भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो,
तू मला शिकवली गीते
ते झरे चंद्र सजणांचे,
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया
त्यावेळी नाजूक भोळ्या
वा-याला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणु अंगी राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी
मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम
मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण
घालती निळाईत पाने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते
की परतायाची घाई
मेदुतून ढळली माझ्या
निष्पर्ण तरूंची राई
कवी - ग्रेस
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो,
तू मला शिकवली गीते
ते झरे चंद्र सजणांचे,
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया
त्यावेळी नाजूक भोळ्या
वा-याला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणु अंगी राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी
मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम
मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण
घालती निळाईत पाने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते
की परतायाची घाई
मेदुतून ढळली माझ्या
निष्पर्ण तरूंची राई
कवी - ग्रेस
काय सुरेख लिहिलंय ग्रेसने!
आत पाझरत जातंय सारं. एकटेपणातलं भय किती नेमकं चितारलंय इथे! त्यामागोमाग येणा-या आठवणींतून पुन्हा दाटून येणारं एकटेपणाचं भय. न तुटणारी साळखीच जणू.
सीता वनवासात असताना तिच्या अंगावर जर खरोखर राघवाचा शेला पडला असता तर? काय भाव उमटला असता बरं तिच्या मनी? किती आश्वस्त झाली असती ना ती! ते निबिड अरण्य, तो रावण, ते पहारेकरी, त्या दोघांतलं ते अंतर... सारं सारं काही क्षणात नाहीसं झालं असतं. मग तो शेला केवळ शेला राहिला नसता.
सीतेचा प्राण झाला असता तो!
तिच्या आयुष्याचा सोबतीही झाला असता तो.
त्या शेल्यात काय काय गुंफलं असतं तीने!
तिच्या भावना, तिची स्वप्नं, तिच्या अपेक्षा, तिचं जगणं, तिचं वाट पाहणं.
तिच्या प्रतिक्षेत त्यानेच तिला धीर दिला असता.
त्यानं डोळे पुसले असते तिचे.
तो नजरेआड झाला असता तर ती सैरभैर झाली असती.
जवळ असता तर निश्चिंत झाली असती.
हरवला असता तर जवळचं माणूस गेल्याप्रमाणं रडली असती.
माणसं अशीच जीव गुंतवत असतात ना! त्याला सीताही चुकली नसती.
तिच्या इंद्रियांनी गुणगुणलेलं दुःख कधी कुणाला ऐकू गेलं असेल का? ज्याच्यासाठी ते सारं होतं त्या रामाने तरी ऐकलं असेल का?
जीवाची काहीली झालेली असताना चांदण्या रात्रीत रामाला आठवताना ती चकोर झाली असेल ना? पण तृष्णा भागली असेल का तिची? काय केलं असेल मग तिनं?
तिनं भोगलेला वनवास माझ्या अंगावर काटा आणतो. तिच्या भोवतीचं अरण्य मला घेरतं चहुबाजूंनी. कोंडून टाकत जातं. आजूबाजूला उभ्या असलेल्या पहारेक-यांचे वटारलेले डोळे भिती घालतात मला. मनात असूनही मला इथून बाहेर पडता येत नाही.
माझ्या या वनवासाला अंत नाही, कारण माझा राम मला न्यायला येणार नाही.
वाट पाहण्याची अंतहीन धडपड उरलीय.
आणि राघवाचा शेलाही हरवलाय...

No comments:
Post a Comment