गात्रं गेली थकून सारी
मज सावराया येशील का?
पाय डगमगता वाटेवरी
हा हात हाती घेशील का?
मी कोरडा भासे मला
सारे पाणवठे सुकले कसे?
फुंकण्या जीव या मनी
माझ्यात तू पाझरशील का?
हाती धरिला जो कुंचला
तू रंग त्याचा होशील का?
होवोनी चित्र मज वेडीयाचे
अवतीर्ण तू होशील का?
मी चुंबिल्या बासरीतूनी
मधुतान होवून उमटशील का?
सुरावटीच्या वृक्षापरी
मनअंगणी बहरशील का?
प्रातःकाली अलगदपणे
प्राजक्त येतो ओंजळीत या
त्या फुलांच्या गंधातूनी
आसमंत माझा व्यापशील का?
उमलून जाईल हे भावफूल
रात्रीच्या अंधःकारी कधी
तू ओलेती दवबिंदूपरी
मज एकदा स्पर्शशील का?
मज सावराया येशील का?
पाय डगमगता वाटेवरी
हा हात हाती घेशील का?
मी कोरडा भासे मला
सारे पाणवठे सुकले कसे?
फुंकण्या जीव या मनी
माझ्यात तू पाझरशील का?
हाती धरिला जो कुंचला
तू रंग त्याचा होशील का?
होवोनी चित्र मज वेडीयाचे
अवतीर्ण तू होशील का?
मी चुंबिल्या बासरीतूनी
मधुतान होवून उमटशील का?
सुरावटीच्या वृक्षापरी
मनअंगणी बहरशील का?
प्रातःकाली अलगदपणे
प्राजक्त येतो ओंजळीत या
त्या फुलांच्या गंधातूनी
आसमंत माझा व्यापशील का?
उमलून जाईल हे भावफूल
रात्रीच्या अंधःकारी कधी
तू ओलेती दवबिंदूपरी
मज एकदा स्पर्शशील का?
No comments:
Post a Comment