तुला कल्पना नाही, पण
मला जिंकून घेणं, तुला खूप सोपं होतं!
एक प्रेमाचा शब्द
आश्वस्त करणारा स्पर्श
थोडासा लळा
थोडासा जिव्हाळा
बस्स!
इतकंच मागणं होतं.
एक आख्खं माणूस तुझं होऊन गेलं असतं.
कायमचं!
आणि तू?
प्रेमात जिंकणं-हरणं असं काही असतं
अशा क्लिशेड सुविचारांच्या जाळ्यात
तू मला कायमचं गमावून बसलीस!
No comments:
Post a Comment