किती वेळा मी तुझं असं दूर जाणं पहायचं?
किती वेळा मी असं वारंवार पोरकं होत जायचं?
हात धरलाच ना कधी तू माझा
कल्पनेत तरी कितीदा तू हात सोडवून पळायचं?
तुझ्या येण्याच्या आशेनं स्वप्नं रंगत गेली ती आपसूक
त्या हिरमुसल्या स्वप्नांना मी आता कसं समजवायचं?
तू घातलेले बांध रोज आडवे येतात मला
त्या बांधांना सावरत मी आता कसं जगायचं?
तुला न गुंतवण्याचं वचन देऊन फसलो मी
तुझी आस लावून बसल्या मनाला कसं फसवायचं?
तू पलिकडून चालत असशील माझ्यासोबत
या भ्रमात मी कुठपर्यंत एकटं चालायचं?

No comments:
Post a Comment