आली आली पहा सर
अशी धावून धावून
माझं अवघडलंपण
गेलं वाहून वाहून
फुलं उमलली पहा
सांदी कोप-यामधून
त्यांचा गंध तो पसरे
अंगप्रत्यंगामधून
वादळाच्या सा-या छाया
गेल्या दूर त्या निघून
माझा आसमंत सारा
गेला मोकळा होऊन
चिंब भिजल्या तनाला
साथ भिजल्या मनाची
हितगुज करी मन
अंतरीच्या त्या घनाशी
घन निनादतो थोडा
त्याचाही निचरा होऊ दे
कधीतरी माझं रोप
समाधानानं न्हाऊ दे
नाही बोलावलं त्याला
तरीही धावून तो येतो
माझ्या अंतरीचं गुज
हळूच समजून घेतो
ओलसर त्या सरींनी
थबथबलेली वाट
अनवाणी मी चालतो
पुढे दिसेल का ती पहाट?
अशी धावून धावून
माझं अवघडलंपण
गेलं वाहून वाहून
फुलं उमलली पहा
सांदी कोप-यामधून
त्यांचा गंध तो पसरे
अंगप्रत्यंगामधून
वादळाच्या सा-या छाया
गेल्या दूर त्या निघून
माझा आसमंत सारा
गेला मोकळा होऊन
चिंब भिजल्या तनाला
साथ भिजल्या मनाची
हितगुज करी मन
अंतरीच्या त्या घनाशी
घन निनादतो थोडा
त्याचाही निचरा होऊ दे
कधीतरी माझं रोप
समाधानानं न्हाऊ दे
नाही बोलावलं त्याला
तरीही धावून तो येतो
माझ्या अंतरीचं गुज
हळूच समजून घेतो
ओलसर त्या सरींनी
थबथबलेली वाट
अनवाणी मी चालतो
पुढे दिसेल का ती पहाट?
No comments:
Post a Comment