तिच्या नुसत्या चाहुलीनं भ्रमर गुंगुनी हे गेले
रान आकाश आकाश भव्य फुलोरा त्याचा
मन सोनुलं सोनुलं वारा विसावे हा आता
सई जाऊ त्या पल्याड पायवाटा ओलांडून
सूर्यास्त हा गोजिरा गेली सई मोहरुन
जाऊ चालत जाऊ निःशब्द याच देखण्या वाटेवरुनी
ये मनोहर छान सुगंध वाटेवरल्या फुलाफुलातूनी
जीवनातूनी येई बहर असा, जीवनातूनीअशी लहर फुले
बंध हे रेशमी ऐसे किती दिसांचे दिसांचे
कुणी तोडता तुटेना तुझ्या नी माझ्या संगतीचे
रान हे उठले उठले मुक्त आभाळ झाले
तिच्या नुसत्या चाहुलीनं भ्रमर गुंगुनी हे गेले
रान आकाश आकाश भव्य फुलोरा त्याचा
मन सोनुलं सोनुलं वारा विसावे हा आता
सई जाऊ त्या पल्याड पायवाटा ओलांडून
सूर्यास्त हा गोजिरा गेली सई मोहरुन
चित्रपट - उत्तरायण
गीतकार - कौस्तुभ सावरकर
गायक - रविंद्र साठे
No comments:
Post a Comment