वाट पाहूनी उशाशी निजेलाही निज आली
डोळीयाच्या कडेवर दिसे आकाशाची लाली
पहाटेचं प्रतिबिंब माझ्या गालावर दिसे
मी मावळत जाई ती तिथे हळूवार फुले
तिनं फुलायाच्या आधी मी आत डोकावून पाही
पांढ-यावरी ते काळं हळूच पसरत जाई
माझ्या शब्दांचा प्रवाह मला भिजवूनी टाकी
शब्दा फुटणारे भय मला थिजवून टाकी
आतून येणारा ओघ दाटल्या कंठाशी तो अडे
त्यांचा तणाव तो किती माझा आसमंत डळमळे
धूर कोंडूनच राही जरी दिली त्याला मी वाट
सोडवावी आता कशी मारलेली मीच गाठ?
बांध घालता घालता रात्र सरे सारी माझी
कसं सांगू माझं मन नाही कुंपणास राजी
कधी मिळेल का आकाश? मिळेल का कधी निवारा?
चातकालाही मिळाव्या कधी हव्याहव्याशा धारा!
डोळीयाच्या कडेवर दिसे आकाशाची लाली
पहाटेचं प्रतिबिंब माझ्या गालावर दिसे
मी मावळत जाई ती तिथे हळूवार फुले
तिनं फुलायाच्या आधी मी आत डोकावून पाही
पांढ-यावरी ते काळं हळूच पसरत जाई
माझ्या शब्दांचा प्रवाह मला भिजवूनी टाकी
शब्दा फुटणारे भय मला थिजवून टाकी
आतून येणारा ओघ दाटल्या कंठाशी तो अडे
त्यांचा तणाव तो किती माझा आसमंत डळमळे
धूर कोंडूनच राही जरी दिली त्याला मी वाट
सोडवावी आता कशी मारलेली मीच गाठ?
बांध घालता घालता रात्र सरे सारी माझी
कसं सांगू माझं मन नाही कुंपणास राजी
कधी मिळेल का आकाश? मिळेल का कधी निवारा?
चातकालाही मिळाव्या कधी हव्याहव्याशा धारा!
No comments:
Post a Comment