मी पहाटे तुला उठवायला आलो होतो
मिठीत निजलेली तू मोहक दिसत होतीस
बाहेर अजून उजाडायचं होतं
तुझी हालचाल करणारी बुबुळं
तुझ्या स्वप्नांची कथा सांगू पाहत होते
तू या कुशीवर वळलीस आणि मला सामोरी आलीस
तिथेच तुझ्या शेजारी तुझ्या चेह-यासमोर निजलो
मी इतक्या जवळून तुला प्रथमच पाहत होतो
मला तुझ्या श्वासांची लय ऐकू येत होती
त्यांची उब जाणवत होती
तुझा सहवास, तू जवळ असल्याची जाणिव किती वेगळी होती!
हात हातात घ्यावा का तुझा? मनाशी थोडावेळ हुज्जत घातली.
शेवटी मनानंच माघार घेतली. हात धरला तर सोडवेल काय?
मग तुझ्या विस्कटलेल्या बटा तुझ्या कानामागे सारल्या
तुला तसाच स्पर्श करून जागं करावं असा विचार केला...
फक्त विचार...
मी काय म्हणून तुला जागं करावं?
कोण मी तुझा? काय करतोय इथे?
मला उत्तरांची गरज नाही, पण तुला भासली तर कुठून देऊ?
मी नाही तर तो जागं करील... आपलीच समजूत...
तुझी झोप चाळवली गेली होती
मी माघारी फिरलो
दवबिंदू पडायची वेळ झाली होती...

No comments:
Post a Comment