किना-यानं स्वतःच्या हातानं होडी पाण्यात सोडली
म्हणाला, ''खूप विस्तरत जा. खूप मोठी हो. माझी पर्वा न करता''
आणि होडी निमूटपणे निघाली...
मनाविरूद्ध...
तिचा किनारा दूर जाऊ लागला
अनिवार ओढीनं तिनं मागं वळून पाहिलं
तर किना-यानं पाणी लोटून तिला पुन्हा दूर ढकललं
होडी पुन्हा पुढे निघाली...
तिला राहून राहून तो दिसत राहिला... नजरेआडही
त्याच्या सोबतीनं पाहिलेली संध्याकाळ आठवली
त्याच्या सोबतीचा पाऊस आठवला
जे अनुभवायचं राहून गेलं ते प्रकर्षानं आठवलं
तिच्यापुढे होता विस्तीर्ण समुद्र
आता तिला हवं तिथं जाता येणार होतं
हवं ते पादक्रांत करता येणार होतं
हवं ते मिळवता येणार होत
हवं ते? खरंच? मिळतं का कधी ते?
ती पुढे जात होती
तिला विश्वास होतो, की किनारा पाहतोय तिला
वादळात, भर समुद्रात, पावसात किंवा दुस-या किना-यावर
आपण कुठूनही दिसू त्याला...
फक्त तिला डोळे भरून पाहता येणार नाही त्याला... एवढंच!
रिकामी होडी कायम डुचमळत राहिल
समुद्रातून उसन्या बळावर जात राहिल
पाण्याच्या मध्यभागीही कोरडीच राहिल
तिचं अस्तित्व... तिचं बळं... तिचा ओलावा...
सारं सारं काही किना-यापाशी राहिलंय...
तिला राग आला त्या समुद्राचा
त्या आभाळाचा... त्या वा-याचा...
आणि स्वतःच्या आयुष्याचाही...
किनारा तिला विसरला तर ती कुणालाच माफ करणार नाही...
स्वतःला तर नाहीच नाही... कधीच नाही!
ए... तू विसरणार नाहीस ना मला?

No comments:
Post a Comment