Wednesday, February 4, 2026

सांग...

सांग,
तुझ्या मनापर्यंत कसं पोचू?

कसं पोचवू मनातलं वादळ?
हा सोसाट्याचा वारा, हे भूकंप, उल्कापात...
कसे दाखवू तुला पहाटेचे भावरंग?
निळंशार दवबिंदू, उमळून येणारा झरा,
आणि,
तुझ्या आठवणीच्या घुमटाखाली पसरणारी
अथांग जीवघेणी चांदरात...

तुझ्यासाठी गोळा केलेली
आभाळभर माया
तुझ्या बंद दाराच्या उंबऱ्यावर
एकली उसासत पडलीय

जीवा, हाक देतोय
साद दे

No comments:

Post a Comment