अनवाणी चालत होतो... तुझ्या काठावरून
तुझ्या स्पंदनांची गाज ऐकत
तू हळूच स्पर्शून गेलीस माझ्या पावलांना
मला हवीहवीशी ओल मागे ठेऊन
उजवीकडे सुरूची बाग पसरत गेलेली
डावीकडे तू अथांग पहुडलेली
आणि मधोमध मी...
घरटं शोधणा-या पाखरासारखा... अस्वस्थ!
मी जेव्हा जेव्हा येतो ना तुझ्याजवळ
मला भरतं येतं आपसूकच
तुझ्या काठावर डोकं ठेऊन
निवांत पडावंसं वाटतं
मी माझ्याच आभाळाखाली चालत असतो
मंदपणे... तुझे समाधानी डोळे पाहत...
त्या प्रत्येक क्षणी तू भिनत जाते माझ्यात
अगदी समरसून एकरूप होतेस
तुझी ओढ वाटते म्हणून
एकदा झेप घेतली कड्यावरून
तर तू अगलद बाहेर काढलंस मला
तुझ्यावर रागवावं का नाही ते कधी कळलंच नाही...!
काठावरून तुझं आणि क्षितीजाचं मिलन
शांतचित्तानं पाहत बसतो मी
तुझी एक लाट माझ्यापर्यंत येत असते
मी आकंठ बुडत असतो
तुझ्या किना-यावर मी रेखाटलेले शब्द
कर्तव्यदक्ष लाटा येऊन मिटवून जातात
एकदा त्या परतीच्या लाटांवर
मला माझे शब्द ओझरते दिसले होते
हा किनारा माझा आहे
इथे माझ्याशिवाय कुणीही नसावं
ना काळ असावा, ना बेड्या असाव्यात
ना प्रश्न असावेत, ना उत्तर असावं
असावा केवळ एक उद्गार...!
माझ्या मनातून निघालेला
तुझ्या जाणिवेपर्यंत पोचलेला
तुला अंर्तबाह्य तृप्त करेल असा...
इथलं आभाळही माझं असावं
तो सूर्यही माझा असावा
तुही माझी असावीस
आणि मी?.....
मला ना शांतपणे चालायचंय तुझ्या काठानं
तू जेवढी पसरत गेली आहेस तिथपर्यंत
मला बोलायचंय खूप तुझ्याशी
पण शब्द हरवलेत कधीचे
मी फक्त चालू शकतो तुझ्या काठाने... समांतर असा!
मला चालू दे...!
तुझ्या स्पंदनांची गाज ऐकत
तू हळूच स्पर्शून गेलीस माझ्या पावलांना
मला हवीहवीशी ओल मागे ठेऊन
उजवीकडे सुरूची बाग पसरत गेलेली
डावीकडे तू अथांग पहुडलेली
आणि मधोमध मी...
घरटं शोधणा-या पाखरासारखा... अस्वस्थ!
मी जेव्हा जेव्हा येतो ना तुझ्याजवळ
मला भरतं येतं आपसूकच
तुझ्या काठावर डोकं ठेऊन
निवांत पडावंसं वाटतं
मी माझ्याच आभाळाखाली चालत असतो
मंदपणे... तुझे समाधानी डोळे पाहत...
त्या प्रत्येक क्षणी तू भिनत जाते माझ्यात
अगदी समरसून एकरूप होतेस
तुझी ओढ वाटते म्हणून
एकदा झेप घेतली कड्यावरून
तर तू अगलद बाहेर काढलंस मला
तुझ्यावर रागवावं का नाही ते कधी कळलंच नाही...!
काठावरून तुझं आणि क्षितीजाचं मिलन
शांतचित्तानं पाहत बसतो मी
तुझी एक लाट माझ्यापर्यंत येत असते
मी आकंठ बुडत असतो
तुझ्या किना-यावर मी रेखाटलेले शब्द
कर्तव्यदक्ष लाटा येऊन मिटवून जातात
एकदा त्या परतीच्या लाटांवर
मला माझे शब्द ओझरते दिसले होते
हा किनारा माझा आहे
इथे माझ्याशिवाय कुणीही नसावं
ना काळ असावा, ना बेड्या असाव्यात
ना प्रश्न असावेत, ना उत्तर असावं
असावा केवळ एक उद्गार...!
माझ्या मनातून निघालेला
तुझ्या जाणिवेपर्यंत पोचलेला
तुला अंर्तबाह्य तृप्त करेल असा...
इथलं आभाळही माझं असावं
तो सूर्यही माझा असावा
तुही माझी असावीस
आणि मी?.....
मला ना शांतपणे चालायचंय तुझ्या काठानं
तू जेवढी पसरत गेली आहेस तिथपर्यंत
मला बोलायचंय खूप तुझ्याशी
पण शब्द हरवलेत कधीचे
मी फक्त चालू शकतो तुझ्या काठाने... समांतर असा!
मला चालू दे...!

No comments:
Post a Comment