तू घराबाहेर पडण्याची तयारी करत असशील
आणि माझं आभाळ भरून येत असेल
तू ''येते रे'' म्हणून उंब-याबाहेर पडशील
तेव्हा मी कोसळण्याच्या कड्यावर असेन
तू बाहेर पडशील
मी झेपावत येईन
हलकेच स्पर्श करेन तुझ्या कपाळाला
तू वर आभाळाकडे पाहशील
मी ओघळू लागेन
तुझ्या भुवयांना वळसा घालत
मी खाली येईन
जाताना मान वेळावून
मी डोळ्यात पाहिन तुझ्या
तुझे डोळे तेव्हा पर्समधला रुमाल शोधण्याची खटपट करत असतील
मी खट्टू होईन
पण तुला तो सापडणार नाही
मग तू हात उंचावशील तुझा
तुझ्या गालावरून हलकेच वाहताना
मी मंदावलेला असेन
तू चार बोटांनी पुसून टाकशील मग मला
चिंब भिजेन मी...
आता मला घाई असेल
पुन्हा आभाळात जाण्याची
पुढच्या पावसात
पुन्हा झेपावण्यासाठी...
आणि माझं आभाळ भरून येत असेल
तू ''येते रे'' म्हणून उंब-याबाहेर पडशील
तेव्हा मी कोसळण्याच्या कड्यावर असेन
तू बाहेर पडशील
मी झेपावत येईन
हलकेच स्पर्श करेन तुझ्या कपाळाला
तू वर आभाळाकडे पाहशील
मी ओघळू लागेन
तुझ्या भुवयांना वळसा घालत
मी खाली येईन
जाताना मान वेळावून
मी डोळ्यात पाहिन तुझ्या
तुझे डोळे तेव्हा पर्समधला रुमाल शोधण्याची खटपट करत असतील
मी खट्टू होईन
पण तुला तो सापडणार नाही
मग तू हात उंचावशील तुझा
तुझ्या गालावरून हलकेच वाहताना
मी मंदावलेला असेन
तू चार बोटांनी पुसून टाकशील मग मला
चिंब भिजेन मी...
आता मला घाई असेल
पुन्हा आभाळात जाण्याची
पुढच्या पावसात
पुन्हा झेपावण्यासाठी...

No comments:
Post a Comment