Thursday, May 17, 2018

स्वच्छंद

ओलेती सांज वेळ
तू भिजली थिजली
मी अधिर अबोल
मन कातर कातर

मी धरीता पदर
तुझा थरारे तो अधर
मन भ्यालेलं बावरं
क्षण मुकाट मुकाट

नदीकाठचा प्रकाश
गेला सरत सरत
तुझ्या समिप मी अालो
गेलो जळत जळत

तुझ्या श्वासाची ती लय
जीव गुंतला गुंतला
तुझ्या ओठाचा तो तिळ
या ओठी रूतला रूतला

तुझ्या गाली पडे खळी
नभी अानंद अानंद
तुझ्या पिंजऱ्यातही हे
मन स्वच्छंद स्वच्छंद!

No comments:

Post a Comment