Tuesday, June 14, 2011

बस... भिजावसं वाटतं

त्‍यानं बरसावं आणि मी हरखावं हे आता नेहमीचंच झालंय
माझी त्‍याच्‍याशी कसली नाळ जोडलीय कळतंच नाही
बस... तो आला की मनसोक्‍त भिजावसंच वाटतं
त्‍याचं काहीतरी स्‍वतःमध्‍ये पाझरू द्यावं
नाहीतर माझं काहीतरी त्‍यात सामावून जावं
असं काहीतरी...
 

No comments:

Post a Comment