अंधाराचे पाट वाहत वाहत
येऊन भिडले मला
रोमरोम भिजत गेला
अाणि सोबत हरेक भावना... स्वप्न... विचार...
मग पाझरला तो अंधार पार अातपर्यंत
अंगप्रत्यंगाच्या कानाकोपऱ्यात पोचला
त्यानं कमरेवर हात ठेऊन पाहिलं अाजूबाजूला
निष्प्राण साम्राज्य पसरलेलं होतं सर्वत्र
तो हसला!
सावकाश पुढे सरकला
दाटू लागला, साकळू लागला
हाडामांसावर अंधाराचं पाणी चढलं
ती ठिसूळ झाली, सडत गेली
त्याची हवेत लवलवणारी मुळं
सपाटून झेपावत गेली
नखं रूतली, विष भिनलं
नाड्या सुकल्या, जीवनरस अाटला
चेतना गुदमरली, गर्भ कुजला...
काळीठिक्कार झाली
बीजाला पोटात घेणारी जमीन
ती सगळी बाळं खुंटल्या रस्त्यावर बसून राहिली
अनाथ चेहऱ्यानं
अाता सर्वत्र काळंशार जग पसरलं
अाणि त्यातून अंधार दिमाखानं चालत राहिला
तुडवत, चेचत, कुटत...
त्यातून निघणारा उरलासुरला रस वाहत राहिला
रस्त्यावर बेवारस कुत्र्याचं रक्त वाहतं तसं
एक हाक ऐकू अाली
कुणातरी बीजाची
ते अावाज देत होतं
मेलेल्या, झडून गेलेल्या जमिनीला
त्याची साद अंधाराला घाबरून गुंजत राहिली
छोटंसं बीज थकलं, दमलं
बोटानं हळूच माती उकरत राहिलं
तिकडे अंधार वर चढत गेला... खूप वर
अाणि इकडे...
छोटसं बीज हसलं
जमिनीचा डोळा किलकिला झाला होता...
येऊन भिडले मला
रोमरोम भिजत गेला
अाणि सोबत हरेक भावना... स्वप्न... विचार...
मग पाझरला तो अंधार पार अातपर्यंत
अंगप्रत्यंगाच्या कानाकोपऱ्यात पोचला
त्यानं कमरेवर हात ठेऊन पाहिलं अाजूबाजूला
निष्प्राण साम्राज्य पसरलेलं होतं सर्वत्र
तो हसला!
सावकाश पुढे सरकला
दाटू लागला, साकळू लागला
हाडामांसावर अंधाराचं पाणी चढलं
ती ठिसूळ झाली, सडत गेली
त्याची हवेत लवलवणारी मुळं
सपाटून झेपावत गेली
नखं रूतली, विष भिनलं
नाड्या सुकल्या, जीवनरस अाटला
चेतना गुदमरली, गर्भ कुजला...
काळीठिक्कार झाली
बीजाला पोटात घेणारी जमीन
ती सगळी बाळं खुंटल्या रस्त्यावर बसून राहिली
अनाथ चेहऱ्यानं
अाता सर्वत्र काळंशार जग पसरलं
अाणि त्यातून अंधार दिमाखानं चालत राहिला
तुडवत, चेचत, कुटत...
त्यातून निघणारा उरलासुरला रस वाहत राहिला
रस्त्यावर बेवारस कुत्र्याचं रक्त वाहतं तसं
एक हाक ऐकू अाली
कुणातरी बीजाची
ते अावाज देत होतं
मेलेल्या, झडून गेलेल्या जमिनीला
त्याची साद अंधाराला घाबरून गुंजत राहिली
छोटंसं बीज थकलं, दमलं
बोटानं हळूच माती उकरत राहिलं
तिकडे अंधार वर चढत गेला... खूप वर
अाणि इकडे...
छोटसं बीज हसलं
जमिनीचा डोळा किलकिला झाला होता...
No comments:
Post a Comment