गडद रात्रीच्या गर्भात
खवळलेल्या समुद्राच्या काठावर
मी उभा असतो...
अशांत... अस्वस्थ... भळभळणारा!
माझ्या काळजातून वाहणारा पाट मला भिजवून चाललेला असतो
माझ्या डोक्यावर माझ्याच खुनाचा आळ असतो
मी पिंज-यात येऊन उभा राहतो
सभोवताली नजर फिरवतो
त्या सा-या खुर्च्यांवरच्या बसून मी पिंज-याकडे पाहत असतो
माझ्यावरचे सारे आरोप केव्हाच सिद्ध झालेले असतात
मला स्वतःला शिक्षा सुनावण्याची घाई झालेली असते
मी मूकपणे माझी बाजू मांडतो
जी ऐकण्यात कुणालाच रस नसतो
मलाही नाही
मला चाबकाच्या फटका-यांची शिक्षा सुनावली जाते
मी दयेची आर्जवं करतो
पण मला माझी दया येत नाही
मग करकचून दोर आवळून
मी ओढत नेतो स्वतःला... भर चौकात
दातओठ खात माझा हात चाबूक उगारतो
एक लाट गर्जत येते
अद्याप मला माझी चूक उमगलेली नसते
मी सपकारे ओढत असतो... सोसत असतो
चहुबाजूंनी बघणारे माझे डोळे भेदरलेले असतात
मी विद्ध होऊन कोसळतो
माझ्याच हातांनी मी आधार देतो स्वतःला
त्यांच्या साह्याने मी पावलं टाकत पुढे येतो
पुन्हा पिंज-यात येऊन उभा राहतो
नव्या शिक्षेसाठी सज्ज होतो...

No comments:
Post a Comment