अंगातून वारं निघून गेलं होतं. किती वेळ क्युबिकलमध्ये तसाच बसून राहिलो.
आता तू माझ्याशी प्रतारणा केलीस वगैरे असल्या झोनमध्ये मला जायचं नाही. कदाचित नसू आपण दोघे एक्स्क्लुझिव्ह! माझ्यासाठी तू होतीसच, पण तुला नसेल तसं वाटत माझ्याबद्दल तसं, तरी ठिकंय की! आपण एकत्र असतानाच तुझं माझ्यावरुन मन उडालेलं असू शकतं आणि त्याला कारणीभूतही मीच असू शकेन. घडतं की असंही कधीकधी!
म्हणजे मला या सगळ्या गोष्टी स्वीकारता येतात. पण तुझ्या गोष्टींमधला 'तो मी नव्हेच' हे आज कळलं आणि आतमध्ये काहीतरी ओरबाडत गेल्यागत झालं. मला तुझ्या आयुष्यात नसण्यापेक्षा तुझ्या गोष्टींमध्ये मी नाही याचं एवढं का वाईट वाटावं? एवढं रडू का यावं? त्या शब्दांमध्ये बेमालूम मिसळून राहण्यात कसलं समाधान होतं मला? त्यातूनही चटका हा की माझ्या जागी कुणी औरच आहे.
तुला केलंय का कधी कुणी रिप्लेस? हे असं? या तऱ्हेने?
तुझ्यापासून वेगळं होताना माझा तुझ्यासोबतचा अंश कुठेतरी मागे उरलाय या विचारानं हलकं दुखरंसं बरं वाटायचं मला. आता? हे घर हरवल्यासारखं फिलिंग खूप विचित्रंय.
तुझा पुन्हा मेसेज आलाय. 'उद्या पार्टीला नक्की ये' म्हणून. काय करु? मला नाही कळतंय काही.

Wednesday, December 21, 2022

सॉलिट्यूड

तुला माहितीय! लडाखला रात्री जेव्हा नितळ अाकाशात चंद्र उगवतो ना, तो फारच सुंदर दिसतो. त्या थंडगार रात्री जगजीतची गझल ऐकताना मला काळाचा वेग मंदावल्याचा भास झाला होता.
धर्मशालेतल्या एका बर्फाळ सकाळी बाहेर आलो तेव्हा जगातले यच्चयावत अावाज संपून गेले होतो. माझ्या सगळ्या खुणा, सारे पाश दूर मागे पडून केवळ मी उरलो असल्याचं फिलींग होतं ते. तिथला आसमंत स्वर्गीय होता. भूतकाळातली सगळी घडामोड, मनावर उठलेले सगळे ओरखडे विसरण्यासाठी मला जगाचं हे कुठलंसं टोक गाठावं लागलं होतं. वाटलं होतं, भवताला शांत असेल तर आतली खळबळ ऐकू येणार नाही. पण गणित चुकलं होतं. आतल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी पुढे जात राहिलो.
लाटांची घनगर्द गाज ऐकू येणारा ओरीसाचा शांत, निर्मनुष्य समुद्रकिनारा. पृथ्वीच्या अारंभकाळातल्या एखाद्या क्षणासारखा वाटला होता मला. मी तिथंच, काळोख्या रात्री आकाशावर उमटलेली, रात्रीच्या एका टोकाकडून पहाटेच्या दुसऱ्या टोकाकडे मूकपणे वाटचाल करणारी नक्षत्रं पाहिली. सृष्टीचं हे अलगद होत असलेलं स्थित्यंतर अगदी देखणं होतं. तरीदेखील हवं असलेलं सापडत नव्हतं.
कशाने शांत होत असेल माणूस? आत पेटलेल्या आगीवर उतारा काय असतो? कळतं नव्हतं. नक्षत्रं डोक्यावर घेऊन दुसऱ्या टोकाकडे चाललो राहिलो.
तमिळनाडूतल्या घनदाट अरण्यात पडणारा मुसळधार पाऊस पाहिला. बोचरी थंडी वाजवणारा. सृष्टीच्या कल्लोळात धुंद करुन टाकणारा. पाऊस थांबला. झाडं निथळत राहिली. शांतता थेंबाथेंबानं साचत गेली. पण आतला कल्लोळ निवला नाही.
विलक्षण समाधानाने अोथंबून-अोसंडून टाकणारं एकटेपण ठिकठिकाणी शोधत राहिलो. त्या क्षणामध्ये सॉलिट्यूड गवसेल असं वाटलं होतं. नाही सापडला तो.
पण तू भेटलीस!
एकाचवेळी रेनफॉरस्टमधल्या मुसळधार पावसासारखी, जैसलमेरमधल्या स्निग्ध-तप्त सायंकाळसारखी.
तुझ्यासोबत थांबावसं वाटलं. तूही थांबू दिलंस. तू माझ्या वाटेनं सोबत चाललीस. आपण विशेष काही बोललो नव्हतो. मी माझी भूतं तुझ्यासमोर नाचवली नव्हती. तरीदेखील तुला मला समजून घेता येतंय असं का वाटत राहिलं?
तू तुझ्या वाटेनं पुढं जाऊ लागलीस तेव्हा मी तुझ्यामागे आलो. नाहीतरी माझी अशी वाट कुठे उरली होती मला? तुझ्यामागे चालताना मला वाट शोधण्याची भ्रांत उरली नव्हती. तुला पाहून तुझ्या गोष्टी करताना, त्यातून तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी आनंदाची लकेर शोधताना मला इतर गोष्टींचा विसर पडत चालला होता.
आणि आता जेव्हा तुझ्या छातीवर डोकं टेकवून मी शांत पहुडलोय, तेव्हा कितीतरी दिवसांनी मला आतलं सारं काही शांत शांत होत गेल्यासारखं जाणवतंय. तुझ्या छातीतली हलकी किणकिण माझ्या कानात शिरतेय. तुझ्या अस्तित्वाचा तो मंदनाद रिचवत माझं मन निद्रेच्या, स्वप्नांच्या काठावर हलकी अावर्तनं घेतंय. या क्षणात मला हवं होतं ते सापडल्यासारखं वाततंय. 
प्रचंड निश्चिती आणि जिव्हाळा. तुझ्या स्पर्शातून माझ्याकडे पाझरत येणारी शांतता. हाच तो सॉलिट्यूड असेल का?
काही असो, पण या क्षणात एकाचवेळी एकटं असण्याची आणि तू सोबतही असण्याची ही दुहेरी फिलिंग भारीय!

Wednesday, August 12, 2020

सफर

सूरज ढल रहा था. उसकी मुलायम रोशनी मे रेत के किले की छोटीसी परछाई बनी थी. उसने कुल्फी की चिपचिपी स्टीक से किले मे खिडकीयाँ भी बनाई थी. अब दोनो मिलकर उस घरोंदे को देख रहे थे.
"अच्छा बना है ना?"
"हाँ! अच्छा तो बनेगाही. मैने इतनी मेहनत जो की है."
"अच्छा जीऽऽऽ? तुमने?" उसने अाँखे बडी कर दी.
वो मुस्कुराया. "अच्छा बाबा, हमने!"
"वैसे नाम तो सिर्फ मेरा होना चाहिए... पर चलो! थोडा क्रेडीट देही देती हूँ तुम्हे."
अपनेही कहे पे वो हसती रही. उसे हसते हुए देख खुश हुआ. उसने जेब से वो चिठ्ठी निकाली.
"ये साथ क्यों लेके आए?"
"पोस्ट करने."
"फिर से? एक बार चोट खाके भी बाज नही आए!"
"शायद..."
वो किला छोड उसे देखने लगी.
"चिठ्ठी की क्या उम्र होती है?"
"मतलब?"
"मतलब... क्या चिठ्ठी का सफर लिखनेवाले से पढनेवाले तक का ही होता है? बस... इतना सा ही होता है क्या उसका जीवन?"
"हा!" उसने किले मे नई खिडकी बनाते हुए अासानिसे कहाँ. वो उठ कर चल पडा. समंदर के साहिल तक पहुंचा. उसने जेब से छोटीसी शिशी निकाली. उसने वो चिठ्ठी शिशी मे डाली और उसे दूर पानी मे फेंकी. ढलते हुए सूरज की रोशनी मे पानी पर तैरती हुई शिशी एक बार चमक उठी. वो मुडने लगा तो उसने देखा के वो पास आकर खडी थी.
"क्यों फेंक दी? मुझे अच्छी लगती थी वो चिठ्ठी. बेशक मेरे िलए नही लिखी थी, पर थी तो मेरी..."
"जैसे तुमने कहाँ; जब तुमने चिठ्ठी पढ ली तो उसका सफर खत्म हो गया. मैने सोचा के उस चिठ्ठी का नया सफर भी हो सकता है..."
वो मुस्कूराई. उसका हात पकड कर नंगे पाव रेत पर चलने लगी.
दूर पानी पर एक छोटासा जहाज अपने नये सफर पर निकल पडा था...

Friday, June 28, 2019

नदीचा घाट

पावसानं पहाटेपासून शहराला झोडपून काढलं होतं. हातातली छत्री अाणि खांद्यावरची बॅग सांभाळत तो रेल्वे स्टेशनवर पोचला. गाडी प्लॅटफॉर्मवर अाली. तो सरसरून गर्दीत शिरला. झपाट्यानं दारातून अात जात त्यानं विंडो सीट गाठली. बॅग मांडीवर ठेवली. पुस्तक काढलं. मोबाईलवर जॅझचा एक ट्रॅक सुरू केला. इअरफोन कानात टाकले अाणि पुस्तक वाचू लागला.
गाडी हळुहळू गच्च भरत गेली. पावसाचा भिजका, कुबट, तेल-घाम-सेंट मिश्रीत वास डब्यात भरून राहिला होता. या शहरात येण्यापूर्वी पावसाला गंध होता. अाता वास उरलाय. त्याला क्षणभर स्वत:चंच ते वाक्य अावडून गेलं. मग पुढच्याच क्षणी त्यानं त्यावर काट मारली. तो पुन्हा हातातल्या पानांमध्ये गुंतला.
गाडी निघाली तसा पाऊस थांबला. बंद असलेल्या खिडक्या उघडल्या. काही स्टेशनं गेल्यानंतर त्याचं बाहेर लक्ष गेलं. पावसानंतरचा गारवा त्याच्या चेहऱ्यावरून वाहत होता. अशी अाल्हादकता पुन्हा केव्हा मिळावी? अशा विचारानं त्यानं पानांसोबत डोळेही मिटले...

धुळीनं माखलेल्या लाल रस्त्यावरून सायकलची चाकं धावत होती. शाळेतून मिळालेला रिझल्ट घेऊन त्यानं भरल्या मनानं नदीच्या दिशेनं सायकल दामटली. नेहमीचा रस्ता. त्याला त्यावरून जाताना तिच ती घरं, झाडं, देवळं दिसत होती. लहानपणापासून सवयीचं झालेलं ते चित्र अाता पुन्हा दिसणार नाही म्हणून तो डोळ्यांत साठवून घेत चालला होता.
विहीरीजवळचं वळण घेऊन तो नदीच्या घाटावर पोचला. ती अाधीच पोचली होती. कापसासारखं मन अाठवणींच्या झडीनं भिजून अाणखी जड होऊन गेलं. सायकल वडाच्या झाडाला लावून तिच्याकडे जाताना त्याचे पाय उचलत नव्हते.
ती शांतपणे पायऱ्यांवर बसलेली होती. त्याला तिचा चेहरा नितळ भासला. पाऊस पडून गेला असावा. तो शेजारी बसला. दोघं एकमेकांकडे पाहत राहिली. तिच्या भुऱ्या डोळ्यांकडे पाहताना त्याला एकाच वेळी खूप शांतता अाणि खूप खळबळ जाणवत होती. दोघांचे हात पायरीवर परस्परांच्या जवळ होते. तसूभराचं अंतर ठेऊन. ती नेहमी केस मोकळे सोडायची. अाज ती घट्ट वेणी बांधून अाली होती. त्यावर गजरा माळला होता. त्याला तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन जवळून पाहायची खूप इच्छा झाली. केवळ इच्छाच...
''गाडी कधीची अाहे?'' तिनं विचारलं.
''उद्या सकाळची.''
''कधी पोचणार?''
''रात्री नऊ वाजतील मुंबईला पोचायला. मामा येणारय न्यायला.''
''तू माघारी कधी येणार?''
तो गप्प राहिला. त्याला काय सांगावं ते कळलं नाही.
''येईन ना उन्हाळ्याच्या सुटीत.'' त्यानं घशातला अावंढा गिळत उत्तर दिलं. ती त्याच्याकडे पाहून समंजसपणे हसली.
''अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. दोन वर्षांनी दहावी अाहे. तिकडे जाऊन क्लास...''
''अापण हेच बोलणार अाहोत का?'' तो दुखऱ्या अावाजात म्हणाला.
''मग काय बोलायचं अापण?'' तिनं सहज विचारलं अाणि त्याला जाणवलं की ते दोघे अभ्यास, शाळा, घर याच्यापलिकडे कधीच काही बोलले नव्हते. मग हा अापलेपणा, ही जवळीक कधी अाणि कशी निर्माण झाली?
''तुझी शाळा दूर अाहे म्हणे तिकडून?''
''हो! ट्रेनने जावं लागणारय असं बाबा सांगत होते.''
तिनं अोढणीखालच्या पिशवीतून एक पुस्तक बाहेर काढून त्याला दिलं.
''तुला प्रवासात वाचायला.''
''तिकडे ट्रेनमध्ये खूप गर्दी असते. एवढ्या गोंगाटात कसं काय...''
''गर्दी अाणि गोंगाट असतो म्हणूनच देतेय.''
त्यानं तिच्या डोळ्यांत पाहिलं. समोरून वाहणाऱ्या नदीचं इवलंसं प्रतिबिंब तिच्या डोळ्यांत पडलं होतं. ते दोघे मूकपणे उठले. त्यानं सायकल हातात घेतली. दोघे गावाच्या दिशेने चालत राहिले. त्याची सायकल मातीत उमटलेल्या चाकाच्या खुणा पुसत गेली...

''यात्री कृपया ध्यान दे...''
स्पीकरच्या अनाऊन्समेंटने त्याचे डोळे उघडले. त्यानं बाहेर पाहिलं. दादर अालं होतं. दाराजवळची माणसं उतरायच्या अाधीच बाहेरची गर्दी धडधडत अात शिरली. मोकळ्या झालेल्या जागा पापणी लवेपर्यंत पुन्हा भरल्या गेल्या. डब्यात कुठूनतरी भोजपुरी गाणी ऐकू यायला लागली. कानांना न समजणारी कित्येक संभाषणं हवेत लहरू लागली. खिडकीबाहेरची गर्दी निरनिराळे अावाज घेऊन वाहायला लागली. ट्रेनमधली अनाऊन्समेंट पुन्हा सुरू झाली. ती संपते तोपर्यंत होम लोनची एक जाहिरात तारस्वरात स्पीकरमधून पाझरू लागली. त्याचाही फोन वाजला. ह्युमन रिसोर्समधल्या प्रिती बावेजाने त्याला संध्याकाळच्या पार्टीचं इन्व्हीटेशन दिलं. त्यानं फोन ठेवला. गाडी पुन्हा सुरू झाली.
त्यानं हातातलं पुस्तक उघडलं. नजर पानांमध्ये गुंतली. पुन्हा तो गार वारा वाहायला लागला. पानांमागून पानं मागे पडत गेली. ती अलगद त्याच्या शेजारी येऊन बसली. हातानं तसूभराचं अंतर अोलांडलं. मान त्याच्या खांद्यावर विसावली. गाडीच्या गतीसोबत तो स्वतःच्या नकळत लाल मातीच्या रस्त्यावरून निघाला. मन पुन्हा जड जड होत धडधडू लागलं. पानांवर छापलेल्या वाक्यांच्या झिरमिळत्या पडद्यांअाडून त्याला भुरे डोळे दिसत होते. वाऱ्यासोबत गजऱ्याचा गंध दरवळत अाला. त्यानं धडधडत्या मनाला वडाच्या झाडाजवळ उभं केलं. हळुवार पावलं टाकत तो घाटावर पोचला.
अाजही ती त्याच्या अाधी तिथे पोचली होती!

Thursday, June 13, 2019

अोल

...अाणि ती निघून गेली!

त्याला बराच वेळ काही कळलंच नाही. ती समोर बसून खूप कठोरपणे बोलत होती. त्याच्या लहान लहान चुका तिच्या मनाला कशा यातना देतात ते सांगत होती. खरं तर त्याच्याकडे त्या सर्वांची उत्तरं होती. त्यानं ती दिली असती तर ती गप्प बसलीही असती. पण त्यानं अोळखलं होतं. ती बोलायसाठी नाही, संपवण्यासाठी अालीय. मूळातूनच सगळं सुकलेलं असल्यावर अधिक बोलून, समजावून काय उपयोग?
तो गप्प राहिला.
शब्द थांबले अाणि विचारांच्या लाटा सुरू झाल्या.
तो गावावरून अाला होता तेव्हा त्याने दिलेला पहिला इंटरव्ह्यू. त्यावेळेस रांगेत शेजारी बसलेली ती. तिथे झालेली तोंडअोळख. दोघांना एकाचवेळी, एकाच डिपार्टमेंटमध्ये मिळालेली नोकरी. मग रोज लिफ्टमध्ये भेटणं, सोबत जेवण करणं, एकत्र घरी जाणं, बाहेर भेटून कॉफी घेणं, असं सगळं रितसर चालू लागलं. ती नेहमीच पुढाकार घ्यायची. हॉटेलमध्ये अॉर्डर काय द्यायची इथपासून त्याच्या बेडशीटच्या रंगांपर्यंत. सगळ्याच बाबतीत. त्याला ते अावडायचं. मित्र म्हणायचे ती बॉसी अाहे, पण त्याला तो तिला अधिकार गाजवण्याचा भाग वाटायचा. त्यानं ते जाणून बुजून चालवून घेतलं.
अाणि अाता ती निघून गेली...
त्याचं प्रमोशन होऊन त्याला नव्या डिपार्टमेंटमध्ये सामिल केलं गेलं. बसायची जागादेखील बदलली. त्यानं केवळ तिच्यासाठी घरी छोटासा जेवणाचा बेत अाखला. खूप दिवसांनंतर स्वत: स्वयंपाक केला. तिनं मॉलमध्ये पाहून ठेवलेला स्कर्ट अाणला.
ती त्या दिवशी अाली नाही. तिथून थोडं थोडं तुटत गेलं.
न्यू इयरला अॉफिसमधले सगळे लोणावळ्याला गेले. त्याच्याकडे नव्या जबाबदाऱ्या होत्या. त्याला जाता अालं नाही. तिला ते अावडलं नाही. पण ती गेली. मग मित्रांकडून काहीबाही कानावर अालं. तिच्या अाणि विहान गुप्ताबद्दल. त्यानं विश्वास ठेवला नाही. पण जेव्हा त्यानं तिला शनिवारी रात्री पार्कींग लॉटमध्ये विहानच्या गाडीत पाहिलं, तेव्हा तो भेलकांडत गेला. त्यानं तिला त्याबद्दल विचारायचा प्रयत्न केला. तिनं अाकांडतांडव केला. दोन अाठवडे अबोला राहिला. मग तिचा मेसेज अाला. 'भेटायचंय.' तो जरा अाशेनंच तिथे पोचला. पण...
चार दिवसांनंतर तो अॉफिसला रूजू झाला. सकाळी त्यानं कॅन्टूनमध्ये चहा घेतला. एकटाच! दुपारी जेवणाचा डबा अॉफीसमध्येच मागवला. मित्र दुपारी डेस्कजवळ गेले, पण तो काही बोलत नाही असं पाहून परतले. त्यानं संध्याकाळी उशीरापर्यंत थांबून काम केलं. मग बाहेर जेवून थेट अंथरूणावर जाऊन पडला.
हे रोज घडू लागलं. सकाळ होऊ लागली. मिटिंग्ज वेळेवर अटेंड होऊ लागल्या. एक्सेलच्या शीट भरत राहिल्या. मेलवर मेल पाठवले जात राहिले. दिवस मावळू लागला.
अातून विस्कटलं असलं तरी त्यानं बाहेरून सगळं व्यवस्थित अावरून ठेवलं होतं. पण समोरच्या सॉफ्ट बोर्डवरचे फोटो नाहीसे झाले होते. येणारे मेसेज कमी होत गेले होते. हॉटेल, समुद्र, लाँग ड्राईव्ह अशा वाऱ्या बंद झाल्या होत्या.
पाऊस मंद दरवळ घेऊन अाला. तेव्हा तो अॉफिसमध्ये किबोर्ड बडवत होता.
पाऊस थोडा वारा सोबतीला घेऊन अाला. तेव्हा हा हॉलमध्ये टीव्ही लावून भिंतीकडे टक लावून बघत बसला होता. पावसाला काहीच कळेना! तो बोलतही नव्हता. तो अाल्या पावली निघून गेला.
सकाळी गेटमधून बाहेर पडताना पावसानं त्याला गाठलं. त्यानं चक्क छत्रीमागे तोंड लपवलं. पावसानं जोराची धार धरली. तो रिक्षात बसून निघून गेला.
पावसाला चिंता वाटू लागली. हा असा तर नव्हता. एकदा वार्षिक परिक्षेला जाताना चुकून पाऊस अाला तर गडी अाधी भिजला अाणि मग वर्गात गेला होता. पहिली कविता पावसातलीच. पहिलं अाकर्षणसुद्धा पावसातलं. दरवर्षी पहिल्या पावसातली दोघांची भेट ठरलेलीच. रात्री हलक्या पावसातले त्यांचे वॉक... त्याची तर गणतीच नाही.
तो अॉफिसबाहेर अाला तेव्हा पाऊस नव्हता. तो घरी अाला. येतानाही पाऊस लागला नाही. दोन दिवस त्याची फिल्ड ट्रिप होती. पावसाचा टिपूसही पडला नाही. त्यानंच एकदोनदा अाकाशाकडे पाहिलं होतं. नुसतेच कोरडे ढग जात राहिले.
रात्री बाल्कनीत उभा होता. सगळीकडे सामसूम होती. ती शांतता त्याला अातून धडके देऊ लागली. तो छत्री घेऊन अनवाणी पायाने बाहेर पडला. रस्ता चित्रात रंगवल्यासारखा स्तब्ध होता. त्याला खूप खूप अाठवण येत होती. पावसाची!
मग तो अाला. हळूच येऊन खांद्यावर हात टाकून त्याच्या छत्रीतून चालत राहिला. त्यालासुद्धा खूप दिवसांनी बरं वाटत होतं. पावसाचे थेंब हलके हलके जमिनीवर अादळत होते. पावसाचे डोळे त्याच्यावरच खिळलेले होते. अखेर त्यानं अबोला सोडला. विचार धडपडत बाहेर अाले. त्यानं सगळं, सगळं काही सांगून टाकलं. रस्त्याकडेच्या जागेतून गढूळ पाणी वाहत होतं. पाउस हलका पण संततधार होता. चालता चालता रस्ता संपला. त्याला काय करावं ते कळत नव्हतं. फार विचित्र तगमग डोक्यात भणभणत होती. त्यानं अपक्षेनं पावसाकडे पाहिलं.
पाऊस काहीच म्हणाला नाही. तो त्याला घेऊन नव्या रस्त्यावरून चालू लागला. तिकडे बागेची माती होती. तिथे दरवळ उमलू लागले. त्याला खूप दिवसांनी श्वास घेतल्याची जाणीव झाली.
''तू दोन दिवस अाला नाहीस, मला वाटलं...'' तो बोलताना अडखळला.
पावसाने धारांचा जोर वाढवत त्याच्या खांद्यावर थोपटलं अाणि म्हटलं.
''Don't worry! मी कुठंच जाणार नाही. मी येणारंच.''
''का?'' त्यानं वाढत्या धारांमध्ये छत्री सावरत विचारलं.
पावसानं छत्रीबाहेर हात काढून काही थेंब झेलले. मग तो तळहातातलं पाणी पाहत राहिला.
''कारण पावसानं कधी कोरडं रहायचं नसतं.''
त्याच्या अंगावरून गार वारा वाहत गेला. पावसानं त्याच्याकडे पाहिलं. त्याची छत्री त्याच्या डोक्यावरून हळूच दूर केली अाणि म्हणाला,
''...अाणि माणसानंसुद्धा!''
पाऊस सपाट्यानं वाढत गेला. सगळी घरं, इमारती पावसाच्या पडद्याअाड धूसर दिसू लागले. पावसाच्या धारा त्याच्या भवताली नाद धरून राहिल्या. त्याच्या अंगावरून शिरशिरी धावत गेली. पाणी डोक्यावरून अोघळून  अंगाखांद्याला कुरवाळत राहिलं. निचरा होत गेला.
पावसाची अोल अात खोलवर पाझरत गेली.

Tuesday, June 11, 2019

प्रतारणा

अॉफिसमधून बाहेर पडताना खिडकीच्या तावदानांवर पावसाची तडतड ऐकू येत होती. खाली येऊन गाडीवर बसेपर्यंत पावसानं जोर धरला होता. पाऊस कसला, वादळंच ते! सोसाट्याचा वारा अाणि लखलखत्या विजा! मी पावसाकडे विचित्र नजरेनं पाहात गाडी तशीच दामटली. रेनकोट नव्हताच. नखशिखान्त भिजलो. पहिल्या पावसाची अोल केसांपासून सॉक्समधल्या तळव्यांपर्यंत पाझरली. किती दिवसांनी असा अोलाचिंब झालो होतो.
मग तू अाठवलीस!
कदाचित पावसात अापण छत्रीच्या बहाण्याने असेच अोलेकिच्च होत भटकत असायचो म्हणून...
कधी कधी मरीन लाईन्सच्या दिव्यांखालच्या अंधारात पावसाच्या अाडोशाला हरवून जायचो म्हणून...
त्या भिजण्यातली ऊब अाठवून रोम रोम शहारत गेला.
गाडी अंधेरी स्टेशनजवळ अाली. तिथलं मॅक-डी गच्च भरलं होतं. मी त्या गर्दीत तुला शोधत राहिलो. अाजही माऊंट मेरी, खार स्टेशनबाहेरचं घंटेश्वर, सोसायटी रोडवरचा डोसावाला, थेटरातल्या कॉर्नरसीट्स, एफसी रोड इथं गेलो की नजरेची ही अशी शोधाशोध होतेच. तुझ्या दरवळीमुळे या शहरातल्या किती जागा माझ्या उरात रूतून बसल्यात!
खूप मनात अालं की तुला फोन करावा. निदान मित्र म्हणून करावा. पण, वर्ष झालं, तुझा स्वत:हून एकही मेसेज नाही, फोन नाही. तुला नाही येत माझी अाठवण कधी? दुखावलेल्या मनानं इगोच्या काठीचा अाधार घेत फोनचा विचार काढून टाकला. मी गाडीला किक मारली.
फर्लांगभर अालो असेन. तू दिसलीस. म्हणजे अाधी केवळ अोढणीच दिसली. पण तो तुझा बांधा, ती चालण्याची लकब, मी असताना छत्री तिरकी धरण्याची ती तऱ्हा! ते सारं या नजरेत तसंच्या तसं ताजं होतं. फक्त या वेळेस छत्रीत दुसरंच कुणीतरी होतं. तुझ्या भोवती हात घट्ट लपेटून तुला खेटून चालत होतं. तो पावसाचा फायदा घेत होता हे स्पष्टच होतं. अाणि तू सुद्धा तो घेऊ देत होतीस!!!
अातमध्ये काहीतरी चरचरत, तडतडत गेलं. पोट अाणि छातीच्या मधोमध हलकी कळ अाल्यासारखी भासत होती. तुझा दरवळ दूर जात राहिला अाणि छत्रीत पाठमोरी चालणारी तूसुद्धा!
डोळ्यांची कड अोलावत गेली. अापलं मूळ खालच्या खाली कुणीतरी खुडून नेल्यासारखं वाटलं. क्षणभर वाटलं की ही प्रतारणाच! पण टेक्निकली ते शक्य नव्हतं. पण तरीदेखील प्रतारणाच की!
मागाहून हॉर्न वाजू लागले तसा मी निघालो. तुझ्या नादात अाधीच उशीर झाला होता. मानसी कॅफेमध्ये वाट पाहात असणार...

Thursday, July 12, 2018

ड्रॉप

कंधे की बॅग अॅडजस्ट करते हुए उसने अॉफिस की लिफ्ट का बटन दबाया. कुछ देर मे जुहु के टॅप रेस्टों मे सतीश वर्मा की पार्टी थी. 'जाने में कम से कम अाधा घंटा!' उसने मन ही मन मे ट्रॉफिक का कॅल्क्युलेशन करते हुए लिफ्ट मे कदम रखा.
''समीर...!''
नये मार्केटींग मॅनेजर की अावाज अाई. उसने तपाक से दरवाजे पर हात रख दिया. वो साडी को संभालते हुए अंदर अा गई. लिफ्ट निंचे जाने लगी.
'साली साड़ी मे गहजब लगती है. कॉन्फरन्स रूम मे मॉर्निंग मिटिंग मे ये जब हाँथ मे मार्कर लिए बात करती है तो जी चाहता है के खा जाऊँ इसे बस! अगर ये इतनी खडूस मिजाज की ना होती ना तो...''
''Can you drop me till my home? My car broke down.''
''अ... Where exactly?''
''Kandiwali, Thakur village!''
मतलब उलटी दिशा मे? इस वक्त? ट्रॅफिक, मेट्रो का चलता काम, मुंबई की बारीश... उसके अाँखो के सामने से छोटासा स्लाईडशो चल गया! वो उसके जवाब के इंतजार मे उसे देख रही थी.
''Yes Yes... Sure Madam!'' वो उसके कजरारे नैनो को देख हडबडाकर बोला.
'हाय ये नज़र...'' वो निचे देख के बुदबुदाया.
वो पिछेले सीट पर बैठी. गाडी गड्डे अौर ट्रॅफिक मे उटपटांग टर्न लेती हुई उसकी बाईक अागे बढ़ने लगी.
''यहाँ से नहीं, यहाँ से लेना.'' वो पिछे से बता रहीं थी.
'अब यहाँ भी मॉनेटरींग करेगी क्या?' उसके माथा फिर गया.
बारीश शुरू हुई. शर्ट भीगी. तब उसे पता चला की उसका हाँथ उसके कंधे को पकडे हुए है. पतली भिगी शर्ट मानो गायब हो चुकी हो. उसे थंड लगने लगी.
''Mam, कहीं रूके?''
''नही.''
'साली, थोडी मेरी भी तो फिक्र कर!'
गाडी मिलेनियम टॉवर के निचे रूकी तब दोनो अच्छे खाँसे भीग चुके थे. बारीश रूकने का नाम ना ले रही थी.
''Thank you.''
उसने स्माईल देकर किक मारी.
''Wanna have coffee? तुम्हारे कपडे...''
''No No! Thanks for the offer. But I need to reach somewhere.''
''Are you sure? The rain is quite heavy. You can wait for a while.'' कजरारे नैन बोल पड़े.
''.... No... Really.... Thanks again.'' उसके लफ्जों मे हिचकिचाहट थी.

वो टॅप रेस्टों पहुँचा तब तक शर्मा पुरा टुन हो चुका था.
''अबे चुतिये! ये अाने का टाईम है क्या?'' रीटाने पुँछा.
''तेरी वो खडूस बॉस रागिनी मिल गई यार! उसे कांदिवली तक छोड़ना पडा!''
''अब इस फेवर के बदले प्रमोशन मिलेगी तुझे.'' रीटाने गिलास मूँह को लगाते कहाँ.
''वो क्या प्रमोशन देगी? मुझे कॉफी पे निपटा रही थी. मख्खीचूस!"
''Coffee? Strange! She hates coffee!'' रीटा चली गई.
इक पल के लिए उसकी अाँखे चमकी. उसने गाडी की चाबी उठाकर बाहर दौड लगाई...

सीट

परेल का एस.टी. स्टेशन धुँअाधार बारीश मे धुँदला दिखाई दे रहा था.
वो रिझर्व्ह की हुई विंडो सीटपर बैठ गया. बारीश का जोर बढ़ा तो सारी खिडकीयाँ बंद होने लगी. उसने खिडकी की चिटखनी बंद करने से पहले बाहर देखा. वो उलटा होता हुअा छाता अौर कंधे की बॅग संभालते हुए बस की तरफ अा रही थी. खिडकी खुली ही रहीं.
उसने बसमें कदम रखा. बस की सारी सींटे भर चुकी थी! इक उसके बगलकी छोड के...
वो उसके पास अाँके बैठी. 
'क्या किस्मत इतनी भी मेहरबान होती है क्या?' उसका मन बोल पड़ा.
''सुनीए.'' वो अल्फाज उसके कानो में शहद की तरह उतरते गये.
''हां जी?''
''अगर अापको ऐतराज ना हो तो क्या हम सीट एक्सचेंज कर सकते है?''
उसको क्या ऐतराज होना था? सींटे बदली. उसने उसकी बॅग उठाकर उपर रख दी. तभी...
''सुनिए, अाप मेरी सीट पर बैठे है.'' वो पच्चीस साल का नौजवान था.
''क्या?''
''यहा मेरी रिझर्व्हेशन है.''
उसने सीट छोडी. नौजवान बैठ गया. ये देख वो उठते हुए बोली,
''अरे मेरी वजह से अाप की सींट...'' उसके अाँखो मे बड़ी सादगी थी.
''अरे बैठीये.'' उसने मुस्कुराते हुए कहाँ. वो बैठ गयी. वो वहीं बगल में खडा रहा. उसने बैठे बैठे तिरछी नज़र से उसे देखा. उन होठोंपर हलकी प्यारी मुस्कान थी. उसने तै कर लिया. अब मंजिल अाने तक यहीं टिके खड़े रहना है.
तभी फोन बजा. ''हा जानू. अच्छी सीट मिली है.'' साथ मे हसीं की चुभती किलकारी.
वो मूडा अौर सीधे जाकर ड्राईव्हर की केबिन मे घुस गया.

Wednesday, July 11, 2018

इश्क मे अजनबी...

स्टेशनपर उसकी राह तकते तकते वो परेशान हुवा था. लोकलके टिकट कतार से बचने के लिये उसे ऍप से टिकट भी बुक करा दी थी, फिर भी पता नहीं वो देर क्यो कर रही थी? उपर से उसके पेट के चुहे बाहर निकलने तडफ रहे थे. आखीर वो आ गयी. चर्चगेट से दादर आते आते उसने दोपहर के साडे तीन बजा दिये थे. फिर उन्हे इकठ्ठे चार बजे एक मिटींग भी पोहचना था और दोनों को ही अपने पेट के चुहों का खयाल करना था.
दादर स्टेशन बाहर के हाटेल में दोनो बैठ गये.
वेटर ने ऑर्डर पुछा.
''जल्दी क्या मिलेगा... ठीक है तो पाव भाजी लेलो. तुम क्या खाओगी?''
"जल्दी में तो पाव भाजी के अलावा उडदवडा सांबार ही नजर आ रहा है, वो ही ला दो भाई."
वेटरने अॉर्डर टेबल पर लगा दी.
"और एक कोक भी लेना." उसने जैसे ही ये कहा लडकीने चौंक कर देखा.
जैसे वो नॉनव्हेज हो और लडकेने कोई घासफुस की ऑर्डर दी. फिर भी कहा किसी ने कुछ नहीं.
वेटर ने दोनों के बीचोबीच कोक रख दी.
"कोक का नाम सूनते ही इतनी हैरान क्यों हुई? तुम भी पिलो; मना थोडी कर रहा हूँ."
"मुझे नहीं पिना है. मैने वैसी प्रतिज्ञा ली थी."
"क्या? प्रतिज्ञा? कब?" अब उसने उसे हैरानियात से देखा. मन में हंस भी पडा पर ज्याच्या नहीं.
"कालेज में... खैर छोडो तुम पिलो."
"कोक ना पिने की भी प्रतिज्ञा होती है क्या? वैसे क्यो ली थी ये प्रतिज्ञा?"
"रहने दो. तुम फिर पियोगे नहीं."
"तुम बताओ तो सही. मुझपर किसी बात का असर नही होगा. मैं एक झपेट मे निगल लूंगा."
"अच्छा, तो सुनो. कॉलेज मे एक संस्था आयी थी. उन्होंने एक डॉक्युमेंटरी दिखाई थी. जहां यह कोक बनानेवाली फॅक्टरिया खडी थी, वहाँ फॅक्टरी की वजहसे उन गावो को ही पिने का पानी नही मिल रहा था. उपरसे ये कोक कंपनिया गंदा पानी नदियो मे मिलाती थी. गाववालो के सफेद चावल भी काले पकते थे. कितने लोगो की उंगलिया झड चुकी थी. किसीका पेट फुल गया था. बच्चे तो बिमारी लेकर ही पैदा हो रहे थे. बस! तब हमे शपथ दिलायी की, ऐसे कोक हम नहीं पियेंगे. बस, तबसे छूंती भी नहीं."
इतना कह कर वो अपने उडद वडा सांबार मे डूब गयी.
उसके दिल में ख्याल आया, 'हद हो गयी! कॉलेज की बात अबतक पकड के बैठी है? ऐसेही मुझसे कोई वादा कर ले तो...' उसने दिल की वह बात वही छोड दी. फिर गला साफ करते हूवे उसने लडकी को पुछा,
"अब मैं क्या करु? चपटालू या.."
"तुम्हारी मर्जी. वैसे मुझे पुंछ रहे हो तो मना ही करूंगी."
"तुम अपनी इन प्रतिज्ञाओं के चक्कर मे मेरे पैसे बचाओगी या जेब खाली करोगी?" उसने झुंझला कर कहा.
वो हाथ धोने के लिये खडी हुई. मुस्कुरा कर बस उसने इतना ही कहा,
"आजमा लो... अभी थोडा और रास्ता भी तो इकठ्ठे चलना हैं." वो वॉश बेसिन के तरफ जैसे ही मुड गयी. वह समझ गया की, इश्क मे इतना भी अजनबी रहना बेवकुफी होती है!!

- हिनाकौसर खान-पिंजार
९८५०३०८२००

Friday, July 6, 2018

चांदणी रात

हॉटेल रूमच्या बाल्कनीत उभं राहून दोघे खाली पहुडलेलं गर्द रान पाहत होते.
रंगांची रांगोळी सावरत सूर्य उतरणीला लागलेला. समोरचा मऊसूद देखावा अंधाराची शाल पांघरत होता. अाकाशाच्या कोपऱ्यातून चंद्राची कोर संथ पावलं टाकत पुढं येत होती. तिचे हात बाल्कनीच्या कठड्यावर होते. ती त्यावर रेलून एकटक समोर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर पडलेला मावळता उजेड अाणि किंचित अंधार यांचं मिश्रण त्याला वेडावून टाकत होतं.
किती स्निग्ध!
तो खुर्चीवरून उठत म्हणाला, ''तुला माहितीए...''
तिनं मान वळवून मागे पाहिलं. तिच्या चेहऱ्याची एक बाजू अंधारली. तो अाणखीनच मोहरला. तिच्या जवळ गेला.
''मला तू या क्षणी फार हवीहवीशी वाटतेयस.'' त्याने तिचा हात हलकेच हातात घेतला.
''असं वाटतंय, हा काळ इथेच थांबावा. हा मंद प्रकाश असाच तेवत राहावा. मी तुझा हात हातात घेऊन या हिरवाईतून वाट काढत असंच थेट क्षितीजापर्यंत जावं. शब्द नसावेत, नाद नसावेत, फक्त तू अाणि मी!''
त्याचे स्वप्नील डोळे अोलसरपणाची झाक घेऊन चकाकत होते. तिनं त्याच्या डोळ्यांला डोळा भिडवला. ती म्हणाली,
''चुतिया अाहेस का तू? एका रात्रीसाठी रूम बुक केलीय अाणि मला बाहेर कुठे घेऊन चाललायस?''
तो तिच्याकडे पाहतच राहिला.
''प्रोटेक्शन अाणलंयस ना?'' तिनं भुवई उंच करत म्हटलं.
तो तिला पाहून गालातल्या गालात हसू लागला. त्याच्या मागोमाग तीही!
ती हातातला त्याचा हात हळुच दाबत खट्याळपणे म्हणाली, ''बाय द वे! माणसाला जे हवंहवंसं वाटतं ना ते त्यानं जवळं घ्यावं. नुसतं बोलत बसू नये.''
त्याचं हसणं विरत गेलं. तो शांत झाला. त्याच्या हाताची पकड घट्ट झाली. तिनं त्याला हळुवार अोढत अातमध्ये नेलं.
रानावरचा प्रकाश अोघळून गेला होता. त्यावर चांदणी रात पसरत होती.

Wednesday, July 4, 2018

फुर्क़त

दोनो CCD मे बैठे कॉफी पी रहे थे। अास-पास चहलपहल थी।
''मै कल घर से पाँच बजे निकलेवाली हूँ।'' उसने कॉफी का घूँट लेते हुए कहाँ।
''तू तो अॉफिस मे रहेगा ना उस वक़्त? मेरी फ्लाईट अाठ बजे है। मेसेज करूँगी निकलने से पहले।''
वो कॉफी के मग को ताक रहा था।
''सुन.'' उसने निचे देखते देखते अावाज दी।
''क्या?''
उसने नजर धीरे से उपर उठाई। उसे देखाँ अौर कहाँ,
''तू मुझे अच्छी लगती है।''
उसकी कॉफी अाधे रस्ते रूक गई। फिर कुछ देर सिर्फ़ अासपास की अावाजे अाती रहीं। उसने धीरे धीरे कॉफी खत्म की अौर कहाँ।
''तेरे घर पर मेरी पॉवरबँक पडी है। अगली बार इंडिया अाऊंगी तो लेके जाऊँगी।''

वो उस रात बडी देर से सोया।

वो साडेपाँच बजे एअरपोर्ट पहुँची। वो राह देख रहा था। उसे देख वो चौकी नही।
वो पास अाया। उसका बॅग उठा लिया। दोनो चलने लगे।
थोडा वक़्त था। दोनो इक जगह बैठे। अासपास थोडा शोर था। दोनो नजदीक बैठे थे। पर अाँखे कहीं अौर थी। शायद अाँखो को खुद पर ऐतबार न था।
''तुझे पता है के मेरा लंडन जाना...''
''हा पता है!''
उसने बडी शांती के साथ कहाँ।
''कल तुने जब वो बात कहीं तो मुझे लगा के...''
''वो भी पता है।''
वो अाने-जानेवाले लोगो को देख रहा था।
''तो तू रोकेगा नही?''
''ना! तू रूकेगी नही।''
उस बात पर दोनों की नज़र मिली। बड़ी देर तक वैसी ही रही।
शायद इकदुसरें को जानना जरा जादाही हो गया था।

उसने पॉवरबँक का पाऊच उसके हाँथ मे दिया।
''क्यों ले के अाए?'' उसने कुछ नहीं कहाँ। दोनो खड़े हो गए।
फिर वो सीधे उसकी अाँखोमे देखते हुए बोला, ''देख। जरूरी नहीं होता, हर बार...'' अौर उसने बात अधुरी छोड दी... जानबुझ के।
''फिर भी...'' वो सटपटाई।
''चल छोड! ये पल बहुत अच्छा है।''
''पता है।'' वो एक कदम उसके नजदीक अाती बोली।

अनाउन्समेण्ट हुई। उसे जाना था। उसने वो नज़र पढी अौर उसे बाँहो मे समेट लिया।
धड़कन कानों तक सुनाई दे रहीं थी। अासपास नज़रें थी। पर उन दोनो नर्मसार बंद अाँखो को कुछ ना दिखा।
दूर होने से पहले होंठ करीब अाए। इक साँस की दूरीं तक...
लेकीन इकदुसरे से मिले नहीं। फाँसला कायम रहा।

वो चली गई। बहुत दूर...
पिछे मुड के देखे बिना ही चली गई।

जब होंठ नजदीक थे तो उसने धीमे से कहाँ था,
''ये फाँसला मुकम्मील ना हुअा, तो उम्र भर याद रहेगा।''
वो बोल पडा, ''ठिक! पर मुडना मत!''

दोनोभी दिल पर अजिब सा बोझ लिए चल पडे।
शायद वो फिर मिल भी जाऐं। पर वो इक साँस का फाँसला... वो अब मिट ना सकेगा!
वो उस पल मे कैद हो चुका था।

Thursday, June 6, 2013

कविता


''हं विचार''
''काय विचारू?''
''अरे विचार ना काय विचारणार होतास ते?''
''मला नाही काही विचारायचं?''
''असं काय करतोस? विचार ना? देईन मी उत्‍तरं''
''अगं काही नाही गं! झालं! मिळालं मला माझं उत्‍तर.''
''ते पूर्णपणे योग्‍य नसेल तर? मी देतेय ना आता उत्‍तर!''
''तोही भाग आहेच. पण नको.''
''काय नको नको लावलंयस? काल तर मारे मोठा म्‍हणत होतास की उद्या चांगल्‍या तयारीत ये. मोठा पेपरच देणार आहे. आता काय झालं?''
''...''
''...''
''...''
''तू तिरस्‍कार करतोस का माझा?''
''नाही ग. अजिबात नाही. तुझा तिरस्‍कार करून मला जगता यायचं नाही.''
''What's wrong then? Are you trying to keep me away?''
''नाही. तसं काही नाही. तू नेहमीच माझ्याजवळ आहेस आणि नेहमी राहशील.''
''ठिक आहे. तुला जे योग्‍य वाटेल ते कर. मी नाही अडवणार.''
''मी कुठे काय करतोय? आणि तू ही अशी नाराज होत जाऊ नकोस बघ माझ्यावर. मला नाही आवडत ते... तू माझ्यावर नाराज झालीस कि वाईट वाटतं मला.''
''मी नाराज नाही. चालू दे तुझं.''
''...''
''...''
''...''
''...''
''...''
''मी कशी वागू तुझ्याशी ते पण सांग.''
''जशी आहेस तशी राहा. छान... आणि वागणं काय ठरवून करता येत असतं का?''
''म्‍हणजे नेमकी कशी?''
''तू नेहमी आनंदी राहा. उदास राहू नकोस. आणि तुला माझ्याशी जसं हवं तसं वाग. तुला पूर्ण मुभा आहे.''
''मंद...''
''...''
तू माझ्याशी कसा वागणार आहेस?''
''तुला त्रास होणार नाही असा.''
''नीट काय ते सांग...''
''...''
''I think I will miss something.''
''...''
''...''
''...''
''...''
''...''
''Are you happy?''
''...''
''अरे बोल ना! Are you happy?''
''अजून ठाऊक नाही.''
''मग आता काय कळलंय?''
''तुझं काम कसं चाललंय? मेहतांसोबत ती डिल फायनल झाली का तुमच्‍या फर्मची?''
''चांगलं चालू आहे. काही नवे अपडेटस् आहेत. मेहतांचं काम झालेलं नाही, पण गळाला लागेल तो... पण प्रश्‍नाचं उत्‍तर कसं टाळावं हे कुणीतरी तुझ्याकडून शिकावं...''
''...''
''तुझं प्रेझेन्‍टेशन छान झालं त्‍या दिवशी.''
''अरे वा! आवडलं तुला? मी तुला त्‍यावरची तुझी प्रतिक्रिया विचारणारच होतो. थॅंक्‍यू... पण काय गं, तुला आधी तर आवडलं नव्‍हतं ना ते?''
''त्‍या दिवशी मी म्‍हटलं होतं की ते प्रेझेन्‍टेशन माहितीच्‍या अंगाने योग्‍य नाही आणि मी आज ते पहिल्‍यांदाच पूर्ण पाहिलं.''
''बरं...''
''...''
''...''
''तू त्‍या दिवशी ती कविता पाठवलीस बघ! ती दोन पाखरांची! ती स्‍पष्‍ट करून सांग ना.''
''वेडी आहेस का? कविता काय अशी स्‍पष्‍ट करून सांगायची असते? नाही सांगणार.''
''एsss असं रे काय करतोस तू? सांग ना. प्लिजsss नाही समजली मला.''
''नाही म्‍हणजे नाही.''
''प्लिज प्लिज प्लिज प्लिज. अरे त्‍यात ती दोन पाखरं म्‍हणजे काय तेच समजत नाही.''
''अगं किती सोपंय ते.''
''तरीही सांग.''
''जsssरासा डोक्याला ताण देशील ना तर चटकन समजेल.''
''तरी पण सांग.''
''अगं प्रयत्‍न तर कर.''
''राहू दे ते. कंटाळले मी. सांग नाsss.''
''एक पाखरू तू आणि एक पाखरू मी.''
''अय्या! खरंच! पण त्‍यातलं कोणतं पाखरू मी आहे? आणि कोणतं तू?''
''ते स्‍वतःचं स्‍वतः ठरवायचं असतं. स्‍वतःला दोन्‍ही ठिकाणी ठेऊन पाहा. जे मनाला योग्‍य वाटेल ते पाखरू आपण आहोत असं मानावं.''
''एss असं कसं होईल? कविता तुझी आहे. तू ठरवायचंस.''
''अगं तसं नसतं... कविता एकतर वाचणा-याची असते किंवा ज्‍याच्‍यासाठी लिहिली गेली त्‍याची. इथे ती दोन्‍ही परिस्थितीत तुझीच आहे. तुझ्यासाठीच लिहिली होती. तू इथे काहीही ठरवू शकतेस... शेवटी काय आहे, तुला जे पाखरू आवडेल तेच तुझं असेल ना!''
''तू ना एक नंबरचा खडूस आहेस. यापुढे मी तुला काही विचारणार नाही. जा...''
''मी काय खडूसपणा केला?''
''जा!  बोलू नकोस''
''अगं,....... जे आहे ते सांगितलं. तुझ्यासाठी कविता लिहिली आहे. कोडं नाही. सोपं आहे ते.''
''पण नाही ना जमतय मला. सांग ना रे...''
''कदाचित कविता ना वाचणा-याची असावी ना ज्‍याच्‍यासाठी लिहिली आहे त्‍याची... कवितेत ज्‍याची भावना गुंतते ना... कविता त्याची असावी... असो, त्‍यात एक पाखरू जरा तटस्‍थ आहे. ती तू...''
''...''
''...''
''सॉरी... मीच माठ आहे.''
''का गं?''
''मला काहीच समजत नाही.''
''असं काही नाही. तू फक्‍त लक्ष देऊन पाहात नाहीस.''
''असं काही नाही. मी पाहिलं. तरीही नाही समजलं.''
''नाही पहात तू. कारण त्‍याची तुला तेवढी गरज वाटत नाही.एकदा ती गरज वाटली ना की समजेल सगळं आपोआप....''
''...पण तू ती कविता स्‍वतःहून समजून घेतली असतीस तर बरं वाटलं असतं मला.''
''...''
''...''
''...''
''...''

Thursday, November 24, 2011

नातं

शिवाजीपार्कच्‍या कट्ट्यावर तो एकटाच बसला होता. छान संध्‍याकाळ रंगून आली होती. त्‍याला आवडणारा पिवळसर प्रकाश पसरला होता. कितीतरी जोडपी, मित्रमैत्रीणींचे घोळके त्‍याच्‍या आजूबाजूला होते. मस्‍त गलका होता आजूबाजूला. आणि तो गप्‍प.
जवळपास अर्धा तास झाला असेल. तो तिथेच बसून होता. विचार करत. मध्‍येच स्‍वतःशी बडबडायचा. मग त्‍याला सभोवतालचं भान यायचं आणि मग पुन्‍हा गप्‍प बसायचा. स्‍वतःशी बोलताना तो नुसता बडबडायचा असं नाही. तो हातवारे करायचा, त्‍याच्‍या चेह-यावर संभाषणातले भाव यायचे. जणू काही समोर बसलेल्‍या ख-याखु-या व्‍यक्‍तीशीच बोलतोय जणू. दुस-या कुणी पाहिलं तर मानसिक रोगीच वाटला असता तो. पण तो तसा नव्‍हता. चारचौघांसारखाच तो सामान्‍य मुलगा होता.
ब-याचदा तो कुणा मुलीसोबत दिसायचा तिथे. त्‍यांचं छान संभाषण चालायचं. तिच्‍या सहवासात तो फुलून यायचा, त्‍याच्‍या सहवासात ती रंगलेली असायची. त्‍यांना कधी हातात हात घातलेलं किंवा खांद्यावर हात टाकून चाललेलं कुणी पाहिलं नाही. पण ते एकत्र असायचे तेव्‍हा त्‍यांच्‍या डोळ्यात परस्‍परांबद्दल खूप आपुलकी, प्रेम असायचं. कधी पार्कात, कधी शिवाजीमंदीरच्‍या फुटपाथवर, कधी कुठे चहाच्‍या टपरीवर, एखाद्या हॉटेलात, नाही तर दादर स्‍टेशनच्‍या फलाटावर उभं राहून ते कितीतरी वेळ गप्‍पा छाटायचे.
गप्‍पांना कोणताही विषय पुरायचा त्‍यांना. साहित्‍य, चित्रपट, सामाजिक घडामोडी, घरगुती गोष्‍टी, नातेसंबंधांवर चर्चा, असं बरंच काहीसं असायचं त्‍यांच्‍या बोलण्‍यात. आणि या सगळ्यात त्‍यांच्‍या मनातल्‍या चोरकप्‍प्‍यात बंद असलेलं आपसुक वर यायचं. मग ते शेअर व्‍हायचं. समजून घेतलं जायचं. चर्चीलं जायचं. कधी भांडणंही व्‍हायची. पण भांडणाचा स्‍वर कानापर्यंत पोचून मागे फिरायचा. त्‍याने कधी मनात उतरण्‍याचा प्रयत्‍नही केला नाही.
कधी ती डिस्‍टर्ब असायची. मग तो तिला बोलावून घ्‍यायचा. कधी त्‍याला कसनुसं वाटत असायचं. मग ती त्‍याला भेटायला बोलवायची. दोघेही यायचे. त्‍यांच्‍या मनात परस्‍परांबद्दल जेवढी माया होती तेवढाच आदरही होता. शिवाजीमंदिर आणि पार्काच्‍या सान्‍नीध्‍यात कितीतरी सांजरंग पाहिले होते त्‍यांनी. तिथंच त्‍यांचं नातं बहरलं. घट्ट झालं. माणसं देवळात जायची आणि तो तिला भेटायचा. ती माणसांपासून चार हात लांब रहायची आणि त्‍याची वाट पहात तिथं उभी रहायची. दोघांनाही परस्‍परांचे विचार ठाउक होते. कल्‍पना ठाउक होत्‍या. मर्यादांसोबत विस्‍तार ठाउक होते. एवढं, की दोघांना परस्‍परांच्‍या मनातलं न सांगता कळायचं. अतिशयोक्‍ती नाही, खरंच कळायचं. आपल्‍याला जाणणारं याजगात नक्‍की कोण आहे हे दोघांनाही माहित होतं. तोच त्‍यांचा आनंद होता...
... पण आज त्‍याच्‍या चेह-यावर तो आनंद दिसत नव्‍हता. तो तिची वाटही पहात नव्‍हता. कट्ट्यावरून उठून तो चौपाटीकडे चालू लागला. त्‍याची नजर उगाच कुठेतरी गुंतलेली होती. रस्‍ता ओलांडून तो किना-यावरच्‍या बागेत आला. तिथल्‍या भिंतीजवळ जाउन तो उभा राहिला.
मंद वारा सुटला होता. समोर पहुडलेला समुद्र खूप शांत वाटत होता. किती खोल होता तो कुणास ठाउक. किती घडामोडी घडत असतील ना त्‍याच्‍या अंतरंगात? पण तरीही वरून अगदी गंभीर वाटत होता. पलिकडे असलेली सूर्यही तसाच सकाळी किती प्रखर होता. आता डोळे भरून पाहता येतंय त्‍याच्‍याकडे. पण आता तो वेगानं अस्‍ताला चालला होता. तो सूर्याकडे बघत राहिला नुसता. त्‍याला अशावेळी आकाशातले रंग खूप आवडायचे. कदाचित कधीतरी न बोलता जवळ बसून त्‍यांनीही सूर्यास्‍त पाहिला असावा. कुणास ठाउक पण, आज त्‍याला सूर्य खूप जवळचा वाटला. अगदी त्‍याच्‍यासारखा. थोडा निस्‍तेज. अंधाराच्‍या कुशीत गडप होण्‍यास उत्‍सुक असा.
काही वेळातच अंधार पडला. त्‍याची पावलं माघारी फिरली. शांतपणे. खरंच शांत होता. त्‍याच्‍या मनात रोष नव्‍हता, असुया नव्‍हती, तिच्‍या आयुष्‍यात दुसरं कुणी आल्‍याची सलंही नव्‍हती. त्‍यांचं नातं खरंच तेवढं प्रगल्‍भ होतं. पण तरीही त्‍याचं मनं घडल्‍या घटनांचं कारण शोधत होतं. तिचं जाणं सहज नव्‍हतं. त्‍यात खूप अवघडलेपण होतं. समोरासमोर आल्‍यानंतर जे ओठ तासनतास बोलत रहायचे ते आता शब्‍दांना थोपवू पहात होते. ज्‍या डोळ्यांनी परस्‍परांचा आनंद पाहिला ते आता प्रयत्‍नपूर्वक दुसरीकडे गुंतू पहात होते आणि हे सगळं त्‍याला सहन होतं नव्‍हतं. नातं तुटलं नव्‍हतं, पण त्‍याचा प्रवाह आटला होता. पाणी वाहून गेलं होतं, पण तिथे न दिसणारे ओघळ त्‍याच्‍या नजरेत खुपत होते. म्‍हणून त्‍याला उत्‍तर हवं होतं.
अचानक वाट्याला आलेली ही शांतता त्‍याच्‍या अंगावर येत होती.
ती त्‍याला कंटाळली होती का? तर नाही.
तिला तो आवडत नव्‍हता का? असंही नाही.
तिच्‍या एकाएकी जाण्‍याचं त्‍याला आता एकचं उत्‍तर समोर दिसत होतं.
त्‍याच्‍या जीवनातली तिची भूमिका संपली होती. ती त्‍याच्‍या आयुष्‍यातून कदाचित दूर जाणार नाही, पण आधी होती तशीही राहणार नाही. ती असेल, पण थोड्या बदललेल्‍या रूपात. कुठल्‍यातरी वेगळ्या जागी. कारण आधीची जागा त्‍या आधीच्‍या 'तिने' व्‍यापलेली होती. आणि राहील. नाती संपत नाहीत, तुटत नाहीत, ती बदलतात. त्‍याच्‍या मनाच्‍या जवळ असलेलं हे नातं बदललं. याची सवय होईपर्यंत, मनानं ते नीट मान्‍य करेपर्यंत त्‍याचा थोडा त्रास होईल त्‍याला. जुन्‍या चित्रांमधले रंग आठवतीलही. पण नंतर घेईल जुळवून तो. घ्‍यावंच लागेल त्‍याला.
तो आत्‍ममग्‍नतेने चालला होता. समुद्र अजूनही शांत होता. पार्कातला गजबजाट कमी होउ लागला होता. अंधार पसरत होता. मावळलेला सूर्य उद्याच्‍या सूर्योदयाच्‍या तयारीला लागला असेल, बस... ही रात्र तेवढी सरावी...

Tuesday, May 3, 2011

अव्‍यक्‍त .......

    दोघे रेस्टॉरंटच्या एक कोप-यात बसले होते. फारशी वर्दळ नव्हती. ती पुढ्यातल्या कॉफीच्या कपमध्ये नजर गुंतवून बसलेली. तो तिच्याकडे एकटक बघत होता. मग तो हलकेच खाकरला. आवाजानं ती भानावर आली.
    ‘‘काय झालंय ग तुला? स्पष्ट सांग पाहू.’’
    ‘‘काही नाही.’’ ती जड आवाजात म्‍हणाली.
    ‘‘हे बघ वैशू. कालपासून तुला ऑब्जर्व्ह करतोय. कुठलीतरी गोष्ट तुझ्या मनात सलतेय. काल कॉलेजची  गेट टूगेदर पार्टी झाली. एवढ्या वर्षांनंतर सगळे भेटले, पण तू कुणाशीच धड बोलली नाहीस. काय झालंय काय तुला?’’
     ‘‘असं काही नाही रे!’’ ती दाटलेल्‍या आवाजात म्‍हणाली, पण तिचा तो नकार दुबळा होता. त्यानं ते चटकन ओळखलं.
     ‘‘हे बघं, त्‍या थापा तुझ्या नव-याला मार. मला नको. तुला कॉलेजपासून ओळखतोय मी. अगं, इतरांना नाही, निदान मलातरी सांग..... बोल, मन हलकं होईल तुझं.’’
    तिनं रूमालानं डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि शांत आवाजात म्‍हणाली, ‘‘सम्‍या...... राजेशला माझ्याशी लग्न करायचं होतं.’’
    ‘‘कोण? आपला राजेश? राजेश इनामदार? काय म्हणतेस काय?’’ तो ऐकून उडालाच.....


     ....... ते कॉलेजमध्‍ये असताना त्‍यांच्‍या कोरग्रुपमधला राजेश इनामदार. थोडा हळवा, थोडा विचारी पण अबोल. कविता लिहायचा. स्‍वतःचं चाली लावायचा. खूप आर्तता असायची त्‍याच्‍या शब्‍दांमध्‍ये. निवांत जागी गप्‍पांचा फड जमला, की याच्‍या हळूवार कविता सगळ्यांचंच भान हरपायच्‍या. कॉलेजमध्‍ये अनेक मुलींना आवडायचा तो. पण त्‍यानं कुणालाच दाद दिली नव्‍हती. अशी कुजबुज होती, कि त्‍याला कोणीतरी आवडायचं, पण ती कोण होती हे अखेरपर्यंत कुणालाच नाही समजलं. आता एवढ्या वर्षांनंतर ती मुलगी वैशाली होती हे ऐकून समीरही आश्‍चर्यचकित झाला.
    ‘‘काल गेट टूगेदरमध्ये स्वाती भेटली होती.’’ वैशाली सांगत होती. ‘‘ती त्‍याची घनिष्‍ठ मैत्रीण. राजेश अजून लग्नाचं मनावर घेत नाही म्हणून सहज तिला विचारलं, तर कसल्‍याशा टेन्‍शमध्‍ये वाटली. खोदून विचारलं तेव्‍हा तिनं हे सांगितलं मला.’’
     ‘‘सम्या, तेव्‍हा आपण सगळे एकत्रच होतो.... पण तो अखेरपर्यंत अबोलच राहिला. किती घुसमट झाली असेल त्‍याची? जास्‍त वाईट याचं वाटतंय, की माझं लग्न झालं तरीही तो माझ्यातच गुंतलाय. त्याला वाटतंय, की अशा मन:स्थितीत त्यानं कुणाशी लग्न केलं तर त्या मुलीवर तो अन्याय असेल, म्‍हणून तो लग्‍नाचा विचारही मनात आणत नाहीए.’’
     ‘‘कमाल आहे त्‍याची. मलाही कधी बोलला नाही तो......... पण वैशू, तू का एवढी अस्वस्थ होतेस? त्यानं त्याच्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवल्या नाहीत यात तुझा दोष आहे का?’’
    ‘‘वाईट यासाठी वाटतंय, की असं कुणामध्‍येतरी अडकणं काय असतं हे मी समजू शकते. त्या अडकलेल्या जीवाच्या यातना कळतायत रे मला! त्यानं मला ते का सांगितलं नसेल तेही समजतंय. रोज समोरासमोर भेटावं, पण मैत्री आणि प्रेम यांच्‍या कचाट्यात अडकून तोंडातून शब्‍द फुटू नयेत, हे अगतिकपण किती जीवघेणं असतं याची कल्‍पना नाही तुला. त्‍याच्‍या भावना आणि दुःख मला तिव्रतेनं जाणवतंय. मी समोर असतानाही त्‍याला त्‍याच्‍या भावना उघड करायला जमल्‍या नाहीत. ते कोंदटलेपण काय असतं, ते या क्षणीही अनुभवू शकते मी आणि त्‍याचाच त्रास होताय मला.’’
     ‘‘तुला तो आवडायचा का तेव्‍हा?’’
     ‘‘तो नाही, पण दुसरं कुणीतरी आवडायचं मला.’’ ती म्‍हणाली.
     काही क्षण त्याला तिचे शब्द कळलेच नाहीत. ‘‘म्‍हणजे? कॉलेजमध्‍ये असताना तुझं कुणावरतरी प्रेम होतं?’’ त्‍यानं अविश्‍वासानं विचारलं. त्‍याच्‍या आवाजात अविश्‍वास तर होताच, पण सोबत थोडं दुखावलेपणंही होतं. तिनं आपल्‍यापासून काहीतरी लपवून ठेवावं आणि तेदेखील इतकी वर्ष हे त्‍याला बोचलं असावं.
     ‘‘तू माझ्यापासून एवढी वर्ष हे लपवून ठेवलंस वैशू? मला आश्‍चर्य वाटतंय. मला वाटायचं की, आयुष्‍यातली कुठलीही बाब शेअर करावी इतकी आपली मैत्री गहिरी आहे. पण आज जाणवलं, तसं काहीच नाहीए. एवढी वर्ष मी तुला एवढा परकाच राहिलो ना?’’ त्‍याला लागलेला चटका  त्‍याच्‍या आवाजातून साफ जाणवत होता.
     ‘‘असं नको रे बोलूस.’’ ती काकुळतीला येऊन म्हणाली. ‘‘तुला सांगावसं अनेकदा वाटलं, पण खूप प्रयत्‍नांनी स्‍वतःला रोखलं मी. तुला सांगणं मला जमलंच नाही.’’
     ‘‘अगं पण का?’’
     ‘‘...................’’
     ‘‘आता बोल ना!’’
     ‘‘कारण तो तूच होतास सम्‍या.’’ तिनं गदगदलेल्‍या आवाजात म्‍हटलं.
     तो जागेवरच गोठून गेला. तिच्या त्या शब्दांबरोबर ह्रदयापासून निघालेली एक शीतलहर त्‍याचं सर्वांग बधिर करत गेली. सारं जग त्‍याच्‍या भोवती क्षणार्धात गर्रकन फिरलं. आत्ता जे शब्द ऐकू आले त्याचा अर्थ लावायला त्याला बराच वेळ लागला. त्याच चित्त ठिकाणावर आलं तेव्हा ती समोर मान खाली घालून बसली होती.
     दोघं अबोल होते. पण आत कसलीशी वादळं थैमान घालत होती. ती शांतता त्‍याच्‍या अंगावर येऊ लागली.
     ‘‘मला माहित नव्‍हतं की तू..... पण कधीपासून?.... मला सांगितलं का नाहीस?’’ तो शब्‍दागणिक अस्‍वस्‍थ होत गेला.
     ‘‘कसं सांगणार होते रे मी?’’ ती कातर आवाजात बोलू लागली. ‘‘कॉलेजपासूनचा तू माझा सगळ्यात जवळचा मित्र. किती गोष्‍टी आपण एकत्र शेअर केल्‍या! आधी केवळ मित्र असलेला तू नंतर माझ्यासाठी आकर्षण होत गेलास. तुझा सहवास, तुझं वागणं, तुझी समजून घेण्‍याची वृत्‍ती, थोडासा चंचलपणा सगळंच भावत गेलं. तारूण्‍यसुलभ गोष्‍ट म्‍हणून मी मनाला समजवण्‍याचा प्रयत्‍न केला, पण नाही जमलं मला ते!’’
     ‘‘मी तुझा अनेकवेळा अंदाज घेतला. पण लग्‍नाविषयीचे तुझे विचार घरच्‍यांच्‍या मतांवर अवलंबून होते. त्‍यात तू एकदा म्‍हटलंस, की तू प्रेमविवाह करणार नाहीस आणि मी वेडी.... तुझा तो अखेरचा निर्णय आहे, असं समजून गप्‍प बसले. तुला कॉलेजमध्‍ये आवडणारी ती मुलगी आणि तिच्‍याजवळ जाण्‍याचे ते तुझे प्रयत्‍न, यांना मी नेहमी साथ देत गेले. पण मनात काहीवेळा एक स्‍वार्थी विचारही यायचा. असं वाटायचं, की ती तुला कधीच मिळू नये आणि मी तुला अशीच आयुष्‍यभर साथ करत जावी.’’
     ‘‘तुझ्या डोळ्यांत मी स्‍वतःला शोधत राहिले, पण त्‍यात एका मैत्रिणीशिवाय मला कधीच काही दिसलं नाही. त्‍यावेळी तुझा ओझरता स्‍पर्श मला हवाहवासा वाटायचा, पण तरीही मी स्‍वतःला तुझ्यापासून प्रकर्षानं लांब ठेवत गेले. त्‍या काळात तुझी आणि माझी खूप भांडणं झालेली होती..... आठवतात?....... मीच मुद्दाम उकरून काढलेली. रोज तुझ्याशी बोलायला मला विषय हवा असणं आणि तुझ्यापासून दूर रहायचा एक वेडा प्रयत्‍न, अशी ती माझी दुहेरी धडपड असायची. मनात भावनांचा कल्‍लोळ उडालेला असताना तू माझा हात हातात धरून तुझ्या त्‍या मैत्रिणीबद्दल बोलत बसायचास. कसं सांगू तुला शब्‍दामध्‍ये, की एकाचवेळी तुझ्यात गुरफटणं आणि तुझ्यापासून तिळ तिळ तुटणं हा काय अनुभव असतो ते.’’
     ‘‘त्‍यानंतरही अनेकदा वाटलं, की तुला एकदा सगळं सारं काही स्‍पष्‍ट सांगावं, पण नाही रे धीर झाला मला. तू नाही म्‍हणालास तर? माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलास तर? रागावून मैत्री तोडून गेलास तर? अशी प्रश्‍नांची माळच उभी रहायची मनामध्‍ये. तुला मनातलं सांगितल्‍यानंतर होणा-या परिणामांची अनिश्चितता मला पेलवत नव्‍हती आणि काही झालं तरी मला ही मैत्री अजिबात तोडायची नव्‍हती. स्‍वतःच्‍याच मनानं तयार केलेल्‍या दुहेरी पेचात अडकत गेले आणि आजही तशीच अडकून आहे.’’
     त्‍याचा जागेवरच दगड होवून गेलेला. एवढी वर्ष कोंडून ठेवलेली भावना, तीही आपल्‍याबद्दलची आणि आपल्‍यामुळेच कोंडून राहिलेली. तिचं स्‍वागत करावं, नकार द्यावा, की तिचं दुखावलेलं मन सांभाळावं. त्‍याला काहीच समजत नव्‍हतं.
     ती बोलतच होती. ‘‘खूप अस्‍वस्‍थ होते रे मी इतकी वर्ष. कुणालातरी सांगावं म्‍हटलं तरी जमत नव्‍हतं. एवढी मनाच्‍या जवळची गोष्‍ट समजून घेईल असं दुसरं जीवाभावाचं कुणी नव्‍हतंच. तुझ्या वाट्याचं असूनही तुला सांगू शकत नव्‍हते. माझं लग्‍न झालंय हे माहितीय मला. पण मी त्‍याच्‍याशी प्रतारणा करत नाहीए. त्‍यानं मला खूप प्रेम दिलंय आणि मीदेखील त्‍याबद्दल त्‍याची कृतज्ञ आहे. मी फक्‍त माझ्या मनाची ही भेग त्‍याच्‍यापासून दडवून ठेवलीय. जशी तुझ्यापासून लपवून ठेवली होती तशी.’’

     मग बराच काळ घड्याळाचे काटे आपल्‍या गतीने धावत राहिले. आकाशात सांजरंग दाटून आला. 
     ‘‘पण वैशू, आता यातून साध्‍य काय?’’ इतका वेळ गप्‍प असलेला तो आताशानं बोलला.
     ‘‘साध्‍य?’’ ती उद्वीग्‍नपणे हसली. ‘‘काहीच नाही. ज्‍या क्षणी ते घडू इच्‍छीत होतं तेव्‍हा ते मी घडू दिलं नाही. खूप प्रांजळ भावना होती माझी! मला फक्‍त हे आयुष्‍़य तुझ्यासोबत जगायचं होतं. माझा प्रत्‍येक क्षण तुझ्याजोडीनं साजरा करायचा होता. खूप सुरेख कल्‍पना केल्‍या होत्‍या मनाशी. त्‍या प्रत्‍यक्षात आणायच्‍या होत्‍या. पण इच्‍छीलेलं सगळं घडत नसतं.’’
     पुन्‍हा शांतता.
     ‘‘सम्‍या, हे ऐकल्‍यावर तू मला सोडून जाणार नाहीस ना?’’
     त्‍या प्रश्‍नासरशी त्यानं तिच्याकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात दाटलेले असंख्य प्रश्न त्याला दिसले. जोडीला साकळलेली दुराव्याची भीती.
     ‘‘तू माझ्या जवळ येऊ शकला नाहीस, निदान याहून दूर तरी जाऊ नकोस.’’
      तिच्‍या आवाजातली अगतिकता आता लपत नव्‍हती. त्‍यालाही ती जाणवली.
     ‘‘तू मला एकेकाळी आवडत होतास, म्‍हणून मी आज हे सगळं सांगितलं, असं नकोस समजू. माझ्या सगळ्यात जवळच्‍या मित्रापासून मी एक गोष्‍ट लपवून ठेवली होती. ती त्‍याचीच होती. ते समजणं त्‍याचा हक्‍क होता, म्‍हणून बोलले. प्लिज......... तू..........’’
     त्‍यानं हलकेच तिच्‍या हातांवर हात ठेवला.
     कदाचित आता शब्‍दांचं काम संपलं होतं.
     किती आश्‍वासक स्‍पर्श होता त्‍याचा! कदाचित या एकाच क्षणासाठी ती थांबलेली असावी. तिला पुन्‍हा भरून आलं. तिनं त्‍याच्‍या डोळ्यात पाहिलं. अनेक वर्षांची आपली अतृप्‍त इच्‍छा पूर्ण करून घेतल्‍याप्रमाणं.
     बराच काळ तिच्‍या गालांवरून आसवं ओघळत राहिली. त्‍यानंही तो हात तसाच राहू दिला. ते दोघे परस्परांच्या खूप जवळ बसले होते, पण त्यांच्यातलं कित्येक मैलांचं अंतर त्या दोघांनाही जाणवत होत. कधीच न तोडलं जाणारं अंतर. आपण आयुष्‍यात परस्‍परांच्‍या जवळ येऊ शकलो नाही, पण निदान दूरवरून एकमेकांना पाहू तरी शकतो.
     रेस्‍टॉरंटच्‍या काचेतून समोरचा समुद्र आणि त्‍या पलिकडचं क्षीतीज नजरेस पडत होतं. सूर्य कलू लागलेला. ती क्षणभर त्‍या दृश्‍याकडे पहात राहिली. समोर दिसणारी जमिन आणि क्षीतीज, दोहोंवर तिला निराशा दाटलेली दिसली. एक फसवी भेट... उगाच तिच्‍या मनात आलं.
     तिनं पुन्‍हा त्‍याच्‍याकडे पाहिलं. तिला बरंच काही बोलायचं होतं. सांगायचं होतं. पण गळा दाटून आला होता. ती कशीबशी एवढंच बोलू शकली.
     ‘‘थँक्‍स सम्‍या!’’

     तिनं पर्स उचलली.
     ‘‘कुठे निघालीस?’’
     ‘‘आज एवढ्या वर्षांनंतर माझा हक्‍क मला मिळाला. तुला एकवार हे सांगण्‍याचा, की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आणखी कुणीतरी अडकलंय या चक्रात. त्या अस्वस्थ मनाला नि:श्वास लाभायला हवा.’’
     तिने डोळे पुसले आणि ती निघून गेली. काहीशी मोकळी, निश्चिंत दिसली ती जाताना. तो तसाच बसून होता. बराच वेळ. कुठतरी एकटक पहात. काहीतरी पुन्हा हरवल्‍यासारखा.
      प्रकाश अंधुक होऊ लागलेला. संकोचलेल्‍या, व्‍याकूळलेल्‍या जिवांना अंधारानं आपल्‍या पदराखाली घेतलं. त्‍या अंधाराच्‍या आड त्‍याच्‍या गालावरून पाण्‍याचे ओघळ वहात होते. नेहमीसारखेच. सर्वांच्‍या अपरोक्ष. मात्र आज त्या अश्रूंची व्यथा काहीशी वेगळी होती....
     आपण शोधात असलेल्या फुलपाखराच्या पायांचे ठसे ब-याच दिवसांनतर आपल्याच खांद्यावर दिसावेत तशी...

Thursday, February 17, 2011

नि:शब्द


          हातातल्या घड्याळाशी खेळत ती गेल्या अर्ध्या तासापासून वाळूत बसली होती. दर पाच मिनीटांनी तीची नजर आत येणाºया रस्त्याकडे जात होती. तो अजून आला नव्हता. काल रात्रीचं त्यानं फोन करून तिला ‘उद्या भेटूया’ म्हणून सांगितलं होतं. उद्या म्हणजे १४ फेब्रुवारीला. जुहू बिचवर. संध्याकाळी 5 वाजता. तशी ती आली. वेळेच्या आधीच. पण नेहमीसारखी साध्या कपड्यात नाही. त्याच्या नजरेस भरावी अशी तयार होऊन.
          त्या दोघांची ओळख गेल्या वर्षभराची. कॉलेजमधले मित्र ते. एकाच वर्गात शिकणारे. तिच्या मित्रांच्या कंपूत तोही होता. थोडासा शांत. थोडासा विचारी. थोडासा भावूक. एक मित्र म्हणून आवडला तिला. कॅन्टीन, झाडाचा पार, ऑफ पिरीयड, सगळीकडे त्यांची धमाल चालली असयची. पण मग पावसाळ्यात गेलेली पिकनिक, दिवाळीत हाती घेतलेला प्रोजेक्ट, डिसेंबरमधल्या कॉलेजच्या स्पर्धा, त्यानंतर आलेलं गॅदरिंग, या सगळ्या दिवसांत तो तिला नव्यानं कळत गेला. ती दोघं खूप जवळ आली. परस्परांबद्दल आकर्षण वाटणं सहाजिकच होतं, पण आपली मैत्री तुटू नये म्हणून एकमेकांना काही कळू न देण्याचीही त्यांची धडपड सुरू होती. याबद्दल कुणीच कुणाशी काही बोललं नाही. मग तिनं त्याला सांगायचा निर्णय घेतला. उद्या सकाळी त्याला सांगायचं असं ठरवते तोच त्याचा फोन आला.
          फोन ठेवला तेव्हा तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. का बोलावलं असेल त्यानं? त्याचा आवाज थरथरत होता का? का मला आपलं उगीच वाटलं तसं? एकामागोमाग एक अशी प्रश्नांची माळच उभी होती. तिनं समोर पाहिलं. क्षीतीजाच्या रेघेवरून पक्ष्यांचा थवा उडत चालला होता.


          आदल्या रात्री फोन केल्यापासून त्याला झोप म्हणून काही आली नाही. खरं तर मनातून तो चांगलाच घाबरला होता. असं त्यानं कधी कुठल्या मुलीला भेटायला बोलावलं नव्हतं. पण ती कातर स्वरात हो म्हणाली आणि त्याच्या मनानं उंच उडी मारली. कधी एकदा उद्याची संध्याकाळ होते आणि़... आणि काय? तिथं गेल्यानंतर काय करायचं? काय बोलायचं? त्यानं काहीच ठरवलं नव्हतं. नव्हे, ते त्याच्या लक्षातच येत नव्हतं. उद्या सकाळी ठरवू, असं म्हणून तो झोपी गेला खरा, पण प्रत्यक्ष भेटीची वेळ होत आली तरी त्याच्या मनात गोंधळच होता. असं गोंधळलेल्या अवस्थेत आपण तिच्यासमोर काही वेड्यासारखं बोललो म्हणजे? आणि ती आपल्याला हसली म्हणजे? त्याला काहीच कळत नव्हतं. पण तरीही तिला भेटण्याचं प्रचंड औत्सुक्य होतं.
          संध्याकाळी पाचच्या सुमारास तो समुद्राकडे जाणाऱ्या वाटेनं चालला होता. पावलागणिक बाजूच्या इमारतींची रांग मागे हटत होती आणि समुद्राचा विस्तार त्याच्या नजरेत भरत होता. किती सुंदर होता तो! अगदी तिच्यासारखा! त्याच्या ह्रदयातली धडधड वाढत होती. तळहातांना घाम सुटला होता. छातीतल्या धडधडीमुळे त्याला आत्ताच दूरवरून धावून आल्यासारखं वाटू लागलं. ती आली असेल का? की मीच लवकर आलोय? त्यानं आसपास वळून पाहिलं. आज समुद्रावर बरीच गर्दी होती. या गर्दीत ती सापडेल? अचानक त्याच्या नजरेला काहीतरी ओळखीचं दिसलं. कदाचित ओढणी. तो त्या दिशेनं निघाला आणि अचानक थांबला.
          ती पाठमोरी बसली होती.


          घड्याळ्याच्या काट्यानं ‘पाच’चा टप्पा ओलांडला आणि तीची अस्वस्थता वाढली. मागे वळून तिनं किती वेळा पाहिलं असेल तिचं तिलाच ठाऊक! ही ओढ कशाला गं? अजून तर कशातच काही नाही. तिच्या मनानंच तिला म्हटलं आणि तिच्या ओठांवर हळूवार हसू उमटलं. अजून कसा आला नाही तो? असा विचार करत तिनं मान वळवली तर तो समोरच उभा. तिनं झटकन समोर पाहिलं. कसली तरी चोरी पकडली गेल्यासारखं वाटलं तिला. तो हळूच येऊन वाळूत तिच्याशेजारी बसला. थोडं अंतर ठेऊन.
          आता काय बोलायचं? दोघांच्या मनात एकच प्रश्न. सुरूवात करायला कुणीच धजत नव्हतं.
          दोघंही गप्प. अवघडून गेल्यासारखे. काय बोलावं ते सुचत नव्हतं. एकमेकांकडे पहायची पण चोरी.
          वेळ अशीच चालली होती.
          समोर पहुडलेल्या समुद्रात नवीन लाटा तयार होत होत्या. एक लाट तयार झाली किनाºयाकडे धाव घेत होती. ती काठावर पोहोचण्याआधीच तिच्यामागे आणखी एक नवी लाट तयार झालेली असायची. दोघंही समुद्राकडे टक लावून त्या लाटा पहात बसले होते. जणू त्यांच्या मनाचं प्रतिबिंबच समोर पडलं असावं. क्षीतीजावर पसरलेल्या आभाळाच्या पडद्यावर सांजरंग हळूवारपणे उतरू लागले होते. मधूनच एखादी पक्ष्यांची ओळ उडत जायची.
          ‘‘किनाऱ्यावर  दिसणारा फेसाळता समुद्र क्षीतीजाजवळ किती शांत दिसतो ना?’’ तो समुद्राकडे पहातच म्हणाला.
          तिनं चटकन त्याच्याकडे बघीतलं. तो असं काही म्हणेल याची तिला अपेक्षा नव्हती. पण तरीही तो जे म्हणाला ते तिला आवडलं होतं. समोर टक लावून पहाणारा त्याचा चेहरा तिनं क्षणभर न्याहाळला आणि ती पुन्हा समोर बघू लागली.
          ‘‘जेवढं आत जावं तेवढा तो प्रगल्भ होत गेलेला भासतो मला.’’ तो बोलत होता. ती ऐकत होती. मग बराच वेळ तो बोलत राहिला. समुद्राबद्दल, क्षीतीजाबद्दल, मावळतीच्या रंगांबद्दल. तिला खूप छान वाटत होतं ते ऐकायला. ती त्याच्या शब्दांना डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करत होती. समोर सूर्य क्षीताजाला स्पर्श करत होता. रंग अधिकच गडद होत चालले. लाटांचा शुभ्र रंग फिकट होऊ लागला. मोजक्या ठिकाणी चांदण्या नजरेस पडत होत्या.
          ‘‘निघू या?’’ त्यानं विचारलं. तिनं मान डोलावली. वाळूवर तळहात ठेऊन उठताना त्याचा तिच्या हातावर पडला. तिनं तो तसाच राहू दिला. केवळ मान वळवून त्याच्याकडे पाहिलं.
          फक्त काही क्षण गेले असतील. पण दोघांनाही खूप मोठा प्रवास करून परस्परांच्या जवळ आल्यासारखं वाटलं.


          दोघं किनाऱ्यावर उभं राहून पलिकडे बघत होते. सूर्य काही वेळातच पाण्याआड गेला असता. एक विरत चाललेली लाट त्यांच्या पायांवरून गेली. त्यानं डाव्या हातात एक गुलाब तिच्यासमोर धरला. लालबुंद पाकळ्यांचा टपोरा गुलाब. तिनं तेवढ्याच शांतपणे तो स्वीकारला. शरिरावरून वाºयाची एक गार झुळूक वहात गेली. तिनं हळूच त्याचा हात हातात घेतला. बोटात बोटं गुंफली. पाय नकळतपणे पुढं निघाले. आता आजूबाजूला वर्दळ नव्हती. कानांवर पडणारे आवाज नव्हते. सांज नव्हती की रात्र नव्हती. होत्या त्या केवळ नि:शब्द पाऊलखुणा!