माझीया डोळ्यास भासे
तू रोखल्या आसवांचा भार
त्या अव्यक्त शब्दांची धार
किती दुधारी सांगू कशी?
चमकत्या झिरमीर पडद्यांच्या आड
नांदते एकले दुःख माझे
पाहते निमूट स्वप्ने सुखाची
कसे सांगू तयास काय वाटे?
तव पावलांची चाहूल ती
मन वेडे थरारे पाण्यापरी
मनतरंगांच्या त्या लाटेवरी
मी वाहूनी चाललो कुठे?
कधी शांत, कधी मृदू, कधी मंद छाया
शब्दांनी तुझीया जी लाभली मला
ते क्षण कैसे चितारून ठेऊ?
जमतील का कधी ते कैद कराया?
दूरूनी गोजिरा दिसे
माझ्या नभीचा प्राण तो
स्पर्शू कसा भीती वाटे मला
डागाळेल का गं चांद तो?
मग चालशील का तु सवे?
तुझ्याच पसरल्या चांदण्यात
मी चाललो अंतापरी तरी
भागेल का तहान ती?
साकाळल्या अंधारातूनी
हे तेज कैसे पाझरे उरी?
डोकावूनी पाहे गाभ्यात मी
तू का दिसे ज्योतीपरी?
तू रोखल्या आसवांचा भार
त्या अव्यक्त शब्दांची धार
किती दुधारी सांगू कशी?
चमकत्या झिरमीर पडद्यांच्या आड
नांदते एकले दुःख माझे
पाहते निमूट स्वप्ने सुखाची
कसे सांगू तयास काय वाटे?
तव पावलांची चाहूल ती
मन वेडे थरारे पाण्यापरी
मनतरंगांच्या त्या लाटेवरी
मी वाहूनी चाललो कुठे?
कधी शांत, कधी मृदू, कधी मंद छाया
शब्दांनी तुझीया जी लाभली मला
ते क्षण कैसे चितारून ठेऊ?
जमतील का कधी ते कैद कराया?
दूरूनी गोजिरा दिसे
माझ्या नभीचा प्राण तो
स्पर्शू कसा भीती वाटे मला
डागाळेल का गं चांद तो?
मग चालशील का तु सवे?
तुझ्याच पसरल्या चांदण्यात
मी चाललो अंतापरी तरी
भागेल का तहान ती?
साकाळल्या अंधारातूनी
हे तेज कैसे पाझरे उरी?
डोकावूनी पाहे गाभ्यात मी
तू का दिसे ज्योतीपरी?
No comments:
Post a Comment