काय होशील तू माझ्यासाठी?
तू सूर्य हो
मी तुझी पृथ्वी होतो
तू तळपत राहा
मी तुझ्याभोवती फिरतो
तू वारा हो
मी आग होतो
तू वाहत रहा
मी जळत राहतो
तू किनारा हो
मी तुझी लाट होतो
तू तटस्थ रहा
मी झेपावत राहतो
तू चंद्र हो
मी तुझी रोहिणी होतो
तू नभात डौलात रहा
मी तुला न्याहाळत राहतो
पण ठाऊक आहे मला
तू यातलं काहीच होणार नाहीस
मग फक्त एक विनंती मान्य कर...
तू माझी कृष्ण होऊन जा
मला होऊ दे तुझी मीरा
तू फक्त निश्चल रहा दगडासारखी
मला तुझ्याशी एकरूप होऊ दे जरा
चालेल मला माझं स्वत्व हरवणं
परमात्म्याशी जोडला जाऊ दे मला
चालेल मला तुझ्या चराचरात सामावणं
क्षणभरासाठी तरी अमर होऊ दे मला...
तू सूर्य हो
मी तुझी पृथ्वी होतो
तू तळपत राहा
मी तुझ्याभोवती फिरतो
तू वारा हो
मी आग होतो
तू वाहत रहा
मी जळत राहतो
तू किनारा हो
मी तुझी लाट होतो
तू तटस्थ रहा
मी झेपावत राहतो
तू चंद्र हो
मी तुझी रोहिणी होतो
तू नभात डौलात रहा
मी तुला न्याहाळत राहतो
पण ठाऊक आहे मला
तू यातलं काहीच होणार नाहीस
मग फक्त एक विनंती मान्य कर...
तू माझी कृष्ण होऊन जा
मला होऊ दे तुझी मीरा
तू फक्त निश्चल रहा दगडासारखी
मला तुझ्याशी एकरूप होऊ दे जरा
चालेल मला माझं स्वत्व हरवणं
परमात्म्याशी जोडला जाऊ दे मला
चालेल मला तुझ्या चराचरात सामावणं
क्षणभरासाठी तरी अमर होऊ दे मला...

No comments:
Post a Comment