तू नभातले तारे माळलेस का तेव्हा?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
आज का तुला माझे एवढे रडू आले?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा?
हे तुझे मला वाचणे सुरू झाले...
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा?
बोलली मिठी माझी - 'दे प्रकाश थोडासा!'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा?
कालच्या वसंताला ठेवतेस का नावे;
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा?
चुंबिलास तू माझा शब्दशब्द एकांती,
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा?
- सुरेश भट
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
आज का तुला माझे एवढे रडू आले?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा?
हे तुझे मला वाचणे सुरू झाले...
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा?
बोलली मिठी माझी - 'दे प्रकाश थोडासा!'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा?
कालच्या वसंताला ठेवतेस का नावे;
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा?
चुंबिलास तू माझा शब्दशब्द एकांती,
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा?
- सुरेश भट
No comments:
Post a Comment