पिकलेली माणसं गमतीदार असतात...
शेजारच्या एक आजी (वय वर्षे पंच्याहत्तर) दुपारच्या वेळी काठी टेकत टेकत आमच्या घरात शिरल्या.
''काय रे आई कुठेय?'' - जाड भिंगाच्या चष्म्याआडून माझ्याकडे पाहात त्यांनी विचारलं.
(मी) - ''झोपलीय. आज जास्त चालणं झालं. थकलीय थोडी.''
मग थरथरणारी मान सावरत त्या म्हणाल्या, ''होsss? मग मी तिच्या पायाला बाम चोळून देऊ का?''
(त्यांच्या प्रेमळपणानं सुखावलेला मी) - ''नको नको... थोडा वेळ झोपेल तर बरं वाटेल तिला.''
मग आजींनी माझ्याकडे दुर्लक्ष करत आत खोलीत झोपलेल्या आईला थेट आवाज दिला.
''मम्मीsss ओ मम्मीsss'' (त्या माझ्या आईला मम्मीच म्हणतात.)
आई उठली. झोपमोड झाल्यामुळे आधी त्रासिक आणि मग आजींना पाहून सावरलेल्या आवाजात आईनं विचारलं. ''काय हो आई?''
''झोपलायत का तुम्ही?''
''हो. का हो?''
''काही नाही. मग मी जाते.''
मग आजी काठी टेकत टेकत निघून गेल्या...