माझ्या मित्राचा, अभिषेकचा वाढदिवस होता. श्रृतीनं वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता सगळ्यांनी
कॉन्फरन्स कॉलवरून एकत्रितपणे अभिेषेकला शुभेच्छा देण्याची टूम काढली. आम्ही तयार झालो. प्रत्येकानं काहीना काही वेगळं करायचं ठरवलं. कुणी नाटकातला संवाद म्हणणार होतं, श्रृती त्याच्यासाठी बासरी वाजवणार होती. माझ्याकडे आलं कविता करण्याचं काम.
मुळात, असं ठरवून लिहिता येत नाही आणि न ठरवता लिहितो ते तितकं चांगलं असतं असंही नाही. पण मला तिला नाही म्हणता आलं नाही. रात्री अकरा वाजेपर्यंत शब्दही खरडला नव्हता. उगीच लिहायचं म्हणून काय लिहायचं? मनात आलं की श्रृतीला सरळ जमलं नाही म्हणून सांगावं. पण त्यांच्या उत्साहावर विरजण पडलं असतं असं वाटलं. मी काही (भले वेडंवाकडं) लिहिलं तरी अभिषेकला बरं वाटलं असतं. तो गोड मुलगा आहे. साधा-सरळ. कुणाच्या अध्यात ना मध्यात.
मग लिहायला बसलो.
लिहिलं ते वेडवाकडंच होतं. पण अभिषेकबद्दल जे वाटत होतं तेच लिहिलं.
असं म्हणतात
दूरून डोंगर साजरे असतात
पण तू जसा दूरून दिसलास
तसा जवळूनही असावास असं वाटतं
तू कधी शांत असतोस
कधी मिश्किल वागतोस
कधी विचारी भासतोस
तर कधी स्वप्नील असतोस
ना कुणाशी वाद कधी
ना कुणाला दुखावलंस कधी
ना दिसला तुझ्या चेह-यावर
कुणाबद्दल राग कधी
तू अविरत असाच रहावास
शांत, निश्चल, निर्गवी अन् प्रेमळ
तुझ्या आनंदाचा ठेवा
तू वाटावास सा-यांना
अन् बदल्यात तुला मिळावं
आयुष्यभराचं समाधान
स्वच्छ... नितळ... पारदर्शक
अगदी तुझ्यासारखं...

साधं होतं. पण त्यानं गोड मानून घेतलं.

No comments:
Post a Comment