सवयी नाहीत वर्तनाच्या अधिन
त्या भाग असतात अायुष्याचा
चांगल्या-वाईट-कशाही असोत
त्या हव्या असतात सोबत सदा
कधी त्रास होतो त्यांचा
कधी अानंद होतो
पण त्यांना वेगळं नाही करता येत
त्या भिनलेल्या असतात अापल्यामध्ये
एखाद्या व्यसनाप्रमाणे...
कुणी सांगतं अापल्याला
सोड ती संगत, सावर स्वत:ला
पण सगळंच कुठं हातात असतं अापल्या?
सवयींच्या पायी अायुष्याची साठी तरी,
किंवा माती तरी...
रात्री जागतात
दिवस कुजतात
अाणि अापण?
रूतत जातो खोलवर
सवय जिवंत असते
ती बोलते-रागावते-समजावते
अनेकदा रागावून दूरही निघून जाते
बस्स! अापल्यापासून वेगळी होत नाही
सवयी दूर होत नसतातच कधी
त्या माणसाच्या सोबतच राहतात...
राहाव्यात!
पार मरेपर्यंत...
तुम्हाला माहितीए का?
माणसांचीही सवय होते...
त्या भाग असतात अायुष्याचा
चांगल्या-वाईट-कशाही असोत
त्या हव्या असतात सोबत सदा
कधी त्रास होतो त्यांचा
कधी अानंद होतो
पण त्यांना वेगळं नाही करता येत
त्या भिनलेल्या असतात अापल्यामध्ये
एखाद्या व्यसनाप्रमाणे...
कुणी सांगतं अापल्याला
सोड ती संगत, सावर स्वत:ला
पण सगळंच कुठं हातात असतं अापल्या?
सवयींच्या पायी अायुष्याची साठी तरी,
किंवा माती तरी...
रात्री जागतात
दिवस कुजतात
अाणि अापण?
रूतत जातो खोलवर
सवय जिवंत असते
ती बोलते-रागावते-समजावते
अनेकदा रागावून दूरही निघून जाते
बस्स! अापल्यापासून वेगळी होत नाही
सवयी दूर होत नसतातच कधी
त्या माणसाच्या सोबतच राहतात...
राहाव्यात!
पार मरेपर्यंत...
तुम्हाला माहितीए का?
माणसांचीही सवय होते...
No comments:
Post a Comment