तुझा मोग-याचा गजरा
कधीचा रुतून बसलाय मनात
हळूच उचलायला जावं तरी
आठवण भळाभळा वाहते
त्या गज-याच्या पाकळ्या विखुरल्या आहेत
माझ्या जाणिवेच्या पटलावर
त्यांना हलकेच सारशील का गं जरा बाजूला?
श्वास गुदमरतोय माझा!
तुला सुखावण्याचा एक क्षण
अवचितपणे हातातून निसटला माझ्या
वेळेच्या घड्याळातून वाळू कायमची निसटावी तशी...
मी कसा गं माफ करू स्वतःला?
त्या निसटल्या क्षणानं पेरलेली बाभळ
झपाट्यानं फोफावली आहे
त्यांच्या अगणित काट्यांवर मी झेपावत राहतो वारंवार
मोगरा अधिकच रुतत जातो आत
किती धावू त्या क्षणामागे? असे किती क्षण मी धरू?
ते क्षणच घेरतात मला एकट्याला
एका बोच-या वर्तुळात...
मी भांबावून जातो त्या गर्दीत... विद्ध होतो!
आणि तरीही...
मी तुझ्या येण्याच्या वाटेवर उभा असतो
सोबत मोग-याचा गंध असतो
तुझ्या पावलांची चाहूल असते
मोगरा उगीच फुलायला लागलेला असतो...
कधीचा रुतून बसलाय मनात
हळूच उचलायला जावं तरी
आठवण भळाभळा वाहते
त्या गज-याच्या पाकळ्या विखुरल्या आहेत
माझ्या जाणिवेच्या पटलावर
त्यांना हलकेच सारशील का गं जरा बाजूला?
श्वास गुदमरतोय माझा!
तुला सुखावण्याचा एक क्षण
अवचितपणे हातातून निसटला माझ्या
वेळेच्या घड्याळातून वाळू कायमची निसटावी तशी...
मी कसा गं माफ करू स्वतःला?
त्या निसटल्या क्षणानं पेरलेली बाभळ
झपाट्यानं फोफावली आहे
त्यांच्या अगणित काट्यांवर मी झेपावत राहतो वारंवार
मोगरा अधिकच रुतत जातो आत
किती धावू त्या क्षणामागे? असे किती क्षण मी धरू?
ते क्षणच घेरतात मला एकट्याला
एका बोच-या वर्तुळात...
मी भांबावून जातो त्या गर्दीत... विद्ध होतो!
आणि तरीही...
मी तुझ्या येण्याच्या वाटेवर उभा असतो
सोबत मोग-याचा गंध असतो
तुझ्या पावलांची चाहूल असते
मोगरा उगीच फुलायला लागलेला असतो...

No comments:
Post a Comment