गोंधळ, आक्रोश, अतिव अस्वस्थता, जीवाची तगमग,
पोटा-छातीपासूनची ओढाताण,
आणि
चांगल्या-वाईटाच्या टोकांमध्ये
हेलकावे खाणारं भयकंपीत मन
या सगळ्यातून पुढे आल्यानंतर ए रुमी,
मला कळतंय रे
त्या पाखराचं झंकारलेलं मन
दिव्यात सामावण्यासाठीची ती अतोनात धडपड
रोमारोमात भिनलेली अनिवार ओढ हा वेडेपणा नाहीए
जीवानं जीवासाठी दिलेली हाक आहे ती
मिलनाची, मुक्ततेची...
प्रयत्न, परिणाम, जीवन, मृत्यू,
भय अन् शंका
या साऱ्याच्याच पार घेऊन जाणारी
ती हाक ऐकू येतेय मला
आणि दिसतोय,
तुझ्या प्रेमसागराचा पैलतीर
No comments:
Post a Comment