Sunday, May 29, 2011

दंड

नाही पडले ते शब्‍द कानी
जरी होता त्‍यांचा अधिकार तो
ना उमगले तिला, ना उमगले मला
अंतरीच्‍या इच्‍छेचा उद्गार तो

आपल्‍याच गतीनं ती येत असता
मी निघूनी गेलो वा-यापरी
तो वेग जाहला शत्रु माझा
अजाण वेदना ही दाटे उरी

समुद्रकिनारी उभे वाळूचे किल्‍ले
आत्‍ममग्‍नतेत का तोडीले मी?
उरलेला वाळूचा ढीग असे,
का माझी स्‍वतःची राख ती

न जाणे बरसली असतील किती
हतबल अश्रूंची टिपे ओंजळीत त्‍या...
मी शांत पहुडलो पुनव चांदण्‍यात
तिथे जागल्‍या काळोख्‍या रात्री तिच्‍या

काय हरपले काय निसटले
उगाच मला ती जाण आली
अज्ञात अंधारातच सुखी होतो
या जाणिवांनी वेदना बहाल केली

का उठावी त्‍या उरीची
वेदना माझ्या इथे
हा दंड असे माझ्या चुकांचा
जो श्‍वासान्‍तापरी ना फिटे...!

No comments:

Post a Comment