माझी बाहेर पडायची वाट बंद झालीय
चिंचोळा रस्ता होता तो
खूप लहान पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा
आता तो बंद झालाय आणि मी आत कोंडला गेलोय
खिडक्यांच्या सापट्याही बुजवून टाकल्या आहेत
आत येणारा सूर्यप्रकाशही उंब-यावरच थांबलाय
मी काय करू आतमध्ये?
ओरडू?
किंचाळू?
आदळआपट करू?
धडका मारू का कवाडावर?
श्वास जोरजोरात येतोय आता
छाती भात्यासारखी वरखाली होतेय
कुणीतरी पार आतमधून ठोसे मारतंय जोरजोरात
हसतंयही आतून... मधेच रडण्याचाही आवाज येतोय
मला इथे करण्यासारखं काहीही नाही
या अंधारात करू तरी काय?
इथे राहण्याला जगणं म्हणत नाहीत. नुसतं जिवंत राहण्यास मला रस नाही.
माझ्या हातात तलवार लागली पाहिजे. सपासपा वार करायचेत मला. सापडेल त्याच्यावर. मीच सापडेन बहुधा माझ्या हातात. त्याला तर अजिबात सोडणार नाही. म्हणे मनसोक्त जगायचंय? बघतोच कसा जगतोय ते? गळाच आवळून टाकेन त्याचा. कोंडू दे श्वास जरा. जीव गेला तर मज्जाच. तलवारीने का कापू? त्यापेक्षा हातोड्याने ठेचेन. त्याहीपेक्षा दगड बरा. पार चेंदामेंदाच होईल. चेह-यापासून पार पायापर्यंत सगळ्याचाच. ठार नाही मारायचं. पण मरणाच्या उंब-यावर आणून सोडायचं. पार रक्तबंबाळ करून सोडायचा.
हवं ते करायचं काय? हवं तसं जगायचं? कातडीच सोलून काढतो. मग ढकलतो त्याला एका कोनाड्यात. सरपटत पुढे येतो काय? घालतोच हातोडे हातापायावर. आता कसा निपचित पडला कोप-यात!
आत फळ्यांच्या बाजूला फळ्या उभ्या करतो. ओंडक्यांच्या बाजूला ओंडके. भिंतींच्या बाजूंना भितीं. पार कोंडून टाकतो त्याला. हरामखोराच्या किंकाळ्या कानाचे पडदे फाडतायत. एकही फट ठेवणार नाही. गुदमरूदे चांगला. कुत्र्याला एवढा मारलाय तरीही कुठून जीव येतो ओरडायला? प्रकाशाची तिरीपही जाणार नाही आतमध्ये आता.
त्याची बाहेर पडायची वाट बंद झालीय...
बरं झालं

No comments:
Post a Comment