नखशिखान्त ओलाचिंब मी
अन् तू उभी आडोशाला तिथे
सर्वांग ओलावले माझे
आता तुझे कोरडे राहणे बरे नाही
डोळ्यांत तुझीया मी शोधता किनारा
तुझे ते पापण्या झुकवणे बरे नाही
मी बंध तोडून मुक्त होत असता
मला तुझे वचनांत बांधणे बरे नाही
वेचित असता मी तुझी आठवे
तुझे मला ते हटकणे बरे नाही
मी इथे धगधगतो क्षणाक्षणा
अन् तुझे विझून जाणे बरे नाही
उमलून येतो रोमारोमात मी
अन् तुझे मिटून जाणे ते बरे नाही
मी कणाकणांतून सांधता तुला
तुझे मला विखरून टाकणे बरे नाही
मज आस लागली विठ्ठलाची
निती कल्पनांचे जाच हे बरे नाही
श्वास तुझाही कोंडतो तिथे
तुझ्या श्वासात मी अडकणे हे बरे नाही
अन् तू उभी आडोशाला तिथे
सर्वांग ओलावले माझे
आता तुझे कोरडे राहणे बरे नाही
डोळ्यांत तुझीया मी शोधता किनारा
तुझे ते पापण्या झुकवणे बरे नाही
मी बंध तोडून मुक्त होत असता
मला तुझे वचनांत बांधणे बरे नाही
वेचित असता मी तुझी आठवे
तुझे मला ते हटकणे बरे नाही
मी इथे धगधगतो क्षणाक्षणा
अन् तुझे विझून जाणे बरे नाही
उमलून येतो रोमारोमात मी
अन् तुझे मिटून जाणे ते बरे नाही
मी कणाकणांतून सांधता तुला
तुझे मला विखरून टाकणे बरे नाही
मज आस लागली विठ्ठलाची
निती कल्पनांचे जाच हे बरे नाही
श्वास तुझाही कोंडतो तिथे
तुझ्या श्वासात मी अडकणे हे बरे नाही
नाम उरी जपता तुझे
तुझे ते नामानिराळे राहणे बरे नाही
अथांग पसरला हा दुरावा
तुझे आणखी दूर जाणे हे बरे नाही...
तुझे ते नामानिराळे राहणे बरे नाही
अथांग पसरला हा दुरावा
तुझे आणखी दूर जाणे हे बरे नाही...
No comments:
Post a Comment