एकांत पायवाटेवर
भुरूभुरू पाऊस पडतोय,
पावलांच्या दोन रांगा
आपल्या दोघांमागे चालत येतायत
निःशब्दपणे...
आभाळ दाटलंय माथ्यावर
आसमंत अंधारुन आलाय
रानातून वारा वाहतोय
अंगावर शहारे उठवत...
हातात गुंफलेली तुझी बोटं
अधिक घट्ट होऊन जातात
मग हळूच बिलगतेस तू मला
झाडाला वेल बिलगावी तशी...
ओलेत्यानं चालतोय आपण
पावसाचा आल्हादक नाद ऐकत
डोक्यावर पडणा-या सरी
आता रंध्रा-रंध्रातून कोसळतातय...
एक जांभुळ घेतला मागून
झाडाकडून तुझ्यासाठी
त्याचा जर्द रंग ओठांवर पसरतोय तुझ्या
मला हेवा वाटतोय त्या जांभळाचा...
रानात सुटलेला मंद सुगंध
मातीचा का तुझ्या सोबतीचा... ते समजत नाही
तुझ्या डोळ्यांत दाटलेलं हे आपलेपण
मनाशी काय हितगुज करत तेच कळत नाही
मागे वळून पाहिलं तर
वाट झाडाआड दिसेनाशी झालेली
अन् पुढची वाट वरून कोसळणा-या
पावसात हरवलेली...
मी भिजत भिजतच
हलकेच हात हातात घेतो तुझा
आणि चालू लागतो त्या ओल्या वाटेवर
माझा पाऊस सोबत घेऊन...
भुरूभुरू पाऊस पडतोय,
पावलांच्या दोन रांगा
आपल्या दोघांमागे चालत येतायत
निःशब्दपणे...
आभाळ दाटलंय माथ्यावर
आसमंत अंधारुन आलाय
रानातून वारा वाहतोय
अंगावर शहारे उठवत...
हातात गुंफलेली तुझी बोटं
अधिक घट्ट होऊन जातात
मग हळूच बिलगतेस तू मला
झाडाला वेल बिलगावी तशी...
ओलेत्यानं चालतोय आपण
पावसाचा आल्हादक नाद ऐकत
डोक्यावर पडणा-या सरी
आता रंध्रा-रंध्रातून कोसळतातय...
एक जांभुळ घेतला मागून
झाडाकडून तुझ्यासाठी
त्याचा जर्द रंग ओठांवर पसरतोय तुझ्या
मला हेवा वाटतोय त्या जांभळाचा...
रानात सुटलेला मंद सुगंध
मातीचा का तुझ्या सोबतीचा... ते समजत नाही
तुझ्या डोळ्यांत दाटलेलं हे आपलेपण
मनाशी काय हितगुज करत तेच कळत नाही
मागे वळून पाहिलं तर
वाट झाडाआड दिसेनाशी झालेली
अन् पुढची वाट वरून कोसळणा-या
पावसात हरवलेली...
मी भिजत भिजतच
हलकेच हात हातात घेतो तुझा
आणि चालू लागतो त्या ओल्या वाटेवर
माझा पाऊस सोबत घेऊन...


No comments:
Post a Comment