आज आम्ही 'बुकशेल्फ'वर नवी मालिका सुरू केली. - 'पुस्तकातून पडद्यावर'!
आम्ही त्यात पुस्तक आणि सिनेमा यांसंबंधीचे व्हिडीअो प्रसिद्ध करणार आहोत. आम्ही त्या मालिकेचा पहिला भाग इरफान खानला समर्पित केला. त्याच्या सिनेमांचा पुस्तकांशी ठळक संबंध आहे. नेमसेक, मकबूल, स्लमडॉग... यादी तशी मोठी आहे.
मालिकेतला पहिला भाग तयार करायचा होता. फुटेज लागणार होतं. इरफानचे पंधरा एक सिनेमे डाऊनलोड केले. त्याचा 'दी नेमसेक' पाहायचा राहून गेला होता. तो पाहिला. एडिट करताना सिनेमे पाहिले. मग एडिट बाजूला ठेऊन पाहिले. पहाटेपर्यंत... पुस्तकांवरच्या सिनेमांमध्ये बऱ्याच गोष्टी वेळेअभावी दिग्दर्शकाला दाखवता येत नाहीत. पण त्याला पुस्तकातला Between the lines चा भाग पडद्यावर चितारता येत असतो. 'दी नेमसेक' पाहताना इरफान एअरपोर्टवर तब्बूचा दूरून निरोप घेतो असं एक दृश्य आहे. इरफानने खूप सहज केलंय ते! खूऽप म्हणजे खूऽऽपच सहज केलंय! इतकं सहज-साधं काहीतरी घेऊन येण्यासाठी आतल्या आत किती झगडावं लागलं असेल! इरफानची ती लहानशी हरकत पाहताना जीव छातीत असा दाटून येतो. शब्दांच्या अधलं-मधलं जे काही असतं ना ते हेच असावं! मोहात पडलो त्याच्या! ते दृश्य 'बुकशेल्फ'वर इरफानचा व्हिडीअो तयार करताना ठेवलंय मी त्यात. त्याला अर्थ देण्याचा लहानसा प्रयत्न करत...
इरफानचे डायलॉग कमाल असायचे! कधी त्याच्या सहजतेमुळे, कधी त्यातल्या गर्भीत-गंभीर अर्थामुळे. पण मला इरफान सर्वात जास्त आवडतो, तो त्याच्या दोन डायलॉगच्या मधल्या जागेत... एक वाक्य उच्चारल्यानंतर दुसऱ्या वाक्याकडे वळायच्या आधी त्याची नजर, कपाळावरच्या रेषा, ओठांची निःशब्द हालचाल हे असं सगळं मिळून तो काहीतरी करतो. आतमध्ये ढवळणारं, फुलणारं, खदखदणारं सगळं त्याच्या त्वचेतून पाझरत बाहेर येतं. 'मकबूल'मध्ये इरफान बोलला कुठे? तो सगळा सिनेमा त्याच्या आत चाललेल्या घुसळणीचा होता. त्याउलट 'पान सिंग तोमर'मध्ये त्याच्या वाट्याला कितीतरी संवाद आलेत, पण त्या आडून परिस्थितीच्या रगाड्यात अडकून-पिचून गेलेलं त्याचं स्वप्नं सतत डोकावतं. संवादांना स्पर्श न करता आतली खळबळ, आनंद, खट्याळपणा, द्वंद्व... सगळं मांडता यायचं त्याला. साहित्यात 'बिट्वीन दी लाईन्स' ही वाचकासाठीची जागा असते. सिनेमात तसं प्रेक्षकासाठी 'बिट्वीन दी फ्रेम्स' असावं. इरफान प्रेक्षकासाठी त्या जागा तयार करायचा. प्रेक्षकालाही त्या कळायच्या. त्या कळण्या-उमजण्याच्या घडामोडीत तो अभिनेता आपलासा होऊन जायचा. इरफाननं मनात घर केलं ते अशा लहान लहान जागांनी. आता तो नाही तर ते घर अंगावर येतं...
'दी नेमसेक'मधला, दूर चाललेला, सहजपणे रांगेमध्ये उभा असलेला, अगदी अलगद निरोप घेणारा तो इरफान अजूनही डोक्यातून जात नाही...
इरफान... बिट्वीन दी लाईन्स!

No comments:
Post a Comment