Monday, June 13, 2011

सहजचं...

पावसाच्‍या आडोशाला कितीतरी पाखरं
उमळलेली मनं आणि अधरांना भरलेली कापरं
अनावर इच्‍छा, पण अडखळतात पाय
मनावर आपसूक येते अपेक्षांची साय

अपेक्षांचे हट्ट तर नेहमीचेच असतात
त्‍यांनी रंगवलेली स्‍वप्‍नं मनाशी बिलगतात
मग त्‍या स्‍वप्‍नांच्‍या मागे धावत रहायचं
नाही झाली पूर्ण तर, सांजरंगांपर्यंत कुरवाळायचं

1 comment: