का अडखळला शब्द तुझा?
का फेरला चेहरा असा?
तू इच्छिले मनी तसा
मी मार्ग माझा शोधीला!
तुजसवे समांतर चालू कसा?
वाट आडमुठी वळण घेते अशी
नको भेदाया रस्ता तुझा
मी मार्ग माझा सोडीला!
तो किनारा तू स्पर्शीला
अन् डोह बघ हा आटला
थेंबापुरी तृष्णा उरी
मन साद घाली पावसा
आठवांचे मेघ ते
डोईवरी दाटे पहा
मी तिष्ठलो युगेयुगे
वसंत माझा हरवला
का फेरला चेहरा असा?
तू इच्छिले मनी तसा
मी मार्ग माझा शोधीला!
तुजसवे समांतर चालू कसा?
वाट आडमुठी वळण घेते अशी
नको भेदाया रस्ता तुझा
मी मार्ग माझा सोडीला!
तो किनारा तू स्पर्शीला
अन् डोह बघ हा आटला
थेंबापुरी तृष्णा उरी
मन साद घाली पावसा
आठवांचे मेघ ते
डोईवरी दाटे पहा
मी तिष्ठलो युगेयुगे
वसंत माझा हरवला
No comments:
Post a Comment